देव भक्त

Submitted by पुरंदरे शशांक on 18 July, 2017 - 23:23

देव भक्त

पहाटेस झाडलोट
सडा घालूनी अंगणी
रखुमाई लगबगी
शेण्या लाविते चुल्हाणी

पाणी अाणी कावडीने
धारा काढी अावडीने
विठू हरखे अंतरी
संतसंगाच्या ओढीने

दिंडी येता पंढरीस
विठू धावला वेशीत
प्रेम भक्तांचे अद्भुत
ओढी संतांना कुशीत

देवसंतांचे मिळणी
येत भाविका उधाण
गेला गेला जीवभाव
एकमेका लोटांगण

भक्तीसुखे लोभावला
देवे त्यागिले वैकुंठ
युगे अठ्ठाविस उभा
भक्तांलागी तो तिष्ठत...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा!
विट्ठल भक्ता भेटी धावले !
देव-भक्त हे द्वैतचि नुरले

संपूर्ण काव्य भक्तीतले निखळ सौंदर्य अतिशय चफकलतेने उभे करतेच पण देवाला भक्ता सारखा करण्यातले कसब औरच . मला खूप आवडले .
पहाटेस झाडलोट
सडा घालूनी अंगणी
रखुमाई लगबगी
शेण्या लाविते चुल्हाणी
पाणी अाणी कावडीने
धारा काढी अावडीने
विठू हरखे अंतरी
संतसंगाच्या ओढीने
अप्रतिमच !
निवडक १० चे बंधन वाढवावे लागेल ॲडमिनला .

वाह

देव भक्त असे द्वैत अद्वयत्व न खंडिता
दाखवी देव देवेशा प्रार्थना ही तुला अता ।।
.......स्वामी स्वरूपानंद, पांवस.

______/\_____

Back to top