आम्ही सारे नवशिके !!!!!!

Submitted by अतरंगी on 15 July, 2017 - 05:28

लोकांच्या मते एक वय असतं उत्साहाचं, उमेदीचं, काहीतरी शिकण्याचं, करून दाखवण्याचं........ त्या मताला कधीही काडीमात्र सुद्धा किंमत देऊ नये. Wink

पण कॉलेज संपलं, नोकरी लागली, लग्न संसार यात अडकलं की नवीन काहीतरी शिकण्याचा, करण्याचा उत्साह कमी होत जातो. वय, वेळ, affordability, संकोच, संसाराच्या जबाबदाऱ्या, लोकांच्या नजरा/टोमणे.... एक ना अनेक कारणं....

अरे आता या वयात कुठं जाऊ गाडी शिकायला?

अरे पण वेळ कुठंय? मुलांच्या शाळा, माझा जॉब, घराची कामं, जाणार कधी?

अरे आता या वर्षी नाही जमणार, पैशांचं shortage आहे.

हे बघ हे येडं आता या वयात चाललंय शिकायला, ये इथं दोन पेग मार तुला बसल्या बसल्या सगळं शिकवतो.

अरे आपलं वय काय? येड्यात काढतील लोकं...

लेह लडाख बाईक वर करायचं होतं यार, राहून गेलं.

सगळे म्हणतात रे आवाज बरा आहे माझा, पण आता कुठं गाण्याचा क्लास वगैरे लावत बसू, जाऊ दे मरू दे.

घरच्यांच्या नादाने नोकरीत पडलो पण मला खरं तर बिझनेसच करायचा होता

सगळे मित्र मैत्रिणींकडून, बहीण भावांकडून ऐकू येणारे नेहमीचे डायलॉग. एका ठराविक काळानंतर काही इच्छा, प्लॅन फक्त मनात राहतात, करायचे होते पण जमले नाही या कॅटेगरीत ढकलले जातात.

तरीपण या सगळ्यांवर मात करत काही जण जे राहून गेलं ते करायचा, शिकायचा प्रयत्न करतात. आयुष्याच्या एका वळणावर येऊन परत नवीन काहीतरी शिकायचा आनंद, काहीतरी मिळवल्याचं फिलिंग फारच मस्तच असते. शिवाय आपल्या कामाच्या रगाड्यातून, रोजच्या कंटाळवाण्या शेड्युल मधून एक ब्रेक मिळतो, आयुष्याचा एकसुरीपणा कमी होतो. आपल्याला हे करायचं होतं, शिकायचं होतं, राहून गेलं ही हुरहूर कमी होते, बकेट लिस्ट मधल्या एखाद्या गोष्टीवर टिक मार्क होतं Happy

बोअरिंग आणि मोनोटोनस आयुष्यावर बेस्ट उपाय म्हणजे काहीतरी नवीन करायला, शिकायला घ्या. तुम्हाला ज्या गोष्टीतून आनंद मिळतो ती काही थोडा वेळ का होईना करा.....

तुम्हाला आता नवीन काही शिकायचे असेल, करायचे असेल, जुनेच अर्धवट राहिलेले परत सुरू करून पूर्ण करायचे असेल तर इथे लिहा, आपल्याला एकमेकांना प्रोत्साहन देता येईल Happy

तुम्ही लेटेस्ट काही केले असेल तरी इथे जरूर लिहा, बाकीच्यांना थोडी प्रेरणा मिळेल. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी सध्यातच बॉलीवूड डान्स शिकले..
>>>>>
नाचण्यासारखे व्यक्त होण्याचे माध्यम नाही दुसरे...
माझे पर्सनल मत आहे की नाच मुळीच शिकू नये, जसा निघतोय तसा निघू द्यावा.. अर्थात हे मत चुकीचेही असू शकते, म्हणून माझ्यापुरतेच आहे Happy
पण बॉलीवूड डान्स म्हणजे नक्की काय?

अगदी कालपर्यंत वाटत होते की मला इथले लेखन डेस्कटॉपवरूनच जमते; मोबाइलवरून लिहीणे हे आपले काम नाही. पण या धाग्यावरचा आधीचा प्र. पहिल्यांदाच मोबाइलवरून टंकला !
अर्थात सध्या ते काम फक्त उजवा अंगठा वापरूनच जमते. बघू या, हळूह ळू कशी प्रगती होती आहे त्यात....

मला स्वयंपाकाची फारशी आवड नाही. चिकन वगैरे कोणी बनवलं असेल काही तर फक्त खायला आवडतं. बाकी मांसाहार फारसा आवडत नाही .
चिकन रस्सा , साबांनी बनवायला शिकवला. लग्नापूर्वी , चिकन शिजेपर्यन्त मी स्वयंपाक घरातही जात नसे.

माबोवरच्या स्वयंपाकाच्या धाग्यावर मी नियमीत भेट देते , काही शाकाहारी पदार्थ बनवले आहेत.
काही महिन्यापूर्वी , सामीच्या रेसिपीने पहिल्यांदा बिर्यानी बनवली . बर्यापैकी बरी झाली होती.
अगदी चिकन कापून साफ करण्यापासून , बिर्यानी वाढण्यापर्यन्त सगळ्ळ सगळ्ळ मीच केलं . ईतक भारी वाटलं म्हणून सांगू .
त्यामुळे माझा चिकन चे पदार्थ बनवण्याचा हुरुप वाढला . मूळातच , नवर्याला आणि लेकाला चिकन कुठल्याही रूपात आणि चवीत आवडत असल्यामुळे आता बिन्धास्त प्रयोग करते.

काल एका बीबी वर प्रतिक्रिया देताना मला लक्षात आले की गेल्या दोन वर्षात माझी म्युझिक ची टेस्ट बरीचशी बदलली आहे. थोडी जाणूनबुजून मी केली असेही म्हणता येईल.

आधी फक्त बॉलिवूड आणि मराठी इतकेच ऐकायचो. गुलाम अली यांच्या एक दोन गझल्स सोडून काही बाकी माहीत नव्हतं. पण गेल्या एक दोन वर्षात गुलाम अली, मेहदी हसन, जगजीतच्या नॉन फिल्मी गझल्स बऱ्याच ऐकल्या. त्यातल्या काही भयानक आवडल्या.
नंतर मध्ये असंच कुठं तरी कोक स्टुडिओ ची एक दोन गाणी ऐकली. त्यानंतर ऐकतच गेलो. कोक स्टुडिओ ऐकल्यावर लक्षात आलं की प्रत्येक वेळेस गाणं ऐकायला, आवडायला शब्दांचे अर्थ माहीतच असणे गरजेचे नाही. जे आवडेल त्याचा अर्थ आजकाल नेटवर लगेच मिळतोच.

सध्या प्लेलिस्ट मध्ये बॉलिवूड इतकाच गझल्स आणि कोक स्टुडिओ, परभाषेतील गाण्यांचा भरणा आहे.

गेल्या काही महिन्यात स्वत:हून पोहायला शिकण्याबरोबरच आयुष्यात सर्वात प्रथमच केलेली अजून एक नवीन गोष्ट म्हणजे स्वत:हून चिकन बनवले. यावर्षीच्या मे महिन्यात घरी एकटाच होतो. जेवण करणाऱ्या मावशी दररोज जेवण करून जात. पण मध्ये काही दिवस त्या येऊ शकत नाहीत असे त्यांनी सांगितले. त्या काळात मग रोज हॉटेल किंवा मेस वगैरेचा कंटाळा आला. पूर्वी कधीतरी बायकोकडून चिकन कसे करावे याची रेसिपी तिने करता करताच मी नोंदवून ठेवली होती ते आठवले. मग एका रविवारी चिकन स्वत:हून बनवायचे ठरवले. ती नोंद केलेली रेसिपी बरीच धडपड आणि शोधाशोध करून कशीबशी मिळवली. चिकन घेऊन आलो. तिथे लिहिल्या प्रमाणे एकेक कृती करत गेलो. आणि तासाभरात झकास चिकन तयार झाले Happy किचन मध्ये आजवर फक्त चहा आणि आम्लेट करता येणारा मी. तेंव्हा चक्क फोडणी वगैरे देऊन चिकन बनवले. तेही पहिल्याच प्रयत्नात एकदम सुपर टेस्टी. त्यामुळे स्वत:वरच खुश झालो. Lol

असं वाटायचं आपली बॉडी स्टिफ आहे फार नाही जमायचं. >>> मला अजूनहि असचं वाटतं . नाचण्याच्या बाबतीत प्रचंड न्यूनगंड आहे .
पण तरीही काही वर्शापूर्वी एरोबिक्स आणि झुम्बा शिकले Happy .
आता सगळं सोडून दिलं पण नाचापेक्शा अजूनही एरोबिक्स फार एन्जोय करेन मी .

येस ॠन्मेष नाचासारखे माध्यम नाही व्यक्त व्हायला...१००% खरं आहे. थकलायत, मुड गेलाय तर नाचा ...:) मस्त रिफ्रेश वाटतं...
बॉलिवूड डान्स म्हणजे इकडे काही फेमस गाण्यावर स्टेज शोज होते त्यात मनवा लागे, पिंगा, दिवानी मस्तानी वर डान्स बसवले.. म्हणून म्हटलं बॉलिवूड डान्स Happy सरोज खान बाई आल्या होत्या वर्कशॉप घ्यायला तेव्हा प्रेम रतन धन पायो, घनी बावरी याच्यावर स्टेप्स शिकले.
आता जन्मभर डान्स करणे सोडणार नाही.
जेव्हा कधी क्लब मधे, पार्टीत झिंग आणणारे पार्टी साँग्ज वाजतात त्याच्यावरही मनसोक्त नाचून घेते. Proud

अजून एक लिहायचे राहिले.... लहानपणीपासून पुण्यातल्या गणपती मिरवणूका बघत आले होते तेव्हापासून जबरी इच्छा होती ढोल, ताशा, लेझीम काहितरी करावे.. ते ढोल चे बीट्स ऐकले की खुळ्यागत व्हायला लागायचं पण तेव्हा कळत नव्हतं या पथकात सामील कसं व्हायच?
ती इच्छा आत्ता पूर्ण होतेय.. लेझीम करायची, ढोल ताशाच्या गजरात!! खूप आनंद होतोय. लेटेस्ट नाही पण २ वर्षापासून लेझीम करतेय हे पहिल्यांदाच घडलेय म्हणुन इथे लिहिले.

माझी ही to do list बरीच मोठी आहे, पण ह्या वर्षी त्यातल्या २/३ गोष्टी केल्या.
१. गणपती बाप्पा घरीच बनवला , तो ही eco friendly. बोळवलाही घरच्या घरीच.
२. दिवाळीत किल्ला बनवला , कॉलनीतील मुले मला त्यांच्यात घेत नव्हती( वासरात लंगडी गाय?!), मग एकटीनेच घरसमोरच्या मोकळ्या जागेत केला, तर मुलांनी त्यातले गडाचे दरवाजे, विहीर असे घरी बनवलेले सामान पळवले, पण मला मज्जा आली. आता मुलांकडुन प्रॉमिस घेतलय, की मला ही त्यांनी सामिल केले तर मी साहित्य घरी बनवुन देईन, म्हणुन..
३. आकाश कंदील ही घरी केला. (ह्या सगळ्या गोष्टी लहानपणी करताच आल्या नाहीत, आता करुन हौस भागवतेय.)
४. तशीच कथा लिहिण्याची ही हौस भागवली.
५. आणि गाणं मात्र शिकतेय, २ कार्यक्रम ही केले.
आता भरतनाट्यम, लेझीम-ढोल , swimming, trading, travel & tourism चा कोर्स.. यादी बरीच मोठी आहे.
ह्या वर्षी १ वर्षभर सुट्टी घेऊन घरी असल्याने बरेच काही जमले आणि "काय काय गमवले" याचा अंदाज ही आला. आता मात्र नोकरीच्या रामरगाड्यातुन स्वतःसाठी वेळ काढायचाच असे ठरवलेय.
आणि हो, आजी झाले तर बाळंतविडा करण्यासाठी शिवणकाम ही शिकले.

अजून एक : स्वैपाक करण्यावरून आठवलं, मला २ वर्ष झालीत ब्रिस्बेनमध्ये राहून. पण मी पोळ्या कधीच हाताने बनवल्या नव्हत्या. नेहेमी वाटायचं कणिक/पीठ मळणं खूप किचकट काम आहे. याआधी केलेले प्रयत्न, केवळ हाताला पीठ चिकटतं म्हणून सोडले होते. सारखं सारखं इंडीयन स्टोरमधून आणलेल्या फ्रोझन पोळ्या किंवा व्रॅप्स खाऊन कंटाळा आला होता. मग एकदा मनावर घेतलं, आणि पीठ मळायला घेतलं, व्यवस्थित मळलं सुद्धा आणि पोळ्या केल्या. लाटता आधीपासूनच यायच्या, पण कणिक मळणं अवघड आहे, अवघड आहे असं मनानेच ठरवून कधीच प्रयत्न नाही केला... आता कधीही पोळ्या करू शकतो Lol

आणि ब्रिस्बेनच्या ढोल ताशा पथकात ताशाही वाजवला (पहिल्यांदाच...)...
न्यूझिलंड ची ट्रीप सोलो केली... साऊथ आयलँडच्या भागात, एकट्याने १४०० किमी ड्राईव्ह करत ५ दिवस मस्त अनुभव घेतला Happy

Msc (IT) केलं 2016 मधे CORRESPONDENCE नी.
38 वय. post graduation ची इछा पुर्ण झाली

अतरंगी ,
बर्‍याच सदस्यांना तुमच्यामुळे स्फुर्ती मिळते आहे. अनेकांनी सुचवले आहे तसे या धाग्याचे शीर्षकही मराठीत करण्याचं थोडं मनावर घ्या हो.

वेमा,
धाग्याचे शीर्षक मराठीतच ठेवायचे होते पण खूप विचार करूनही काही सुचेना. काल तुमचा प्रतिसाद पाहिल्यावर परत भरपूर विचार केला पण तरी काही पटकन अपील होईल असे सुचेना.

कोणाला सुचल्यास सांगा प्लिज. का मी त्या साठी वेगळा धागा काढू? Wink

अगदी तशीच परिणामकारक शब्दरचना कदाचित होणार नाही. पण हे त्यातल्या त्यात बरे वाटते...
आयुष्यात काहीतरी पहिल्यांदाच केले, असे सर्वात अलीकडे कधी केलेत?

मस्त धागा आहे हा ... मी स्विमिंग लग्ना नंतर शिकले , गेल्या वर्षी शिवणकाम शिकले , खरंतर डोक्यात इतकं फिट बसले होते की आपण शिवनयंत्र हाताळू शकत नाही पण त्यावर मात करून शिकले ह्याच अप्रूप वाटलं . चारचाकी दुचाकी चालवायला शिकायचं म्हणतेय पण मुहूर्त मिळत नाहीय पण इथल्या गोष्टी वाचेन हुरूप आलाय , ते ही लवकरच जमवणार

मला पण स्विमिंग शिकायचंय... थोडं कॉन्टिनेन्टल फूड करायला शिकायचंय...टेनिस शिकायचंय...
गेल्या 6/7 वर्षात मी पण बऱ्याच गोष्टी शिकले...कार शिकले ...रॉयल एनफिल्ड पल्सर अँटायसर सगळ्या बाइक्स चालवून पहिल्या.. आता आता गुजराथी वाचायला आणि बोलायला शिकले...थोडं थोडं जापनीज शिकले... अगदी थोडं ,सहा महिने शिकले मग सोडून दिलं..

मस्त धागा !! सगळ्यांचे अनुभवही मस्त !!

मी स्वतः २०१५ मधे सहज पुण्यात गोएथे इथे जर्मन शिकायला सुरूवात केली . आधी फक्त बेसिक ए१ करायच ठरवल होत. दिवसाच हेक्टीक शेड्युल पाळून रोज सकाळी ५:३० ला उठून ७ ते ८:३० जायच , तेही सौदागर ते कोरेगाव पार्क म्हणजे सुरूवातीला दिव्यच होते . पण त्यात ९६% पडले आणि हुरूप वाढत गेला . मग ए२ , बी१ करत अवघड बी२ ही झाल . माझ पाहून बायकोनेही सुरू केल अन तीही बी२ला पोचली .

आता सोसायटीमधल्या मित्राना (अर्थातच फुकट) शिकवतोय , मस्त मजा येतेय !!

नवीन काहीतरी शिकायची अन त्याहीपेक्षा शिकवायची मजा काही औरच असते Happy

मी एकटीने हाॅटेलात बसून खाल्ले .... >>> खरचं छान

आपल्याकडे पुरुष एकटे कुठेही कधि ही खातात पण बर्याचदा स्त्रिया मात्र संकोचतात

पण मला खरच सांगायला आवडेल की कोणतीही गोष्ट जर आपल्याला योग्य वाटत असेल तर मी एकटीच आहे म्हणुन ती न टाळता न संकोचता लगेच करुन टाकायची असे माझ्या मम्माने मला शिकवले

Pages