लोकांच्या मते एक वय असतं उत्साहाचं, उमेदीचं, काहीतरी शिकण्याचं, करून दाखवण्याचं........ त्या मताला कधीही काडीमात्र सुद्धा किंमत देऊ नये.
पण कॉलेज संपलं, नोकरी लागली, लग्न संसार यात अडकलं की नवीन काहीतरी शिकण्याचा, करण्याचा उत्साह कमी होत जातो. वय, वेळ, affordability, संकोच, संसाराच्या जबाबदाऱ्या, लोकांच्या नजरा/टोमणे.... एक ना अनेक कारणं....
अरे आता या वयात कुठं जाऊ गाडी शिकायला?
अरे पण वेळ कुठंय? मुलांच्या शाळा, माझा जॉब, घराची कामं, जाणार कधी?
अरे आता या वर्षी नाही जमणार, पैशांचं shortage आहे.
हे बघ हे येडं आता या वयात चाललंय शिकायला, ये इथं दोन पेग मार तुला बसल्या बसल्या सगळं शिकवतो.
अरे आपलं वय काय? येड्यात काढतील लोकं...
लेह लडाख बाईक वर करायचं होतं यार, राहून गेलं.
सगळे म्हणतात रे आवाज बरा आहे माझा, पण आता कुठं गाण्याचा क्लास वगैरे लावत बसू, जाऊ दे मरू दे.
घरच्यांच्या नादाने नोकरीत पडलो पण मला खरं तर बिझनेसच करायचा होता
सगळे मित्र मैत्रिणींकडून, बहीण भावांकडून ऐकू येणारे नेहमीचे डायलॉग. एका ठराविक काळानंतर काही इच्छा, प्लॅन फक्त मनात राहतात, करायचे होते पण जमले नाही या कॅटेगरीत ढकलले जातात.
तरीपण या सगळ्यांवर मात करत काही जण जे राहून गेलं ते करायचा, शिकायचा प्रयत्न करतात. आयुष्याच्या एका वळणावर येऊन परत नवीन काहीतरी शिकायचा आनंद, काहीतरी मिळवल्याचं फिलिंग फारच मस्तच असते. शिवाय आपल्या कामाच्या रगाड्यातून, रोजच्या कंटाळवाण्या शेड्युल मधून एक ब्रेक मिळतो, आयुष्याचा एकसुरीपणा कमी होतो. आपल्याला हे करायचं होतं, शिकायचं होतं, राहून गेलं ही हुरहूर कमी होते, बकेट लिस्ट मधल्या एखाद्या गोष्टीवर टिक मार्क होतं
बोअरिंग आणि मोनोटोनस आयुष्यावर बेस्ट उपाय म्हणजे काहीतरी नवीन करायला, शिकायला घ्या. तुम्हाला ज्या गोष्टीतून आनंद मिळतो ती काही थोडा वेळ का होईना करा.....
तुम्हाला आता नवीन काही शिकायचे असेल, करायचे असेल, जुनेच अर्धवट राहिलेले परत सुरू करून पूर्ण करायचे असेल तर इथे लिहा, आपल्याला एकमेकांना प्रोत्साहन देता येईल
तुम्ही लेटेस्ट काही केले असेल तरी इथे जरूर लिहा, बाकीच्यांना थोडी प्रेरणा मिळेल.
सचिनजी तुमची इच्छा नक्की
सचिनजी तुमची इच्छा नक्की पुर्ण होईल.. ऑल द बेस्ट!
@ मेघा, धन्यवाद.
@ मेघा, धन्यवाद.
Submitted by साधना on 15 July
Submitted by साधना on 15 July, 2017 - 22:08>>> भारि वाटल वाचताना
शाळेत असताना (सहावी सातवी) एक
शाळेत असताना (सहावी सातवी) एक भयंकर खुळ डोक्यात घुसलं होतं डाव्या हाताने पण लिहायला शिकायचं..दोन तिन मित्र प्रयत्न करत बसायचो..पण नंतर मागं पडलं...आता परत होणं नाही.. आठवून गम्मत वाटते..हसायला येतं..
मुलांनो आणि मुलींनो
मुलांनो आणि मुलींनो
आपण सगळ्यांनी हे जे काही फर्स्ट-टाईम (नवीन काहीतरी) केलंय त्याचा लास्ट टाईम वर्षा सहा महिन्यातला असू द्या.
आणि वर्षा सहा महिन्यात नवीन काही केलं नसेल तर नवीन काहीतरी करायचे मनावर घ्या आणि लिहा इथे.
हा धागा माझा नाही पण माझ्या मते असे खूप जुने पाने लिहिले तर मजा जाईल ह्या धाग्याची.
अतरंगी आणि सर्व.. तुमचे अनुभव
अतरंगी आणि सर्व.. तुमचे अनुभव ऐकून खूप छान वाटतंय,
When was the last time...... थीम घेऊन लिहिलेला एक छानसा लेख.
बाय ललिता-प्रीती
http://www.maayboli.com/node/25707
खुप छान धागा...
खुप छान धागा...
खुप कंटाळा यायचा स्वयंपाक करायचा.. खुप आवड पण अशी काही नव्हती. पण बायको 6 महिन्यांसाठी भारतात गेली, तेव्हा ठरवल की आता शिकायलाच हव. मग काय.. केली सुरुवात.. अगदी पोळ्या पण बनवल्या. पहिला आठवडा अशी काही तारांबळ उडाली काही विचारू नका. 3 पोळ्या बनवायला 2-3 तास लागायचे... पण धिर सोडला नाही.
6 महिने बाहेर खाण्याचा मोह टाळला.. आणि पस्तीशीत का होईना स्वयंपाक शकलो. खुप काही अचिव्ह केल्याच समाधान मिळाल.
आता मुलांबरोबर मि पण, स्विमींग शिकण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे..
आपल्या सगळ्यांच्या अचिव्हमेंटस वाचून खुप छान वाटलं.
गाडी चुकलेले आपण एकटे नाही हे पाहुन दिलासा वाटला..
धन्यवाद
छान धागा व सर्व प्रतिसाद!
छान धागा व सर्व प्रतिसाद!
पण नव्या घरातील बेड्स, टेबलं
पण नव्या घरातील बेड्स, टेबलं वगैरे आयकियातून मागवले होते. ते सर्व मी एकटीने असेंबल केले. ३ बेड्स, ४ एंड टेबल्स. >> बस्के तुला सर्टीफिकेट मग! आयकियाच्या मॅन्युअल वरुन तु जोडल म्हणजे!
मनीष,
मनीष,
मी पण परवा पासून स्वयंपाक करायला सुरुवात केली. माझ्या मागच्या प्रतिसादात लिहिलेली नवीन सुरू केलेली गोष्ट म्हणजे स्वयंपाक. खूप दिवस शिकायचा प्लॅन चालू होता. शेवट मुहूर्त लागला. इंडक्शन कुकिंग, भांडी घेऊन आलो.
काही दिवसांनी मी स्वयंपाकाच्या धाग्यांवर पडीक असेन बहुतेक
जेवण बनवायला शिकायचा एक फायदा म्हणजे सध्या बायकोचा आणि माझा संवाद एकदम वाढला आहे. आज काय मेन्यू ? भाजी चिरून झाली का? भांडी झाली का .... वगैरे वगैरे
थँक्स प्राजक्ता!
थँक्स प्राजक्ता!
गेल्या वर्षी ऑक्टोबर मध्ये
गेल्या वर्षी ऑक्टोबर मध्ये बंजी जंपींग केलं होतं, त्यानंतर स्कायडाईव्ह आणि स्वतः फ्लाईट फ्लाईंग (पायलट सोबत असतो) चा अनुभव घ्यायचे राहिलेय... या पुढच्या दोन महिन्यात करीनच म्हणतो...
ड्रगन बोटिन्ग शिकलो आहे.
ड्रगन बोटिन्ग शिकलो आहे. ऑफिस ची टिम आहे..
छान धागा. आणि प्रतिसादही मस्त
छान धागा. आणि प्रतिसादही मस्त आहेत.
मला टू व्हीलर शिकायची आहे कधी पासुन. आता मुहुर्त काढायलाच पाहिजे श्रीगणेशाचा.
बंजी जम्पिंग आणि स्काय
बंजी जम्पिंग आणि स्काय डायव्हिंग बऱ्याच जणांच्या बकेट लिस्ट/ टू डू लिस्ट मध्ये असेल
स्वधा, सगळे नियम एका काळाने मसल मेमरी मध्ये जातात अगदी शेतात किंवा गावात जरी वळायचे असेल तरी सवयीने इंडिकेटर देणे वगैरे पण आपसूक होते.
साधना, भारी अनुभव.
बस्के, घरी आणून जोडायच्या वस्तू, DIY च्या गमती जमती वर लवकरच एक धागा काढायचा आहे.
सचिन साहेब , उर्दू शिकलात की आम्ही येतो क्लास ला तुमच्याकडे. आम्हालाही शिकवा
माझं लेटेस्ट नवीन म्हणजे मी
माझं लेटेस्ट नवीन म्हणजे मी काल शेपूची भाजी बनवली
सगळ्यांनीच मस्त लिहिलंय .
सगळ्यांनीच मस्त लिहिलंय . आवडलेला सकारात्मक धागा ! मी एकटीने हाॅटेलात बसून खाल्ले मला हे लिहीतांनाही गंमत वाटतेय! मला एका चांगल्या संस्थेत वेळ द्यायचा होता तसा मी दिला व सहा महिने आसामच्या अनेक भागात राह्यले.
फार जुने नको असं म्हटलं तरी एवढंच सांगते की दुचीकी, चारचाकी, पोहणं, ट्रेकिंग अश्या काही गोष्टी चाळीशी पन्नाशीनंतर केल्या
मंजुतै, तू भारीच आहेस :*
मंजुतै, तू भारीच आहेस :*
मला स्विमिंग शिकायचंय... सगळं वाचून हुरुप यायला लागलाय.
सध्या फोर व्हिलर शिकणं आणि भाकरी शिकणं हे दोन प्रायोरिटीवर आहे.
मला तमिळ पण शिकायचीये.. अगदी वाचायला नाही जमली तर किमान बोलता यायला हवी
ब्राव्हो मंजूताई !
ब्राव्हो मंजूताई !
To do list खुप मोठी आहे...
To do list खुप मोठी आहे... या वर्षी बाप्पा ची मूर्ती घरी करायची आहे... जमला तर बाप्पा नाही तर गणोबा...
माझी पण to do list मोठी आहे
माझी पण to do list मोठी आहे पण बकेट लिस्ट मधील काही गोष्टी टिक ऑफ झाल्या आहेत. २०११ पहिला ट्रेक २०१२ तारकर्ली स्क्यूबा २०१३ वॉटर फॉल रॅपीलिंग आणि २०१५ कोलाड रिव्हर राफ्टिंग
हा धागा वाचून पुन्हा काही तरी कर ण्यासाठी खरंच उत्साह वाटायला लागलाय
मंजुताई, ग्रेट आहात !!!!
मंजुताई, ग्रेट आहात !!!!
चांगला धागा . " राहून गेले
चांगला धागा . " राहून गेले करायचे , पण आता करणार आहे !" हे शीर्षक कसे वाटते ?
मस्त धागा. मी आणि नवऱ्याने
मस्त धागा. मी आणि नवऱ्याने मिळुन lickage ने खराब झालेली भिंत repair केली आणि पूर्ण घराला रंग दिला फक्त youtube ची मदत घेउन आणि आमचे ४५००० वाचवले
आपण बहुतेक लोक 'उजवे खोरे'
आपण बहुतेक लोक 'उजवे खोरे' असतो. त्यामुळे आपला डा वा हात आळशी झालेला असतो. मी आता काही स्किल कमी असलेली कामे मुद्दाम या आळशी हाताने करतो. जसे की झाडणे, पुसणे, बाजाराच्या पिशव्या उचलणे इ. फार मस्त वाटते बघा. हळूहळू डाव्याला उजव्या च्या निदान 40% तरी कार्यक्ष म करेन म्हणतो
.
.
धाग्याचे शिर्षक आणि उर्वरित
धाग्याचे शिर्षक आणि उर्वरित धागा-प्रतिसाद म्याच नाही होत आहे.
@ कुमार१, डावखोरे, छान उपक्रम
@ कुमार१, डावखोरे, छान उपक्रम.
मी सध्यातच बॉलीवूड डान्स
मी सध्यातच बॉलीवूड डान्स शिकले .. पहिल्यांदा खूप घाबरायचे का काय माहित आपण विचित्र दिसू असा गंड होता मनात. पार्टीत किंवा कुठेहि डान्सची वेळ आली की काहीतरी कारणे सांगून वेळ मारून न्यायचे. आता ठरवूनच शिकले. असं वाटायचं आपली बॉडी स्टिफ आहे फार नाही जमायचं. पण आता डान्स करायला लागल्यावर खूप मजा येतेय. डान्स लाईक नोबडी इज वॉचिंग ....
अभिनंदन १२ अंजली
अभिनंदन १२ अंजली
मंजूताई,
मंजूताई,
ते दुचीकी, चारचाकी, पोहणं, ट्रेकिंग अश्या काही गोष्टी चाळीशी पन्नाशीनंतर केल्या... हे तर भारीच!
पण यापेक्षा भारी हे वाटले,
मी एकटीने हाॅटेलात बसून खाल्ले ....
हे मला माझ्या आईलाही शिकवायचेय
Pages