Submitted by अनन्त्_यात्री on 17 July, 2017 - 04:54
गावाकडच्या मावळतीचे
…….रंग बिलोरी
प्रसन्न पिवळे, गडद गुलाबी
निवांत निळसर, कबरे करडे
पाहून निवती माझे डोळे
…....निब्बर शहरी
प्रसन्न पिवळ्या संध्याकाळी
खेळ अंगणी रंगुनी जावा
दावण तोडुन, आचळ सोडुन
....अचपळ गोऱ्हा
.....पिऊन वारा....
उधळत जावा
गडद गुलाबी संध्याकाळी
शुक्र जरासा तेजाळावा
उडता उडता पुन्हा थव्याची
......... मोडुन नक्षी...
.........चुकार पक्षी......
उतरून यावा
निवांत निळसर संध्याकाळी
फड गप्पांचा मस्त जमावा
सळसळ रोखून वृद्ध वडाने
........टाळीसाठी........
.......पारंबीला.......
झोका द्यावा
कबऱ्या करड्या संध्याकाळी
धूसर ढग ओथंबुन यावा
पायतळीच्या वाटेवरचा
.......भिरभिरणारा.......
........एक काजवा.......
लखलख व्हावा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुर्रेखच......
सुर्रेखच......
सुंदर...
सुंदर...
राहुल, शशांक प्रतिसादाबद्दल
राहुल, शशांक प्रतिसादाबद्दल धन्यवाद
आवडली रचना
आवडली रचना
मायबोलीवर स्वागत असो.
हर्पेन, प्रतिसादाबद्दल
हर्पेन, प्रतिसादाबद्दल धन्यवाद
फार आवडली रचना
फार आवडली रचना
सन्तोष वाटपाडे, आपल्या
सन्तोष वाटपाडे, आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
अतिशय सुंदर रचना ......
अतिशय सुंदर रचना ......
ही कविता....अगदी चोरुन घ्यावी
ही कविता....अगदी चोरुन घ्यावी अशी आहे....दिलसे
दत्तात्रय साळुन्के,
दत्तात्रय साळुन्के, प्रतिसादाबद्दल ___/\___ !
सन्तोष वाटपाडे, आपल्या "दिल
सन्तोष वाटपाडे, आपल्या "दिल"खुलास प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा आभार!
निब्बर शहरी डोळे ....वाह !!!
निब्बर शहरी डोळे ....वाह !!!
भुईकमळ, प्रतिसादाबद्दल
भुईकमळ, प्रतिसादाबद्दल धन्यवाद
नितांत सुंदर रचना....
नितांत सुंदर रचना....
सुंदर निसर्ग, मावळती
सुंदर निसर्ग, मावळती संध्याकाळ डोळ्यांसमोर उभी केलीत ! वाहवा !
सायुरी, प्रतिसादाबद्दल
सायुरी, प्रतिसादाबद्दल धन्यवाद !
पल्लवीजी, प्रतिसादाबद्दल
पल्लवीजी, प्रतिसादाबद्दल धन्यवाद !
वा वा!
वा वा!
Mast!
Mast!
मस्त!
मस्त!
अहाहा. किती सुंदर !
अहाहा. किती सुंदर !
त्या पहिल्या कडव्याचा फॉर्मॅट आणि यमक मुद्दाम वेगळे का आहे? तेही छान आहे पण बाकीच्या कडव्यांशी जुळत नाहीये.
अप्रतिम रचना .
अप्रतिम रचना .
फारच सुरेख!
फारच सुरेख!
सन्तोष किल्लेदार,
सन्तोष किल्लेदार, प्रतिसादाबद्दल धन्यवाद !
पहिल्या कडव्याचा फॉर्मॅट आणि यमक मुद्दाम वेगळे रचले आहे.
मनीमोहोर, प्रतिसादाबद्दल
मनीमोहोर, प्रतिसादाबद्दल धन्यवाद !
चिन्नू, स्वाती_आम्बोळे,
चिन्नू, स्वाती_आम्बोळे, वैद्यबुवा आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !
जिज्ञासा, प्रतिसादाबद्दल
जिज्ञासा, प्रतिसादाबद्दल धन्यवाद !
छान आहे
छान आहे
वाह! क्या बात है!
वाह! क्या बात है!
जाई, मामी प्रतिसादाबद्दल
जाई, मामी प्रतिसादाबद्दल धन्यवाद !
Pages