Submitted by अनन्त्_यात्री on 17 July, 2017 - 04:54
गावाकडच्या मावळतीचे
…….रंग बिलोरी
प्रसन्न पिवळे, गडद गुलाबी
निवांत निळसर, कबरे करडे
पाहून निवती माझे डोळे
…....निब्बर शहरी
प्रसन्न पिवळ्या संध्याकाळी
खेळ अंगणी रंगुनी जावा
दावण तोडुन, आचळ सोडुन
....अचपळ गोऱ्हा
.....पिऊन वारा....
उधळत जावा
गडद गुलाबी संध्याकाळी
शुक्र जरासा तेजाळावा
उडता उडता पुन्हा थव्याची
......... मोडुन नक्षी...
.........चुकार पक्षी......
उतरून यावा
निवांत निळसर संध्याकाळी
फड गप्पांचा मस्त जमावा
सळसळ रोखून वृद्ध वडाने
........टाळीसाठी........
.......पारंबीला.......
झोका द्यावा
कबऱ्या करड्या संध्याकाळी
धूसर ढग ओथंबुन यावा
पायतळीच्या वाटेवरचा
.......भिरभिरणारा.......
........एक काजवा.......
लखलख व्हावा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर!
सुंदर!
rmd , प्रतिक्रियेबद्दल आभार!
rmd , प्रतिक्रियेबद्दल आभार!
वा!
वा!
सुरेख रंग मावळतीचा, खूप आवडली
सुरेख रंग मावळतीचा,
खूप आवडली
भास्कराचार्य,
भास्कराचार्य, प्रतिक्रियेबद्दल आभार!
विजया केळकर, प्रतिक्रियेबद्दल
विजया केळकर, प्रतिक्रियेबद्दल आभार !
Pages