लोकांच्या मते एक वय असतं उत्साहाचं, उमेदीचं, काहीतरी शिकण्याचं, करून दाखवण्याचं........ त्या मताला कधीही काडीमात्र सुद्धा किंमत देऊ नये.
पण कॉलेज संपलं, नोकरी लागली, लग्न संसार यात अडकलं की नवीन काहीतरी शिकण्याचा, करण्याचा उत्साह कमी होत जातो. वय, वेळ, affordability, संकोच, संसाराच्या जबाबदाऱ्या, लोकांच्या नजरा/टोमणे.... एक ना अनेक कारणं....
अरे आता या वयात कुठं जाऊ गाडी शिकायला?
अरे पण वेळ कुठंय? मुलांच्या शाळा, माझा जॉब, घराची कामं, जाणार कधी?
अरे आता या वर्षी नाही जमणार, पैशांचं shortage आहे.
हे बघ हे येडं आता या वयात चाललंय शिकायला, ये इथं दोन पेग मार तुला बसल्या बसल्या सगळं शिकवतो.
अरे आपलं वय काय? येड्यात काढतील लोकं...
लेह लडाख बाईक वर करायचं होतं यार, राहून गेलं.
सगळे म्हणतात रे आवाज बरा आहे माझा, पण आता कुठं गाण्याचा क्लास वगैरे लावत बसू, जाऊ दे मरू दे.
घरच्यांच्या नादाने नोकरीत पडलो पण मला खरं तर बिझनेसच करायचा होता
सगळे मित्र मैत्रिणींकडून, बहीण भावांकडून ऐकू येणारे नेहमीचे डायलॉग. एका ठराविक काळानंतर काही इच्छा, प्लॅन फक्त मनात राहतात, करायचे होते पण जमले नाही या कॅटेगरीत ढकलले जातात.
तरीपण या सगळ्यांवर मात करत काही जण जे राहून गेलं ते करायचा, शिकायचा प्रयत्न करतात. आयुष्याच्या एका वळणावर येऊन परत नवीन काहीतरी शिकायचा आनंद, काहीतरी मिळवल्याचं फिलिंग फारच मस्तच असते. शिवाय आपल्या कामाच्या रगाड्यातून, रोजच्या कंटाळवाण्या शेड्युल मधून एक ब्रेक मिळतो, आयुष्याचा एकसुरीपणा कमी होतो. आपल्याला हे करायचं होतं, शिकायचं होतं, राहून गेलं ही हुरहूर कमी होते, बकेट लिस्ट मधल्या एखाद्या गोष्टीवर टिक मार्क होतं
बोअरिंग आणि मोनोटोनस आयुष्यावर बेस्ट उपाय म्हणजे काहीतरी नवीन करायला, शिकायला घ्या. तुम्हाला ज्या गोष्टीतून आनंद मिळतो ती काही थोडा वेळ का होईना करा.....
तुम्हाला आता नवीन काही शिकायचे असेल, करायचे असेल, जुनेच अर्धवट राहिलेले परत सुरू करून पूर्ण करायचे असेल तर इथे लिहा, आपल्याला एकमेकांना प्रोत्साहन देता येईल
तुम्ही लेटेस्ट काही केले असेल तरी इथे जरूर लिहा, बाकीच्यांना थोडी प्रेरणा मिळेल.
Chhan dhaga, pn aadhi tumhi
Chhan dhaga, pn aadhi tumhi liha.....
माझं लेटेस्ट म्हणजे
माझं लेटेस्ट म्हणजे
वयाच्या तेहतीसाव्या वर्षी सगळ्या रागाड्यातून वेळ काढून स्विमिंग शिकलो.
लहानपणापासून शिकायचं होतं, शाळा कॉलेज मध्ये एक दोन वेळा प्रयत्न केला तरी जमलं नाही. या वेळेस मनावर घेतलंच, मित्रांचे टोमणे, मस्करी, चेष्टा सगळ्यांकडे दुर्लक्ष केलं. कामावरून निघालो की डायरेक्ट स्विमिंग पूल... फायनली शिकलो. वीस पंचवीस दिवस लागले पण शेवटी जमलंच.
व्वाव! अभिनंदन अतरंगी...
व्वाव! अभिनंदन अतरंगी...
मला पण एक गोष्ट शिकायचीये..पण बघू कधी मुहुर्त लागतोय ते ....
आणि नाही शिकता आली तरी ,ठिक आहे..सगळ्याच अपेक्षा पुर्ण होईल अस काही नसतं ना...
सगळे मित्र मैत्रिणींकडून, बहीण भावांकडून ऐकू येणारे नेहमीचे डायलॉग. एका ठराविक काळानंतर काही इच्छा, प्लॅन फक्त मनात राहतात, करायचे होते पण जमले नाही या कॅटेगरीत ढकलले जातात. >>> एकदम सही बात बोली..
खूप वर्षांपासून टु व्हिलर
खूप वर्षांपासून टु व्हिलर चालवायला शिकायची होती, गेल्यावर्षी लर्निंग लायसेन्स काढले डिसेंबर मध्ये एक्सपायर झाले आणि मला यावर्षी मुहूर्त सापडला गाडी शिकायला. चला पण या बहाण्याने पल्सर आणि रॉयल एन्फिल्ड तरी हाताळायला मिळाली नाहीतर हि धूड कशी चालवत असतील लोक असेच वाटायचे.
मी सुद्धा यावर्षी पोहायला
मी सुद्धा यावर्षी पोहायला शिकलो. अर्थात मला वीस पंचवीस नाही तर खूप जास्त दिवस लागले. पण तो खूप आनंददायी अनुभव होता. कुणाचीही मदत न घेता स्वत:हून पोहायला शिकणे त्यातही तीस पस्तीशी नंतर म्हणजे खरेच ग्रेट फिलिंग असते. सुरवातीला ट्रेनिंगचे वेगवेगळे युट्युब व्हिडीओज् खूप पाहत होतो. पण तसे प्रत्यक्षात जमत नव्हते. शरीराची तरणशीलता buoyancy किती आहे त्यावर ते अवलंबून. शेवटी स्वत:चेच एक टेक्निक डेव्हलप केले. आणि कमरेपेक्षा खोल पाण्यात उतरायला सुद्धा घाबरणारा मी जेंव्हा स्विमिंग पूलच्या खोल भागात पहिल्यांदा पोहत गेलो तेंव्हा काय आनंद झाला होता. व्वा शिकण्यासाठी काय स्टेप घेतल्या तो एक वेगळाच धागा काढतो नंतर. कुणाला न कुणाला उपयोगाला नक्की येईल.
मेघा, सगळं जमलंच पाहिजेच असं
मेघा, सगळं जमलंच पाहिजेच असं काही नाही. पण आपण प्रयत्न करून पहायचाच. अगदीच नाहीच जमलं तर ठीक आहे, आयुष्यात नंतर हुरहूर राहत नाही.
अपर्णा, घ्या पूर्ण मनावर, बाईक पिदडण्यात एक अवर्णनीय मजा आहे.
अतुल, मी स्विमिंग साठी कोच लावला होता. तो पण माझ्यापेक्षा तीन की चार वर्षाने लहान होता त्याने ब्रेस्ट स्ट्रोक शिकवला, बॅक स्ट्रोक मी स्वतः शिकलो.
मागच्या वर्षी फोटोग्राफी
मागच्या वर्षी फोटोग्राफी शिकायचं ठरवलं होतं. क्लास शोधून माहिती जमविण्यापर्यंत आलो होतो पण कामाच्या धावपळीत राहून गेलं. आता या वर्षी जमेल असं लक्षण दिसत नाही. पुढच्या वर्षी परत चौकशी पासून हरी ओम....
मेघा, सगळं जमलंच पाहिजेच असं
मेघा, सगळं जमलंच पाहिजेच असं काही नाही. आपण प्रयत्न करून पहायचाच. >>> हा तर माझा स्वभावगूणच आहे,आशा सोडायची नाही ,प्रयत्न करत रहायच.. थँक्यू अतरंगी
खरच या धाग्यामूळे शिकण्याची /आत्मसात करण्याची प्रेरणा नक्की मिळेल...
हो अतरंगी नक्कीच. थँक्स फॉर
हो अतरंगी नक्कीच. थँक्स फॉर युअर चिअर-अप.
छान धागा अतरंगी.
छान धागा अतरंगी.
कॉलेजला असताना ट्रेकिंगची आवड होती, एक दोन हार्ड ट्रेक केले होते.
नंतर कामाच्या व्यापात हरवून गेलो.मधल्या दहा वर्षात सिगरेटी फुकुन छातीचा खोका झालाय.मागच्याच महीण्यात ठरवले की सिगरेटने जो विकनेस येतोय तो कमी करायला महीण्यात एक ट्रेक तरी करायचा व जोडीला व्यायाम.जुनमध्ये वासोटा नागेश्वर ट्रेक करुन आलो.पहील्यांदा ट्रेक करत अहे असे न्हवे पण गेल्या दहा पंधरा वर्षात पुन्हा नव्याने करत आहे.
बापरे! सिंजी अजून हे सिगारेटच
बापरे! सिंजी अजून हे सिगारेटच ध्यान आहेच होय तुमच्या सोबतीला ???
अतरंगी मस्त धागा
अतरंगी मस्त धागा
मी स्वतःला नेहेमीच हे विचारत असतो. मला स्वतःलाच असा धागा काढायचा होता इकडे पण राहून गेलेलं
ह्या वर्षीपासून १५ जून हा मल्लखांब दिवस म्हणून साजरा करण्यास चालू केले आहे. त्या निमित्ताने पुण्यातल्या टिळक रस्त्यावरच्या महाराष्ट्रिय मंडळात जास्तीत जास्त वेळा 'साधी उडी', 'दसरंग' असे मल्लखांबावरचे प्रकार करण्याकरता सर्वसाधारण लोकांनाही आमंत्रण / आवाहन होते.
दोन -तीन दिवस आधीपासून संध्याकाळी जाऊन थोडे प्रशिक्षण घेणे अपेक्षित होते पण मला ऑफीस मधल्या कामामुळे जायला जमलेच नाही.
मग तरी हिंमत दाखवून १५ जूनला ममं मधे डेरेदाखल झालो. त्या दिवशी मी आयुष्यात पहिल्यांदाच मल्लखांबावर चढलो व तिथ्ल्या तिथे शिकून ५ साध्या उड्या मारल्या.
फुशारकीने मुलाला सांगायला गेलो तर तो म्हणे साधी उडी काय बाबा, दसरंग तरी मारायचेस.
तर दसरंग बद्दल पोस्ट पुढच्या १५ जून नंतर
मागे माबोवर एक कोणी तरी
मागे माबोवर एक कोणी तरी आर्किटेक्ट होत्या त्यांनी मुलांची शाळा/कॉलेज, व्यवसाय सांभाळून केलेल्या कोर्स बद्दल एक लेख लिहिला होता. तो पण मस्त होता.
सिंजी,
सिंजी,
माझे पण ट्रेकिंग सध्या खूप कमी झाले आहे. एक तर भारतात कमी असतो आणि असलो तरी शनिवारी रविवारी जमत नाही. बाकी दिवशी कंपनी मिळत नाही.
मध्ये एकदा महाराष्ट्रातल्या सगळ्या किल्ल्यांची लिस्ट केली होती. जे राहिलेत ते एक एक करून जाऊन यावे म्हणून. जीमेल मध्ये draft मध्ये शोधावी लागेल आता
हर्पेन,
तुमच्याकडे बघितलं की आम्हाला कॉम्प्लेक्स येतो. तुम्ही तर काय काय नवीन नवीन करत असता....
भारतात आलो की टिळक टॅंक वर भेटू एकदा
हे जे पहिल्यांदाच करणे आहे ते
हे जे पहिल्यांदाच करणे आहे ते फार काही मोठेच आणि लेटेस्टच हवे अशी अट नसेल तर अजून काही गोष्टी सांगू शकेन. मी असे काही केले की फेसबुकवर टाकत असतो.
मोठेच पाहिजे असे कशाला?
मोठेच पाहिजे असे कशाला?
आपल्याला ते करताना मजा आली, काहीतरी शिकायला मिळालं ना बास.
मी या वर्षी आमच्याकडे cctv बसवले. Cctv वाले खूप जास्त सांगत होते. मी युट्युब वर व्हिडीओ बघून मार्केट मध्ये जाऊन कॅमेऱ्याची किंमत बघून स्वतः करायचे ठरवले.
फावल्या वेळात सगळे कॅमेरे आणून वायरिंग करून बसवले. वायर खेचायला आणि बाकी कामाला घराचा इलेक्ट्रिशियन घेतला होता. Cctv वाल्यानी जे कोटेशन दिलं होतं त्या पेक्षा निम्म्या किंमतीत काम झालं.
त्यात मला पण नवीन शिकायला मिळालं आणि चार पैसे पण वाचले. डबल फायदा
आमच्या मित्रमंडळातल्या तीन
आमच्या मित्रमंडळातल्या तीन जणांनी मागच्या वर्षी 'आयर्नमॅन' ट्रायथ्लॉन पुर्ण के ली. त्यावेळी त्यांच्या सरावाच्या वेळचे व्हिडीयो काढायचे होते. एका रविवारी मित्र म्हणाला चल बरोबर व्हिडीयो शूटिंग करायचेय म्हटले चला. गेल्यावर म्हणे मलाच करायचेय. मी तर काही डिजी-कॅम हाताळलेला नव्ह्ता, तरी म्हटलं फोटो काढता येतात तर हे ही येईलच. पण मग नंतर म्हणे बाईकवर उलटे बसायचे आहे.
मग असा मी काही अंतर बाईक वर उलटे बसून व्हिडीयो शूटिंग केलं. अचानक ब्रेक लावणे, (मित्राला साधीशी वाटणारी) वळणं अश्या सगळ्या संकटांना तोंड खरेतर पाठ देऊन मी नेटाने माझं पहिलं वहिलं व्हिडीयो शूटिंग केलंय.
मी या वर्षी ठरवून चार चाकी
मी या वर्षी ठरवून चार चाकी गाडी चालवायला शिकले... आता रोज 150 किमी गाडी व्यवस्थित चालवु शकते... आणि मी कायम सगळे ट्राफिक नियम पाळून ड्रायव्हिंग करते... त्या साठी प्रचंड संयमाची गरज आहे... आता त्या साठी प्रयत्न सुरु आहेत
म्स्त लेख.
म्स्त लेख.
मागे माबोवर एक कोणी तरी आर्किटेक्ट होत्या त्यांनी मुलांची शाळा/कॉलेज, व्यवसाय सांभाळून केलेल्या कोर्स बद्दल एक लेख लिहिला होता.>>>> +१
माझं दुसऱ्या डावातील शिक्षण..
माझं दुसऱ्या डावातील शिक्षण...
http://www.maayboli.com/node/62233
हा तो लेख - अनया यांचा
(रच्याकने, या धाग्याचे शीर्षक
(रच्याकने, या धाग्याचे शीर्षक मराठीतून लिहिता येईल का?)
या धाग्याचे शीर्षक मराठीतून
या धाग्याचे शीर्षक मराठीतून लिहिता येईल का?
केवळ समर्पक मथळा मराठीतून न सुचल्याने मी हा धागा काढला नव्हता.
>> केवळ समर्पक मथळा मराठीतून
>> केवळ समर्पक मथळा मराठीतून न सुचल्याने मी हा धागा काढला नव्हता.
त्याच धाग्याच्या विषयाला धरून पहिल्यादाच याला मराठी शब्दप्रयोग तुम्हाला सुचवता आला असता
मी आयुष्यात पहिल्यांदा बागकाम
मी आयुष्यात पहिल्यांदा बागकाम करतेय ( व झाडं जिवंत राहतायत - हे झाडांनी पहिल्यांदा केले माझ्यासाठी)
हे तसं पहिल्यांदा नाहीये. कारण मी थोडीफार असेंबली कायम करत आले आहे. पण नव्या घरातील बेड्स, टेबलं वगैरे आयकियातून मागवले होते. ते सर्व मी एकटीने असेंबल केले. ३ बेड्स, ४ एंड टेबल्स. उरलेले बॅकयार्ड फर्निचर व लिव्हिंग रूम सोफा मी न नवर्याने मिळून. पण ते बेड्स असेंबल करणे अॅब्सोल्युटली पेशन्सचे, शक्तीचे काम होते.
मस्तच बस्के !
मस्तच बस्के !
मी पण ओला कचरा जिरवून आणि पालापाचोळा वापरून खत तयार करून त्यात बाल्कनी गार्डन तयार करायचा प्रयत्न करतोय.
कारली तेव्हढी आली बाकी ३-४ गोष्टी फसल्यात
मी 35शी नंतर सायकल, स्विमिंग,
मी 35शी नंतर सायकल, स्विमिंग, दुचाकी व चारचाकी शिकले. स्विमिंग शिकायला माझ्या बॅच मध्ये मी एकटी बाई व बाकीचे सगळे 20 25शीचे तरुण होते. पाण्याला लोक इतके घाबरतात पहिल्यांदा तेव्हा बघितले. 8 दिवसात शिकणारी मी एकटीच, बाकीचे पोर्गे नाही शिकले. मी नंतर वर्षभर नियमित जात राहिले. नंतर सुटले ते सुटलेच.
पण मी पहिल्यांदा केलेली व आवडलेली गोष्ट म्हणजे फायर escape विंडो च्या बाहेर लावलेल्या शूट मधून खाली उडी मारणे. ऑफिसात सेफटी वीक निमित्त वेगवेगलीं प्रात्यक्षिके होती. एक होते खिडकीबाहेर एक फायर escape शूट लावून वेळ येताच खिडकी उघडून त्यातून स्वतःला खाली झोकून द्यायचे. त्यातून खाली पडताना तुम्ही गोल गोल फिरत खाली पडता त्यामुळे ब्रेक्स लागत खाली येता व खाली ही आपल्या पायावरच उभे पडता. मी जेव्हा हे बघितले तेव्हा नको ही भानगड वाटले, पण मैत्रिणीने भरीस पाडले. पण ती खूप घाबरली आयत्या वेळेस. खिडकीला सोडायलाच तयार नव्हती. मीच तिचे हात जबरदस्ती सोडवून तिला खाली ढकलले आणि तिच्या मागून मी उडी मारली. घाबरायचे नाहीच हे ठरवून मी उडी ठोकली चौथ्या मजल्यावरून. अगदी पिसासारखी तरंगत गोल गोल फिरत खाली आले. मी घाबरले नाही यावर माझाच विश्वास बसत नव्हता. परत करावेसे वाटत होते पण एकच मौका मिळत होता प्रत्येकाला.
सही आहे.!
सही आहे.!
पण मला चटकन असे काही आठवत नाहीये. याचे तसे दोन अर्थ होऊ शकतात. एक म्हणजे मला वेळ निघून गेल्यावर नवीन काहीही शिकायला भिती वाटते. किंवा मला ज्या गोष्टी शिकायच्या होत्या त्या मी वेळच्या वेळी शिकल्या आणि ईतर ज्या नाही येत त्यांची कधी गरजही वाटली नाही.
एक चमकून आठवणारे उदाहरण म्हणजे सायकल.
काही कारणांमुळे मी लहानपणी सायकल चालवायला शिकलो नाही आणि घरच्यांनीही मला ती शिकू दिली नाही. अर्थात, मग मला बाईकही चालवता येत नाही. अगदी आजही काहीही जमत नाही. आणि प्रामाणिकपणे सांगायचे तर गरजही वाटत नाही.
दुसरे चमकून आठवणारे उदाहरण म्हणजे ईंग्लिश स्पीकीण्ग. ईथे मात्र शिकायची ईच्छा नसली तरी गरज नक्कीच आहे. ही क्लास लावून शिकायची गरज आहे. अपवदानेच एखादा ईंजिनीअर असे जॉबला वगैरे लागल्यावर शिकत असेल. पण तरी मला तसले विचार झटकून खरंच मनावर घ्यायला हवे.
मी पक्का मत्स्यप्रेमी आहे. पण
मी पक्का मत्स्यप्रेमी आहे. पण मला कोलंबी खेकड्यानंतर हलवा, पापलेट, रावस, सुरमई हे चारच मासे फार आवडतात. बोंबील नावाचा पातळ काटेदार मासा जराही आवडत नाही. घरी आईवडिलांच्या आवडीचे म्हणून वरचेवर बोंबील असतातच. पण मला सुके बोंबीलच आवडतात, ओले नाही. एवढे चमचमीत तळलेले बोंबील महिन्यातून दोनदा समोर दिसत असूनही कधी खायचा मोह झाला नाही.
पण काही महिन्यांपूर्वी मी पहिल्यांदा बोंबील खाल्ले. एका ऑफिसमधील मैत्रीणीबरोबर जेवायला बाहेर गेलेलो. ज्या हॉटेलमध्ये गेलेलो तिथले बोंबील फ्राय तिच्या फार आवडीचे असल्याने आणि तिला तेच खायचे असल्याने मग मागवले. छान चिकन क्रिस्पी स्टार्टर यावे तसे वाटले आणि पटकन उचलून एक तोंडात टाकला. काय माहीत पण खूप आवडला. जवळपास निम्मे मीच संपवले.
आता गेले काही महिन्यात मी घरी तीनचार वेळा आईच्या हातचे बोंबील थोडे थोडे का होईना खाल्लेत. फक्त हा चमत्कार कसा झाला हे मी माझ्या आईला सांगितले नाही. कारण भरवसा नाही माझ्या आईचा, त्या मैत्रीणीलाच सून करून घ्यायच्या मागे लागायची
मी आयुष्यात पहिल्यांदा बागकाम
मी आयुष्यात पहिल्यांदा बागकाम करतेय >>>>>
मी पण हे काम चालू केले आहे. घराच्या एका बाजूला व्हर्टिकल गार्डन साठी पोल लावले आहेत. रोपं कोणती आणायची याची लिस्ट केली आहे. आता फक्त ठिबक सिंचन स्वस्तात मस्त कसे करायचे हे शोधले की पुढचे काम चालू........ असे म्हणत म्हणत 5 ते 6 महिने गेले
पण आता वेळ मिळाला की तेच काम पहिल्यांदा करणार आहे जर कोणाला स्वस्तात मस्त ठिबक सिंचन कसे करायचे हे माहीत असेल तर शिकवा. बाजारातून आणून जोडायचे हा पर्याय सध्या नको आहे.
दुसरी एक गोष्ट परवा पासून चालू केली. उद्या लिहीन, सध्या शुभरात्री.
लहानपणापासूनच मला वाचनाचा
लहानपणापासूनच मला वाचनाचा भयंकर नाद. वाचण्याच्या प्रकारात खास आवडनिवड होती असे काही नाही. जे दिसेल ते, जे मिळेल ते मी वाचत असे. मित्रमंडळींकडून त्यांच्या पालकांनी वाचायला आणलेली पुस्तके, मासिकेही मी मागून आणून वाचत असे. बऱ्याचदा रस्त्यावर पडलेले कागदाचे चिटोरेही उचलून मी वाचत असे. कधीकधी काही वाचायला नसेल तर अगोदर वाचलेलं साहित्य मी पुन्हा पुन्हा वाचत असे. अशा प्रकारे बऱ्याचदा एकाच पुस्तकाची माझी असंख्य पारायणे झालेली आहेत.
तीस वर्षांपूर्वी किंग्जसर्कल (आजचे महेश्वरी उद्यान) येथे विक्रेते रस्त्यांवर जुनी पुस्तके घेऊन विकायला बसत. त्यांच्याकडे अगदी स्वस्तात जुनी पुस्तके विकत मिळत. दर दोन चार दिवसांनी त्यांच्याकडे माझी एखादी फेरी ठरलेली असे. तेव्हा असेच एकदा मला तिथे 'Learn urdu in 30 days' हे पुस्तक मिळाले. ते वाचून मला उर्दू शिकण्याची भयंकर उर्मी झाली. पुस्तकात लिहिल्याप्रमाणे त्यातील सर्व पाठ मी गिरवले. सर्व मूळाक्षरांचा लेखी सराव केला. मला उर्दू लिहायला आणि वाचायला येऊ लागले. पण त्याचा अर्थ समजत नसे. म्हणून मी भेंडीबाजार येथून १ली ते ४थी पर्यंतची मदरसा आणि बालभारतीची उर्दू मिडीयमची पुस्तके आणली. त्यांचा अभ्यास केला. आता मला थोडे थोडे उर्दू समजू लागले. तरी काही शब्द समजायला कठीण पडत. म्हणून पुन्हा भेंडीबाजार येथे जाऊन उर्दूची भली मोठी डिक्शनरी घेऊन आलो. काही शब्द अडले की मी त्यात बघायचो. उर्दू जाणणारे दोन मुस्लिम मित्र बनवले. त्यांच्याकडून मी शंका निवारण करून घेई. ते 'इन्कलाब' उर्दू वृत्तपत्र व इतर उर्दू पुस्तकं वाचीत, तेव्हा मी त्यात डोकावे. तेव्हा मित्रमंडळींनी मला फार पिडलं. गमतीत मला म्हणायचे "काय रे? कोण्या मुस्लिम मुलीच्या प्रेमात पडलायस का?" कोणी म्हणे "धर्मांतर करणारेस वाटतं?" पण मी माझे प्रयत्न सोडले नाहीत. आणि शेवटी मी बऱ्यापैकी उर्दू लिहायला, वाचायला आणि समजायला लागलो.
पण थोड्याच दिवसांत माझे लग्न झाले. आणि घरसंसारात पडल्यावर जे सर्वांचे होते तेच माझे झाले. गेली तीस वर्षे माझा उर्दूशी संपर्कच राहिला नाही. मी बरचसं विसरून गेलोय. हातातोंडाशी आलेला घास खायचा राहून गेला.
आता सारखं वाटू लागलंय, की उर्दूचा पुन्हा सराव करावा. मोबाईलच्या जमान्यात आता तर उर्दू शिकणे फारच सोपे झालंय. अँड्रॉइडवर उर्दू शिकण्याचे विविध प्रकारचे अप्लिकेशन, पुस्तके, वर्तमानपत्रे, मासिके आहेत. संसारातून जरा मोकळा झालो की मी माझी अपूर्ण राहिलेली 'उर्दू' आणि 'मोडी लिपी'ची इच्छा नक्कीच पूर्ण करणार आहे.
Pages