आपल्याला नेहमीच सेलिब्रेटी आणि सुपर्रस्टारची चमकधमक दिसते, त्यांना मिळणारा मानमरातब पैसा दिसतो. मात्र तो त्यांनी मेहनतीने, सचोटीने, आणि आपल्या अंगी असलेल्या कलागुणांनी कमावला असतो हे दिसत नाही. अर्थात सारेच लोकं असा विचार करत नसतील, काहींना याची जाण असेलही.
मात्र या देशात सेलिब्रेटी असणे हे त्रासदायक सुद्धा ठरू शकते जेव्हा तुमची एखादी शिंक सुद्धा न्यूज बनते, तुमच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ होत तुमच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जाते, आणि त्यातून न्यूज शोधली जाते, न मिळाल्यास बनवली जाते.
आताच्या सतराशे साठ न्यूज चॅनेलच्या जमान्यात शेकडो रिपोर्टर आणि त्यांचे फोटोग्राफर याच कामात लागले असतात, आणि सोशल मिडीया तसेच आधुनिक तंत्रज्ञानामुळे हे कॅप्चर केलेले क्षण आणि या बातम्या तितक्याच वेगाने पसरतात, पसरवल्या जातात.
हे सारे आता सुचायचे तात्कालिक कारण नुकतेच घडलेली हि घटना आणि कानावर आलेली ही बातमी...
सेलिब्रेटी होणे गुन्हा असेल म्हणावे तर सेलिब्रेटींच्या पोटी जन्म घेणे हा तर प्रचंड मोठा अपराध ठरावा अशी ही बातमी..
खुद्द शाहरूख खानची मुलेही यातून सुटली नाहीत, किंबहुना शाहरूख खानची मुले असल्यानेच त्यांना हा मनस्ताप भोगावा लागला..
पडद्यावर कोणता कलाकार काय थिल्लरपणा करतो याची आपण नेहमीच चर्चा करतो, मात्र या लोकशाहीने नटलेल्या देशात या कलाकारांना कोणत्या वाह्यातपणाचा सामना करावा लागतो हे यातून समजते..
मिडीयाचा वाह्यातपणा ईथे बघू शकता
कसे त्याच्या मुलीचे फोटो मिळवण्यासाठी आणि त्या नादात तिला हॅरास करत होते.
https://www.youtube.com/watch?v=8PfEe0mnhEo
दुसर्या एका धाग्यावर स्टॉकिंगची चर्चा चालू आहे . अक्षयकुमार कसे मोबाईलमधून हिरोईनचे फोटो घेण्याचा वाह्यातपणा करताना एका चित्रपटात दाखवलेय जे चुकीचे आहे.
ईथे प्रत्यक्षात एका अर्थाने तेच चालू आहे. आणि याचा एक अर्थ असाही निघू शकतो की या देशात कुठलीही मुलगी सेफ नाहीये, अगदी एखाद्या सुपर्रस्टारची असली तरीही ..
शाहरूख माझा आवडता हिरो असल्याने त्याच्या नावाने सर्च करत विकेंडला काही यू ट्यूब विडिओ बघतो, तेव्हा ही न्यूज समजली.
मात्र या जागी त्याच्या मुलीच्या जागी ईतर कोणत्याही कलाकाराची किंवा अगदी कोणाचीही मुलगी असती तरी हा प्रकार बघून तितकीच चीड आली असती. आणि त्याचा निषेध नोंदवणारा धागा तेव्हाही काढलाच असता. त्यामुळे कृपया या धाग्याचा संबंध शाहरूखशी जोडून आणखी त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर चर्चा नको.
मात्र एका गोष्टीचे कौतुक वाटले जेव्हा या विडिओनंतर या खालील विडिओमध्ये शाहरूखची खास शाहरूख टच रिअॅक्शन पाहिली. हॅटस ऑफ! या प्रकारानंतर असे समजूतदारपणे तोच वागू शकतो. ईतक्या योग्य शब्दात हे तोच बोलू शकतो.
Shahrukh Khan REACTS on Suhana's TROUBLE with media
https://www.youtube.com/watch?v=ifl1N4kweyk
या देशातील मिडीया मात्र दिवसेंदिवस शरम आणत आहे !
चूक भूल माफ,
ऋन्मेष
चला आज माझा पहीला नंबर धागा
चला आज माझा पहीला नंबर धागा वाढवायला. बाकी काहीही असो, माबोचा सुपरस्टारसाठी नामांकन केल्यास ऋ यांचे नाव नक्की असेल. डिपीचा नवीन शाखा छान आहे. आता होऊन जाऊ द्या बाकी मुद्द्याला धरून / सोडून चर्चा. येईल परत धागा संख्या बघायला.
"पब्लिक"ने संयमाने वागायला
"पब्लिक"ने संयमाने वागायला शिकायला पाहिजे.
फोटो घेण्याचं वेड वाढत जातय. इतरांचे घेताना त्यांना विचारायचे असते हे सुद्धा आता शाळेत शिकवायला पाहिजे.
परदेशांत यावर काही विनोदी सिनेमेही आले होते.
Srd लिंक प्लिज!
Srd लिंक प्लिज!
सेलिब्रिटींच्या आयुष्याविषयी
सेलिब्रिटींच्या आयुष्याविषयी त्यांच्या मुलांविषयी जाणून घेण्यास पापाराझी मागे लागतात हे मान्य. पण त्यांना कंट्रोल करता येऊ शकते. सन्नी पाजीच्या बायकोचे आणि मुलींचे फोटो घ्यायचा प्रयत्न एकदा एका फोटोग्राफरने केला असता त्याच्या खांद्यावर ढाई किलोचा हात पडला, कॅमेरा, रोल सगळंच रबला प्यारं झालं. फोटोग्राफर तसे होण्यापासून थोडक्यात वाचला पण पुन्हा कोणी तसला वाह्यातपणा केला नाही.
सुहानासोबत घडलेलं हे सगळं शाहरुखच्या संमतीने रॅदर त्याच्या प्लॅनिंगनुसारच होत नसेल कशावरुन? त्याच्या मुलीकरिता त्याने बॉडीगार्ड्स ठेवले आहेत. ते नेमक्या वेळी कसे गायब होतात?
सेलिब्रिटींच्या आयुष्याविषयी
सेलिब्रिटींच्या आयुष्याविषयी त्यांच्या मुलांविषयी जाणून घेण्यास पापाराझी मागे लागतात हे मान्य. पण त्यांना कंट्रोल करता येऊ शकते. सन्नी पाजीच्या बायकोचे आणि मुलींचे फोटो घ्यायचा प्रयत्न एकदा एका फोटोग्राफरने केला असता त्याच्या खांद्यावर ढाई किलोचा हात पडला, कॅमेरा, रोल सगळंच रबला प्यारं झालं. फोटोग्राफर तसे होण्यापासून थोडक्यात वाचला पण पुन्हा कोणी तसला वाह्यातपणा केला नाही.
सुहानासोबत घडलेलं हे सगळं शाहरुखच्या संमतीने रॅदर त्याच्या प्लॅनिंगनुसारच होत नसेल कशावरुन? त्याच्या मुलीकरिता त्याने बॉडीगार्ड्स ठेवले आहेत. ते नेमक्या वेळी कसे गायब होतात?
बिपिन यांच्याशी सहमत....
बिपिन यांच्याशी सहमत....
सेलिब्रिटींच्या बाबतीत जोवर स्वतः सेलिब्रिटी ठरवत नाहीत तोवर परिंदा भी पर नही मार सकता.
स्टारकिड्सना लॉन्च करण्याआधी अशा अनेक क्लृप्त्या योजल्या जातात. त्यातलीच ही एखादी असावी.
बिपीन आणि नानाकळा,
बिपीन आणि नानाकळा,
छान मुद्दा मांडलात. मलाही हा उचलायचा होताच.
जेव्हा सेलिब्रेटींशी काही दुर्दैवी घडते तेव्हा बरेचदा किंवा नेहमीच हा पब्लिसिटी स्टंट तर नसेल ही शंका घेतली जाते. हे देखील त्यांना फार त्रासदायक जात असेल. तुम्ही सहानुभुती नका देऊ, गरजही नाही आम्हाला, पण असे आरोप तरी करू नका. असेच त्यांना यावेळी वाटत असेल.
ज्या लोकांनी स्वत:च्या आयुष्यात स्टेशनबाहेर बसलेल्या भिकार्याला दोन रुपये देण्याव्यतिरीक्त काही केले नसेल ते देखील त्यांच्याकडून नेहमीच सामाजिक जाण जपत समाजकार्याची अपेक्षा ठेवतात. वर लोकांच्याच जीवावर हे पैसे कमावतात असे बोलून दाखवतात. आणि कोणी केलेच काही समाजकार्य तर ते पब्लिसिटी स्टंट आहे वा इमेज बिल्डींगसाठी केले जातेय असा आरोप होतो.
त्या ईंटरकोर्सच्या धाग्यावर देखील हाच आरोप झाला. म्हणजे शाहरूखने सेन्सॉर बोर्डाला मॅनेज करून तो स्टंट घडवून आणला. जे सेन्सॉर बोर्ड यांच्यावर लक्ष ठेवायला आहे ते बोर्डच तो मॅनेज करू शकतो ईतका पॉवरफुल सेलिब्रेटी आहे तो या देशातील? मग त्याच्याबाजूने लाखभर मते आली तर ती देखील त्यानेच आपली माणसे लावून मॅनेज केली असतील अशी शंका आली. चला हे शक्यही मानले. पण अमेरीकेत त्याच्याशी जे घडले ते देखील स्टंट होता अशी शंका म्हणजे अमेरीकन सुरक्षाव्यवस्था सुद्धा तो आपल्या पैसा किंवा पॉवर जे काही आहे त्या बळावर विकत घेउन त्यांना हवे तसे वागवू शकतो का? आता या धाग्यावरच्या केसमध्ये मिडीयाला त्याने मॅनेज केले असेल अशी शंका निघाली. नक्की कोणत्या राजकीय नेत्याचा हात त्याच्या डोक्यावर आहे जो ते हे सगळे सहज करू शकतो. किंबहुना आजच्या तारखेला भारतातील सर्वात मोठे नेते नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले तर तो देश सोडून जाईल हे देखील मागे त्याच्या नावाने उगाचच फिरत होते आणि उगाचच त्याला या राजकारणात ओढले जात होते. आणि उगाचच तो मोदी समर्थकांच्या एकतर्फी शिव्या खात होता. जेव्हा हे त्याचे ट्विट नव्हते हे क्लीअर झाले तेव्हा कोणत्या समर्थकाने आधी घातलेल्या शिव्यांबद्दल दिलगिरी व्यक्त केली असेल?
वर नानाकळा म्हणतात की..., सेलिब्रिटींच्या बाबतीत जोवर स्वतः सेलिब्रिटी ठरवत नाहीत तोवर परिंदा भी पर नही मार सकता...... आर यू शुअर?? पुन्हा एकदा विचार करा. मग बोलूया यावर.
बाकी सनी पाजीने कोणत्या कॅमेरामन वा रिपोर्टरला मारले माहीत नाही. पण यांच्यावर हात उचलणे म्हणजे एकतर हे लोकं मग तुम्हाला वाळीतच टाकतील किंवा आणखी तुमच्याबद्दल अफवा पसरवतील. आणि आपल्याईथली गॉसिपप्रिय लोकं त्यावर लगेच विश्वास ठेवतील.
सन्नीपाजींनी एवढं सगळं केलं?
सन्नीपाजींनी एवढं सगळं केलं? कधी वाचलं नाही.
सलमान, शाहरुख किंवा त्यांच्या बॉडीगार्डनी धक्काबुक्की केली तरी अवघे भूमंडळ डळमळते.
ऋन्मेष तुमचा लेटेस्ट प्रतिसाद
ऋन्मेष तुमचा लेटेस्ट प्रतिसाद म्हणजे येडा बनके पेडा खानेका किंवा वेड पांघरुन पेडगावला जाणे प्रकारातला आहे. तुम्हाला सारे ठाऊक आहे पण ते आमच्या कीबोर्डातुनच यावे असा प्रयत्न आहे आणि आम्ही ते लिहिले नाही म्हणजे तुम्ही तुमचाच मुद्दा खरा असे एकतर्फी घोषित करणार. राजाच्या आणि उंदराच्या टोपीची गोष्ट असा हा प्रकार. असो.
थोडक्यात तुमचे शंकानिरसन,
वार्याने पवनचक्की फिरते किंवा शिडाचे गलबत पुढे जाते याचा अर्थ आपण वारा मॅनेज करतो असे नव्हे तर वार्याच्या गुणधर्माचा उपयोग करुन घेतो इतके ते साधे सोपे आहे.
अमेरिकन सिक्युरिटी मॅनेज करायची काहीच गरज नाही. ती सर्वांकरिता तितकीच कडक आहे. अब्दुल कलामांसारख्या थोर व्यक्तिमत्वाचीही त्यांनी कसून तपासणी केलीच होती. फक्त कलामसाहेबांनी त्याचा इश्यू केला नाही. शाहरुखचा फंडा सोपा आहे. खान नावाचा अमेरिकास्थित मुस्लिम पात्राविषयीचा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी एक अमेरिका वारी करायची. त्यांनी कसून तपासणी केलीच तर चांगलेच आहे. नाहीच केली तर आपणहून कुठलीतरी हलकीशी संशयास्पद हालचाल करायची मग ते कपडे उतरवणार. त्यांना काही सापडणार नाहीच पण त्यांच्या कृतीची लगेच बोंबाबोंब ठोकायची. तेव्हढीच फुकटची पब्लिसिटी सिनेमाला.
सेन्सर बोर्ड देखील मॅनेज करायची गरज नाही. पहलाज काहीसा विक्षिप्त माणूस आहे हे एव्हाना सर्व भारतीय प्रेक्षकांना माहीत आहेच. आपण मुद्दामून एखादा असा शब्द सिनेमात टाकायचा की तो उचकेल. उचकला की आपण वाद घालायचा झाली पब्लिसिटी.
पाप्पाराझी तर कायमच सेलिब्रिटींच्या मागे लागलेले असतात. आपल्याला त्यांची गरज असेल तेव्हा फक्त आपले सिक्युरिटी गार्ड्स बाजुला करायचे. इशारा समझल्याप्रमाणे हे पाप्पाराझी टाकलेले तुकडे गोळा करायला येणार्या कुत्र्याप्रमाणे पुढे येतात. मिळाली पब्लिसिटी. खरेच जर शाहरुखला किंवा त्याच्या कन्येला त्यांचा त्रास होत असेल तर त्याची सिक्युरिटी नेमके कसले पैसे घेते त्याच्याकडून?
असो शाहरुखच्या दोन रिसेंट प्रसंगांचा तुम्ही एक शाखामृग असुन कुठे उल्लेख केलेला दिसत नाही. एक म्हणजे त्यांना रईसच्या प्रमोशनच्या वेळी ट्रेन मधून काही वस्तु बाहेर फेकल्या त्या गोळा करताना लोक जखमी (आणि नंतर एक मृतही) झाले. दुसर्या एका प्रसंगात तो एका रिअॅलिटी शो मध्ये गेला आणि त्याला कल्पना नसताना एका हिंस्त्र प्राण्याला सामोरे जावे लागले त्यामुळे तो प्रचंड घाबरला. हा शोच्या निर्मात्याचा ठरवून केलेला स्टंट होता हे समजल्यावर शाहरुखने अँकरला चोपले. प्रत्यक्षात शाहरुखला या सगळ्याची कल्पना होती आणि त्याला कल्पना नाही असे भासवून त्याने अँकरला चोपणे हाच एक पब्लिसिटी स्टंट होता. बातम्या थोडक्यात दिल्या आहेत. तुम्हाला गरज असेल तर तपशील इंटरनेटवर शोधा.
थोडक्यात अमेरिकन सिक्युरिटी / प्रेस - मिडीया किंबा सेन्सर बोर्ड यांच्या गुणवैशिष्ट्यांचा अभ्यास करुन त्यानुसार हरकती करायच्या. त्यांच्या अपेक्षित रिअॅक्शन्स आल्या की मग त्यानुसार आपल्याला हवी तशी प्रसिद्धी मिळवायची.
हेच मॉडेल मिनिएचर प्रकारात श्री. रिशी पकूरही वापरतातच की. मायबोलीकरांच्या प्रतिक्रिया देण्याचा अभ्यास करायचा. त्यानुसार काहीतरी आचरट, धागे किंवा प्रतिसाद टाकायचे. अपेक्षित प्रतिसाद आले की धाग्याचे शतक होणार. नाहीच आले तर बघा मी सांगतो तेच खरे माझा प्रतिवाद कुणीच केला नाही असे म्हणायचे. आणि कुणी मुद्देसूद पकडले की त्याला हळूच बगल द्यायची जसे की मी मागे विचारले की करण जोहरचा मुद्दामच करण जोहार असा उल्लेख एक नव्हे तर अनेक वेळा करायचे प्रयोजन काय? तर प्रश्नाचे उत्तर दिलेच नाही उलट त्यानंतरही पुन्हा तसाच उल्लेख चालूच ठेवला.
असो. ऋन्मेषसारखी एक नावगावओळख कशाचाच पत्ता नसलेली व्यक्ति लोकांना उचकवून धागापब्लिसिटी मिळवू शकते तर शाहरुखला पब्लिसिटी मिळविणे फारसे अवघड नसावे.
बायदवे शाहरुखच्या पॉवरफूल असण्याबद्दल - अबतक ५६ सिनेमा पाहावा. त्यात नाना व्हिलनला पॉवर आणि न्यूसन्स व्हॅल्यू यातला फरक फार सोप्या पद्धतीने समजावून सांगतो. न्यूसन्स व्हॅल्यू ऋन्मेष, किंवा इतर कोणीही सोम्यागोम्या मायबोलीकर बाळगू शकतो. शाहरुखकडे तर ती फार मोठ्या प्रमाणावर आहे. पॉवरचा प्रत्यय फारच थोड्या व्यक्ती देऊ शकतात.
बिपीनचंद्रजी, परफेक्ट
बिपीनचंद्रजी, परफेक्ट प्रतिसाद.
{{{ सलमान, शाहरुख किंवा
{{{ सलमान, शाहरुख किंवा त्यांच्या बॉडीगार्डनी धक्काबुक्की केली तरी अवघे भूमंडळ डळमळते. }}}
भरत. सलमान शाहरुखचे फोटो काढताना त्यांना धक्काबुक्की केली तर फॅनच्या जिवावर जगता आणि फॅनला झिडकारता, माज आलाय का? अशी विचारणा होते. सनीची पत्नी आणि मुली कधीही कुठल्या पब्लिसिटीच्या भुकेल्या नसताना, कुठल्याही वादात नसताना त्यांचे बळजबरीने फोटो घेणे ही फोटोग्राफरचीच चूक होती अशा मताची त्याला सहानुभूती देणारी बातमी आली होती.
{त्याच्या खांद्यावर ढाई
{त्याच्या खांद्यावर ढाई किलोचा हात पडला, कॅमेरा, रोल सगळंच रबला प्यारं झालं. फोटोग्राफर तसे होण्यापासून थोडक्यात वाचला }
हे मस्तच केलं सनीनी.
बिपिन, कडक प्रतिसाद. एकदम
बिपिन, कडक प्रतिसाद. एकदम सडेतोड. भन्नाट आवडला.
कोणी केलेच काही समाजकार्य तर ते पब्लिसिटी स्टंट आहे वा इमेज बिल्डींगसाठी केले जातेय असा आरोप होतो.
>> ह्यात काहीही आरोप नाही. हे असेच असते. बीइंग ह्युमन हा एका कापडकंपनीने सलमानला व्यावसायिक फी देऊन निर्माण केलेला क्लोदिंग ब्रॅण्ड आहे. बीइंग ह्युमन ही संस्था त्या ब्रॅन्डच्या पोझिशनिंगसाठी निर्माण केली गेली आहे. बहुसंख्यांना तर अजूनही माहित नसेल.
तेव्हा सेलिब्रिटींचे निस्वार्थी समाजकार्य ह्याबद्दल भ्रमात राहू नये. जे लोक कुठेही पब्लिसिटी न करता समाजकार्य करतात व त्यांचा त्यांना काहीच फायदा होत नसतो असेही लोक आहेत जगात,.
@ बिपीन चन्द्र प्रतिसाद आवडल.
@ बिपीन चन्द्र
प्रतिसाद आवडल.
हॅरास केलं म्हणजे नेमकं काय
हॅरास केलं म्हणजे नेमकं काय केलं... मी तो व्हिडीओ पहिला फोटोग्राफर फक्त फोटो काढत होते ती पॅनिक झाली हे खरं आहे. पण हॅरास म्हणजे नक्की काय केलं????
या देशातील मिडीया मात्र
या देशातील मिडीया मात्र दिवसेंदिवस शरम आणत आहे !
100% खरं आहे. बाकी सेलिब्रिटीची मुले unsafe आहेत हे मात्र चूक. त्याचे bodyguard अशावेळी कुठे कल्टी मारतात काय माहित
@ बिपीन चन्द्र
@ बिपीन चन्द्र
LOL, मस्त सिक्सर मारलाय
तुमचे प्रतिसाद मनापासुन आवडले
धन्यवाद मानिनी, प्रसाद आणि
धन्यवाद मानिनी, प्रसाद आणि नानाकळा. खरेतर मी मागेच एका धाग्यावर ऋन्मेष स्ट्रॅटेजीची पोलखोल केली होती पण तिथे एका आयडीने तुम्ही लिंबूटिंबूच्या विरोधात का लिहीत नाही आणि ऋन्मेषच्या विरोधातच का लिहिता असा आरोप करत गोंधळ उडवून दिला होता.
इथला माझा प्रतिसाद वाचू शकता.
इथला माझा प्रतिसाद वाचू शकता.
http://www.maayboli.com/node/62599?page=2
आजवर अनेक मायबोलीकर आपल्या
आजवर अनेक मायबोलीकर आपल्या मुद्द्यांना रेटतांना (चांगले वा वाईट, चूक वा बरोबर, सॉर्टेड वा फ्लॉड) बघितले आहेत, काही ह्या प्रयत्नात शहीद सुद्धा झाले आहेत, पण असा बिनकण्याचा मायबोलीकर कधी बघितला नाही. अनेक मायबोलीकरांनी वेळोवेळी ह्या स्पाईनलेस प्रतिसादांना 'किती कूल आहे हा' म्हणत ट्रोलिंग मानसिकतेला सतत उचलून धरले सतत जिवंत ठेवले. मी वेळोवेळी ह्या ट्रोल आयडीच्या पोस्ट्सचा निषेध करत आले आहे, पुढेही करीत राहीनच.
अनेकांच्या संयमाचा अंत पाहणारी ही विचारसरणी सगळ्यांनी मिळून थोपावणे मायबोलीचे स्पिरिट टिकवण्यासाठी नितांत आवश्यक आहे असे मला मनापासून वाटते.
या देशातील मिडीया मात्र
या देशातील मिडीया मात्र दिवसेंदिवस शरम आणत आहे !>>> जो तो मिडीयाचा आपल्याला हवा तसा वापर करतो आहे. नाही का?
नाहीच आवडत असे धागे तर वाचू नका आणि प्रतिसाद तर मुळीच देऊ नका
बिपिनचंद्र आवडली पोस्ट,
बिपिनचंद्र आवडली पोस्ट, कित्येक मुद्दे पटले
आता काही शंका आणि सूचना ..
१) शाहरूख हा खरेच ईतका स्मार्ट आहे असे तुम्हाला वाटते जो अमेरीकेच्या सुरक्षाव्यवस्थेचा असा फायदा करून घेईल?
शाहरूख हा खरेच ईतका चतुर आहे असे तुम्हाला वाटते जो तो कांगावा करून अमेरीकेसारख्या बलशाली देशाविरुद्ध ओरडा करेल आणि मग त्यांच्यावरच आणि तिथेच माय नेम इज खान सारखा चित्रपट बनवेन?
२) एकीकडे आपण म्हणता, "पहलाज काहीसा विक्षिप्त माणूस आहे हे एव्हाना सर्व भारतीय प्रेक्षकांना माहीत आहेच" पण त्याचवेळी हा विक्षिप्तपणा त्यांनी स्वत:च्या मनाने केला नसून शाहरूखने त्यांना करायला भाग पाडला असा युक्तीवाद करता. अर्थात या युक्तीवादात काही चुकीचे नाही. जो माणूस प्वाईंट क्रमांक एक प्रमाणे ईतका स्मार्ट आणि चतुर आहे की अमेरीकन सुरक्षा पॉलिसींचा आपल्या सोयीने फायदा करून घेऊ शकतो तर पेहलाज यांच्या स्वभावाचा फायदा उचलणे त्याला काही अवघड नाही. पण अर्थात हा तर्क आहे. नेमके सिद्ध करणे अवघड आहे. पण या प्रकरणात पेहलाज हा विक्षिप्त माणूस आहे हे कबूल केल्याबद्दल धन्यवाद
३) ईथे आपण दोन मुद्दे छान मांडलेत, जे मला पटले.
३.अ) पापाराझी हे कुत्र्याप्रमाणे (कुत्रा हा आपलाच शब्द) टपलेले असतात. यांच्यापासून सेलिब्रेटीच नाही तर त्यांची फॅमिली सुद्धा सुरक्षित नसते.
३.ब) आपल्या देशात सेलिब्रेटींना सिक्युरटी ही लागतेच, पण त्याच बरोबर त्यांच्या फॅमिलीला सुद्धा सिक्युरटी लागते. जर तुम्ही सिक्युरटी हटवलीत तर मग तुम्हाला हे जे घडले ते भोगणे भागच आहे.
ईथे पर्टीक्युलर या केसमध्ये शाहरूखने या वृत्तीचा फायदा करून घेतला की नाही हे एकवेळ बाजूला ठेऊ. किंवा आपल्या समाधानासाठी मान्यही करू की ते तसेच असावे.
पण वर ३.अ आणि ३.ब नुसार या देशात सेलिब्रेटी असणे हा गुन्हा आणि त्यांची फॅमिली असणे हा अपराध आहे यात काही चुकीचे नाही हे आपल्यालाही मान्य आहेच.
४) रईसच्या प्रमोशनच्या वेळी ट्रेनमधून वस्तू फेकल्यावर लोकं जखमी झाले या बातमीची लिंक दिलीत तर आवडेल. कारण तो शाहरूख आहे. त्याच्या नावावर बरेच अफवाही फिरतात.
५) रिअॅलिटी शोज हे सारेच ठरवून केले गेलेले असतात, त्या बातमीत काही नावीन्य नाही. माझ्या कानावरही आली नाही, मी असे शो बघतही नाही.
पण यावरून आठवले, तो एक बिग बॉस म्हणून शो आहे. मला कन्सेप्ट फक्त ऐकून माहीत आहे, कधी बघितलाही नाही, पण जे ऐकलेय त्यावरून लोकं नक्की काय म्हणून बघतात हे समजत नाही. बहुतेक लोकांना सेलिब्रेटीच्या जीवनात डोकावायची आवड असते. गंमत म्हणजे त्यातील व्यक्ती काही फार मोठ्या सेलिब्रेटीही नसतात तरी ही क्रेझ. मग शाहरूखसारख्या सुपर्रस्टारच्या व्यक्तीगत जीवनात डोकावायची किती असेल याची कल्पनाच करू शकतो. खरेच अशक्य आहे या देशात सुपर्रस्टार बनून जगणे.
६) <<<<<<<<<< मागे विचारले की करण जोहरचा मुद्दामच करण जोहार असा उल्लेख एक नव्हे तर अनेक वेळा करायचे प्रयोजन काय? तर प्रश्नाचे उत्तर दिलेच नाही उलट त्यानंतरही पुन्हा तसाच उल्लेख चालूच ठेवला. >>>>>>>> जोहर की जोहार, करण की करन, ईत्यादी गोंधळ उडतातच, यात काय उत्तर द्यायचे हे समजले नाही? जोहरचे जोहार केले तर त्याची जात बदलते की त्या जोहार शब्दाला काही वाईट अर्थ आहे? क्लीअर केले तर आवडेलच. काळजी घेत जोहरच टाईप करेन
७) अवांतर - हे अवांतर कारण या धाग्याशी नाही तर माझ्याशी संबंधित आहे. तुम्ही जी "ऋन्मेष स्ट्रॅटेजी" (असे काही खरेच असेल तर याचे मी पेटंट घ्यायला हवे) मांडली आहे तशी आधीही काही जणांनी आपल्यापरीने मांडली आहे. आता यापैकी सर्वांचीच विवेचने बरोबर नसणार, किंवा असतीलच असे नाही. पण प्रत्येकाला आपणच या स्ट्रॅटेजीची केलेली उकल बरोबर वाटते. जर आपण वेगळा धागा काढलात तर तिथे तुम्ही सारे आपापल्या परीने लिहाल आणि मग त्यावर ईतर मायबोलीकरांची मते एकाच ठिकाणी जाणून घेता येतील. अश्याने आपण इथे तिथे सर्व धाग्यात तेच तेच लिहील्याने ईतर धागे भरकटणार नाहीत. अर्थात यातून मलाच प्रसिद्धी मिळेल या भितीने जर आपण स्वतंत्र धागा काढणार नसाल तर मग त्याला अर्थ नाही. नवा धागा काढलात तर मला तिथे लिहायला आवडेल, अन्यथा ईथे या विषयावर ईथेच थांबूया
<<<<<<कोणी केलेच काही
<<<<<<कोणी केलेच काही समाजकार्य तर ते पब्लिसिटी स्टंट आहे वा इमेज बिल्डींगसाठी केले जातेय असा आरोप होतो.
>> ह्यात काहीही आरोप नाही. हे असेच असते.
>>>>>>>>
नानाकळा,
हे असेच असते यातील "च" वर माझा आक्षेप आहे
पण तुम्ही प्रत्येक क्रिकेटचा सामना हा फिक्स’च असतो समजणारे असल्याने तुम्हाला माझा आक्षेप पटणार नाही’च
हॅरास केलं म्हणजे नेमकं काय
हॅरास केलं म्हणजे नेमकं काय केलं... मी तो व्हिडीओ पहिला फोटोग्राफर फक्त फोटो काढत होते ती पॅनिक झाली हे खरं आहे. पण हॅरास म्हणजे नक्की काय केलं????
>>>>>>>
अनिश्का, आपला आपला दृष्टीकोण!
मी त्या जागी माझ्या नात्यातील, ओळखीतील महिला सदस्य ठेवली आणि मला ते नाही रुचले, किंबहुना चीड आली.
रुन्मेष तुझा युक्तिवाद वाचला
रुन्मेष तुझा युक्तिवाद वाचला आणि थोडाफार पटलाही!
आयरन मॅन माझा मुद्दा थोडाफार
आयरन मॅन माझा मुद्दा थोडाफार पटणेच अपेक्षित आहे, कारण कुठल्या गोष्टीत पब्लिसिटी स्टंट आहे हे जसे दरवेळी आरोप करणारे सिद्ध करू शकत नाहीत तसेच त्या त्या सेलिब्रेटींचे चाहतेही तो पब्लिसिटी स्टंट नव्हता हे सिद्ध करू शकत नाही.
पण ईथे मुळात कश्यात पब्लिसिटी स्टंट होता आणि कश्यात नाही हे सिद्ध करणे हा धाग्याचे हेतू नाहीयेच. तर सेलिब्रेटींनी काहीही केले तर त्याला पब्लिसिटी स्टंटच समजले जाते हे त्यांचे दुखणे असावे जे कोणी समजून घ्यायला तयार नाही.
जसे वर नानाकळा यांनी म्हटले, हे असेच असते... दॅट्स इट.. असेच असते. विषय संपला !
पण तुम्ही प्रत्येक क्रिकेटचा
पण तुम्ही प्रत्येक क्रिकेटचा सामना हा फिक्स’च असतो समजणारे असल्याने तुम्हाला माझा आक्षेप पटणार नाही’च
>>> ऋ, मी त्या दिवसाची वाट पाहत आहे जेव्हा तू मला माझ्याच धंद्याबद्दल 'असे नसते हो, तुम्हाला गैरसमज झालाय' वगैरे सांगशील....
वाटसपवर विडिओ वाइरल वगैरे
वाटसपवर विडिओ वाइरल वगैरे होतात तसल्या काहीचा जनक आपण असावं असं वाटणारं पब्लिक वाढतय. मोबाइल घेऊन धावतात. अगदी अगोदर सिलेब्रटी नसलेला मरायच्या काही क्षण अगोदर होतो. उदा ० रेल्वेखाली मरणारा. त्याचेही व्हिडिओ स्टेशनवरचे हौशी फोटुग्राफर काढतात अन ग्रुपवर टाकतात.
ओके नानाकळा, तुम्हाला असे
ओके नानाकळा, तुम्हाला असे म्हणायचे आहे का, शाहरूख सलमान, नाना पाटेकर प्लस मकरंद, अक्षय कुमार, आमीर खान वगैरे सारे एकाच माळेचे मणी आहेत?
<खान नावाचा अमेरिकास्थित
<खान नावाचा अमेरिकास्थित मुस्लिम पात्राविषयीचा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी एक अमेरिका वारी करायची. त्यांनी कसून तपासणी केलीच तर चांगलेच आहे. नाहीच केली तर आपणहून कुठलीतरी हलकीशी संशयास्पद हालचाल करायची मग ते कपडे उतरवणार. त्यांना काही सापडणार नाहीच पण त्यांच्या कृतीची लगेच बोंबाबोंब ठोकायची. तेव्हढीच फुकटची पब्लिसिटी सिनेमाला.>
ही थिअरी खूप आवडली मला. तर त्याची एक वारी माय नेम इज खान या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी होती. आणि त्या चित्रपटाचं शीर्षकच मुळी अमेरिकेतल्या रेशल प्रोफाइलसंबंधाने होती. माय नेम इज खान अँड आय अॅम नॉट अ टेररिस्ट. पण ते अमेरिकेतलं रेशल प्रोफाइलिंग वगैरे सग़ळं नाटक (अमेरिकेत माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम , भारताच्या राजदूत मीरा शंकर, भारताचे संयुक्त राष्ट्रांतले प्रतिनिधी हरदीप सिंग पुरी यांनाही डिटेन केलं किंवा त्यांची अंगझडती केली, तरी याचा काही संबंध नाही). स्वतःच्या नावाचा आणि विमानतळावर डिटेन केलं जाण्याचा संबंध लावून शाहरुखने त्यावर चक्क एक सिनेमा बनवला किंवा मित्राकरवी बनवून घेतला.
शाहरुखला डिटेन करण्याचं कारण म्हणजे ते नाव यु एस इमिग्रेशनच्या टेरर अॅलर्ट लिस्टमध्ये आहे. आता वरच्या थिअरीनुसार शाहरुखनेच कोणा टेररिस्ट्सला आपला या नावाचा पासपोर्ट असल्याची खबर पसरवायला सांगितलं असेल.
शाहरुखचे फोटो छापलेल्या मॅगॅझिनच्या लाखभर प्रती त्याने स्वतःच विकत घेतल्या असंही वाचलं (शंकर जयकिशन पण फिल्म फेअर अवॉर्ड्स जिंकायला हेच करायचे असं वाचलं होतं.. तितली उडी.....) काय करणार, तो जराही लोकप्रिय नाही. पण त्याला दाखवायचंय की तो प्रचंड लोकप्रिय आहे.
तो लोकप्रिय नसल्याने त्याचे सिनेमेही खराखुरा प्रेक्षक पाहत नसून ड्युआय, आपलं डमी प्रेक्षक पाहत असेल किंवा तोच नुसती तिकिटं विकत घेत असणार.
इतकं सगळं करण्यासाठी त्याच्याकडे पैसा कोठून येतो? तर त्याचे नक्कीच इंटरनॅशनल गुन्हेगार्/टेररिस्ट्सशी संबंध असणार. आणि तेच त्याला पैसा पुरवत असणार. त्याचे सिनेमे हे ड्रग्ज, स्मगलिंग इत्यादीचा पैसा सफेद करण्याचा साबण असणार.
पटलं मला.
Pages