या देशात सेलिब्रेटी / सुपरस्टार होणे गुन्हा आहे का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 1 July, 2017 - 18:20

आपल्याला नेहमीच सेलिब्रेटी आणि सुपर्रस्टारची चमकधमक दिसते, त्यांना मिळणारा मानमरातब पैसा दिसतो. मात्र तो त्यांनी मेहनतीने, सचोटीने, आणि आपल्या अंगी असलेल्या कलागुणांनी कमावला असतो हे दिसत नाही. अर्थात सारेच लोकं असा विचार करत नसतील, काहींना याची जाण असेलही.

मात्र या देशात सेलिब्रेटी असणे हे त्रासदायक सुद्धा ठरू शकते जेव्हा तुमची एखादी शिंक सुद्धा न्यूज बनते, तुमच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ होत तुमच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जाते, आणि त्यातून न्यूज शोधली जाते, न मिळाल्यास बनवली जाते.

आताच्या सतराशे साठ न्यूज चॅनेलच्या जमान्यात शेकडो रिपोर्टर आणि त्यांचे फोटोग्राफर याच कामात लागले असतात, आणि सोशल मिडीया तसेच आधुनिक तंत्रज्ञानामुळे हे कॅप्चर केलेले क्षण आणि या बातम्या तितक्याच वेगाने पसरतात, पसरवल्या जातात.

हे सारे आता सुचायचे तात्कालिक कारण नुकतेच घडलेली हि घटना आणि कानावर आलेली ही बातमी...

सेलिब्रेटी होणे गुन्हा असेल म्हणावे तर सेलिब्रेटींच्या पोटी जन्म घेणे हा तर प्रचंड मोठा अपराध ठरावा अशी ही बातमी..
खुद्द शाहरूख खानची मुलेही यातून सुटली नाहीत, किंबहुना शाहरूख खानची मुले असल्यानेच त्यांना हा मनस्ताप भोगावा लागला..

पडद्यावर कोणता कलाकार काय थिल्लरपणा करतो याची आपण नेहमीच चर्चा करतो, मात्र या लोकशाहीने नटलेल्या देशात या कलाकारांना कोणत्या वाह्यातपणाचा सामना करावा लागतो हे यातून समजते..

मिडीयाचा वाह्यातपणा ईथे बघू शकता
कसे त्याच्या मुलीचे फोटो मिळवण्यासाठी आणि त्या नादात तिला हॅरास करत होते.

https://www.youtube.com/watch?v=8PfEe0mnhEo

दुसर्‍या एका धाग्यावर स्टॉकिंगची चर्चा चालू आहे . अक्षयकुमार कसे मोबाईलमधून हिरोईनचे फोटो घेण्याचा वाह्यातपणा करताना एका चित्रपटात दाखवलेय जे चुकीचे आहे.
ईथे प्रत्यक्षात एका अर्थाने तेच चालू आहे. आणि याचा एक अर्थ असाही निघू शकतो की या देशात कुठलीही मुलगी सेफ नाहीये, अगदी एखाद्या सुपर्रस्टारची असली तरीही ..

शाहरूख माझा आवडता हिरो असल्याने त्याच्या नावाने सर्च करत विकेंडला काही यू ट्यूब विडिओ बघतो, तेव्हा ही न्यूज समजली.
मात्र या जागी त्याच्या मुलीच्या जागी ईतर कोणत्याही कलाकाराची किंवा अगदी कोणाचीही मुलगी असती तरी हा प्रकार बघून तितकीच चीड आली असती. आणि त्याचा निषेध नोंदवणारा धागा तेव्हाही काढलाच असता. त्यामुळे कृपया या धाग्याचा संबंध शाहरूखशी जोडून आणखी त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर चर्चा नको.

मात्र एका गोष्टीचे कौतुक वाटले जेव्हा या विडिओनंतर या खालील विडिओमध्ये शाहरूखची खास शाहरूख टच रिअ‍ॅक्शन पाहिली. हॅटस ऑफ! या प्रकारानंतर असे समजूतदारपणे तोच वागू शकतो. ईतक्या योग्य शब्दात हे तोच बोलू शकतो.

Shahrukh Khan REACTS on Suhana's TROUBLE with media
https://www.youtube.com/watch?v=ifl1N4kweyk

या देशातील मिडीया मात्र दिवसेंदिवस शरम आणत आहे !

चूक भूल माफ,
ऋन्मेष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शाहरूखच्या रईस मधे पाकिस्तानी अभिनेत्री होती म्हणून इतका कहर केला, पण इर्फान खानच्या हिंदी मिडियम मधे पाकिस्तानी हिऱोइन आहे, श्रीदेवीच्या मॉम मधेपण तिचा नवरा आणि मुलगी पाकिस्तानी अभिनेते आहेत, ते कसे चालतात?
Wink

त्या चित्रपटात शाहरूख असता तर बातम्या अश्या असत्या...
क्या ये हिण्दी मिडीयम है या उर्दू मिडीयम.. आखिर क्यो पसंद है शाहरूख को पाकिस्तानी कलाकार.. मॉम बन गयी अम्मीजान.. अब प्यारा लगने लगा पाकिस्तान Happy

Pages