आपल्याला नेहमीच सेलिब्रेटी आणि सुपर्रस्टारची चमकधमक दिसते, त्यांना मिळणारा मानमरातब पैसा दिसतो. मात्र तो त्यांनी मेहनतीने, सचोटीने, आणि आपल्या अंगी असलेल्या कलागुणांनी कमावला असतो हे दिसत नाही. अर्थात सारेच लोकं असा विचार करत नसतील, काहींना याची जाण असेलही.
मात्र या देशात सेलिब्रेटी असणे हे त्रासदायक सुद्धा ठरू शकते जेव्हा तुमची एखादी शिंक सुद्धा न्यूज बनते, तुमच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ होत तुमच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जाते, आणि त्यातून न्यूज शोधली जाते, न मिळाल्यास बनवली जाते.
आताच्या सतराशे साठ न्यूज चॅनेलच्या जमान्यात शेकडो रिपोर्टर आणि त्यांचे फोटोग्राफर याच कामात लागले असतात, आणि सोशल मिडीया तसेच आधुनिक तंत्रज्ञानामुळे हे कॅप्चर केलेले क्षण आणि या बातम्या तितक्याच वेगाने पसरतात, पसरवल्या जातात.
हे सारे आता सुचायचे तात्कालिक कारण नुकतेच घडलेली हि घटना आणि कानावर आलेली ही बातमी...
सेलिब्रेटी होणे गुन्हा असेल म्हणावे तर सेलिब्रेटींच्या पोटी जन्म घेणे हा तर प्रचंड मोठा अपराध ठरावा अशी ही बातमी..
खुद्द शाहरूख खानची मुलेही यातून सुटली नाहीत, किंबहुना शाहरूख खानची मुले असल्यानेच त्यांना हा मनस्ताप भोगावा लागला..
पडद्यावर कोणता कलाकार काय थिल्लरपणा करतो याची आपण नेहमीच चर्चा करतो, मात्र या लोकशाहीने नटलेल्या देशात या कलाकारांना कोणत्या वाह्यातपणाचा सामना करावा लागतो हे यातून समजते..
मिडीयाचा वाह्यातपणा ईथे बघू शकता
कसे त्याच्या मुलीचे फोटो मिळवण्यासाठी आणि त्या नादात तिला हॅरास करत होते.
https://www.youtube.com/watch?v=8PfEe0mnhEo
दुसर्या एका धाग्यावर स्टॉकिंगची चर्चा चालू आहे . अक्षयकुमार कसे मोबाईलमधून हिरोईनचे फोटो घेण्याचा वाह्यातपणा करताना एका चित्रपटात दाखवलेय जे चुकीचे आहे.
ईथे प्रत्यक्षात एका अर्थाने तेच चालू आहे. आणि याचा एक अर्थ असाही निघू शकतो की या देशात कुठलीही मुलगी सेफ नाहीये, अगदी एखाद्या सुपर्रस्टारची असली तरीही ..
शाहरूख माझा आवडता हिरो असल्याने त्याच्या नावाने सर्च करत विकेंडला काही यू ट्यूब विडिओ बघतो, तेव्हा ही न्यूज समजली.
मात्र या जागी त्याच्या मुलीच्या जागी ईतर कोणत्याही कलाकाराची किंवा अगदी कोणाचीही मुलगी असती तरी हा प्रकार बघून तितकीच चीड आली असती. आणि त्याचा निषेध नोंदवणारा धागा तेव्हाही काढलाच असता. त्यामुळे कृपया या धाग्याचा संबंध शाहरूखशी जोडून आणखी त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर चर्चा नको.
मात्र एका गोष्टीचे कौतुक वाटले जेव्हा या विडिओनंतर या खालील विडिओमध्ये शाहरूखची खास शाहरूख टच रिअॅक्शन पाहिली. हॅटस ऑफ! या प्रकारानंतर असे समजूतदारपणे तोच वागू शकतो. ईतक्या योग्य शब्दात हे तोच बोलू शकतो.
Shahrukh Khan REACTS on Suhana's TROUBLE with media
https://www.youtube.com/watch?v=ifl1N4kweyk
या देशातील मिडीया मात्र दिवसेंदिवस शरम आणत आहे !
चूक भूल माफ,
ऋन्मेष
<मायबोलीचे स्पिरिट
<मायबोलीचे स्पिरिट टिकवण्यासाठी>
ऋन्मेष, मायबोलीचे स्पिरिट काय आहे , यावर धागा बनता है बरं का.
शाहरूख सलमान, नाना पाटेकर
शाहरूख सलमान, नाना पाटेकर प्लस मकरंद, अक्षय कुमार, आमीर खान वगैरे सारे एकाच माळेचे मणी आहेत?
>> असं कोण म्हटलं? तुझा बॉलिवूडचा अभ्यास प्रेक्षकाच्या चष्म्यातून आहे. माझा अभ्यास ब्रॅण्डिंग स्ट्रॅटेजिस्ट च्या चष्म्यातून आहे. दूध का दूध पानी का पानी मला कळू शकतं, तुला कळेलच असे नाही. जे लोक कोणताही फायदा नसतांना सामाजिक कार्य करतात असेही आहेतच असे मी वरच म्हटले आहे. नाना+मक्या हे वेगळ्या कॅटेगरीत येतात.
ज्या कोणा अभिनेत्याचे नविन चित्रपट येऊ लागले की तो न्यूजमध्ये झळकायला लागतो. बातम्या अगदी कशाच्याही असतात. आणि त्यात हटकून त्याच्या नवीन सिनेमाचं नाव असतं ती पीआर अॅक्टिविटी. ह्यात समाजकार्यापासून मोदींना भेटण्यापर्यंत काहीही असतं. आताच आपआपल्या कोणत्यातरी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सचिन तेंडुलकर, अक्षय आणी प्रियंका मोदींना भेटले. मोदी हा आता एस्टॅब्लिश्ड ब्रॅण्ड आहे, तर त्याचाही फायदा चित्रपटांच्या पब्लिसिटीसाठी करण्यात येऊ लागला आहे. साक्षात देशाच्या पंतप्रधानांना अशा कामांसाठी वापरणारे समाजकार्याचा वापर करत नाहीत?
आजकाल चित्रपट स्टारच्या नावावर चालतात, पण स्टारची जाहिरातही करावीच लागते, नाहीतर त्या स्पेसमध्ये दुसरा घुसतो. प्रत्येकाच्या डिफाइन्ड स्पेस असतात. स्टारची सर्फएक्सेल, निरमा, हिरोहोंडा सारखी जाहिरात करता येत नसते. त्यासाठी वेगळी स्ट्रॅटेजी असते. जेणेकरुन स्टार सतत चर्चेत राहावा. मागच्या पंधरा वर्षातल्या बॉलिवूडशी संबंधित सर्व बातम्या नीट अभ्यासाव्यात मग कळेलच की एखाद्या स्टारची दोन वर्षे काही खबर नसते पण अचानक हळूहळू बातम्या यायला लागतात. चित्रपट प्रदर्शनाच्या तीन ते सहा महिने आधी धुमाकूळ असतो. प्रदर्शन संपले, चित्रपट गेला की सगळे शांत होते. वेगवेगळ्या कॉन्ट्रावर्सीज क्रिएट केल्या जातात. एनि पब्लिसिटी इज गुड पब्लिसिटी हे ब्रिदवाक्य आहे शोबिझचे. आणि मिडिया यात सामिल असतो. मिडियाने ठरवले तर ती कोणत्याही थराला जाऊ शकते, पण सेलिब्रिटीने ठरवले तर मिडियाचा परिंदापण पर नाही मारु शकत हे आमिरखानच्या दुसर्या लग्नात दिसलेच.
ज्या अभिनेत्यांना आता काही ब्रॅन्ड वॅल्यू नाही त्यांच्या कोणत्याही बातम्या येत नसतात. कोणतेही डिटेल्स माहित नसतात. मिडियाला त्यात काही मलिदा मिळणार नसतो.
मिडिया आणि बॉलिवूड यांचे साटेलोटे आहे.
नानाकळा तुमच्या सगळ्या
नानाकळा तुमच्या सगळ्या प्रतिसादांशी सहमत पण तुम्ही हे सगळ कुणाला पटवून देण्याचा प्रयत्न करताय ? उगाच कशाला स्वतःचा वेळ वाया घालवताय
नानाकळा,
नानाकळा,
तुमचा लेटेस्ट प्रतिसाद अगदी बरोबर आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांचा अभ्यास करुन त्यावर चित्रपट बनविणारे श्री. मधुर भांडारकर यांनी हिरोइन चित्रपटात हे सारं तपशीलवार दाखवलं आहे. तरीही लोक वेड पांघरुन पेडगावला जात असतील आपण त्यांना अजुन काय आणि किती सांगत बसणार? रिशी पकूरच्या जोडीला आता अध्यापकही आलेले पाहिल्यावर कोणाकोणाला समजावत बसणार हाही प्रश्न आहेच. तेव्हा माझ्याकडून पूर्णविराम.
बाकी ह्या सगळ्या घटना घडविलेल्या की घडलेल्या ह्यापैकी लोकांनी काहीही मानलं आणि मी पन्नास वर्षे, मराठी नाटक, मालिकांमध्ये माझं योगदान दिलंय तरी मला त्या क्षेत्रातलं ओ की ठो कळत नाही असाही लोकांचा समज असला तरी त्यात श्री. हरिश्चंद्र यांचं काहीच जात नाही.
बिपिन, सहमत आहे. म्हणूनच मी
बिपिन, सहमत आहे. म्हणूनच मी वर म्हणालो की माझ्याच धंद्यातलं मलाच कळत नाही, माहित नाही वगैरे म्हणायला साहेब कमी करणार नाहीत.
तेव्हा आपलाबी रामराम! फुकटात टीआरपी का वाढवायचा?
लोक चित्रपटाच्या
लोक चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी काय काय करतात हे एकदम कबूल.
पण प्रत्येक गोष्ट चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठीच केलेली असते हा त्याचा व्यत्यास होईल का?
बिपीन चन्द्र यान्चा मागच्या
बिपीन चन्द्र यान्चा मागच्या पानावरचा आणि नानाकळा यान्चा वरिल प्रतिसाद आवडले, पटले....
भरत यांच्या खुलाश्यानंतर बरेच
भरत यांच्या खुलाश्यानंतर बरेच गोष्टी मलाही पटू लागल्या आहेत. आता हळूहळू एकेका गोष्टीचा उलगडा होत आहे. हिज नेम इझ खान एण्ड एक्चुअली ही ईज टेररीस्ट! पण हे कोणी म्हटल्यावर कांगावा करता यावा म्हणून त्यानेच आय एम नॉट टेरेरीस्ट टॅगलाईन असलेला चित्रपट बनवला आणि वरील फण्डे वापरून तो प्रसिद्धही केला आहे.
तो एवढा मास्टरमाईंड आहे की त्याचे चित्रपट डमी पब्लिक बघतात तसेच त्याने सोशलसाईटवर आपले ड्यू आयडी पसरवले आहेत जे त्याचे नाव सतत चर्चेत राहील हे बघतात... ओह माय गॉड.. मी सुद्धा त्यातलाच एक तर नाही.. आणि मी स्वत:ला आजवर काहीतरी वेगळेच समजत होतो.. आता हळूहळू सारे उलगडतेय.. माझा पासवर्ड .. srk@786 .. म्हणजे मी शाहरूखने मार्केटमध्ये आणलेला 786 क्रमांकाचा ड्यू आयडी आहे.. असण्याची शक्यता आहे.. शप्पथ...खरेच फार सोपे आहे या देशात सेलेब्रटी बनणे.. त्याहून सोपे तर सुपरस्टार बनणे.. फक्त दोनचार चांगले टेरेरीस्ट तुमच्या ओळखीचे हवेत .
लोक चित्रपटाच्या
लोक चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी काय काय करतात हे एकदम कबूल.
पण प्रत्येक गोष्ट चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठीच केलेली असते हा त्याचा व्यत्यास होईल का?
>><><>>>
असे कुठे म्हणाले ते.. नाना, मकरंद हे वेगळ्या कॅटेगरीत आहेत असे ते म्हणाले आहेत.
आमीर शाहरूख हे एका कॅटेगरीचे आहेत..
बरं अक्षय कुमारची देशभक्ती आणि समाजसेवा कुठल्या कॅटेगरीत येते??
एक लिस्ट दिली तर बरे पडेल.. पुरावे तुम्ही देणार नाहीत हे माहीत आहे. ते स्वत: अनुभव घेऊन शोधायचे असतात हे ही माहीत आहे
{{{ पण प्रत्येक गोष्ट
{{{ पण प्रत्येक गोष्ट चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठीच केलेली असते हा त्याचा व्यत्यास होईल का? }}}
प्रत्येकच जण असं करत नाही पण शाहरुख आणि आमिर खानसारखे लोक कोणत्या थराला जातील याचा नेम नाही. काही लोक आपल्याला किती यश मिळतंय ते पाहून समाधानी असतात. तर हे दोघं 'मीच पहिला' आणि माझ्यापुढे दुसरा कोणी नको या सूत्राने झपाटून गेलेले असतात. त्यांना अपयश नव्हे तर दुसर्यापेक्षा किंचित कमी यश देखील सहन होत नाही. इतकी वर्षे आमिर खानचे चित्रपटच नंबर वन गल्ला भरायचे. ३ इडियट्स आणि पीके ह्यांचे रेकॉर्ड्स त्यांच्यानंतरच्या इतरांच्या चित्रपटांनाही मोडता आले नाहीत. यावर्षी बाहुबली२ ने जास्त गल्ला जमविला तर आमिरने इर्ष्येने दंगल चीनमध्ये लावला आणि बाहुबली२ पेक्षा भारतात इंडियन नाही जमलं तरी इंटरनॅशनल मार्केट मध्ये आपण जास्त गल्ला (२००० कोटी ++) जमविल्याच्या बातम्या छापून आणल्या. त्याचप्रमाणे गेली कित्येक वर्षे शाहरुख सर्वात महागडा स्टार गणला जात होता. सध्या सुलतान पासून हा मान सलमानकडे आल्यामुळे शाहरुख अस्वस्थ. त्यात रईसही मनासारखा चाललेला नाही. हॅरी मेट सेजल वर सार्या आशा खिळलेल्या तेव्हा सुहाना फोटोग्राफी प्रकरण हे घडवून आणलेलंच वाटतं.
असो. भरत. तुम्ही रिशी पकूर पेक्षा विचारी असाल अशा अपेक्षेने तुमच्या प्रश्नाला उत्तर दिलंय. रिशीसोबत मड रेस्लिंग करण्याची इच्छा नाही त्यामुळे त्याच्या पुनर्प्रश्नांना उत्तरे देत बसत नाही. तुम्हीही त्याची री ओढत असाल तर मग चर्चा व्यर्थच आहे.
ओ हो अमीर ने हे सगळं
ओ हो अमीर ने हे सगळं बाहुबलीला मागे टाकण्यासाथी केलं? शेम ऑन हिम. सो मीन. चीनच्या भारतद्वेषाचाही त्याने स्वतःसाठी वापर केला. देशद्रोही नंबर १.
सलमानचा ट्युबलाइट तितकासा चालला नाही म्हणे. यामागे अमीरचा हात आहे की सलमानचा?
मी रुशी पकूरपेक्षा विचारी आहे की नाही, हे माहीत नाही. पण तुमच्यासारखं विचारी होण्याची अजिबात इच्छा नाही.
< चर्चा व्यर्थच आहे.>
मनापासून आभार.
नानाकळा आणि बिपिनचंद्र हर
नानाकळा आणि बिपिनचंद्र हर यांच्याशि सहमत
आमिरने इर्ष्येने दंगल चीनमध्ये लावला >>>> +१
चिनमध्ये बाहुबलि ५०००+ स्क्रिन वर झळकला होता तर दंगल तब्बल ९००० स्क्रिन वर लावला गेला.
चीन मध्ये भारतीय सिनेमे
चीन मध्ये भारतीय सिनेमे चालतात, ऐकून छान वाटले.
अख्खा धर्मच चालतो, संस्कॄतीचा
अख्खा धर्मच चालतो, संस्कॄतीचा प्रभाव चालतो तसे सिनेमेही चालत असावेत त्यांना.
फक्त कराटे आपण त्यांना दिले हे लपवुन ठेवायचे की झाले.
फक्त कराटे आपण त्यांना दिले
फक्त कराटे आपण त्यांना दिले हे लपवुन ठेवायचे की झाले.
>>>>
कराटे नाही, पराठे असतील, पुन्हा चेक करा
असो, नवीनच माहीती आहे माझ्यासाठी ... भारताने जगाला काय काय शिकवले यावर कोणीतरी जाणकार ईसमाने धागा काढायला हवा.
बाकी चीनमध्ये सिनेमा प्रदर्शित केल्यास भारतालाच चीनचे चलन मिळत असेल ना? मला अर्थशास्त्र फार समजत नाही, पण यात जास्त फायदा नक्की कोणाचा?
प्रत्येकच जण असं करत नाही पण
प्रत्येकच जण असं करत नाही पण शाहरुख आणि आमिर खानसारखे लोक कोणत्या थराला जातील याचा नेम नाही.
>>>>>
ही पोस्ट बिपीनचंद्र यांची आहे, पण मला यावर प्रश्न नानाकळांना विचारायचा आहे.
काय नानाकळा, हा द्वेषाचा / पूर्वग्रहाचा चष्मा लावून एखाद्याकडे बघणे नाही का झाले?
हॅरी मेट सेजल वर सार्या आशा
हॅरी मेट सेजल वर सार्या आशा खिळलेल्या तेव्हा सुहाना फोटोग्राफी प्रकरण हे घडवून आणलेलंच वाटतं.
>>>>
सुहाना प्रकरणाचा फायदा हॅरी मेट सेजलला कसा मिळणार?
त्याची नक्की स्टोरी काय आहे?
तुझा बॉलिवूडचा अभ्यास
तुझा बॉलिवूडचा अभ्यास प्रेक्षकाच्या चष्म्यातून आहे. माझा अभ्यास ब्रॅण्डिंग स्ट्रॅटेजिस्ट च्या चष्म्यातून आहे. दूध का दूध पानी का पानी मला कळू शकतं, तुला कळेलच असे नाही.
>>>>>>>
हा ब्रॅण्डिंग स्ट्रॅटेजिस्टचा चष्माही तुम्हाला चुकीचं दाखवू शकतो. जसा तो डायलॉग आहे ना, पुलिसवालोंको तो सब चोरही लगते है. तसे तुम्हाला एखाद्या सेलिब्रेटीच्या प्रत्येक हावभावात काहीतरी पब्लिसिटी स्टंटच वाटत असेल.
किंवा असेही असू शकेल की यापैकी एखादा आपला कस्टमर असेल आणि आपण मुद्दाम त्याबद्दल चांगले आणि त्याच्या प्रतिस्पर्ध्यांबद्दल वाईट लिहित असाल.
चित्रपटाची आणि सेलिब्रेटींची खरी पारख सामान्य पण चित्रपटवेड्या पब्लिकलाच असते, आणि त्यात बंबई की पब्लिक म्हणजे सर्वात शहाणी. त्यामुळे तुमचा व्यवसाय (नक्की काय ते मला माहीत नाही) पण या फिल्डशी संबंधित असला तरी तुम्हाला सारेच माहीत असेल आणि तुम्हाला जे माहीत आहे ते सारेच खरे असेल असे नाही, किंबहुना असे कोणाबाबतही नसते. त्यात तुम्ही नुसते हवेत विधाने करता, पण त्यामागे काही पुरावे साध्य सिद्धता काही नसते, फक्त मी या व्यवसायात आहे आणि मी या लोकांना जवळून बघितले आहे एवढाच युक्तीवाद करता, मग कसा विश्वास ठेवायचा. जसे की सारेच गैरधंदे हे लोकं आपल्या समोर टेबल थाटून करतात..
चित्रपटाची आणि सेलिब्रेटींची
चित्रपटाची आणि सेलिब्रेटींची खरी पारख सामान्य पण चित्रपटवेड्या पब्लिकलाच असते
>>
तू खरंच भाबडा आहेस की तसा व्हायचे ढोंग करतोयस
अरेवा! लवकरच माझी अपेक्षा
अरेवा! लवकरच माझी अपेक्षा पुरी केलीस की, तेही याच धाग्यावर! धन्यवाद!
ती मराठीत एक म्हण आहे अस्सल गावरान भाषेत, इथे देण्याचा वारंवार फार मोह होत होता.... पण बापाला 'काहीतरी' शिकवण्याबद्दल आहे,
ते काहीतरी म्हणजे नेमकं काय ते उच्चारायचं की नाही यावर पहलाज निहलानींची वोटींग सुरु आहे, ती झाली आणि त्यांनी निर्णय दिला की सांगेल....
त्या हॅरी मेट सेजल च्या
त्या हॅरी मेट सेजल च्या प्रोमोवरून तरी शाहरूख तीच ती तरूण प्रेमिकाची भूमिका, जी त्याने त्याच्या जवळजवळ प्रत्येक चित्रपटात केलेली आहे, तेच ते फॉरेनमधले चकाचक लोकेशन्स..त्याला स्वतःलाच अशा त्याच त्याच भूमिका करायचा कंटाळा कसा येत नाही कोण जाणे
त्याला स्वतःलाच अशा त्याच
त्याला स्वतःलाच अशा त्याच त्याच भूमिका करायचा कंटाळा कसा येत नाही कोण जाणे
>>>>
आम्हा चाहत्यांसाठी करतो, आम्हाला आवडते, निदान मला तरी, मी फर्स्ट वीकेंडलाच बघणार हे नक्की... मायबोलीवर एक परीक्षण धागा पक्का
नानाकळा, ते काहीतरी म्हणजे
नानाकळा, ते काहीतरी म्हणजे ईण्टरकोर्स ना..
जर तुमच्या आमच्या सारखी शिकलेली आधुनिक विचारांची माणसे तो शब्द वापरायला कचरू लागली तर मग खेदाने म्हणावेसे वाटेल की पहलाज निहलानीच बरोबर होते...
नानाकळा, ते काहीतरी म्हणजे
नानाकळा, ते काहीतरी म्हणजे ईण्टरकोर्स ना..
जर तुमच्या आमच्या सारखी शिकलेली आधुनिक विचारांची माणसे तो शब्द वापरायला कचरू लागली तर मग खेदाने म्हणावेसे वाटेल की पहलाज निहलानीच बरोबर होते...
नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 4 July, 2017 - 11:04
>>>> तुझी आधुनिक विचारांचि व्याख्या खुपच भडक आहे.
मला माहीत नाही ऋन्मेष ह्या
...
पंडीतजी,
पंडीतजी,
आधुनिक विचारांची व्याख्या भडक नाही तर प्रामाणिक आहे. ज्या शब्दात काही गैर नाही ते न लाजता उच्चारा, जे उच्चारायला कसली लाज, संकोच वाटून फुल्या फुल्या टिँब टिंब वापरावे लागत असतील तर असे घाण शब्द वापरूच नका.
ईंटरकोर्स हा शब्द वाईट नाहीये. आपण या जगात येण्याचे कारण तेच आहे. फक्त तुम्ही तो वापरता कश्या अर्थाने यावर चांगले की वाईट ठरते.
Shah Rukh Khan - Donates 45
Shah Rukh Khan - Donates 45 crores to Pakistan Gas Tanker accident victims | News | Ind & Pak Viral
https://www.youtube.com/watch?v=6ZFn2GleelY
या अश्या अफवा उगाचच कोणीतरी फिरवणे, आणि उगाचच तथाकथित देशभक्तांच्या शिव्या झेलणे !
आणि हो, आता यामागे देखील त्याचाच हात आहे असा युक्तीवाद निदान आता तरी नको ..
अश्या अफवा उगाचच कोणीतरी
अश्या अफवा उगाचच कोणीतरी फिरवणे, आणि उगाचच तथाकथित देशभक्तांच्या शिव्या झेलणे ! > जसा तुम्हाला पाकिस्तान जिंकावा वाटत होते तशीच त्याने दोन पावलं पुढं जात पाकिस्तानला मदत केली, तुमच्याच हीरोबद्दल तुम्हाला का वैषम्य वाटते आहे.?
आणि तुम्हाला कधीपासून अफवांचे, शब्दं फिरवण्याचे आणि थापांचे वावडे झाले? असा सोयीस्कर, दलबदलू स्टँड घेवू नका. शाहरूख खान चर्चेत रहावा म्हणून तुम्हीच तर नाही ना ते अफवा फिरवणारे? नाही तुम्ही म्हणता तशी तुमची सवयच आहे ना ती म्हणून विचारते आहे.
आणि हो, आता यामागे देखील त्याचाच हात आहे असा युक्तीवाद निदान आता तरी नको .. > मेलेल्या धाग्यावर प्रतिसाद वाढवण्यासाठी त्याच्या नावाखाली केलेल्या ह्या केविलवाण्या युक्तीवादामागे तुमचाच हात आहे हे मात्रं सगळ्यांच्या ध्यानात आले आहे.
इंटरकोर्सची चर्चा इथे वाचून
इंटरकोर्सची चर्चा इथे वाचून त्या सेलेब्रिटीशी नक्की काय करणे गुन्हा आहे का? असं लिहिलंय ते वरच्या हेडर मध्ये परत वाचून आलो.
>>आणि तुम्हाला कधीपासून अफवांचे, शब्दं फिरवण्याचे आणि थापांचे वावडे झाले? असा सोयीस्कर, दलबदलू स्टँड घेवू नका. >> अगदी अगदी. त्यातून मजा घेता आली पाहिजे म्हणजे झाले.
तशीच त्याने दोन पावलं पुढं
तशीच त्याने दोन पावलं पुढं जात पाकिस्तानला मदत केली
>>>>>>
मदत केली?,
मी दिलेली लिंक आणि बातमी एकदा वाचून घेता का..
Pages