Submitted by पुरंदरे शशांक on 23 June, 2017 - 02:29
सगुण ब्रह्म
वारकरी होऊ चला
तुळशीच्या कंठी माळा
तुका—माऊली साथीने
निघे गोपाळांचा मेळा
भावे गाऊया भजने
एकमेका लोटांगणे
नामघोष सप्रेमाने
टाळ वीणा संकीर्तने
धन्य संत संगतीत
दोष गेले, शुद्ध चित्त
विठू मावेना मनात
येतो अापैसा वाणीत
चंद्रभागा उचंबळे
भक्त सागर हेलावे
ब्रह्म सगुणता पावे
युगे अठ्ठावीस उभे.....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शेवटची दोन कडवी खूपच आवडली.
शेवटची दोन कडवी खूपच आवडली.
सुंदर
सुंदर
सुरेख!
सुरेख!
सुरेख
सुरेख
चंद्रभागा उचंबळे ,भक्तसागर
चंद्रभागा उचंबळे ,भक्तसागर हेलावे.... सुंदर !!!
सुंदर, शेवटचे कडवे अतिशय छान
सुंदर, शेवटचे कडवे अतिशय छान
विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल..
विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल.....
________/\_______
शशांकजी धन्यवाद धागाचे
शशांकजी धन्यवाद धागाचे एकादशीच्या दिवशी पुनर्जीवनासाठी. पुन्हा एकदा भक्तीरसात न्हालो .