क्रिकेट - ४

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 04:33

क्रिकेटवरील पहिले तीन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या बरीच झाली आहे. बर्‍याच दिवसांत तिथे कोणी काही म्हटलेलेही नाही. सध्याच बर्‍याच सिरीज संपल्यात, तर काही नव्याने सुरू होतायत. त्यामुळे नवीन धागा काढायला हा आयडियल टाईम आहे. आता क्रिकेट टॉक इथे करूया.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालची मॅच कडे सगळ्या जगाचे लक्ष लागले होते. एक तर बर्‍याच दिवसांनी भारत-पाक एकमेकांविरुध्द खेळणार होते तर दुसरीकडे सीमावर्ती भागात चकमकी वाढल्या होत्या.
त्यातच पाकिस्तानाची बहुतेक सगळीच नविन फळी होती त्यांच्या गोलंदाजींचा सामना पुर्वी कधी केला नव्हता. एक वहाब रियाझ आणि आमिर सोडल्यास बाकीची गोलंदाजी आपल्यासाठी नवखी होती. त्यामुळे त्यांच्यासमोर पहिल्यांदाच खेळताना थोडे टेंशन होते. तसे पाकिस्तानने सुध्दा वनडे मधे चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे तुल्यबळ लढत होईल अशी आशा होती.

टॉस जिंकून सर्फराज ने जेव्हा बॉलिंग घेतली तेव्हाच पाकिस्तानाचा घात झाला. स्वच्छ निरभ्र आकाश असताना कुठला कॅप्टन सुरुवातीला बॉलिंग घेईल ते ही स्वतःची बॉलिंग साईड मजबूत असताना.? पावसाची शक्यता मॅच च्या दरम्यान होती पण मॅच सुरु होत असताना पावसाचे कुठलेही लक्षण नव्हते. कडक ऊन आणि निरभ्र आकाशात पहिली बॅटींग भारताने आनंदाने स्वीकारली. अशा वातावरणात बॉल स्विंग काय पिंग सुध्दा होणार नव्हता. त्यामुळे सुरुवातीचे ८-९ षटके आरामात खेळून काढल्यावर रोहीत-धवनने फटाकेबाजी सुरु केली. धवन थोडा अनलकी ठरला. कोहली काही जबरदस्त फॉर्म मधे नव्हता. त्याचे फटके हवे तसे बसत नव्हते. तर दुसरीकडे रोहीत धवन आउट झाल्यावर एकदम कोशात गेला. त्यामुळे ऐन मॅच मधे एका वेळेस ५-८ ओवर मधे अवघे १७ धावा झाल्याची परिस्थिती ओढावली होती. कोहली आणि रोहीत फटके खेळण्यासाठी फार प्रयत्न करत होते. पण ढगाळ वातावरण आणि पाकिस्तानची गोलंदाजी दोघांमुळे ते जखडत गेले, एकी कडे कोहली जास्त बॉल खात होता तर दुसरीकडे ५० पुर्ण होऊन सुध्दा रोहीत कुर्मगतीने खेळत होता. दबाव वाढू लागलेला त्यात डक्वर्थ लुईसच्या नियमाचीही भिती होती. कारण त्या नियमात रन्स-ओव्हर यांच्यापेक्षा विकेटला जास्त महत्व होते. १च विकेट गेल्याने मधे पाऊस आला तेव्हा आपल्यासाठी त्यानियमाने नुकसान झाले नाही. अखेरीस रोहीत स्वतःच्या कोशातून बाहेर पडला तो पर्यंत बराच वेळ झाला. झटपट धावा काढण्याच्या नादात तो आउट झाला. इथे मॅचची मोठी पहिली टर्निंग पॉईंट होती. रोहीत आउट झाल्यावर युवराज आला. त्याला आल्यावर पाकिस्तानाच्या महान फिल्डिंग साईड ने मोठे जिवदान दिले. त्याची भरपाई युवराजने पाकिस्तानी बॉलर्सची अक्षरश: चिंधड्या उडवून केली. युवीच्या या प्रतिहल्ल्यामुळे दुसर्‍याबाजूला दबावात असणार्या कोहलीचे ओझे कमी झाले. दोघांची फटाकेबाजी इतकी तुफ्फान होती की रोहीत आउट झाल्यानंतरच्या ९ षटकात ९३ धावा निघाल्या. त्यात युवीच्या ५३ धावा होत्या. यात दोघांनीही वहाब रियाझ ची चांगलीच रियाझ करून घेतली. आमिर अचानक जायबंदी झाल्यामुळे त्याच्या उरलेल्या दोन महत्त्वाच्या षटकांना इतर गोलंदाजांना द्यावे लागली इथे मॅचची दुसरी टर्निंग पॉईंट आली. आमिरचे २ षटक मार खात असलेल्या वहाब ला करावी लागली. त्यात भारतीय गोलंदाजांनी धावांची लयलूट केली. नंतर स्वतः वहाब सुध्दा जायबंदी झाला. त्यामुळे पाकिस्तानाला दुष्काळात १३वा महिना दिसू लागला. पावसामुळे ओव्हर कमी तर झाल्याच पण गोलंदाजांच्या ओवर पन कमी झाल्या. त्यामुळे शेवटची ओव्हर सर्फराजला स्पिनर इमाम ला द्यावी लागली. इमामचे स्वागत पांड्याने अत्यंत हार्दिक पध्दतीने केले. पहिल्या ३ चेंडूवर ३ सलग षटकार मारल्यावर सगळ्याच पाकिस्तानी संघाचे चेहरे बघण्यासारखे होते. चौथा चेंडू पण बॅटीला कनेक्ट झाला असता तर नक्कीच सीमापार गेला असता. पाचव्या चेंडूवर १ धाव काढून त्याने स्ट्राईक कोहलीला दिला. कोहलीने पण शेवटचा बॉलवर चौकार मारून ३१९ चा आकडा गाठलाच.

आपले अवघे ३ विकेट गेले होते म्हणून डकवर्थ लुईस मुळे पाकिस्तानासाठी आवश्यक धावा वाढल्या. आता त्यांना ४८ ओवर मधे ३२४ करायचे होते. सुरुवात संथ अपेक्षेप्रमाणे झाली. भुवी आणि यादव यांचे स्वींग होत येणारे चेंडू शेहजाद आणि अझर यांना पचनी पडत नव्हते. पुन्हा एकदा पावसाच्या व्यत्ययानंतर भुवीने शेहजादला पचनी न पडणार्‍या चेंडूवर पायचीत करून त्याला त्यातून मोकळे केले. नंतर बरेच नाव चर्चेत राहणार्या बाबरला जास्त चर्चा न करू देता यादवने माघारी पाठवले. हाफिज आणि अझरने डाव सांभाळायचा प्रयत्न केला पण नविन लक्ष्य अजुन अवघड बनत होते. हाफिझ आणि अझरची भागीदारी सर जाडेजाने अझरला आउट करत तोडली. शोएब मलिक ने चौकार षटकार मारून थोडी रंगत वाढवण्याचा प्रयत्न केला पण त्याने घाटात लिहिलेली पाटी वाचली नाही. नको तिथे घाई नडली आणि सर जाडे़जाने अप्रतिम थ्रोवर त्याला धावबाद केले. मग तर फक्त आता पराभवाची औपचारिकता बाकी होती. हाफिज ला आउट करत जाडेजाने स्वतःच्या नावावर अजुन एक खिळा पाकिस्तानी शवपेटीवर ठोकला. ३ षटकार मारलेला हार्दिक का मागे राहिल मग? त्याने ही सर्फराज आणि वसीमला आउट करून हात साफ करून घेतला. यादवने पाकची शेपूट लवकर गुंडाळली. वहाब रियाझ जायबंदी असल्याने फलंदाजीला उतरलाच नाही.
अवघा संघ १६४ धावांवर माघारी परतला. परंतू पाकिस्तानी खे़ळाडू सगळ्यांना बॅटींग मिळाल्यामुळे आनंदी होते. असे प्रत्येक भारत-पाक मॅच मधे होते. सामना संपल्यावर कोहलीचे इंग्लिश ऐकल्यावर सर्फराजचे इंग्लिश ऐकून असे वाटत होते की फरारी चालवून झाल्यावर सरळ हातगाडी ढकलत आहे. बहुदा सर्फराज संघात एकुलता एक थोडेफार इंग्लिश बोलणारा असल्यामुळे त्याची कॅप्टनपदी वर्णी लागली असावी असा दाट संशय मला येऊ लागला आहे.
बाकी कोहलीला स्वस्तात आउट करण्याची स्वप्न पाहणार्‍या जुनैद ला सर्फराजने ड्रेसिंग रूम मधेच झोपवून ठेवले हे एक बरे केले. उगाच कुणाचा स्वप्न भंग करू नये. Happy

कालची मॅच ८०च्या दशकातील भारत-पाक सामन्यांचे संपूर्ण रोल-रिव्हर्सल होती. पाकिस्तान मनातून हरुनच मैदानात उतरले होते जसे पूर्वी आपले लोक करायचे. मार्केटींग स्ट्रॅटेजी म्हणून उगाच हवा तापवायची आणि आयसीसीनेही तसाच ड्रॉ काढायचा हे निव्वळ अर्थकारण उरले आहे. नाही म्हणायला राष्ट्रवादी आरोळ्या ठोकायची अजून एक संधी यापेक्षा बाकी त्यात काही मजा उरलेली नाही. खरी खुन्नस आता भारत-ऑसीज मधेच आहे.

न्यूझीलँड ला ऑस्ट्रेलियाविरुद्ध च्या मॅच नंतर जे वाटलं, तेच काल ऑस्ट्रेलियाला वाटलं असणार Wink
काल परत एकदा तमिम ची बॅटिंग प्रेक्षणीय !

एकदम भारी सुरुवती नंतर एकदम दोन ओव्हर्स मधे दोन आउट. आता पुढच्या दहा तरी ओव्हर्स विकेट न गमावता खेळले पाहिजे, म्हणजे ३०० प्लस आरामात होतील..

आयला मी विसरुनच गेलो आज मॅच! आता लावलीये. स्लिंग टिव्ही जिंदाबाद. मोबाईल वर लावलीये!
यक्सलेट्रावर पाय देवून र्हायलेत शिकं डावन आणि धोनी आता. ग्रेट!
कोहलीला रेस्ट आज. नो प्रॉबलेम, इतकं पुण्य कमवलय त्यानी की कोणी ब्र काढू शकत नाही त्याच्या विरोधात.

खरय, आजकाल ३०० म्हणजे हं ठीकाय... असा स्कोअर झालाय.
लंके वाले प्रेसर पायी आता कोंब्ड्या प्कडत आहेत.

बाकी मलिंगाचा भाताचा राशन कमी करायला पाहिजे का? चक्क पोट सुटलय थोडं. म्हणजे मला काही प्राबलेम नाही फक्त त्याला बॉलिंग करताना बरं पडेल असं वाटलं.

टी-२० का जमाना है.. और अपने सभी स्पेशलिस्ट बॅट्समन बाकी है.. महापूर आला की ३५० होतीलच>>

आयपीएल छोट्या मैदानावर होते हो! तिथे स्ट्रोक्स वरदेखिल हे लुटतात धावा! ह्या मैदानांवर मिसटाईम केला तर झेलच!

गेला बघा ढवण झेल देऊन!

पांडोबा आला रे आला!
आता मस्त ठोकंबाजी कर म्हणा!
डावन टिकला असता तर बरं झालं असतं. लेप्टी रायटी जरा त्रास होतो बॉलरांना.

हौ ना. ३०० होतील पण ३२५ वगैरे अवघड वाटत आहे. मलिंगा वगैरे चा अनुभव कामी आला. अगदी सातत्याने स्लोवर बॉल टाकत आहेत. ऑफ ला स्लोवर टाकले भस्कन की मोठे शोट मारणे अवघड होऊन जातं. वनली शिंगल डुंगल राहतात मग.

आईच्चा केदार जाधव!!! सिक्स पाहिला का? खत्तरनाक शॉट! खरं अंगापिंडानी अगदी साधा आहे तो. काय पावर अन टायमिंग? टू गूड!

Danushka Gunathilaka >>> ह्याच नाव कसं उच्चारायचं Proud

Pages