Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 04:33
क्रिकेटवरील पहिले तीन धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या बरीच झाली आहे. बर्याच दिवसांत तिथे कोणी काही म्हटलेलेही नाही. सध्याच बर्याच सिरीज संपल्यात, तर काही नव्याने सुरू होतायत. त्यामुळे नवीन धागा काढायला हा आयडियल टाईम आहे. आता क्रिकेट टॉक इथे करूया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मुद्दा त्याच्या फ्रिक्वेन्सी,
मुद्दा त्याच्या फ्रिक्वेन्सी, इन्टेन्सीटी आणि रॅशनालचा आहे. >> यालाच अभिनिवेश म्हणतात.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चार टाळकी म्हणतात म्हणून त्याचे वागणे बालिश आणि अनावश्यक होत नाही.
शेवटी हा खेळ आहे आणि यात चांगला खेळ खेळणारा टिकतो,>> अर्थातच, पण अरेला कारे करण्याचीही जिगर हवी. त्याला चीप थ्रिल्स म्हणणे म्हणजे बाबा रे समोरच्याने एका गालावर मारली तरी तू दुसरा पुढे कर असं सांगण्यासारखे आहे.
अर्थात, त्याला काही फरक पडत नाही म्हणा. तो योग्य ट्रॅकवरच आहे![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
यात चांगला खेळ खेळणारा टिकतो
यात चांगला खेळ खेळणारा टिकतो >> हे खरेच, पण चांगला खेळ ह्यामध्ये अनेक घटक आहेत. कोहलीला त्याच्या अॅग्रेशनमुळे 'चांगला खेळ' करण्यास मदत होते, असे त्यानेच म्हटले असताना आपण आपल्या पर्सनल टेस्टला आवडत नाही, म्हणून त्याला त्याच्या अॅप्रोचमध्ये बदल करण्यास सांगणे हे कितपत योग्य आहे? जर त्याने ओव्हरस्टेप केले, तर आयसीसी इ. लोक त्याला काय ती शिक्षा देतीलच. आपणच ती चिंता का वहा?
अर्थात, त्याला काही फरक पडत
अर्थात, त्याला काही फरक पडत नाही म्हणा. तो योग्य ट्रॅकवरच आहे Proud >>
फक्त तो चांगल खेळतो म्हणून तो कोहली आहे . बीसी , एमसी कुणीही करू शकत हे त्यान विसरू नये इतकच .
भारतीय खूप विसराळू आहेत . आणखी एखाद दुसरी वाईट सिरीज अन त्याच्या नावाने शिमगा सुरू होईल.
आता सगळ्याना अगदी भारी वाटणार्या या गोष्टी त्यावेळी अगदी नकोशा होतील इतकच .
भास्कराचार्य, अगदी अगदी.
भास्कराचार्य, अगदी अगदी.
एक गमतीशीर स्टॅट्स ९ वेळा
एक गमतीशीर स्टॅट्स ९ वेळा आपल्या कप्तानीच्या पहिल्याच कसोटीत विजय मिळविणाऱ्या कर्णधारात ५ मुंबईकर..
कोहलीला त्याच्या अ
कोहलीला त्याच्या अॅग्रेशनमुळे 'चांगला खेळ' करण्यास मदत होते, असे त्यानेच म्हटले असताना आपण आपल्या पर्सनल टेस्टला आवडत नाही, म्हणून त्याला त्याच्या अॅप्रोचमध्ये बदल करण्यास सांगणे हे कितपत योग्य आहे? जर त्याने ओव्हरस्टेप केले, तर आयसीसी इ. लोक त्याला काय ती शिक्षा देतीलच. आपणच ती चिंता का वहा? >> +१. फक्त त्याने ऑसीज कडून हे एखाद्याच्या स्किनखाली जात कसे करायचे हे शिकून घ्यायला हवे, आगाऊ म्हणतोय तसे ओपन अॅग्रेशन एका लिमिटनंतर कितीही योग्य असले तरी बालिश वाटायला लागते. (आगावा वय झाले रे लेको आपले
) वरती केदार म्हणाला तसे एक-दोन वाईट सिरीज झाल्या ( नि होतीलच) कि त्या नावाने शिमगा सुरू होईल. ऑसी मिडीया हि अतिशय बायस्ड आहेत असे माझे मत आहे. ज्या तर्हेने ते आगरकर, रणतुंगा, मुरली ह्यांच्या मागे लागलेले ते पाहता कोहलीची काळजी वाटते. मॅक्सवेल चे खांदा पकडण्याची कृती किंवा वेडची स्टाममागची बॉलर बॉलिंग स्ट्राईडमधे असताना सुरू असलेली बडबड ह्यावर चकार शब्द न येते कोहलीच्या मॅच नंतरच्या वक्तव्या वर हल्लाबोल हे त्याचेच उदाहरण आहे. जर ऑसीज स्लेजिंग हा त्यांच्या क्रिकेटींग कल्चरचा भाग असेल तर बीसी एम्सी शब्दप्रयोग उत्तरेकडच्या कॅज्युअल (किमान मेट्रोपोलिटन) कन्व्हर्सेशन कल्चरचा भाग आहेत.
भास्कराचार्य ++१००
भास्कराचार्य ++१००
प्रत्येक क्रिकेटर काय तेंडूलकर, द्रविड, धोनी सारखा डिमेनर घेवून येईल ? ते काय रोबॉट फॅक्टरी मधून तयार होवून येतात? ज्याची त्याची जडण घडण वेगळी आहे. अॅग्रेशन, काल्मनेस हा ज्याच्या त्याच्या ब्यक्तीमत्वाचा भाग आहे, त्याला कंस्ट्रक्टिवली वाट करून दिल्याशिवाय त्यांचा नॅचरल गेम दिसणार नाही. ऑस्ट्र्लियन पब्लिक ला मिडल फिंगर दाखवणारा कोहली आता तोच कोहली नाहीये. अॅग्रेशन तेच आहे पण ते खूप रिस्पॉन्सिबल झाले आहे. तो मॅच्युअर होत राहिल आणि आपोआप बदलत राहिल कोणी सांगून त्यात चेंज होवू नये हीच अपेक्षा.
वेडची स्टाममागची बॉलर बॉलिंग स्ट्राईडमधे असताना सुरू असलेली बडबड >> आयसीसी डिसिप्लिन कमिटीने स्लेजिंग बाबत नियम कडक करायला हवे. बॉलरचा रन अप चालू झाल्यावर कीपर/ स्लीप मधून चकार शब्द काढला तरी तो स्टंप मायक्रोफोन मधून कळू शकतो.
बॅटिंग ला जायच्या आधी तोंडात सिगार, हातात वाईन चा ग्लास आणि मांडीवर...
असा पहिले वेस्ट ईंडियन लिजेंड्स चा अॅटिट्यूड असे. कोणाची हिंम्मत होती त्यांना स्लेज करायची ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
"ऑसी मिडीया हि अतिशय बायस्ड
"ऑसी मिडीया हि अतिशय बायस्ड आहेत असे माझे मत आहे." - काहीतरीच काय असामी? ईतके नि:पक्ष लोक्स मी ईंग्लंड च्या मिडीयात सोडले तर कुठेही पाहिले नाहीत. ते त्यांच्या संघात ईतके मिसळून जातात की आपण फक्त वार्तांकन करतोय, प्रत्यक्ष खेळत नाही, ह्याचा त्यांना काही वेळा (वगळता) विसर पडतो. पण त्याचं काही विशेष नाही. त्यांचे माजी खेळाडू सुद्धा असं करतात (आठवा, कालची मायकेल क्लार्क ची कॉमेंट्री करतानाची कॉमेंट - वी नीड एट विकेट्स... सॉरी, ऑस्ट्रेलिया नीड एट विकेट्स).
बाकी, आगाऊ च्या अॅग्रेशन च्या प्रदर्शनाविषयी च्या मताशी मी वैय्यक्तिक पातळीवर सहमत आहे. पण म्हणून कोहली ने किंवा आणखी कोणी काय करावं हे मी नाही सांगू शकत. तसं तर गांगुली च्या टॉस ला (ब्लेझर सापडत नव्हता म्हणून) उशीरा जाण्याच्या किंवा लॉर्ड्स वर अचानक पणे उकडायला लागल्यावर शर्ट काढून त्याचा पंखा करण्याच्या आज जरी आख्यायिका झाल्या असल्या, तरी त्यावेळी त्या कृतींवर टीका करणारे लोकही होते. वक्त वक्त की बात होती है. यशस्वी खेळाडूंचं गुणगान गाणारे आणी सातत्याने अपयश आल्यावर ह्याच खेळाडूंना पायदळी तुडवणारे देखील त्या त्या वेळी त्यांच्या भावनेशी प्रामाणिक च असतात. त्यातही काही योग्य-अयोग्य मला तरी वाटत नाही.
कुणी काय करावे, कुणी काय करू
कुणी काय करावे, कुणी काय करू नये, हे सांगणे आताशा मला भंपकपणा किंवा मॉरल पोलिसिंग वाटू लागले आहे. तरी पण ..
मॅच संपल्यावर काल जॉन्सनभाऊ म्हणाले की रहाणेच चांगला कॅप्टन आहे. कोहली नाही. च्यामारी, हे पण शिवीगाळ करणेच आहे.
ऑस्ट्रेलियन लोकांना ( ह्यात कुठलाही अभिनिवेष नाही.) तसेच वागवता आले पाहिजे, जसे इंग्लिश लोकांना लॉर्डसवर शर्ट फिरवून वागवले. अॅज लाँग अॅज मॅच चालू असताता एखाद्याने कॅच सोडल्यावर, कोहली रागात येऊन आपल्याच प्लेअरला भेंचोद म्हणत नाही, तो पर्यंत मला काही वावगे वाटत नाही.
अॅग्रेसिव्ह शिव्या न देताही कसे राहता येते हे रहाणेने दाखवून दिले आहे, सचिनने अनेकदा दाखवले आहे, पण म्हणून तोच मापदंड सगळ्यांना का? हा प्रश्न मला पडतो.
"कुणी काय करावे, कुणी काय करू
"कुणी काय करावे, कुणी काय करू नये, हे सांगणे आताशा मला भंपकपणा किंवा मॉरल पोलिसिंग वाटू लागले आहे." - +१
आणी ह्या धाग्यावर १००० प्रतिसाद झाले.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रहाणेचे कप्तान म्हणून होणारे
रहाणेचे कप्तान म्हणून होणारे कौतुक कोहलीच्या पोटदुखीला कारण होवू नये म्हणजे मिळवली.... तसे आजकालचे क्रिकेटर्स बऱ्यापैकी sorted असतात पण तरीपण!
ऑसीज खेळाडूंच्या रहाणेच्या कप्तानीच्या कौतुकाबद्द्लच्या (आणि कोहलीबरोबरच्या तुलनेच्या) कॉमेंटस ऐकताना तर ही धास्ती जास्त वाटते (कदाचित त्यांचा हेतूही तोच असावा)
स्मिथ आता माफी वगैरे मागून आयपीएलसाठीची तयारी करतोय एकंदरीत!![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
खरतर स्मिथऐवजी रहाणेलाच पुण्याचे कॅप्टन करावे.... मज्जा येइल
ऑसीज खेळाडूंच्या रहाणेच्या
ऑसीज खेळाडूंच्या रहाणेच्या कप्तानीच्या कौतुकाबद्द्लच्या (आणि कोहलीबरोबरच्या तुलनेच्या) कॉमेंटस ऐकताना तर ही धास्ती जास्त वाटते (कदाचित त्यांचा हेतूही तोच असावा) >> +१ ऑसीज असे बोलायला लागले कि मला थेट आगरकर आठवतो. रच्याकाने हि सिरीज सुरू व्हायच्या अगोदर क्लार्क ची मुलाखत पाहिली होती ज्यात त्याने कोहली च्या मैदानाबाहेरच्या वागण्याचे कौतुक केले होते. कोहली डाउन अंडरच्या दौर्यात ह्युजेसच्या फ्युनरलसाठी स्वतःहून गेला होता ह्या कृतिने क्लार्क एकदम भारावून गेला होता. आयपीलमधे पैसा आहे तोवर कितीही उड्या मारल्या तरी सॉरी बोलायची वेळ ऑसीज वरच असणार आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
स्मिथ आता माफी वगैरे मागून आयपीएलसाठीची तयारी करतोय एकंदरीत!![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
खरतर स्मिथऐवजी रहाणेलाच पुण्याचे कॅप्टन करावे.... मज्जा येइल >>
अॅज लाँग अॅज मॅच चालू असताता एखाद्याने कॅच सोडल्यावर, कोहली रागात येऊन आपल्याच प्लेअरला भेंचोद म्हणत नाही, तो पर्यंत मला काही वावगे वाटत नाही. >> त्याने स्पेसिफिक शिव्या दिलेले खटकतेय कि राग प्रदर्शित करणे ?
आयसीसी डिसिप्लिन कमिटीने स्लेजिंग बाबत नियम कडक करायला हवे. बॉलरचा रन अप चालू झाल्यावर कीपर/ स्लीप मधून चकार शब्द काढला तरी तो स्टंप मायक्रोफोन मधून कळू शकतो. >> ह्याबद्दल नियम आहेच. त्यामुळे वेड च्या कृतीबद्दल काहीच अॅक्शन नाही हे विचित्र वाटले. हे सगळे सध्या सब्जेक्टिव्ह असल्यामूळे मॅच रेफ्री कूठ्ल्या कल्चरचा आहे ह्यावर फरक पडतो हा तापदायक प्रकार आहे.
कोहली रागात येऊन आपल्याच
कोहली रागात येऊन आपल्याच प्लेअरला भेंचोद म्हणत नाही, तो पर्यंत >>>>> बस्स काय, नवीन पोरांना बोलत असणार बिनधास्त. त्याला काय होतेय. कल्चर कसे आहे टीममध्ये त्यावर डिपेंड आहे. मी आमच्या गल्ली क्रिकेटमध्ये शिव्यांचे भंडार होतो. म्हणजे अगदी प्रत्येक वाक्याला. म्हणाल तर, जर एखादे वाक्य माझ्या तोंडून शिविशिवाय बाहेर पडले तर आकाशातून पुष्पवृष्टी व्हावी अशी एकंदरीत ईमेज होती. पण हेच माझ्या घरी समजले असते तर सारे घरवाले चक्कर येऊन पडले असते. कारण घरात असे संस्कार की तोंडातून चुकून साल्या वा च्याईला हा शब्दही बाहेर पडणार नाही. ईथे मी वेगळा आणि तिथे मी वेगळा..
तर मॉरल ऑफ द स्टोरी - जिथे जसे आपण कम्फर्टेबल असतो तसे राहायचे. आधीच कप्तानीचे आणि फलंदाजीच्या फॉर्मचे टेंशन डोक्यावर असताना आणखी वागायचे कसे याचे टेंशन का घ्या? आणि तसेही तुम्ही एकाच वेळी सर्वांना खुश करू शकत नाही हे वैश्विक सत्य आहे. त्यामुळे मजा येते तर द्यायच्या बिनधास्त शिव्या. फक्त त्याचा जास्त विचार करून बिथरायचे नाही.
मानलं.
मानलं.
जिथे जसे आपण कम्फर्टेबल असतो तसे राहायचे. आधीच कप्तानीचे आणि फलंदाजीच्या फॉर्मचे टेंशन डोक्यावर असताना आणखी वागायचे कसे याचे टेंशन का घ्या? आणि तसेही तुम्ही एकाच वेळी सर्वांना खुश करू शकत नाही हे वैश्विक सत्य आहे. त्यामुळे मजा येते तर द्यायच्या
बिनधास्त शिव्या. फक्त त्याचा जास्त विचार करून बिथरायचे नाही. >>
स त कुडचेडकरांनी महान वाक्ये रचली आहेत. ह्या वाक्याखाली मी आपली सही घेऊ इच्छितो.
आपला नम्र. सखाराम गटणे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तात्या पार गटणे केला तुझा ,
तात्या पार गटणे केला तुझा , बोळा वाहता होउ दे आता![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
<< "कुणी काय करावे, कुणी काय
<< "कुणी काय करावे, कुणी काय करू नये, हे सांगणे आताशा मला भंपकपणा किंवा मॉरल पोलिसिंग वाटू लागले आहे." >> पण त्याचबरोबर आपल्या संघाच्या कर्णधाराचं मैदानावरचं, व मैदानाबाहेरचंही, वागणं कसं असणं मला आवडतं किंवा खेदजनक वाटतं, हें एक क्रिकेटप्रेमी म्हणून सांगणं, यावरही आक्षेप असूं नये; कारण, माझा क्रिकेटचा आनंद घेण्यावर या गोष्टीचा निश्चितच परिणाम होत असतो. व्यक्तिशः, मला उत्कट स्पर्धेमधेही खेळाचा आनंद घेणारे व देणारे सोबर्स, कपिल देव सारखे कर्णधार किंवा स्थितप्रज्ञासारखं राहून खेळावर लक्ष केंद्रित करणारे अॅलन बोर्डर, धोनीसारखे कर्णधार खूप भावतात. 'पॅशन', 'अॅग्रेशन' असला कितीही रंग त्यांच्या वागणूकीला फासला तरीही रिकी पाँटींग , कोहलीसारखे कर्णधार खेळाचा रसभंग करतातच, हेंही माझं स्पष्ट मत. अर्थात, त्यानी कसं वागावं हा त्यांचा प्रश्न व मला काय आवडतं याबाबत मीही ठाम असावं, हें उत्तम !
पण त्याचबरोबर आपल्या संघाच्या
पण त्याचबरोबर आपल्या संघाच्या कर्णधाराचं मैदानावरचं, व मैदानाबाहेरचंही, वागणं कसं असणं मला आवडतं किंवा खेदजनक वाटतं, हें एक क्रिकेटप्रेमी म्हणून सांगणं, यावरही आक्षेप असूं नये;>>> हो पण असे मत व्यक्त केल्याने त्या खेळाडूचे खच्चीकरण होते म्हणे.
माझ्या पोस्ट्मध्ये कोहलीने कसे वागावे अथवा वागू नये अशा आशयाचे काही आहे असा अर्थ कसा निघाला ते कळाले नाही. त्याच्या अॅग्रेशनबद्दलचे ते माझे मत आहे. ते अॅग्रेशन 'आता' अनेकदा अस्थानी, फॉर द सेक ऑफ इट चालले आहे असे मला वाटते. त्याने ते करावे किंवा करु नये हा अर्थातच त्याचा आणि टीमचा प्रश्न हे तर मान्यच आहे. अर्थात इथल्या (व मायबोलीवर इतर ठिकाणीही) पोस्टींमध्ये अशा प्रकारचे भंपक व मॉरल पोलिसिंगचे सल्ले कोणीच अजिबात दिलेले नाहीत याबद्दल मला पूर्ण खात्री आहे.
कोहली रागात येऊन आपल्याच
कोहली रागात येऊन आपल्याच प्लेअरला भेंचोद म्हणत नाही, तो पर्यंत > >>
तुम्ही मॅच हायलाईट्स मधे बघतात का?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शिव्या देणे हे राग निवळंण्याचा एक मार्ग आहे. कोहली मैदानावर प्रचंड शिव्या देतो. तोच काय बाकीचे सुध्दा देतात. लिप रिडींगवरुन सहज कळते. जाडेजा ने सुध्दा वेड ला शिव्या दिलेल्या ज्याचा अर्थ वेड सारखा विचारत होता. अर्थात तो अर्थ कळला असता तर त्याला नक्कीच वेड लागले असते.
दीपस्त,
दीपस्त,
तुम्हाला "आपल्याच प्लेअरचा" अर्थ कळाला नाही का?
वेड आपला प्लेअर आहे का? असेल तर मग जडेजाने वेडला शिव्या देण्याचे मी समर्थन करणार नाही.
IPL चे उदाहरण देऊ नये, आंतरराष्ट्रीय मॅचेस बद्दल मी ते वाक्य लिहिले आहे.
भाऊ,
एक क्रिकेटप्रेमी म्हणून सांगणं, यावरही आक्षेप असूं नये >> हो नाहीच आहे. पण ह्याचा अर्थ असाही आहे की जर काही क्रिकेटप्रेमींना दुसर्या टीमने अॅग्रेशन दाखवले तर आपणही तसेच अॅग्रेशन दाखवावे असे वाटते, ह्यावरही आक्षेप असू नये.
असो मला स्वतःला धोणी, सचिन, रहाणे सारखे कॅप्टन आवडतात, जे आपल्या करणीतून अॅग्रेशन दाखवतात, देहबोलीतून नाही, पण वेळप्रसंगी देहबोलीतून अॅग्रेशन दाखवणारे अझर, दादा अन कोहली पण हवे आहेत. म्हणून ते वाक्य लिहिले की, त्यांनी कसे वागावे ह्यावर लिहिणे भंपकपणा वाटतो.
बरेचदा कॉम्पिटिटिव्ह स्पोर्टस मध्ये ही एनर्जी जाऊ देणे आवश्यक असते. कोणी पायावर बॅट मारून स्वतःला दोष देतो, कोणी स्वतःलाच फक मी म्हणून दोष देतो, तर कोणी मैदानावर शिव्या देऊन इतर जंटलमन बघ्यांची ( उदा आपण सर्व) मने दुखावतो. अॅज लाँग अॅज परफॉरमन्सच्या आड येते नाही, तो पर्यंत काही म्हणू शकत नाही. त्यांचे अॅग्रेशन मनाबाहेर घालवण्याची ती एक ष्टाईल आहे असे म्हणता येईल.
( मलाही शिवीगाळ आवडत नसताना, कोहलीला एवढे डिफेन्ड करेल असे वाटले नव्हते
)
आंतरराष्ट्रीय मॅच मधे ही
आंतरराष्ट्रीय मॅच मधे ही कोहली ने शिव्या दिलेल्या आहे. साहा, इशांत ही गिर्हाईक मंडळी आहे. वन डे २०-२० मधे प्रमाण जास्त आहे. तो राग तात्पुरता असतो. एखादा कॅच सुटला अथवा बॉल अडवता आला नाही तर ऑटोमॅटिक शिवी तोंडातून निघते. त्यात विराट दिल्लीचा आहे. मग तर शिव्या त्याच्या जिभेवर नाचत असतील
(आठवा एका मॅच मधे नेहरा ने धोनीला नविन असताना फक्त बॉल नीट ग्लोव्ह्ज मधे पकडला नाही म्हणून शिव्या दिलेल्या) शिविगाळ केली म्हणून तो वाईट असे लगेच होत नाही. प्रत्येक खेळाडूला या गोष्टीची सवय असते. भारतात ह#$खो# इ. ची सवय असेल तर ऑसी, इंग्लंड मधे मद$%^ ची सवय असेल. पाकिस्तानात तर प्रत्येक वाक्याच्या आधी २ शिवी आणि वाक्य संपल्यानंतर ३ शिव्या या लागलेल्याच असतात. मग तो इंझमाम असो या आफ्रिदी असो. वर्ल्डकप ०३ मधे सचिन चा कॅच सोडल्यावर अक्रम ने रझ्झाक ला भर मॅच मधे दिलेली शिवी तर जगप्रसिध्दच झाली होती. "$%^&द तुझे मालूम है किसका कॅच छोडा..?" ![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मैदानात दिलेल्या शिव्यांवर तर ग्रंथ तयार होईल
आता ऑस्ट्रेलिया दौर संपला. आय
आता ऑस्ट्रेलिया दौर संपला. आय पी एल केंव्हा संपणार नि नवीन दौरे केंव्हा सुरु होणार? त्या साठी आय पी एल सारखा वेगळा धागा काढावा अशी विनंति.
(आधी नवीन धागा काढा असे लिहिणार होतो, पण वरचे सगळे वाचून इतका गोंधळलो आहे - कुणि कुणाला काय सांगायचे नि त्याबद्दल कुणि काय वाटून घ्यायचे, काय लिहायचे हे फारच अवघड झाले आहे. काहिहि लिहीले तरी त्यावर काहीतरी भाष्य!
तर विनंति म्हणायला कुणाचा आक्षेप नसावा!)
आय पी एल साठी नवा धागा स्वरुप
आय पी एल साठी नवा धागा स्वरुप यांनी पुर्वीच उघडला आहे
दीपस्त,
दीपस्त,
यंदा तो मान फेरफटका यांनी पटकवलेला आहे!
अच्छा यावेळेस त्यांनी बाजी
अच्छा यावेळेस त्यांनी बाजी मारली. मला वाटले यंदा ही आयपीएलची जवाबदारी तुम्हीच उचलली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कुणि कुणाला काय सांगायचे नि
कुणि कुणाला काय सांगायचे नि त्याबद्दल कुणि काय वाटून घ्यायचे, काय लिहायचे हे फारच अवघड झाले आहे. काहिहि लिहीले तरी त्यावर काहीतरी भाष्य! >>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
(No subject)
यंदा हैद्राबादची बॉलिंग लाईन
यंदा हैद्राबादची बॉलिंग लाईन जबरदस्त आहे.
भुवी, मुझ्तफिजुर, प्रविण तांबे, आशिष नेहरा, नेगी, रशिद खान, जॉर्डन, ताहीर.
सगळेच २०-२० मधे मॅजिक स्पेल् टाकणारे बॉलर आहेत
वाचतोय वाद. याबाबतीत मला असे
वाचतोय वाद. याबाबतीत मला असे वाटते की मैदानावरच्या अॅग्रेशन ने तुम्हाला जास्त चांगले फोकस करता येणार असेल तर हरकत नाही. स्टीव वॉ, हरभजन सिंग वगैरे लोकांचा खेळ तसा होता. याउलट आमिर सोहैल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
स्टीव वॉ ने तर याबद्दल स्पेसिफिकली लिहीलेले आहे. अनेकदा तो स्वतःला 'झोन' मधे नेण्यासाठी मुद्दाम उकरून काढत असे भांडण.
म्हणजे इथले काही स्टीव्ह वॉ,
म्हणजे इथले काही स्टीव्ह वॉ, भज्जी नि काही आमिर सोहेल आहेत असे म्हणतोयस का फा ?![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
"यंदा हैद्राबादची बॉलिंग लाईन
"यंदा हैद्राबादची बॉलिंग लाईन जबरदस्त आहे.
भुवी, मुझ्तफिजुर, प्रविण तांबे, आशिष नेहरा, नेगी, रशिद खान, जॉर्डन, ताहीर." - ताहीर पुण्याकडे आहे.
Pages