सचिनवर सिनेमा येणार हे कळल्यापासूनच तो फर्स्ट डे फर्स्ट शो पाहायचा हे नक्की होतच . त्यामुळे आज सकाळीच गँगला घेऊन थिएटरला पोचलो . सचिनचा सिनेमा म्हटल्यावर बघण आलच , पण तो कसा असेल याची प्रचंड उत्सुकता अन टेन्शन ही होतच , पण चित्रपटाने सचिन प्रमाणेच अपेक्षा पूर्ण केल्या.
हा खरतर रूढार्थाने सिनेमा नाही , खरे तर डॉक्युमेट्रीच्या आसपास जाणारा . फार कमी प्रसंग तेही मुख्यतः लहानपणीचे इतरानी एनॅक्ट केले आहेत. अन्यथा जुन्या क्लिपिंग्ज अन सचिन अन इतरांच्या मुलाखतीवर सिनेमा पुढे जातो . पण तुम्हाला अगदी पहिल्या क्षणापासून शेवटपर्यंत खिळवून ठेवतो , हसवतो , नॉस्टेल्जिक करतो अन बर्याच ठिकाणी रडवतोही .
आपल्याकडे माणसाला देवत्व देण्याची एक अतिशय वाईट पद्ध्त आहे , सचिनला ही ते चुकल नाही . पण त्यामुळे होत काय , की त्याने केलेले सगळे कष्ट मातीमोल होतात , एकदा "he is Gifted" म्हटल की त्याने नेटमध्ये घालवलेले कित्येक तास , त्याची मेहनत , त्याच्यावरचा ताण हे सगळ शून्य होत. चित्रपट नेमक हेच दाखवतो , त्याची मेहनत , त्याचा त्याग , त्याचबरोबर सचिन हा शेवटी माणूस च आहे हेही . त्याच्या यशात वाटा असलेले त्याचे कुटुंबीय , गुरू , मित्र या सगळ्याबद्द्ल सांगत असतानाही सिनेमा आपली गती राखतो.
चित्रपटात त्याच्या लहानपणापासून रिटायरमेंट पर्यंत ऑलमोस्ट सगळ्या महत्वाच्या घटना दाखवल्या आहेत . क्रिकेट खेळायची सुरूवात , कांबळीबरोबरची भागीदारी , पाकिस्तानचा पहिला दौरा , डेझर्ट स्टोर्म , सारे वर्ल्ड कप्स सगळ काही ..
मुख्य म्हणजे सचिनच्या आयुष्यातले वाईट प्रसंग दाखवायलाही सिनेमा पुढे मागे पाहत नाही , मग ते मॅचफिक्सिंग असो की "Endulkar" (धोनी त्याबाबतीत अगदीच गुडी गुडी होता) . त्याला झालेला त्रास , त्यावेळी त्याला त्याच्या कुटुंबियानी विशेषतः अंजलीने दिलेली साथ , अगदी छान चित्रित केलाय .
सगळ्यात शेवटी स्मरणात राहतो तो तेंडुलकरचा नम्रपणा . त्याने असंख्य रेकॉर्ड बनवले , पण सगळा भारत तुम्हाला जवळजवळ देव मानत असताना पाय जमिनीवर ठेवणे ही माझ्यामते सचिनची सर्वात महत्वाची अचिव्हमेंट आहे .
अर्थात वर म्हटल्याप्रमाणे काहीसा डॉक्युमेट्रीच्या आसपास जाणारा असल्याने कमर्शियल , गाणी वगैरे अशी अपेक्षा ठेवून जाणार्या लोकाना हा बोअर वाटू शकतो हे मान्यच आहे , पण एक सच्चा क्रिकेट फॅन (सचिन फॅन नाही) पाणावलेले डोळे घेऊन बाहेर येईल हे नक्की .
आणि काय लिहू , फक्त इतकच ...
सचिन ..... सचिन !!! सचिन ...... सचिन !!! सचिन .... सचिन !!!
नक्की बघणर आहे.
नक्की बघणर आहे.
केदार, छान लिहिलंय. हे वाचतानाही डोळ्यात पाणी आलंय माझ्या.
छान लिहिलयं
छान लिहिलयं
धन्यवाद सस्मित , मेघा .
धन्यवाद सस्मित , मेघा .
सस्मित नक्की बघा , आमची तर अजून अनेक पारायण घडणार आहेत
शेवटचा सचिन सचिन वाचताना
शेवटचा सचिन सचिन वाचताना अंगावर काटा आला.नक्की पाहनार आहे.
शेवटचा सचिन सचिन वाचताना
शेवटचा सचिन सचिन वाचताना अंगावर काटा आला.नक्की पाहनार आहे. >>>>> +१
पिक्चर बघताना सचिन आणि
पिक्चर बघताना सचिन आणि क्रिकेट फॅनच्या डोळ्यातून पाणी येते का?
असल्यास हा अनुभव घ्यायलाच हवा...
मलाही याच विकेण्डला जमवायचा होता. क्ठीण दिसतेय. पण पुढच्याला नक्की...
डॉक्युमेण्टरी टाईप आहे कल्पना आहेच. पण ज्याने स्पोर्टस चॅनेलवर सचिनवरचे कित्येक कार्यक्रम आणि डॉक्युमेण्टरी आवडीने पाहिल्या आहेत त्याला तेच बिग कॅनव्हासवर बघायला बोअर नाही होणार याची खात्री असल्याने जाणार..
आणि हो एकटाच जाणार.. गर्लफ्रेण्डला सोबत म्हणून बळजबरी नाही नेणार.. जर व्यावसायिक मसालेपट नसेल आणि ती बोअर झाली तर तिच्या तोण्डून तिचे हे प्रामाणिक मत ऐकवणार नाही
केदार छान लिहिलयसं.
केदार छान लिहिलयसं.
आजच टॅक्स फ्री झाला.
आजच टॅक्स फ्री झाला.
छान लिहीले आहे!
छान लिहीले आहे!
सचिन. बस नाम ही काफी है! संधी
सचिन. बस नाम ही काफी है! संधी मिळेल तिथे, आणी संधी मिळेल तेव्हा, नक्कीच बघणार. बाकी सचिन ने 'परफॉर्म' करावं आणी आणी आम्ही बघून आनंद घ्यावा हीच रीत २५ वर्षं चालली आणी आताही तसंच घडेल.
छान लिहिले आहे!!
छान लिहिले आहे!!
आपल्याकडे माणसाला देवत्व देण्याची एक अतिशय वाईट पद्ध्त आहे , सचिनला ही ते चुकल नाही . पण त्यामुळे होत काय , की त्याने केलेले सगळे कष्ट मातीमोल होतात , एकदा "he is Gifted" म्हटल की त्याने नेटमध्ये घालवलेले कित्येक तास , त्याची मेहनत , त्याच्यावरचा ताण हे सगळ शून्य होत. >>>> हे खूप आवडले.
छान लिहिलेय. सचिन फॅन
छान लिहिलेय. सचिन फॅन असल्याने बघणार आहेच
आजच टॅक्स फ्री झाला.
आजच टॅक्स फ्री झाला.
>>>
हेवाचून आधी मनात विचार आला याचा सिनेमा टॅक्स फ्री का केला. हे का उगाचचे लाड..
मग लक्षात आले "भारतरत्न" सचिन तेंडुलकरचा सिनेमा आहे
Movie is too good. Done in
Movie is too good. Done in documentary fashion. He looks fabulous and very real. Comes across as sincere and human. Lovely family and its great to watch other cricketing greats. A true Bharat Ratna. There are four marathi lines he says about his father tevaa radu yete. They bring out the sensituve son in him.
छान लिहिलयस केदार. बघणार.
छान लिहिलयस केदार.
बघणार.
आताच पाहून आलो.
आताच पाहून आलो.
वर्थ वाॅचिंग!!!
या परिक्षणातला शब्द न शब्द पटला. गाणी, मेलोड्रामा न दाखवणारा एखादा डाॅक्यूमेन्ट्री सदृश सिनेमा आहे. मॅच फिक्सिंग, दोन वेळा दिलेलं कर्णधारपद.. यांवर कुठलाही आडपडदा न ठेवता फॅक्ट्स समोर ठेवल्या आहेत.
फक्त सचिनला सुरुवातीला फास्ट बोलर व्हायचं होतं असं वाचण्यात आलं होतं, त्याबद्दल काहीच उल्लेख नाही सिनेमात. बाकी पहिला पाकिस्तान दौरा, डेजर्ट स्टाॅर्म इनिंग, वर्ल्डकप वगैरे आहेतच.
फारेण्डाच्या प्रतिक्रियेच्या प्रतिक्षेत...
श्री , फारेण्ड , सुमुक्ता ,
श्री , फारेण्ड , सुमुक्ता , अमितव , मित , सर्वांचे आभार .
सिनेमा डोक्यातून जातच नाहीये . दिवसभर ऑफिसम्धेही त्याबद्द्लच बोलत होतो.
सगळ्या मित्रानाही आवडला .
एखादा ऑलमोस्ट डॉक्युमेंट्री असलेला सिनेमा लोकाना इतका आवडावा हे जितक सचिन च यश आहे तितकच ती कथा अगदी ओघवती पुढ नेणार्या दिग्दर्शकाचही आहे
पिक्चर बघताना सचिन आणि
पिक्चर बघताना सचिन आणि क्रिकेट फॅनच्या डोळ्यातून पाणी येते का?
असल्यास हा अनुभव घ्यायलाच हवा... >> ऋन्मेऽऽष १००% . सच्च्या क्रिकेट फॅनच्या नाही आले तर मी पैसे परत करीन
(No subject)
वा! नक्कीच बघणार!
वा! नक्कीच बघणार!
पाहिला. छानच आहे
पाहिला. छानच आहे
छान परिक्षण ! नक्की पहाणार.
छान परिक्षण !
नक्की पहाणार.
चित्रपटाचा दर्जा अन बॉक्स
चित्रपटाचा दर्जा अन बॉक्स ऑफिस यांचा प्रत्येक वेळी संबध असतोच अस नाही हे मान्य आहे , चित्रपट पहावा की न पहावा हा वैयक्तिक चॉईस आहे हेही मान्य आहे , पण तरीही पहिल्या दिवशी फक्त ८.४ कोटी वाचून थोडस वाईट वाटलच
We Indians Have Very Short Memory Span !
ओह! हे कलेक्शन सरसकट असतं का
ओह! हे कलेक्शन सरसकट असतं का?म्हणजे सचिन, इंग्लिश, हिंदी, मराठी तीनही भाषेत आहे. तर तीनही भाषेतलं मिळुन आहे का?
मी उद्या जाणार. मराठी बघणार.
हो सस्मित
हो सस्मित
Considering it's a docu-drama, #SachinABillionDreams opens IMPRESSIVELY... Fri ₹ 8.40 cr. India biz [Hindi, Marathi, Tamil, Telugu, English]
ओके
ओके
केदार जाधव एक तर हा चित्रपट
केदार जाधव एक तर हा चित्रपट नाही माहीतीपट / डॉक्युमेंट्री आहे. त्यामुळे या माहीतीपटाची तुलना "धोनी अनटोल्ड स्टोरी, बाहुबली दंगल" इ. चित्रपटांबरोबर करणे चुकीचे ठरेल. उलट माहितीपट असुन सुध्दा एकाच दिवसात तब्बल ८ करोड कमवले असे म्हणायला हवे.
बुकिंगसाठी वर्तमानपत्र पाहिलं
बुकिंगसाठी वर्तमानपत्र पाहिलं तर हा चित्रपट मराठी आणि हिंदी अशा दोन भाषांमध्ये आहे...
आपण चित्रपट कुठल्या भाषेत पाहिला आहे..?
उलट माहितीपट असुन सुध्दा एकाच
उलट माहितीपट असुन सुध्दा एकाच दिवसात तब्बल ८ करोड कमवले असे म्हणायला हवे.
>>>>
अगदी,
उद्या लोकांना समजले की माहीतीपट असूनही ईंटरेस्टींग आहे तर पकवले तर नसेल ना अशी शंका असणारी आणखी लोकं बघायला जाऊ शकतात.
फक्त पायरसीवर आळा हवा. अन्यथा डॉक्युमेंटरी आहे तर थिएटरात का बघा, मोबाईलवरच बघूया असा विचार होऊ शकतो..
केदार जाधव एक तर हा चित्रपट
केदार जाधव एक तर हा चित्रपट नाही माहीतीपट / डॉक्युमेंट्री आहे. त्यामुळे या माहीतीपटाची तुलना "धोनी अनटोल्ड स्टोरी, बाहुबली दंगल" इ. चित्रपटांबरोबर करणे चुकीचे ठरेल. उलट माहितीपट असुन सुध्दा एकाच दिवसात तब्बल ८ करोड कमवले असे म्हणायला हवे.
>> गजोधर ,डॉक्युमेंट्री आहे हे मान्यच आहे . तरीही ती सचिन वरची आहे , कदाचित माझ्या अपेक्षा काही वेगळ्या असतील .
ज्या माणसाने आयुष्यात एवढा आनंद दिला , त्याच्यासाठी २ तास /२०० रू जास्त नसावेत अस मला वाटत , पण अस सगळ्याच मत असाव असही माझ म्हणण नाही.
Pages