सचिनवर सिनेमा येणार हे कळल्यापासूनच तो फर्स्ट डे फर्स्ट शो पाहायचा हे नक्की होतच . त्यामुळे आज सकाळीच गँगला घेऊन थिएटरला पोचलो . सचिनचा सिनेमा म्हटल्यावर बघण आलच , पण तो कसा असेल याची प्रचंड उत्सुकता अन टेन्शन ही होतच , पण चित्रपटाने सचिन प्रमाणेच अपेक्षा पूर्ण केल्या.
हा खरतर रूढार्थाने सिनेमा नाही , खरे तर डॉक्युमेट्रीच्या आसपास जाणारा . फार कमी प्रसंग तेही मुख्यतः लहानपणीचे इतरानी एनॅक्ट केले आहेत. अन्यथा जुन्या क्लिपिंग्ज अन सचिन अन इतरांच्या मुलाखतीवर सिनेमा पुढे जातो . पण तुम्हाला अगदी पहिल्या क्षणापासून शेवटपर्यंत खिळवून ठेवतो , हसवतो , नॉस्टेल्जिक करतो अन बर्याच ठिकाणी रडवतोही .
आपल्याकडे माणसाला देवत्व देण्याची एक अतिशय वाईट पद्ध्त आहे , सचिनला ही ते चुकल नाही . पण त्यामुळे होत काय , की त्याने केलेले सगळे कष्ट मातीमोल होतात , एकदा "he is Gifted" म्हटल की त्याने नेटमध्ये घालवलेले कित्येक तास , त्याची मेहनत , त्याच्यावरचा ताण हे सगळ शून्य होत. चित्रपट नेमक हेच दाखवतो , त्याची मेहनत , त्याचा त्याग , त्याचबरोबर सचिन हा शेवटी माणूस च आहे हेही . त्याच्या यशात वाटा असलेले त्याचे कुटुंबीय , गुरू , मित्र या सगळ्याबद्द्ल सांगत असतानाही सिनेमा आपली गती राखतो.
चित्रपटात त्याच्या लहानपणापासून रिटायरमेंट पर्यंत ऑलमोस्ट सगळ्या महत्वाच्या घटना दाखवल्या आहेत . क्रिकेट खेळायची सुरूवात , कांबळीबरोबरची भागीदारी , पाकिस्तानचा पहिला दौरा , डेझर्ट स्टोर्म , सारे वर्ल्ड कप्स सगळ काही ..
मुख्य म्हणजे सचिनच्या आयुष्यातले वाईट प्रसंग दाखवायलाही सिनेमा पुढे मागे पाहत नाही , मग ते मॅचफिक्सिंग असो की "Endulkar" (धोनी त्याबाबतीत अगदीच गुडी गुडी होता) . त्याला झालेला त्रास , त्यावेळी त्याला त्याच्या कुटुंबियानी विशेषतः अंजलीने दिलेली साथ , अगदी छान चित्रित केलाय .
सगळ्यात शेवटी स्मरणात राहतो तो तेंडुलकरचा नम्रपणा . त्याने असंख्य रेकॉर्ड बनवले , पण सगळा भारत तुम्हाला जवळजवळ देव मानत असताना पाय जमिनीवर ठेवणे ही माझ्यामते सचिनची सर्वात महत्वाची अचिव्हमेंट आहे .
अर्थात वर म्हटल्याप्रमाणे काहीसा डॉक्युमेट्रीच्या आसपास जाणारा असल्याने कमर्शियल , गाणी वगैरे अशी अपेक्षा ठेवून जाणार्या लोकाना हा बोअर वाटू शकतो हे मान्यच आहे , पण एक सच्चा क्रिकेट फॅन (सचिन फॅन नाही) पाणावलेले डोळे घेऊन बाहेर येईल हे नक्की .
आणि काय लिहू , फक्त इतकच ...
सचिन ..... सचिन !!! सचिन ...... सचिन !!! सचिन .... सचिन !!!
चित्रपट/माहितीपट आवडला
चित्रपट/माहितीपट आवडला सचिनने आपल्या बॅट/किटबद्दल माहिती सांगतांना, एखादा सर्वोत्तम कलाकार आपल्या वाद्याची जितक्या काळजीने जपणूक करतो, तशी निगा राखली. त्यावेळी खरंच खूप छान वाटलं. नुसतं मैफिली गाजविणे म्हणजे उत्तम कलाकार नसतं, तर त्यामागची मेहनत, तंत्र, सखोल अभ्यास, सर्व सोपस्कारांची जाणीव असलेला हा अत्यंत मोठ्या उंचीला जाऊनही नम्र राहिलेला कलाकार पाहिला अशी भावना आली.
त्याच्या पायाच्या अंगठ्याचं दुखणं दाखवणारं चित्र पाहून कसंतरीच झालं. सुरुवातीला आणि शेवटी , सचिन... सचिन ऐकून अंगावर काटा, त्याच्या वैयक्तीक आयुष्यातले क्षण पाहून हसू-आणि आसूंचं मिश्रण झालं. खूप मजा आली. पुन्हा पाहणार
एखादा सर्वोत्तम कलाकार आपल्या
एखादा सर्वोत्तम कलाकार आपल्या वाद्याची जितक्या काळजीने जपणूक करतो, तशी निगा राखली. त्यावेळी खरंच खूप छान वाटलं
>> अगदी अगदी , तो जेव्हा म्हणतो की मी बॅट कधीही फेकली नाही , तेव्हा अगदी भरून आल . आम्ही सगळे क्रिकेट ग्रुपच पहायला गेलो होतो , अन एवढ्या तेव्ढ्या कारणावरून बॅट फेकणे , स्टंप्सला लाथ मारणे हे कधी ना कधी प्रत्येकाने केल असल्याने सगळेच एकमेकाकडे पाहत होते
Pages