मायबोलीच्या ऊर्ध्वश्रेणीकरणानंतर ..

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

मायबोलीच्या गाभ्याचे (core software ) उर्ध्वश्रेणीकरण (Upgrade) यशस्वीरित्या पार पडले आहे. तुम्हा सगळ्यांच्या सहकार्याबद्दल आभारी आहोत.
इतके मोठे उर्ध्वश्रेणीकरण या अगोदर आपण २००७ मधे केले होते. नंतर मधून मधून छोटे बदल आपण नेहमीच करत आलो आहोत. पण गेल्या १० वर्षात मायबोली वापरत असलेल्या संगणक प्रणालीच्या गाभ्यात काही मूलभूत बदल झाले आणि त्यामुळे आपल्यालाही हे बदल करणे आवश्यक झाले. यातले मुख्य बदल सभासदांना दिसणारही नाहीत. पण मायबोलीच्या भविष्यासाठी ते खूप महत्वाचे आहेत. किंवा सभासदांना फारसे बदल न जाणवू न देता , हा मुख्य बदल कसा करता येईल हे एक महत्वाचे उद्दीष्ट या प्रकल्पामागे होते. एकदम खूप नवीन सुविधा उपलब्ध होतील अशी काही सभासदांची अपेक्षा असेल आणि आम्ही ती पूर्ण केली नसेल तर त्याबद्दल दिलगीर आहोत.

सभासदांना लक्षात येणारे मुख्य बदलः
१. मोबाईलवरून मायबोली पाहणे सुलभ झाले आहे.
२. सदस्याना आपली संपूर्ण विचारपूस अप्रकाशीत करायची सोय सध्या तांत्रीक कारणामुळे उपलब्ध नाही. पण आता स्वत:ची विचारपूस तुम्ही मॉडरेट करू शकता. नको असलेले प्रतिसाद काढून टाकायची सोय दिली आहे.

खालील गोष्टींवर अजून काम चालू आहे:.
१. Smileys (स्मीतचित्रे) देता येत नाही आहेत.
२. ग्रूपमधल्या सदस्यांची संख्या आणि यादी दिसत नाही आहे.
३. ग्रूपमधल्या लेखांची विषयवार यादी दिसत नाही आहे पण शब्दखुणांचा वापर करून किंवा शोध सुविधा वापरून कुठल्याही धाग्यावर जाता येईल.
४. निवडक १० मध्ये नोंद केलेले धागे दिसत नाहीत.
५. ग्रूपच्या नावावरून ग्रूपच्या मुख्य पानावर जात येत नाही : पण धाग्याखाली ग्रूपचे नाव दिलेले आहे. त्या दुव्यावरून तुम्ही ग्रूपच्या मुख्य पानावर जाऊ शकता.
६. तांत्रीक कारणांमुळे मायबोली बखर सध्या चालत नाही आहे. त्यामुळे एका विशीष्ट दिवशीच्या धाग्यांचा शोध घेण्याची सुविधा नाही. त्या ऐवजी प्रत्येक पानावर असलेल्या शोध सुविधेचा वापर करू शकता. लेखक स्वतःच्या व्यक्तिरेखेतूनही त्यांच्या जुन्या लेखनावर जाऊ शकतात.

चाचणी समितीत काम केलेल्या खालील मायबोलीकरांचे खूप आभार. त्यांनी वेळोवेळी तत्परतेने केलेल्या सुचनांमुळे आणि शोधलेल्या चुकांमुळेच आम्ही हा मोठा प्रकल्प पार पाडू शकलो.
rmd, चिन्नु, प्रिंसेस, राया, वैद्यबुवा, श्री, संपदा, स्वप्ना_राज, हर्पेन

अजून काही चुका राहून गेल्या आहेत. चाचणी समितीने काढलेल्या सगळ्याच चुकांवर काम करणे वेळेअभावी शक्य नव्हते. त्यामुळे काही चुका तशाच ठेवून मायबोली पुन्हा सुरु करण्याचा निर्णय आम्हाला जाणीवपूर्वक घ्यावा लागला. येत्या काही दिवसात या दुरुस्त करण्याचा आमचा प्रयत्न राहील..

या व्यतिरिक्त काही चुका /अडचणी / नवीन प्रश्न आढळते तर कृपया याच पानावर खाली प्रतिसादांमधे लिहा.
तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याबद्दल आभारी आहोत.

प्रकार: 

मोठा मजकूर लिहिलेली पोस्ट प्रतिसादात देता येत नाही.
http://www.maayboli.com/node/62647 सदर धाग्यावर ७ क्रमाकाच्या पानावर मी ३ प्रतिसाद लागोपाठ दिले आहे. खरंतर ते मी एकाच पोस्टीत लिहिलेले होते परंतू जेव्हा जेव्हा save केले तेव्हा ती पोस्ट प्रसिध्द झाली नाही. अर्धी अर्धी करून सुध्दा पोस्ट होत नाही. म्हणून ३ पोस्टींमधे डिव्हाईड करून पोस्ट करावी लागली.

आधी प्रतिसादात मोठा मजकूर देता येत होता. यात काही बदल केला आहे का ?

नवीन फोटो चा प्रश्न फक्त मोबाईलवरून आहे का डेस्कटॉपवर ही येतो आहे? >> डेस्कटॉपवरुन पण अपलोड होत नाहीत.

मोठा मजकूर लिहिलेली पोस्ट प्रतिसादात देता येत नाही.
>>> होय! तीन दिवसांपूर्वी 'माझ्या आठवणीतील रीमा लागू' ह्या धाग्यावर प्रतिसाद देताना मलाही ही अडचण जाणवली होती. अखेर मीसुद्धा Contd. लिहून तिला दोन भागांत विभागली होती.

मोबाईलवरून फोटो तर अपलोड होतायत. चाचणीचा धागा पहा. मी फोटो आत्ताच Google drive वरून अपलोड केलाय.

खाजगी जागेतला फोटो अपलोड होत नाहीए का?

होय! बरोबर म्हणताय. मोबाईलवरून खाजगी जागेत फोटो अपलोड होत नाहीए. पण खाजगी जागेतला अगोदरच असलेला फोटो अपलोड होतोय.

तात्पुरता आपण google drive वगैरे वरून फोटो अपलोड करू शकता. मी करून पाहिला, होतोय.

फोटो अपलोड होण्याचा प्रॉब्लेम सुटला आहे.

मोठी पोस्ट देण्याचा प्रश्न ही सुटला असावा. कारण दोन्ही प्रश्न एकाच गोष्टी मुळे होत होते. आणि काही चाचण्या यशस्वी झाल्या. पण मोठ्या पोस्टचा प्रश्न एकच नसून अनेक गोष्टींचे मिश्रण असेल तर काही जणांना अजूनही अडचण येत असेल. तुम्हाला मोठी पोस्ट देताना अजूनही प्रश्न आला तर कृपया इथे लिहा.

झकास!!! मोठ्या पोस्टीची चाचणी यशस्वी झाली.

धन्यवाद, वेबमास्टर!!!

मोबाईल ते खाजगी जागा. आणि खाजगी जागा ते धाग्यावर फोटो अपलोड करण्याची चाचणीसुद्धा यशस्वी झाली.

झकास!!!

पुन्हा एकवार धन्यवाद, वेबमास्टर!!!

मला सेम धागा एडिट करताना एरर आलेली.. वॉट्स अप वर स्क्रिन शॉट फॉर्वर्ड केलेला
आणखी एक - एखादा धागा किंवा कमेंट एडिट करून परत लिहायला गेलं तर देवनागरी फॉण्ट जातोय...
क्रोम, विन्डोज वापरतेय मी

काही समस्या व शंका:

१. >> क्रोम वर सीपीयू खूपच खात आहे मायबोली साईट. त्यामुळे कॉमेंट लिहिणे खूप संथ होतेय. जवळजवळ अशक्य. Waiting for cas.criteo.com अशा सारखे मेसेज सातत्याने येत आहेत. याचा अर्थ सतत इन्टरनेट एक्सेसिंग सुरुच राहत आहे.
Submitted by atuldpatil on 30 January, 2017 - 12:36

हि समस्या पुन्हा उद्भवली आहे.

२. इंग्रजी वा मराठी "Ctrl + \ ने बदला" असे लिहिलेय. पण ते चालत नाही. माऊसनेच select करावे लागते (निदान क्रोम वर तरी). शिवाय एकदा इंग्रजी select केल्यानंतर पेज रीलोड केल्यावर भाषा पुन्हा मराठीच दिसते.

३. विचारपूस मधील मेसेजखालील "प्रतिसाद" क्लिक करून मेसेजला प्रतिसाद दिला तर तो आपल्याच विपू मध्ये राहतो. पण मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीला आपण प्रतिसाद दिलाय हे कळते का?

१. >> क्रोम वर सीपीयू खूपच खात आहे मायबोली साईट. त्यामुळे कॉमेंट लिहिणे खूप संथ होतेय. जवळजवळ अशक्य. Waiting for cas.criteo.com अशा सारखे मेसेज सातत्याने येत आहेत. याचा अर्थ सतत इन्टरनेट एक्सेसिंग सुरुच राहत आहे.
Submitted by atuldpatil on 30 January, 2017 - 12:36
हि समस्या पुन्हा उद्भवली आहे.

इथे कळवल्याबद्दल धन्यवाद. हा प्रश्न भौगोलिक प्रदेशानुसार भिन्न असू शकतो त्यामुळे नेहमीच आम्हाला आपोआप कळत नाही. बदल केला आहे. येत्या २४ तासात हा प्रश्न कमी होईल्/सुटेल अशी अपेक्षा आहे.

>>फोटो अपलोड होण्याचा प्रॉब्लेम सुटला आहे.<<

फोटो अप्लोड केल्यावर (इमेज अप्लोडच्या पॉपप मधुन) तो फोटो पॉपप विंडोमध्ये व्यवस्थित दिसतो पण प्रतिसादाच्या विंडोत ऑटोमॅटिकली टिल्ट होतो. फोटो रोटेट करता येत नाहि, इमेजची साइझ कमी करुन पाहिली, डिस्प्ले कोऑर्डिनेट्स बदलले पण फरक नाहि. काय होत असेल बुवा?

>प्रतिसादाच्या विंडोत ऑटोमॅटिकली टिल्ट होतो.
मोबाईल का डेस्क्टॉप. त्या फोटोची इथे लिंक देणार का?

>>मोबाईल का डेस्क्टॉप. त्या फोटोची इथे लिंक देणार का?<<

डेस्क्टॉप (मॅकओएस सिएरा १०.१२.५), सफारी (१०.१.१)

लिंक - <--img src="/files/u18168/IMG_1124.JPG" width="320" height="240" alt="IMG_1124.JPG" />

फोटो -
IMG_1124.JPG

Pages