मायबोलीच्या ऊर्ध्वश्रेणीकरणानंतर ..

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

मायबोलीच्या गाभ्याचे (core software ) उर्ध्वश्रेणीकरण (Upgrade) यशस्वीरित्या पार पडले आहे. तुम्हा सगळ्यांच्या सहकार्याबद्दल आभारी आहोत.
इतके मोठे उर्ध्वश्रेणीकरण या अगोदर आपण २००७ मधे केले होते. नंतर मधून मधून छोटे बदल आपण नेहमीच करत आलो आहोत. पण गेल्या १० वर्षात मायबोली वापरत असलेल्या संगणक प्रणालीच्या गाभ्यात काही मूलभूत बदल झाले आणि त्यामुळे आपल्यालाही हे बदल करणे आवश्यक झाले. यातले मुख्य बदल सभासदांना दिसणारही नाहीत. पण मायबोलीच्या भविष्यासाठी ते खूप महत्वाचे आहेत. किंवा सभासदांना फारसे बदल न जाणवू न देता , हा मुख्य बदल कसा करता येईल हे एक महत्वाचे उद्दीष्ट या प्रकल्पामागे होते. एकदम खूप नवीन सुविधा उपलब्ध होतील अशी काही सभासदांची अपेक्षा असेल आणि आम्ही ती पूर्ण केली नसेल तर त्याबद्दल दिलगीर आहोत.

सभासदांना लक्षात येणारे मुख्य बदलः
१. मोबाईलवरून मायबोली पाहणे सुलभ झाले आहे.
२. सदस्याना आपली संपूर्ण विचारपूस अप्रकाशीत करायची सोय सध्या तांत्रीक कारणामुळे उपलब्ध नाही. पण आता स्वत:ची विचारपूस तुम्ही मॉडरेट करू शकता. नको असलेले प्रतिसाद काढून टाकायची सोय दिली आहे.

खालील गोष्टींवर अजून काम चालू आहे:.
१. Smileys (स्मीतचित्रे) देता येत नाही आहेत.
२. ग्रूपमधल्या सदस्यांची संख्या आणि यादी दिसत नाही आहे.
३. ग्रूपमधल्या लेखांची विषयवार यादी दिसत नाही आहे पण शब्दखुणांचा वापर करून किंवा शोध सुविधा वापरून कुठल्याही धाग्यावर जाता येईल.
४. निवडक १० मध्ये नोंद केलेले धागे दिसत नाहीत.
५. ग्रूपच्या नावावरून ग्रूपच्या मुख्य पानावर जात येत नाही : पण धाग्याखाली ग्रूपचे नाव दिलेले आहे. त्या दुव्यावरून तुम्ही ग्रूपच्या मुख्य पानावर जाऊ शकता.
६. तांत्रीक कारणांमुळे मायबोली बखर सध्या चालत नाही आहे. त्यामुळे एका विशीष्ट दिवशीच्या धाग्यांचा शोध घेण्याची सुविधा नाही. त्या ऐवजी प्रत्येक पानावर असलेल्या शोध सुविधेचा वापर करू शकता. लेखक स्वतःच्या व्यक्तिरेखेतूनही त्यांच्या जुन्या लेखनावर जाऊ शकतात.

चाचणी समितीत काम केलेल्या खालील मायबोलीकरांचे खूप आभार. त्यांनी वेळोवेळी तत्परतेने केलेल्या सुचनांमुळे आणि शोधलेल्या चुकांमुळेच आम्ही हा मोठा प्रकल्प पार पाडू शकलो.
rmd, चिन्नु, प्रिंसेस, राया, वैद्यबुवा, श्री, संपदा, स्वप्ना_राज, हर्पेन

अजून काही चुका राहून गेल्या आहेत. चाचणी समितीने काढलेल्या सगळ्याच चुकांवर काम करणे वेळेअभावी शक्य नव्हते. त्यामुळे काही चुका तशाच ठेवून मायबोली पुन्हा सुरु करण्याचा निर्णय आम्हाला जाणीवपूर्वक घ्यावा लागला. येत्या काही दिवसात या दुरुस्त करण्याचा आमचा प्रयत्न राहील..

या व्यतिरिक्त काही चुका /अडचणी / नवीन प्रश्न आढळते तर कृपया याच पानावर खाली प्रतिसादांमधे लिहा.
तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याबद्दल आभारी आहोत.

प्रकार: 

छान आहे नवा लूक!

मी पहिली की काय!

अ‍ॅडमीन टीम आणि मदतनीस सर्वांना खूप धन्यवाद!

मायबोलीच्या नव्या रुपड्यासाठी मेहनत घेतलेल्या चमूचे अभिनंदन व कौतुक !
हळू हळू नवीन मायबोली कशी आहे हे कळेलच. कामे अपूर्ण असल्यास आपण आणखी काही काळ मायबोली बंद ठेवली तरी सदस्य सहकार्य करतील याची खात्री वाटते.

नव्या मायबोलीस मनःपूर्वक शुभेच्छा !

छान वाटतोय नवा लूक. Happy

फूटर मेनुचा फाँट खूप छोटा वाटतोय मला. इन फॅक्ट ओव्हर ऑल मायबोलीचाच फाँट छोटा वाटतोय. पण फूटर मेनु बघतांना डोळ्यांना त्रास होतोय किंचित.
कुणाला वाटतय का असे ?

फायरफॉक्स वर फाँट छोटा दिसतोय. क्रोम वर ओके Happy >>> +१ (पण तसंही जो-तो आपल्यापुरता झूम-इन्/आऊट करून वाचू शकतोच.)

मोबाईलवर मी सहसा मायबोली बघत नाही. आता बघावी काय?! Wink

- मला माझा इथला प्रतिसाद संपादित करता येत नाहीये.
- पाककृतींच्या धाग्यांवर जिन्नसांची यादी सर्वात शेवटी दिसते आहे.

हे जाणीवपूर्वक केलं आहे काय?

सर्व प्रथम ऍडमिन टीम आणि प्रकल्पासाठी काम केलेल्या टीमचे आभार ! याच आमच्या साठी संक्रांतीच्या शुभेच्छा!

वेळेच्या आत मायबोली चालू केल्याबद्द्ल धन्यवाद!
माबो टीमलाही धन्यवाद आणि वेळेत काम केल्याबद्दल अभिनंदन!

१.मला माझ्या मोबाईलवरून माबो अधिक गोरीपान दिसत्येय, वाचायला त्रास होतोय.
२. प्रतिसादकर्त्याचे नाव कृपया सुरूवातीस आणि जरा ठळक फाँट मध्ये येऊ द्या.
मराठी नावे नाजूकश्या निळ्या रंगात छोट्टीशी दिसतायत.
त्या मानाने इंग्रजी बरी आहेत.
३.सगळीकडेच, प्रतिसादाच्या खिडकीसह , जागा खूप मोकळी सोडलीय, जास्त स्क्रोल करायला लागतंय.

अजून सूचना असतील तर देईनच.

१) प्रतिसाद परत संपादीत करता येऊ लागले आहेत.
२) इतर गोष्टींवर काम सुरु आहे.
३. कृपया अडचणी सांगताना (विशेषतः फाँट्चा आकार) तुम्ही कुठला मोबाईल, ओएस, ब्राउझर वापरता ते लिहिले तर खूप् मदत होईल.

२. प्रतिसादकर्त्याचे नाव कृपया सुरूवातीस आणि जरा ठळक फाँट मध्ये येऊ द्या.
>>>
याला माझाही प्लस वन. बरेच प्रतिसाद वाचताना कोणता कोणाचा प्रतिसाद आहे हे समजायला अवघडेय.

पहिल्या पानावर फार कमी धागे दिसत आहेत का? तसे असेल तर ते ही नाही आवडले.

पांढराशुभ्र लूक फारसा रुचला नाही. हे रंगाची वैयक्तिक आवड म्हणून नाही तर जरा डोळे दिपल्यासारखे होतेय म्हणून सांगतोय.

(मी क्रोम वापरतोय)

मोबाईलवरून अजून फारसे चाळले नाही पण उघडताच नेहमीपेक्षा युजरफ्रेंडली वाटले.

ज्या गोष्टी आम्हाला दिसत नाहीयेत, पण मायबोलीच्या चांगल्यासाठी केल्या गेल्या आहेत, त्या यशस्वी झाल्याबद्दल अभिनंदन Happy

अजुन एक, नविन प्रतिसादावर क्लिक केल्यावर पुर्वी जसे नविन प्रतीसाद नविन शब्द लाल रंगात दाखवायचे तसे आता दिसत नाही. ते होऊ शकते का पहा

मायबोली भ्रमणध्वनी वरुन पहाताना चांगाली दिसतेय पुर्वी पेक्षा परंतु संगणकावर अक्षरे खूप बारीक दिसतायेत!

प्रतिसादकर्त्याचे नांव अंत्यंत बारीक दिसते अर्थात उत्तर देताना पुर्व ग्रह दुषित विचार उत्तर देण्यापुर्वीच येतात ते येणार नाहीत! त्यामुळे वाचून मग प्रतिसाद देतील लोक! Wink

ते अक्षरांच्या आकाराचे तेवढे बघा!

गुगल क्रोमवर चांगले दिसते! फायरफॉक्स मध्ये अक्षरे बारीक दिसतात!

स्मार्टफोनिय लुक आवडला. फक्त ते कोणी पोस्ट टाकली ते पटकन समजत नाहीये तर त्यासाठी काही करता येईल का ? बाकी सुविधा येतील हळूहळू असे तुम्ही लिहिले आहेच .

Pages