मायबोलीच्या ऊर्ध्वश्रेणीकरणानंतर ..

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

मायबोलीच्या गाभ्याचे (core software ) उर्ध्वश्रेणीकरण (Upgrade) यशस्वीरित्या पार पडले आहे. तुम्हा सगळ्यांच्या सहकार्याबद्दल आभारी आहोत.
इतके मोठे उर्ध्वश्रेणीकरण या अगोदर आपण २००७ मधे केले होते. नंतर मधून मधून छोटे बदल आपण नेहमीच करत आलो आहोत. पण गेल्या १० वर्षात मायबोली वापरत असलेल्या संगणक प्रणालीच्या गाभ्यात काही मूलभूत बदल झाले आणि त्यामुळे आपल्यालाही हे बदल करणे आवश्यक झाले. यातले मुख्य बदल सभासदांना दिसणारही नाहीत. पण मायबोलीच्या भविष्यासाठी ते खूप महत्वाचे आहेत. किंवा सभासदांना फारसे बदल न जाणवू न देता , हा मुख्य बदल कसा करता येईल हे एक महत्वाचे उद्दीष्ट या प्रकल्पामागे होते. एकदम खूप नवीन सुविधा उपलब्ध होतील अशी काही सभासदांची अपेक्षा असेल आणि आम्ही ती पूर्ण केली नसेल तर त्याबद्दल दिलगीर आहोत.

सभासदांना लक्षात येणारे मुख्य बदलः
१. मोबाईलवरून मायबोली पाहणे सुलभ झाले आहे.
२. सदस्याना आपली संपूर्ण विचारपूस अप्रकाशीत करायची सोय सध्या तांत्रीक कारणामुळे उपलब्ध नाही. पण आता स्वत:ची विचारपूस तुम्ही मॉडरेट करू शकता. नको असलेले प्रतिसाद काढून टाकायची सोय दिली आहे.

खालील गोष्टींवर अजून काम चालू आहे:.
१. Smileys (स्मीतचित्रे) देता येत नाही आहेत.
२. ग्रूपमधल्या सदस्यांची संख्या आणि यादी दिसत नाही आहे.
३. ग्रूपमधल्या लेखांची विषयवार यादी दिसत नाही आहे पण शब्दखुणांचा वापर करून किंवा शोध सुविधा वापरून कुठल्याही धाग्यावर जाता येईल.
४. निवडक १० मध्ये नोंद केलेले धागे दिसत नाहीत.
५. ग्रूपच्या नावावरून ग्रूपच्या मुख्य पानावर जात येत नाही : पण धाग्याखाली ग्रूपचे नाव दिलेले आहे. त्या दुव्यावरून तुम्ही ग्रूपच्या मुख्य पानावर जाऊ शकता.
६. तांत्रीक कारणांमुळे मायबोली बखर सध्या चालत नाही आहे. त्यामुळे एका विशीष्ट दिवशीच्या धाग्यांचा शोध घेण्याची सुविधा नाही. त्या ऐवजी प्रत्येक पानावर असलेल्या शोध सुविधेचा वापर करू शकता. लेखक स्वतःच्या व्यक्तिरेखेतूनही त्यांच्या जुन्या लेखनावर जाऊ शकतात.

चाचणी समितीत काम केलेल्या खालील मायबोलीकरांचे खूप आभार. त्यांनी वेळोवेळी तत्परतेने केलेल्या सुचनांमुळे आणि शोधलेल्या चुकांमुळेच आम्ही हा मोठा प्रकल्प पार पाडू शकलो.
rmd, चिन्नु, प्रिंसेस, राया, वैद्यबुवा, श्री, संपदा, स्वप्ना_राज, हर्पेन

अजून काही चुका राहून गेल्या आहेत. चाचणी समितीने काढलेल्या सगळ्याच चुकांवर काम करणे वेळेअभावी शक्य नव्हते. त्यामुळे काही चुका तशाच ठेवून मायबोली पुन्हा सुरु करण्याचा निर्णय आम्हाला जाणीवपूर्वक घ्यावा लागला. येत्या काही दिवसात या दुरुस्त करण्याचा आमचा प्रयत्न राहील..

या व्यतिरिक्त काही चुका /अडचणी / नवीन प्रश्न आढळते तर कृपया याच पानावर खाली प्रतिसादांमधे लिहा.
तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याबद्दल आभारी आहोत.

प्रकार: 

हा नवीन फॉन्ट जास्त छान आहे अधीपेक्शा. डोळ्यांना बरा वाटतोय. Happy
पेजेसही बरेच स्ट्रिम्लाईन झालेत.
सध्या सफारी मधून पाहातोय. आयपॅड मिनि. आयओएस १०.२.

आता फॉन्ट ची समस्या सुटल्यासारखी वाटतेय. ऑफिसमधून कालपर्यंत तरी लहानच दिसत होता, उद्या बघून सांगतो.
मेन मेनू च्या जागी कधी कधी आडव्या तीन निळ्या रेघा दिसतात. तोच मेनू आहे, ते पटकन लक्षात येत नाही.
यू आर हिअर.. या ओळीचा फॉन्ट मात्र अजूनही लहानच दिसतोय.

शेवटचा प्रतिसाद.. हि ओळ अपडेट होत नाही आहे. या पानावर शेवटचा प्रतिसाद ५ दिवस अगो ( अगो इंग्रजीत ) दिसतेय. प्लीज ते अपडेट करा आणि सर्व मराठीत असू द्या. ( पण त्याची गरज आहे का नक्की ? )

मोबाईल वरुन छान दिसते अस बर्याच जणांनी म्हटले म्हणुन मोबाईल वर ओपन करुन बघितली. खरच छान दिसतेय.

मोबाइल वरून आधीही छान दिसत होतं आणि आता मस्त दिसतेय . फक्त ते पोस्ट कर्त्याच नाव वर टाकायचं काही करता आलं तर बरं होईल ? का आहे तसेच ठेवायचं धोरण आहे ?

प्रतिसाद प्रत्येकाचे वेगवेगळे दिसावे.

Submitted by - या लाईनीवर एक रंगीत पट्टी देता येईल का? म्हणजे प्रतिसाद एका खाली एक बघताना मिक्सिंग होणार नाही.

अखेर वाचण्यायोग्य आकार झाला अक्षरांचा. सही एकदम. दिसायला सुरेख आहे आधीच्या नव्या फॉन्टपेक्षा. अजूनही खूप मोकळं ढाकळं वाटतं आहे पण तरीही तो सवयीचा भाग आहे. Happy

नवा फॉन्ट छान वाटतोय...
पण,ते जाई आणि सचिन काळे यांनी सांगितल्याप्रमाणे प्रतिसाद कर्त्याचे नाव वर नाही का देता येऊ शकत पहिल्यासारखं???

Screenshot_20170122-125410.png

सगळे बदल छान आहेत! फक्त पान उघडल्यावर वरती बरीच मोकळी जागा दिसते जी कमी झाली तर अधिक बरे होईल.

हो ना!!! मोबाईलवर तर पान उघडल्यावर प्रत्येकवेळी एक पूर्ण पान वरती ढकलावं लागतंय, मग वाचणं चालू होतंय.

अरे वा.. नवीन फॉन्ट मोबाईलवरून अतिशय सुरेख दिसतोय हेच लिहायला आले होते. माझ्यासारखाच अनेकांना तो आवडला हे पाहून छान वाटले. खरंच सुंदर आहे नवीन फॉन्ट.

फाँट मस्त दिसतो आहे आता.
वर कोणितरी लिहिलं म्हणून मिपा पाहिलं. त्यांचा ले आऊट खूप कॉम्पॅक्ट आहे खरच. विशेषतः पानावरच्या पोस्टी व्यवस्थित मांडल्यासारख्या दिसतात. मला आठवतं त्याप्रमाणे २००८ मध्ये पण सुरुवातीला असाच पोस्टींचा लेआऊट असाच होता आणि पोस्टी भोवती चौकट होती. नंतर काही दिवसांनी सिग्नेचर निळी पट्टी आणली होती. तसाच काही प्लॅन असेल तर मस्तच Happy

फाँट बदल्यावर खूपच फरक पडलाय.
एकदम सुटसुटीत वाटतेय माबो.

टाईट जीन्स, माफक टी शर्ट, अन तशात पोट आत ओढुन वावरतानाचा ताण सोडून, मस्त पैकी सुटसुटीत झब्बा पायजमा घालुन वावरताना जसं रिलॅक्स्ड आणि उत्साहीत पण वाटतं, तस वाटतंय.

छान आहे नवीन माबो. आवडलं!

गझल, कविता, उपग्रह वाहिनी या विभागात आलेले नवीन लेखन दिसू नये यासाठी काय करायचं?

स्वतःच स्वतःला स्क्रॅप टाकण्याची सुविधा छान आहे. त्याला लाईक्स आणि प्रतिसादांची सोय मिळाली तर अजून छान होईल.

आता खरच छान दिसतेय माबो, पण ते हेडरचे कराना काहितरी, खुप मोठे फाँट वाटतायेत.

मध्यंतरी "नवीन प्रतिसाद लिहा" आणी हेडर दोन्ही खुप मोठे वाटत होते, आता "नवीन प्रतिसाद लिहा" व्यवस्थीत दिसतेय... शक्य असेल तर हेडर पण तेव्हढेच करा

एक शंका. एखाद्या सर्वांसाठी असलेल्या लेखावर आलेल्या प्रतिक्रियांची संख्या 'येण्याची नोंद' न करता पाहिल्यास थोडी कमी दिसते. नोंद करून पाहिल्यास जास्ती असते (काही काळ). असे का?

>जुन्या निवडक १० मध्ये साठवलेले लेखन गेले का?
नाही आहे. ते जुन्या फॉर्मॅट्मधून नवीन फॉर्मॅट मधे आणायचे प्रयत्न चालू आहेत.

>एखाद्या सर्वांसाठी असलेल्या लेखावर आलेल्या प्रतिक्रियांची संख्या 'येण्याची नोंद' न करता पाहिल्यास थोडी कमी दिसते. नोंद करून पाहिल्यास जास्ती असते (काही काळ). असे का?
येण्याची नोंद न करता ते जे पान दिसते ते १-२ तास जुने असून शकते. ही पाने मधून मधून Refresh केली जातात. येण्याची नोंंद केली असेल तर सगळ्यात ताजे पान दिसते. मायबोलीवर येण्याची नोंद न करता येणार्‍या वाचकांची (आणि न वाचकांची उदा Search engine robots ) संख्या ही लॉगीन करून येणार्‍यांच्या १० पट तरी आहे त्यामुळे सर्वरवर येणार भार कमी होतो. हे फार पूर्वीपासूनच आहे अशात त्यात मोठा बदल झाला नाही. तुम्ही पाहण्याच्या काही मिनिटेच अगोदर पान Refresh झाले असेल तर कदाचित तुम्हाला दोन्ही सारखेच दिसतील.

मोबाईलवरून टाईप करताना केलेली निरीक्षणे
१. मेन्यू शेजारी ' Main Menu' असे दिसते.
२. मेन्यू उघडल्यानंतर कुठल्याही सबमेन्यूवर क्लिक केले नाही तर पानावर टच करून मेन्यू जात नाही. मेन्यू, त्याच्या शेजारील 'X' वापरून घालवावा लागतो.

>मेन्यू उघडल्यानंतर कुठल्याही सबमेन्यूवर क्लिक केले नाही तर पानावर टच करून मेन्यू जात नाही
असे व्हायला नको. आताच केलेल्या चाचणीत तरी ते पान इतर पानांसारखेच येते आहे. (शेजारील 'X' न वापरता)

Pages