Submitted by योकु on 8 August, 2016 - 23:51
चल्ला पिसं काढू!
येत्या २२ तारखेपासून ही नवी मालिका, झी मराठीवर चालू होतेय. आजच सकाळी जाहीरात पाहीली म्हणून ताबड्तोब धागा काढ्ला!
चलो हो जाओ शुरू!
कलाकार -
अभिजित खांडकेकर
स्मिता गोंदकर
सुहिता थत्ते
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अस व्हायला पाहीजे की, रेवतीने
अस व्हायला पाहीजे की, रेवतीने तिच्याशी कायमची मैत्री तोडायला हवी आ़णि गुरुने शनायाकडे पुन्हा जायला हव. म्हणजे हिला अक्कल येईल कायमची.>>
राधिका चे पात्र खरोखरी मुर्ख
राधिका चे पात्र खरोखरी मुर्ख पात्र आहे. परत एकदा बोटिंग ला गेल्यावर पण हडळीसारखी खदाखदा हसत होती काल. (रिपिट मध्ये पण तशीच हासली :हाहा:)
गुरू आणि ती बोटिंग करताना ३/४ भाग तिने व्यापल्यासारखं दिसत होतं
अभिजित अनिता दात्ये समोर अगदीच कोवळी काकडी वाटतो.
हडळीसारखी खदाखदा हसत होती >>
हडळीसारखी खदाखदा हसत होती >>>अगदी
राधिका आणी गुरुची जोडी अगदी
राधिका आणी गुरुची जोडी अगदी बहिणभावाची जोडी वाटते, बोटिन्गचा सीन अगदी अगदी होता, तुफान आलया मधे अनिता जिन्स कुर्ती मधे मस्त वाटते... झीच्या टिआरपी ची गणीत वैगरे ठिक आहे पण राधिकाला ग्रुहिणी दाखवताना अगदी गबाळी टाइप दाखवलय, रेवतीच्या साड्या बघुन तरी राधिकाने तिचा वॉर्डरोब बदलायला हवा होता.
ती समिधा आता शनायाला का मदत
ती समिधा आता शनायाला का मदत करतिये? गुरु आणि राधिकाच पॅच अप झाल तर राधिका हिच्या घरातुन जाईल ना
ती समिधा आता शनायाला का मदत
ती समिधा आता शनायाला का मदत करतिये? गुरु आणि राधिकाच पॅच अप झाल तर राधिका हिच्या घरातुन जाईल ना>> नैतर काय.. व्हिलन पण अकला गहाण टाकायला लागल्या.
(No subject)
ती समिधा आता शनायाला का मदत
ती समिधा आता शनायाला का मदत करतिये? गुरु आणि राधिकाच पॅच अप झाल तर राधिका हिच्या घरातुन जाईल ना >>>> नैतर काय. आधीच ती पहिली नोकरी (उगाचच) सोडून बसली. दुसरी नोकरी शोधायची सोडून ती त्या कुणालचे फोटो काढत बसलीये.
नानाजी परवा बरोबर बोलले होते तिला कि,"दुसरी नोकरी हि अशी सहजासहची मिळत नाही. मुळात आपल्याला पहीली नोकरी टिकविता आली पाहीजे." Practical समिधाला एवढी साधी गोष्ट कशी कळत नाही?
मला वाटले तिने मुद्दम नोकरी
मला वाटले तिने मुद्दम नोकरी सोडली. नानांना तुम्हीच बिल भरा असे सांगायला. एकतर राधाक्का तिथे राहून सगळ्यांना डबे पाठवते. आता तर फोन वर कामे सांगून ऑर्डर पुर्ण करत असते. आले-गेल्या लोकांना चहा, खायला देत असते. ते तिच्याकडून काही घेत नाही आणि ती सुद्धा त्यांना काही देत नाही.
एकतर राधाक्का तिथे राहून
एकतर राधाक्का तिथे राहून सगळ्यांना डबे पाठवते. आता तर फोन वर कामे सांगून ऑर्डर पुर्ण करत असते. आले-गेल्या लोकांना चहा, खायला देत असते. ते तिच्याकडून काही घेत नाही आणि ती सुद्धा त्यांना काही देत नाही. >>> होना म्हणूनच तर ब्याद टळत होती तर जाऊ द्यायच ना. उगाच शनायाच्या नादाला कशाला लागायच
गुरु ला कळलं का ?
गुरु ला कळलं का ?
एकतर राधाक्का तिथे राहून
एकतर राधाक्का तिथे राहून सगळ्यांना डबे पाठवते. आता तर फोन वर कामे सांगून ऑर्डर पुर्ण करत असते. आले-गेल्या लोकांना चहा, खायला देत असते. ते तिच्याकडून काही घेत नाही आणि ती सुद्धा त्यांना काही देत नाही>>> हे खरे फार रिडिक्युलस आहे. इतका खर्च कोण सहन करेल? ते नाना कायम राधिका कडे बघत बसतात ते मला चमत्कारिक वा टते. परवा तो सासू सुनेने गजरा माळण्यचा प्रसंग बघितला. मग घरी जेवणे होतात मग काय राधिका अथर्व शेजारी झोपायला परत जातात? हे जरा टूमच नाही का होत? सासू सासरे नवरा घरी असताना शेजारीच राहात बसायचे काहीतरी मानाचा मुद्दा करून.
जाम स्टुपिडीटी चालू असते. जसे काही हिच्या स्वयंपाकाच्या स्किलवरच जग चालले आहे समिधा मस्त म्हण ते हिला इतका सपोर्ट आहे तो मला कुठे आहे. म्हणून. रेवती पण आजकाल साड्या?! परवा ऑरेंज साडी मस्त होती.
काल गुरुनाथला सगळ खर कळल.
काल गुरुनाथला सगळ खर कळल. पुन्हा राधिका त्याच्यासाठी बावळट, गावन्ढळ झाली. शनायाची माफी मागायला गेला काल. आता तर म्हणे त्याला दोन्हि हव्यात. का तर म्हणे, राधिका परफेक्ट बायको मटेरिअल आहे आणि शनाया ही परफेक्ट girlfriend आहे म्हणून त्याला आता दोन्हि हव्यात. भरीस भर म्हणजे त्या के.डी ने त्याला मोलाचा सल्ला दिला, बायको घरात आणि girlfriend ला बाहेर ठेव. घरवाली-बाहरवाली मध्ये balance ठेव.
देवा !!!!!! .
देवा !!!!!! .
आणि ती राधिका , लाजत मुरकत त्याने आणलेला गजरा काय माळते , घरी येउन त्यासाठी जेवण काय बनवते , पत्ते वाटताना गुरु कडे लाजत लाजत काय बघते .
पण यांनी मला मानाने बोलवल्याशिवाय घरी जाणार म्हणते .
सुलू, काल प्रोमो पाहिला तो.
सुलू, काल प्रोमो पाहिला तो. तेव्हाच प्रचंड चिडचिड झाली. आता त्या दोघींनी मिळून गुरुला बडवायला पाहिजे.
आता त्या दोघींनी मिळून गुरुला
आता त्या दोघींनी मिळून गुरुला बडवायला पाहिजे.>> त्याने काय फरक पडणार आहे. या दोन्ही बायकाच अशा आहेत ना...
शनायाला फक्त त्याच्या पैश्यावर मजा करायची आहे. एखाद्याचा संसार आपण मोडतोय याचे जरापण काही वाटत नाही. राधिका तिला खोड्याकाढून त्रास देते म्हणून ती सुद्धा तिला त्रास देते. आधि गुरुनाथ तिच्यात गुंतला होता, आपण राधिकाला सोडचीठ्ठी देऊन शनायाशी लग्न करू असा सरळ विचार तो करत होताच की.
इकडे राधिका.... आपला नवरा खूप चांगला त्यातून शन्याच त्याला फसविते. त्यामुळे त्याची काही चुकच नाही. आपले त्याच्यावर खूप प्रेम आहे तर आपण त्याला कधीच सोडायचे नाही...याच विचारात तिला रहायचे आहे त्याला कोण काय करणार?
बायको सोडायला तयार नाही आणि प्रेयसी लग्न करायला तयार नाही मग त्याने काय करावे?
बायको घरात आणि girlfriend ला
बायको घरात आणि girlfriend ला बाहेर ठेव >>> हे आधी होतच की शनाया त्याच्या घरी येईपर्यंत. नविन काय आहे त्यात
काल गुरुनाथला सगळ खर कळल.
काल गुरुनाथला सगळ खर कळल. पुन्हा राधिका त्याच्यासाठी बावळट, गावन्ढळ झाली. शनायाची माफी मागायला गेला काल. आता तर म्हणे त्याला दोन्हि हव्यात. का तर म्हणे, राधिका परफेक्ट बायको मटेरिअल आहे आणि शनाया ही परफेक्ट girlfriend आहे म्हणून त्याला आता दोन्हि हव्यात. भरीस भर म्हणजे त्या के.डी ने त्याला मोलाचा सल्ला दिला, बायको घरात आणि girlfriend ला बाहेर ठेव. घरवाली-बाहरवाली मध्ये balance ठेव. >>> कोण के. डी. ? बरं झालं, गेले काही दिवस मालिका बघायला वेळ नाही झाला ते. काय फाल्तु दाखवत आहेत झी वाले ?
कोण के. डी. ? >>> शनाया आणि
कोण के. डी. ? >>> शनाया आणि कुणाल चा कॉमन फ्रेन्ड .
शनाया नेच गुरु ला सांगितलं की तो त्याला विचार , माझा आणि कुणालचा काही संबंध नाही आता .
फालतू सिरीयल आहे ..
फालतू सिरीयल आहे ..
कुठेही भरकटत चालली आहे .. तर्कहीन
सिरीयलचे फक्त प्रोमोचं चांगले दाखवतात हे झी मराठी वाले
मला पहिले वाटायचं की प्रोमो
मला पहिले वाटायचं की प्रोमो म्हणजे ते पुढे कधीतरी घडणार ...... पण झी ने माझा हा समज पार खोटा ठरविला.
प्रोमो आणि अॅक्च्युअल कहाणी यांचा काहीहि संबंध नसतो!
ही झी वरची सगळ्यात फालतु आणि
ही झी वरची सगळ्यात फालतु आणि कथा नसलेली सिरियल असावी...
इथे नायिकाच बोअरिन्ग , खोटी, फालतु, चुकीच्या विचारांची वाटते..
गुरु स्वर्थी पणाचं टोकं...
असल्या नवर्या बरोबर रहावं वाटण म्हन्जे अवघड आहे..
त्यापेक्शा बरी सुटका झाली असं वाटलं पाहिजे राधिकाला..
इतकं इरिटेटिंग की टायटल साँग सुरु झालं की पट्टकन बंद करतो आम्ही टि.व्ही. ....बर्याच्दा टि.व्ही असाच चालु असायचा.. आता बंद करुन टाकतो.. किती फालतु डाव राधिकाचे.. प्रोमो मधे कणखर वाटली होती.. निघाली वेडी
राधिका खरच डोक्यात जाते. काल
राधिका खरच डोक्यात जाते. काल काय ती सारखी दाराकडे बघत होती, लाजत्-मुरकत होती. जस काही नविन लग्न झालेली किंवा प्रेमात पडलेली टीन एजर आहे. तिच ते वेणी उडवणं तर
हे तरी काही नाही त्या खु.क
हे तरी काही नाही त्या खु.क.खु. मधे तर आता सगळे एक्प्रेशनलेस वालेच आहेत...
मा.ची हेयर स्टाइल पार डोक्यात जाते, तीच हसण /रडणं दोन्ही सारखच... आजी,मोनिका कुठे गायब आहेत ,मो चा तर साधा उल्लेखहि नाही... सगळकाही थंडच आहे अजून..या कडक उन्हाळ्यात...
खरंच... आता परत पहिले पाढे
खरंच... आता परत पहिले पाढे पंचावन्न...
मग परत राधम्माला कळेल की अरे शन्या बाळ आहेच अजून माह्या भैताड नवऱ्याकडे ... मग ती म्हणेल या वेळेस नाय हा मी जाऊन राह्यले... मग गॅरोबा म्हणणार मी पण नाही जाऊन राह्यलो या वेळेस... मग शन्योबाच येऊन राह्यली ना हो... मग कदाचित प्रोमो खरा होऊन राह्यला ना ह्हो...
इकडे राधिका.... आपला नवरा खूप
इकडे राधिका.... आपला नवरा खूप चांगला त्यातून शन्याच त्याला फसविते. त्यामुळे त्याची काही चुकच नाही. आपले त्याच्यावर खूप प्रेम आहे तर आपण त्याला कधीच सोडायचे नाही...याच विचारात तिला रहायचे आहे त्याला कोण काय करणार? >>>>> अगदी अगदी. ती भक्ती शनायाला म्हणते," तु नेहमीच स्वप्नान्च्याच दुनियेत राहते. मी practical जगात राहते." हेच विधान राधिकालाही लागू होत.
आज मात्र राधिकाने एक गोष्ट भारी केली. गुरुकडे आपला आणि अर्थवचा अधिकार मागितला. "आधी घर माझ्या नावावरही करा.तरच मी घरात पाऊल ठेवीन." ठणकावून सान्गितल तिने गुरुला.
आता त्या दोघींनी मिळून गुरुला
आता त्या दोघींनी मिळून गुरुला बडवायला पाहिजे.>>> आधी त्या के.डी ला बडवायला पाहीजे, असले फालतू सल्ले दिल्याबद्दल.
बायको घरात आणि girlfriend ला बाहेर ठेव > हे आधी होतच की शनाया त्याच्या घरी येईपर्यंत. नविन काय आहे त्यात > हो पण शनाया घरी आल्यानन्तर तो तिच्याकडे बायको म्हणून पाहू लागला, म्हणून तो के. डी. गुरुला म्हणाला ना, बायको हि कधीच प्रेयसी होऊ शकत नाही, आणि प्रेयसी कधीच बायको होऊ शकत नाही. तु दोघीन्ची सरमिसळ करायला गेलास आणि इथेच फसलास. दोघीन्मध्ये balance ठेव."
समोरच्याच घरी परत जायचे तर
समोरच्याच घरी परत जायचे तर जाताना हि रडारड!!! म्हणे स्वतःची काळजी घ्या, औषधे वेळेवर घ्या.
आज समिधा बरोबर बोलत होती तिच्याबद्दल.
त्या दाते बाईचे डेडली रूप
त्या दाते बाईचे डेडली रूप "अय्या" मध्ये पहा
हा हा... हो.. भयाण आहे ... (
हा हा... हो.. भयाण आहे ... ( अजूनही बरेच शब्द सुचत होते पण मागे कोणीतरी पांढरी माकडीण म्हणल्यावर त्यांच्यावर टीका झाली होती म्हणून फक्त भयाण एवढाच शब्द वापरलाय... ) इथे ही तिचे हे रूप दाखवलं असतं तर गॅरोबाच काय नाना नानींनी पण केव्हाच घराबाहेर काढलं असतं तीला... कोणीच नसत ठेवून घेतलं घरी... शनाया परवडली त्या पेक्षा अस म्हणाले असते मग सगळे.... ...
Pages