एक कळी उमलतानां..... :
घराच्या बाल्कनीत झाडं लावताना ती देशी असावीत किंवा निदान इथे रूळलेली असावीत अशी इच्छा होती.
कारण ही घरची बाग पक्षी, फुलपाखरं, विविध प्रकारच्या माश्या, किटक यांना आकर्षित करणारी, त्यांना काहीतरी देणारी असावी अशी संकल्पना होती.
फुलपाखरं, छोटे पक्षी आणि मुंग्यांना आकर्षित करणारं झाड म्हणून पावडर पफ लावलं.
3 फुटाची फांदी होती. एकही कळी नव्हती.
पहिल्या 15, 20 दिवसात तर त्याला कुठेही पालवी पण नाही फुटली. रुजल्याचं एकही लक्षण दिसत नव्हत.
हळुहळु मुख्य खोड सोडून बाकीच्या फांद्याना पालवी फुटु लागली. आणि त्यानंतर महिन्याभरानी चक्क एक इवलुशी कळी नवीन फुटलेल्या फांदीवर दिसली. दिसामाजी तिचा आकार वाढु लागला. तिच्या मागेमागे आणि आजूबाजूला छोट्या छोट्या जोडीदारीणीही दिसु लागल्या.
01 पहिली कळी....
मग तिची रोज खबरबात ठेवणं हा अॅडिशनल कामधंदा होउन बसला...
02... कळी उमलायची सुरूवात...
03... अजुन थोडी उमलतानां...
04... थोडी आणखी उमललेली...
05... ही दुसरी कळी.. काही दिवसांनंतर... पण हिच्या उमलण्याची तर्हा निराळी...
06... पहिली कळी अजून उमललेली.. गुलाब कळ्यांच्या गुच्छाची आठवण करून देणारी... सोबत छोट्या मैत्रीणी..
07.... गुलाब पुष्पांचा गुच्छ...
08... गुच्छाची घडी हळूहळू विस्कटायला लागलेली...
द्वाड मुलाच्या विस्कटलेल्या केसांसारखी..
आता पावडर पफ होण्याकडे वाटचाल...
प्रचि ०८.५ हा रात्री काढ्लेला.... (मधली अवस्था)
(हा फोटो पुर्वी टाकला नव्हता. नंतर प्रतिसादामधे दिला होता. आता वाचकांच्या सूचनेनुसार वरती डकवतोय...)
>
09.... पूर्ण विकसित पावडर पफ..
आता झाड कळ्या फुलांनी बहरून गेलंय. कळ्या असल्यापासून मुंग्यांची लगबग आहे..
आणि गेल्या तीन चार दिवसापासून सनबर्डही फेर्या मारतायत....
मायबोली :निसर्गाच्या गप्पा यावर पुर्वप्रकाशित...
superb photo !
superb photo !
सुरेखच
सुरेखच
प्रतिसादासाठी सर्वांना
प्रतिसादासाठी सर्वांना धन्यवाद....
@ हर्पेन.... : आता तो रात्रीचा फ्लॅश मारुन काढलेला फोटो लेखात Add केलाय....
फारच छान निरु. हे झाड साधारण
फारच छान निरु.
हे झाड
साधारण किती मोठ होत? म्हणजे बाल्कनीत लावता येत ?
@ सुनिता... <<<< हे झाड
@ सुनिता...
<<<< हे झाड साधारण किती मोठ होत? म्हणजे बाल्कनीत लावता येत ? >>>
हे ज्याचे फोटो आहेत ते झुडूप बाल्कनीतल्या कुंडीतच लावलय. अधूनमधून छाटलं तर 5/6 फुटापर्यंत वाढत. फुलही खूप येतात.. आमच्याकडे रोज फुलांवर सनबर्डस् येतात.
त्यांचं अलगद पणे फुलावर बसून, किंचित झुलून, नाजुकपणे फुलातला मध पिणं पहाणं म्हणजे मोठा आनंद आहे...
मात्र हेच झाड जमिनीत लावल तर जास्त उंच होत आणि जोमाने वाढतं... बहरतही जास्त...
वॉव किती सुंदर फोटो
वॉव किती सुंदर फोटो आहेत.
रच्याकने एक (कदाचित मुर्ख) प्रश्न - पहिली कळी आणी दुसरी कळी अशा वेगळ्या वेगळ्या तर्हेने का उमलली?
उमलत्या कळीच्या सर्व अवस्था
उमलत्या कळीच्या सर्व अवस्था खूप सुंदर टिपल्या आहेत निरू!अप्रतिम.माझ्याकडेही आहे पावडर पफ,पण कळयांचा रंग प्रथमपासूनच लालसर असतो.
excellent pic 7 is
excellent pic 7 is outstanding
काय सुंदर फोटो टिपलेत !
काय सुंदर फोटो टिपलेत ! आवडलेच.
रीया, sariva, urmilas,
रीया, sariva, urmilas, अनघा.,
प्रतिक्रियां बद्दल धन्यवाद...
@ रीया, <<< रच्याकने एक
@ रीया, <<< रच्याकने एक प्रश्न - पहिली कळी आणी दुसरी कळी अशा वेगळ्या वेगळ्या तर्हेने का उमलली? >>>
खर तर नेहमीच नाही उमलत अशा... पण पंधरवड्यात दिसते तशी एखादी...
आजही एक तशीच उमललीय...
छानच!!
छानच!!
धन्यवाद मीरा.....
धन्यवाद मीरा.....
आता बाल्कनीतल्या बागेत खूपच छान बदल झालेयत.... या आठवड्यात नवीन बदलांसह येतोच सर्वांच्या भेटीला....
निरु.....
मस्त आवडलं
मस्त आवडलं
धन्यवाद mr. pandit....
धन्यवाद mr. pandit....
तुमची बाग बघायला यावं लागेल
तुमची बाग बघायला यावं लागेल आता
>>> तुमची बाग बघायला यावं
>>> तुमची बाग बघायला यावं लागेल आता <<<
तुमचं स्वागतच आहे...
Surekh....
Surekh....
अत्यंत मनोरम आहेत फोटोज..
अत्यंत मनोरम आहेत फोटोज.. निसर्गाच्या करामती यांत्रिक कौशल्याने कैद करणे सोपे नाही
तिसरा आवडला म्हणेतो चौथा
तिसरा आवडला म्हणेतो चौथा दिसला, मग तिसरा व चौथा आवडला म्हणेतो पाचवाही त्यात घालावासा वाटला, मग सहावा दिसला. मग मात्र थांबलेच. हे चारही फोटो खूप आवडले. अगदी गुलाबाची फुलेच जणू.
तुम्ही पेशन्स व लक्ष ठेऊन काम केलंय. तुमचा नीटनेटकेपणा दिसतो
निसर्गात सगळे नियमबद्ध होते. आपण मध्येच विसरलो आणि नंतर परत बघायला गेलो तर तिकडे प्रकरण बरेच पुढे गेलेले असते, आपले बघायचे राहून जाते.
मागे माझ्या बागेत फुलपाखराचे तीनचार कोष दिसले. आता छान सिरीज करूया म्हणून मी दोन दिवस फोटो काढले, नंतर विसरले. पुढचा फोटो काढायला गेल तेव्हा कोष रिकामे झाले होते
मस्तच आलेत हे फोटो. पुन्हा
मस्तच आलेत हे फोटो. पुन्हा पहायला मजा आली
दत्तात्रय साळुंके, प्राचीन,
दत्तात्रय साळुंके, प्राचीन, साधना, शाली
प्रतिसादाबद्दल धन्यवाद....
आमच्या बाल्कनीतल्या बागेत
आमच्या बाल्कनीतल्या बागेत हल्ली पडीक असलेले सनबर्डचे पिल्लू...
म्हणजे तसे जाऊन येऊन असते..
पण बर्याचदा मुक्काम फांदीवरच..
आणि लहान असल्यामुळे चलाख नाहीये. उत्सुकतेने इथे तिथे भिरभिरत्या मानेने आणि चौकस नजरेने बघत बसते.
खूप मजा येते पहायला..
Amazing.. Beautiful
Amazing.. Beautiful Photographs..
अप्रतिम प्रचि !!! ऑफिसमधील
अप्रतिम प्रचि !!! ऑफिसमधील कंपाऊंडमध्ये असण्याऱ्या पावडर पुफच्या फुलांकडे रोज बघतो. तुम्ही काढलेल्या फोटोतील सौंदर्य प्रत्यक्ष फुलांमध्ये दिसत नाही. ती गुलाबांचे गुच्छ असलेली स्टेज तर मला अजूनपर्यंत एकदाही दिसली नाही.
सनबर्डचे पिल्लू मस्तच!
सनबर्डचे पिल्लू मस्तच!
<<<<< अप्रतिम प्रचि !!!
<<<<< अप्रतिम प्रचि !!! ऑफिसमधील कंपाऊंडमध्ये असण्याऱ्या पावडर पुफच्या फुलांकडे रोज बघतो. तुम्ही काढलेल्या फोटोतील सौंदर्य प्रत्यक्ष फुलांमध्ये दिसत नाही. ती गुलाबांचे गुच्छ असलेली स्टेज तर मला अजूनपर्यंत एकदाही दिसली नाही. >>>>
गोल्डफिश धन्यवाद.. खर तर बारकाईने बघितलं तर प्रत्येक कळी फुलापर्यंतचा प्रवास असाच करते...
मन्या ऽ आपलेही धन्यवाद..
मस्त!!
मस्त!!
कसले सुरेख प्रचि काढलेत
कसले सुरेख प्रचि काढलेत निरूदा.
साधनातैच्या पुर्ण पोस्टला अनुमोदन.
राॅनी, किट्टु२१
राॅनी, किट्टु२१
प्रतिसादाबद्दल आभार...
Pages