एक कळी उमलतानां..... :
घराच्या बाल्कनीत झाडं लावताना ती देशी असावीत किंवा निदान इथे रूळलेली असावीत अशी इच्छा होती.
कारण ही घरची बाग पक्षी, फुलपाखरं, विविध प्रकारच्या माश्या, किटक यांना आकर्षित करणारी, त्यांना काहीतरी देणारी असावी अशी संकल्पना होती.
फुलपाखरं, छोटे पक्षी आणि मुंग्यांना आकर्षित करणारं झाड म्हणून पावडर पफ लावलं.
3 फुटाची फांदी होती. एकही कळी नव्हती.
पहिल्या 15, 20 दिवसात तर त्याला कुठेही पालवी पण नाही फुटली. रुजल्याचं एकही लक्षण दिसत नव्हत.
हळुहळु मुख्य खोड सोडून बाकीच्या फांद्याना पालवी फुटु लागली. आणि त्यानंतर महिन्याभरानी चक्क एक इवलुशी कळी नवीन फुटलेल्या फांदीवर दिसली. दिसामाजी तिचा आकार वाढु लागला. तिच्या मागेमागे आणि आजूबाजूला छोट्या छोट्या जोडीदारीणीही दिसु लागल्या.
01 पहिली कळी....
मग तिची रोज खबरबात ठेवणं हा अॅडिशनल कामधंदा होउन बसला...
02... कळी उमलायची सुरूवात...
03... अजुन थोडी उमलतानां...
04... थोडी आणखी उमललेली...
05... ही दुसरी कळी.. काही दिवसांनंतर... पण हिच्या उमलण्याची तर्हा निराळी...
06... पहिली कळी अजून उमललेली.. गुलाब कळ्यांच्या गुच्छाची आठवण करून देणारी... सोबत छोट्या मैत्रीणी..
07.... गुलाब पुष्पांचा गुच्छ...
08... गुच्छाची घडी हळूहळू विस्कटायला लागलेली...
द्वाड मुलाच्या विस्कटलेल्या केसांसारखी..
आता पावडर पफ होण्याकडे वाटचाल...
प्रचि ०८.५ हा रात्री काढ्लेला.... (मधली अवस्था)
(हा फोटो पुर्वी टाकला नव्हता. नंतर प्रतिसादामधे दिला होता. आता वाचकांच्या सूचनेनुसार वरती डकवतोय...)
>
09.... पूर्ण विकसित पावडर पफ..
आता झाड कळ्या फुलांनी बहरून गेलंय. कळ्या असल्यापासून मुंग्यांची लगबग आहे..
आणि गेल्या तीन चार दिवसापासून सनबर्डही फेर्या मारतायत....
मायबोली :निसर्गाच्या गप्पा यावर पुर्वप्रकाशित...
https://photos.app.goo.gl
हे पावडर पफचे फूल जमिनीत रुजवलेल्या झाडाचे..

प्रचि ०५ प्रमाणे कधीकधी
प्रचि ०५ प्रमाणे कधीकधी आख्ख्या फुलामधून तुरे बाहेर येण्याऐवजी फुलाच्या थोड्याश्याच भागातून तुरे बाहेर येतात.
आजही एक कळी अशी मधूनच उमलायला लागली आहे..
प्रचि तसेच प्रत्येक प्रचिवरील
प्रचि तसेच प्रत्येक प्रचिवरील, कमेंटस सुंदर आहेत.
सामो, आभारी आहे..
सामो, आभारी आहे..
सुंदर प्रची. अप्रतिम. गुलाब
सुंदर प्रची. अप्रतिम. गुलाब गुच्छ फार आवडला.
खूप सुंदर फोटो आहेत..
खूप सुंदर फोटो आहेत..
Pages