बाबा आता नको फाशी ..!

Submitted by satish_choudhari on 13 May, 2017 - 11:03

" बाबा आता नको फाशी !! "

असा कसा बळीराजा माह्या हारून गेला
कोनी नाई पाहत त्याले जिता मरून गेला
मांगल्या वर्षा परिस यंदा बी काय होते
चिंता सदा मनी त्याच्या कायची झोप येते ....

काहून देव बापा असा करून राहिला
पावसाचं बटन दाबाले तू इसरुन गेला
शेतीमंधी पिकत नाई कर्ज अभाया एवढं
मातीच्या लेकराले अजुन मारशील केवढं ...

पेरलं त पिकत नाई पिकलं त खपत नाई
कापसाले वाव नाई तुरी ले भाव नाई
हरामी नेते सारे नुसत्या बाता करतात
सत्ताधारी न विरोधी कोल्हेकुई करतात ...

मॉलमध्ये जानारे बी कम नाई काई
फालतूच्या गोष्टिवर पैसे उधळउन येई
शेतकर्याच्या भाजीचा करी भाव सतरा वेळा
कोन पाहिल त्याची चूल बंद किती वेळा ...

काय चुकलं देवा त्याच तूच सांग आता
लोकांना खाऊ घालनारा तोच आहे दाता
तरी नशीबी त्याच्या दारिद्र्य का आलं
काहून त्याच्या लेकराईले उपाशी ठेवलं ...

पैसे नाई म्हणून पोराना पुढे शिकवत नाई
काय शेतकर्याच्या पोरानी शिकायचं बी नाई
सावकाराच्या कर्जापाई पुरतं जीवन जाई
जहर विकत घ्यायले बी आता पैसे नाई ...

हात जोडून काळ्या आईचा निरोप घेऊन जातो
माह्या लेकराईले पाह्यजो माय ख़ुशी मंधी ठेवजो
मि असेपरेन ति अर्ध्या पोटीच राह्याची
मि गेल्यावर तरी त्याईले पोटभर जेवु देजो ...

असा कसा देवा तुले पाझर फुटला नाई
बळीराजा लटकताना तुले दिसला नाई
सर्वांमंधी देव असतो फ़क्त दिसला पाहिजे
मानुसकिला मानुस एकदा भेटला पाहिजे ...

वेळ आली आता बळी राजा जिंकला पाहिजे
सर्वानी मिळून त्याची साथ दिली पाहिजे
लेकरांनी बी त्याच्या म्हटलं पाहिजे आहे ख़ुशी
बस झालं बाबा आता नको फाशी..
.... आता नको फाशी ...

- सतीश चौधरी

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेल्कम बॅक प्राध्यापक Happy

<<शेतकर्याच्या भाजीचा करी भाव सतरा वेळा
कोन पाहिल त्याची चूल बंद किती वेळा ... >>
----- Sad

अरे वा!
चौधरीजी अनेक वर्षांनी दिसलात.

धन्यवाद दक्षिणा जी .. आजकाल वेळ मिळत नाही. म्हणून बऱ्याच वर्षांनी कविता केलि.. म्हणून टाकली ..पण मी आता अधुन मधून येत राहन्याचा प्रयत्न करेल .. तुम्ही सांभाळून घ्या मला ...