बाबा आता नको फाशी ..!
Submitted by satish_choudhari on 13 May, 2017 - 11:03
" बाबा आता नको फाशी !! "
असा कसा बळीराजा माह्या हारून गेला
कोनी नाई पाहत त्याले जिता मरून गेला
मांगल्या वर्षा परिस यंदा बी काय होते
चिंता सदा मनी त्याच्या कायची झोप येते ....
काहून देव बापा असा करून राहिला
पावसाचं बटन दाबाले तू इसरुन गेला
शेतीमंधी पिकत नाई कर्ज अभाया एवढं
मातीच्या लेकराले अजुन मारशील केवढं ...
पेरलं त पिकत नाई पिकलं त खपत नाई
कापसाले वाव नाई तुरी ले भाव नाई
हरामी नेते सारे नुसत्या बाता करतात
सत्ताधारी न विरोधी कोल्हेकुई करतात ...
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा: