Submitted by पुरंदरे शशांक on 24 April, 2017 - 02:14
रंग चितारी अाभाळावर जाताना दिनकर
लाजलाजुनी नवथर संध्या मोहरली तिथवर
काजळ किंचित भिरभिरले अन् पापणीत थरथर
ओष्ठद्वय रंगता उमलले गुलाब गालांवर
पदर जांभळा उचलून पाही हळूचकन् प्रियवर
दारातून ती पहात असता गेला कि झरझर
कृष्णवस्त्र हिरमुसून ओढी पुरते अंगावर
लुकलुकणारी एक चांदणी उमटे क्षितिजावर......
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर! अप्रतिम !!
सुंदर! अप्रतिम !!
मस्त!
मस्त!
अप्रतिम!
अप्रतिम!
वा, सुंदर
वा, सुंदर
सुंदर कविता....
सुंदर कविता....
बालभारती, कुमार भारतीचे दिवस आठवले...
खुपच मस्त शशांक
खुपच मस्त शशांक
वाह !
वाह !
वाह!!!
वाह!!!
अतिशय सुंदर .
अतिशय सुंदर .
"कृष्णवस्त्र हिरमुसून ओढी
"कृष्णवस्त्र हिरमुसून ओढी पुरते अंगावर
लुकलुकणारी एक चांदणी उमटे क्षितिजावर......" छान.
मस्त आहे कविता.
व्वा ! चित्रमय कविता आहे अगदी
व्वा ! चित्रमय कविता आहे अगदी!
(पाय सोडुनी जळांत बसला असला औदुंबर- ही कविता आठवली वृत्तसाधर्म्यामुळे)
अप्रतिम ,संध्येची रूपे
अप्रतिम ,संध्येची रूपे साकारली
सर्वांचे मनापासून अाभार......
सर्वांचे मनापासून अाभार......
व्वा! अप्रतिम!!!!!!!!!!!!!!!
व्वा! अप्रतिम!!!!!!!!!!!!!!!
(पाय सोडुनी जळांत बसला असला औदुंबर- ही कविता आठवली वृत्तसाधर्म्यामुळे)>>>>>>>>>>+१
अतिशय सुंदर. 'ओष्ठद्वय' शब्द
अतिशय सुंदर. 'ओष्ठद्वय' शब्द आवडला.
सुंदर! खुप दिवसांनी दिसलात
सुंदर! खुप दिवसांनी दिसलात
सहज सुंदर... सलज्ज ...नवथर
सहज सुंदर... सलज्ज ...नवथर मोहर ...