Submitted by फेरफटका on 20 February, 2017 - 12:23
आयपीएल - १० चं रणशिंग फुंकलं गेलय. कालच्या लिलावात बेन स्टोक्स ने विक्रमी १४.५ कोटी चा आणी टायमल मिल्स ने १२ कोटी चा बार उडवलाय, तर बहूचर्चित जेसन रॉय १ कोटी (फक्त?) च्या बार्गेन डील मधे गुजराथ लायन्स कडे गेलाय. ईरफान पठाण, ईशांत शर्मा वगैरे भारतीय खेळाडू आणी अॅलेक्स हेल्स, जॉनी बेअरस्ट्रॉ, ईम्रान ताहीर शॉन अॅबॉट, रॉस टेलर सारखे टी-२० मधले तगडे परदेशी खेळाडू ह्या वेळी 'अनसोल्ड' आहेत. अन्कॅप्ड कॅटेगरीमधे भारताचे नटराजन, थंपी, गौथम आणी सिराज ह्यांना लॉटरी लागलीये तर अंकित बावणे चा सुद्धा यंदा लिलावात नंबर लागलाय.
पुन्हा एकदा ह्या रणधुमाळी मधे मायबोलीकरांच्या चर्चा, विचार, व्यंगचित्रं, मत-मतांतरं ह्या सगळ्यांसाठी हा धागा सुरू करतोय. होऊ दे चर्चा!!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खेळतो की स्मिथ.... आणि खेळतो
खेळतो की स्मिथ.... आणि खेळतो तेंव्हा एकदम धडाक्यात खेळतो!
परवा इतका धडाक्यात खेळलेला इशान किशन काल कसला चाचपडत होता.... पण रैनाने मस्त काढली मॅच कालची.... आणि सगळे अगदी क्लीन शॉट्स!
पण उथाप्पाने तो नरीनच्या बॉलींगवर रैनाचा कॅच पकडला असता तर कदाचित वेगळे चित्र दिसले असते!
परवा इतका धडाक्यात खेळलेला
परवा इतका धडाक्यात खेळलेला इशान किशन काल कसला चाचपडत होता.... >>>>> डिफरंट सिच्युएशन
>> डिफरंट सिच्युएशन
>> डिफरंट सिच्युएशन
उलट कालची सिच्युएशन सोप्पी होती की रे!
ताहिर चा कोटा पूर्ण केला नाहि
ताहिर चा कोटा पूर्ण केला नाहि आज ?
फिनिशर इज बॅक!
फिनिशर इज बॅक!
डीडीने आज तीन चेंजेस केलेत!
मुंबई गॅसवर की काय आज ?
मुंबई गॅसवर की काय आज ?
राणा गेल्यावर माझा तर
राणा गेल्यावर माझा तर इंट्रेस्टही गेला. आज हरायला हरकत नाही. बॅलन्स द बजेट.
आत्ता विकेट वाचवून शेवटी रन
आत्ता विकेट वाचवून शेवटी रन रेट वाढवायचा प्लॅन असेल.
झहिर खान जरा बारिक झालेला दिसतोय. मध्यंतरी तो बराच जाड वाटलेला.
बादवे, भारतातल्या सध्याच्या हवेत खेळाडूंची वाट लागत असेल! मुंबई, कलकत्ता, चेन्नईला तर जास्तच ! सगळ्या मॅचेस धरमशालाला खेळवायला हव्या खरतर !
उलट कालची सिच्युएशन सोप्पी
उलट कालची सिच्युएशन सोप्पी होती की रे! >>> अगदी सोपी नव्हती, खेळून जिंकवायचे होते. टेंपरामेंटचा कस लागणार होता. आधीच्या सामन्यात रन्स ईतके मारायचे होते की सामना गेल्यातच जमा होता. अश्यावेळी एखादा नवीन खेळाडू बाद झाला तरी ते उठून दिसत नाही, उलट झालेच तर चमकायला चान्स असतो. बरेचदा गोलम्दाज सुद्धा हरल्यातच जमा सामन्यात फटकेबाजी करताना दिसतात ते याच कारणासाठी. आणि लोकं म्हणतात हे मारताहेत तर पुढच्यांना मारायला काय झाले होते
असो, आता धोनी द फिनिशर ईज
असो, आता धोनी द फिनिशर ईज बॅक ..
and it's smashed through extra cover. Dhoni does another epic finish. Stands still, gets his front leg forward and out of the way, and with a perfectly textbook drive, secures victory
"When 2 runs needed per ball, MSD scored 36 runs from 13 balls, that's why he called as best finisher in the world!!!"
And because of that his team, Rising Pune Supergiant, has jumped from last place to fourth.
Bhuvneshwar Kumar's excellent form in the slog overs, but today, he went for 19 runs in the 19th over. He lost the one-on-one battle with Dhoni, as many bowlers have have done before.
MS Dhoni is Man of the Match for his 61 off 34 balls.
It's the first last-ball win for the chasing team this season. The last in IPL was also by Pune v Kings XI last year. MSD has hit the winning runs in both.
दिल्ली डेअरडेव्हिल्स विषयी
दिल्ली डेअरडेव्हिल्स विषयी माझी एक थियरी आहे.
कॅप्टनः झहीर खान टॅक्टीकली चांगल कॅप्टन आहे. पण तो सर्व प्रकारच्या क्रिकेट मधून निवृत्त झालाय. आता तो स्वान्तः सुखाय खेळतो. he has nothing to lose. त्यामुळे तो खेळाचे बाकीचे पैलू एंजॉय करू शकतो. उदा. 'अरे वा, आजची मॅच दोन्हीकडच्या बॉलर्स नी डॉमिनेट केली.' किंवा, '२६/६ वरून पुष्कळ खेचली' वगैरे.
टीम कल्चरः सगळ्या नवोदितांना एक कम्फर्टेबल स्पेस निर्माण करणं, त्यांना क्रिकेट मधल्या वेगवेगळ्या सिच्युएशन्स ची ओळख करून देणं.
ह्या दोन घटकांमुळे, कदाचित लाँग रन मधे चांगले खेळाडू घडतील, पण आत्ता ते त्या विजिगीषु वृत्तीपासून - किलर इन्स्टींक्ट पासून दुरावले गेले आहेत. DD is a great experience lab than a professional team that would play to win. जिंकलच पाहीजे असं नाही, पण प्रत्येक मॅच मधून काहीतरी शिका असा काहीसा अॅप्रोच वाटतो.
फे फे पटतय. आज त्यांच्या
फे फे पटतय. आज त्यांच्या शेवटच्या ओव्हर मधे तो हसत होता ते विचित्र वाटत होते.
>>दिल्ली डेअरडेव्हिल्स विषयी
>>दिल्ली डेअरडेव्हिल्स विषयी माझी एक थियरी आहे.
अगदीच पटली तुझी थिअरी!
पण फ्रेंचाइसी ओनरचे काय? स्पॉन्सर्सचे काय?
जिंकून पण आंतराराष्ट्रीय खेळाडू घडवता येतात हे मुंबई इंडियनने दाखवून दिलेय. उदा. हार्दिक पंड्या, बुमराह, पुढे मागे कृणाल पंड्या, नितिश राणा पण भारतीय संघात यायची शक्यता आहे
इतके पण ढीले सोडून नाही चालत .... कुठेतरी जबाबदारीची जाणीव करुन द्यावी लागते.... काल कसल्या विकेट फेकल्या डीडीवाल्यांनी.... एखाददुसरा टिकला असता तरी मॅच काढली असती मॉरीसने...... आणि कप्तान म्हणून या हाराकिरीची जाणीव करुन देणे झहीरचे काम आहे.... processes, learning, enjoying the game वगैरे सगळे ठीक आहे पण जिंकणार कधी?
Hope DD will use this long break and come up as a better team in remaining tournament
मुळात सगळे नवोदीत अनुनभवी बॅट्समन एका टीममधून खेळवल्यावर असेच होणार.... You need to place them in a combo with some experienced players
काल बिलिंग्सची कमी जाणवली
तुमच्याकडे एकच प्रॉपर फोरेनर बॅट्समन आहे आणि तो रिझनेबली चांगले खेळतोय, अश्यावेळी त्याला वगळण्याचा निर्णय फारसा योग्य नाही!
असो..... Still with DD!
Always with RD
खरं तर किलर इन्स्टिंक्ट हे
खरं तर किलर इन्स्टिंक्ट हे मुळात उपजत असते. तुमची जी शैली कप्तान कोच सहज बदलू शकतो वा कंट्रोल करू शकतो ती मुळात तुमची नसतेच.
दिल्लीने ही अशी बॅटींग लाईन आणि अशीच बॅटींग ऑर्डर ठेवली तर कठीण आहे. कोणत्याही फलंदाजाचा रोल त्याला डिफाईन आहे असे वाटत नव्हते. ओवरऑल चुकीचा एप्रोच. २०-२० खेळत आहात तर त्या फॉर्मेटला पहिले प्रामाणिकपणे न्याय द्यायला हवा. एक चांगले आहे की टीम चांगलीच आहे, फक्त एकदोन फेरफार करत टॅक्टीक्त्स बदलायची गरज आहे. जिंकण्यासारखा आत्मविश्वास कुठूनही येत नाही.
मुंबईला बाकी आता फिलिंग
मुंबईला बाकी आता फिलिंग ऑस्ट्रेलियन टीम (गेल्या दशकातील) असे होत असेल .. एक सामना ४-४ वरून चेस करत काढला, तर एका सामन्यात चांगल्या खेळपट्टीवर १४२ डिफेण्ड करताना समोरच्यांचे २४-६ केले. प्लेऑफमध्ये पोहोचल्यावर असे मिळवलेले विजय आठवणीत असणे फायद्याचे ठरेल..
नरीन a.k.a. आयपीएल २०१७ चा
नरीन a.k.a. आयपीएल २०१७ चा कालुविथरणा सुटलाय. नरीन आहे का 'नो-रनिंग'? सगळे रन्स बाऊंड्रीज मधेच काढतो
बॅट्समेन चं शुन्य किंवा
बॅट्समेन चं शुन्य किंवा टेंटेटीव्ह फूटवर्क मुळे चहल/बद्री वगैरे फारच भेदक वाटतात.
आधी नारायण नारायण.. आणि मग हर
आधी नारायण नारायण.. आणि मग हर हर महादेव.. काय झटपट फिरला सामना. चहलला मात्र आज टर्नही मिळत होता. कुलदीप यादवलाही तसाच मिळतो का हे बघणे रोचक. तो आज की बॉलर ठरू शकतो. मात्र आधी 150 तरी न्या..
पुढच्या मॅचपासून नरीन ला सगळे
पुढच्या मॅचपासून नरीन ला सगळे जण ऑफ स्टंपबाहेर शॉर्ट बॉल टाकत राहणार KKR रॉयल कोसळल ...
अरे आरसीबी कोसळले ... केकेआर
अरे आरसीबी कोसळले ... केकेआर तो जीत गये! काय अविश्वसनीय खेळ बघायला मिळाला!
आरसीबी अविश्वसनीय रीत्या
आरसीबी अविश्वसनीय रीत्या हारले किंवा केकेआर अविश्वसनीय रीत्या जिंकले.
चौथ्या ओवरलाच बिनबाद पन्नास
चौथ्या ओवरलाच बिनबाद पन्नास झालेले. तिथेच डिक्लेअर केला असता तर रंगतदार सामना बघायला मिळाला असता
कालची आरसीबीची बॅटींग म्हणजे
कालची आरसीबीची बॅटींग म्हणजे कोणीतरी यावे टिकली मारुन जावे पद्धतीत होती...
आज सचिन च्या वाढदिवशी
आज सचिन च्या वाढदिवशी (क्रिकेट मधल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक) मुंबई वि. पुणे.
मुबई च्या द्रुष्टीने राहणे
मुबई च्या द्रुष्टीने राहणे अतिशय चुकिच्या वेळी बाद झाला. तो स्लो व्हायची सुरूवात झाली होती
पुण्याने मुंबईला ३ रन्स ने
पुण्याने मुंबईला ३ रन्स ने हरवलं. मुंबई ची जागा अजूनही पहिलीच आहे, पण पुण्याची टीम मात्र झपाट्यानं वर चाललीये.
शर्माचा वाईड वाईड द्यायला
शर्माचा वाईड वाईड द्यायला हवा होता असे मला वाटले. वाईड चा नियम शोधून वाचला. अंपायरचा कॉल असतो.
2. Delivery not a Wide
The umpire shall not adjudge a delivery as being a Wide,
(a) if the striker, by moving,
either (i) causes the ball to pass wide of him, as defined in 1(b) above
or (ii) brings the ball sufficiently within his reach to be able to hit it by means of a normal cricket stroke.
(b) if the ball touches the striker’s bat or person.
मला वाटले कि बॉल (a-ii) मधे नव्हता.
ईरफान पठाण ला गुजराथ लायन्स
ईरफान पठाण ला गुजराथ लायन्स ने ब्राव्हो ची रिप्लेसमेंट म्हणून घेतला. बर्याच ईरफान चाहत्यांना बरं वाटलं असेल.
उद्या बंगलोर वि. हैद्राबाद. कोहली पेटून खेळेल असं वाटतय. उद्या ग्राऊंड वर चौकार-षटकार-भकार अशी सगळी बरसात व्हायची शक्यता आहे.
>>मला वाटले कि बॉल (a-ii) मधे
>>मला वाटले कि बॉल (a-ii) मधे नव्हता.<<
रोहित शर्माचं इंटेशन तर वाटत होतं कि बाहेर येउन ठोकायचा पण ऐनवेळेला त्याने विचार बदलला. त्याने हेजिटेट केलं नसतं तर बॉल त्याच्या रेंज्मध्ये होता. पुढे झालेलं नुकसान तर डॉट्बॉल पेक्षा जास्त डॅमेजिंग होतं. ते हेझिटेशन आणि अंपायरशी केलेलं आर्ग्युमेंट रोहितचा मोमेंटम बिघडवायला कारणीभूत झालं; नाहितर मॅच आपल्या खिशात होती...
https://www.facebook.com
https://www.facebook.com/LoksattaLive/posts/1454034461315846
दिल्ली च्या कामगिरीचं रहस्य?
अभिनन्दन झहीर खान!
Pages