सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३१ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.
थंडीच्या दिवसांचे आगमन होत आहे. वातावरण अगदी गार गार होत जाणार आहे. दवबिंदूंचे मोती गवता पानांवर अलंकार सजवणार आहेत. आता शेकोटी आणि त्या भोवतालच्या गप्पा रंगणार. भाजीचे मळे हिरवेगार होऊन पिकाला येऊ लागले आहेत. सकाळच्या थंड हवेत पशु पक्षांची कुडकुडती किलबिल चालू होणार. सकाळची सूर्यकिरणे हवीहवीशी वाटू लागणार. चला तर स्वागत करूया येणार्या हिवाळी ऋतूचे.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
सर्वच फोटो सुंदर!
सर्वच फोटो सुंदर!
हा चष्मेवाला आमच्याकडे पण येतो. पण फोटो काही काढून देत नाही. फार चंचल आहे. जो नी मस्त काढले फोटो.
बहाव्याचे झुंबर छानच!
बहाव्याचे झुंबर छानच!
गौरी तेच वाटते आहे झाड.. तरी जाणकर प्रकाश टाकतील.
कुंडीत पण जगते छान, तर लावून पाहिले पाहिजे.++ नक्की लावा.
बहावा वाह वा!!
बहावा वाह वा!!
आहाहा मस्त फोटो.
आहाहा मस्त फोटो.
तसं एका विंगच्या मागेपण चालणार आहेत ठेवलेल्या++ मग तीथे काही कुंड्या ठेऊ शकतेस की तु >>> ते लांब आहे, माझी रोपं मला दिसणार नाहीत तिथे ठेवल्या तर . बघूया.
सर्व निसर्गाचं सुख मनसोक्त
सर्व निसर्गाचं सुख मनसोक्त आमच्या गावालाच जाऊन उपभोगता येतं, पण काही कारणाने जाता येत नाही.
बिया गोळा करायचा आहे मला...
बिया गोळा करायचा आहे मला...
बहाव्याच्या आणि तामण च्या...
मला सीडबॉल्स पन तयार करायचे आहे...शेण कटीसा मिळेन मला पुण्यात?
धन्यवाद मित्रांनो
धन्यवाद मित्रांनो
मनीमोहोर, स्निग्धा, गौरी मस्त फोटो
भज्यांच्या पानाच्या ओव्याच्या
भज्यांच्या पानाच्या ओव्याच्या झाडाची फुलं
वा, पहिल्यांदा च पहातेय
वा, पहिल्यांदा च पहातेय ह्याची फुलं . अगदी नाजूक आणि छोटी छोटी असतील ना आणि वास पण असतो का ह्यांना ओव्याचा ?
ममो +१
ममो +१
सांगा ना कुणीतरी पुणेकरी शेण कुठे मिळेल पेठेत ?
मस्त ओव्याची फुलं. इथेच नि ग
मस्त ओव्याची फुलं. इथेच नि ग वर बहुतेक मामीने फोटो टाकला होता खूप मागे, आठवतंय असं काहीतरी.
टीना कर्वेरोड्ला दशभुजाच्या
टीना कर्वेरोड्ला दशभुजाच्या अलिकडे म्हणजे sndt च्या समोर जो रस्ता आत वळतो तिथे शेण मिळते अस ऐकलय
भज्यांच्या पानाच्या ओव्याच्या
भज्यांच्या पानाच्या ओव्याच्या झाडाची फुलं>>> पहिल्यांदा च पहातेय. घरी अगदि शेती झाली होती इतका वाढला होता पण फुलं कधी लागली नाहीत.
टीना कर्वेरोड्ला दशभुजाच्या
टीना कर्वेरोड्ला दशभुजाच्या अलिकडे म्हणजे sndt च्या समोर जो रस्ता आत वळतो तिथे शेण मिळते अस ऐकलय>> जाऊन पाहते जो धन्यवाद..
टीना, जांभळाच्या बिया पण बघ.
टीना, जांभळाच्या बिया पण बघ. त्या लवकर रुजतात आणि त्या शिवाय जेव्हा बाकीची झाडे निष्पर्ण होतात,
तेव्हादेखील ही झाडे हिरवीच राहतात. शिवाय फळे मिळतात, मधमाश्या पोसतात, पक्षी घरटी बांधतात..
हे फायदे आहेतच.
व्वा! ओव्याची फुलं मस्तच.
व्वा! ओव्याची फुलं मस्तच.
पहिल्यांदा च पहातेय. घरी अगदि शेती झाली होती इतका वाढला होता पण फुलं कधी लागली नाहीत. >>>>>>>>> +१११११११११११
आमच्या कडे कोकणात आमची शिवणी
आमच्या कडे कोकणात आमची शिवणीची झाडं आहेत. खूप जुनी म्हणजे माझ्या आजे सासऱ्यांनी लावलेली , खूप उंच वाढलेली, पांढर आणि सरळ खोड असलेली ती झाडं म्हणजे माझा अभिमान आहेत. कोकणात ह्याच लाकूड फर्निचर साठी वापरलं जातं . इतके वर्षात मला ह्याची फुल पहायची संधी कधी मिळाली नव्हती. ह्या वर्षी मात्र मला ही फुल पहायला मिळाली . आमची ही झाडं फारच उंच असल्याने झाडावरच्या फुलांचे फोटो नाही काढता आले पण खाली पडलेल्या फुलांचे फोटो देत आहे . खाली पडलेली फुलं इतक्या उन्हाळ्यात ही कोमेजून नव्हती गेली . छान टवटवीत दिसत होती . वरचा फोटो हा त्या फुलांचा
अरे वा, क्युट, मस्तच फुलं.
अरे वा, क्युट, मस्तच फुलं.
आमचीपण आहेत शिवणीची झाडं पण मी फुलं बघितली नाहीयेत अजून.
ममो , क्रृष्णा सो लकी.
ममो , क्रृष्णा सो लकी..केव्हढी फुलं.. मस्तंच..
ओव्याची फुलं पहिल्यांदाच पाहिली.. कसली सुंदर आणी नाजुक आहेत
ममो तुझ्याकडील खजाना अप्रतिम
ममो तुझ्याकडील खजाना अप्रतिम आहे
वा हेमा ताई मस्तच ग !!
वा हेमा ताई मस्तच ग !!
ना, जांभळाच्या बिया पण बघ. त्या लवकर रुजतात आणि त्या शिवाय जेव्हा बाकीची झाडे निष्पर्ण होतात,
तेव्हादेखील ही झाडे हिरवीच राहतात. शिवाय फळे मिळतात, मधमाश्या पोसतात, पक्षी घरटी बांधतात..
हे फायदे आहेतच. +++ व्वा कल्पना आवडली दा!
ममो मस्त फ़ोटो. :).
ममो मस्त फ़ोटो.
टीना, जांभळाच्या बिया पण बघ.
टीना, जांभळाच्या बिया पण बघ. त्या लवकर रुजतात आणि त्या शिवाय जेव्हा बाकीची झाडे निष्पर्ण होतात,
तेव्हादेखील ही झाडे हिरवीच राहतात. शिवाय फळे मिळतात, मधमाश्या पोसतात, पक्षी घरटी बांधतात..
हे फायदे आहेतच. >> +१ दिदा..
घरी नेहमी खाल्लेल्या जांभळाचे रोप तयार होत असतातच... यावेळी जपुन रोप तयार करुन इकडेतिकडे लावता येईल नाही? छान आयडीया दिली..
मस्तच फुलं ममो..
मस्तच फुलं ममो..
मी पुण्यात खुप सारे पांढरे ट्बेबुया पाहिले..
सद्ध्या सगळीकडे देशी का विदेशी ? वृक्ष लावण्यावरुन वाद सुरु आहे.. सन भन्नागया वाच वाच के..
इधरके लोगांने जराशी चर्चा करनेको मंगताय पण कोणी येईना आजकाल धाग्यावर
सोनसावरीच्या कापसाची बोंडं
सोनसावरीच्या कापसाची बोंडं उकललेली बघितली आज झाडावर. इतकी सुंदर दिसत होती ती!
हे थोडं जवळूनः
जमिनीवर पडलेल्या बोंडाच्या पाकळ्या:
आणि हा कापूसः
मस्तच
मस्तच
मस्तच
मस्तच
उचलुन आणायचा ना गौरी आणि मला
उचलुन आणायचा ना गौरी आणि मला द्यायचा होता..
रुजवून बघीतलं असत आपण...
छानच फोटो
काल हिमाचलातील एका रीमोट
काल हिमाचलातील एका रीमोट खेड़्याला भेट दिली. तेथील स्थानिक परिवारा सोबत बसून त्यांच्या घरच्या भोजनाचा आस्वाद घेताना तिथल्या राजम्याच्या अप्रतिम चवी ची तारीफ करताच माझ्या समोर तीन प्रकारच्या राजम्याच्या पोटल्या हजर झाल्या. हे लोकं हे धान्य पोटापुरतेच पैदाकरतात.
https://goo.gl/photos/F5kgswnB1uojnG1f6
ज्यांना लिंक ओपन करता येईल त्यांना दिसतील फोटो
बाकीच्यांनी तिळा उघड म्हणून ट्राय करावे
मनीमोहोर शिवणीची फुलं छानच
मनीमोहोर शिवणीची फुलं छानच दिसताहेत! या झाडाचा फोटो असेल तर तो पण टाका ना.
वर्षूताई राजमा दिसतोय मला! यांच्या चवी वेगवेगळ्या असतात का? आपल्याकडे मिळणार्यात लाल सगळ्यात चवदार वाटतो मला.
टीना, काल मी दोनच बिया आणल्या पावसाळ्यात घरी रुजवून बघू म्हणून. संध्याकाळी लेकीला ही गंमत बघायला एआरएआयच्या टेकडीवर घेऊन जाईन तिथे थोड्या वेचायला बेत होता (तिथे जास्त सोनसावर आहे). पण लेकीला काल कधी नव्हे ते टेकडीवर जायचंच नव्हतं, त्यामुळे राहिलं. आता पुढचे दोन वीकेंड मी पुण्यात नाही त्यामुळे या वर्षी अजून बिया नाही मिळणार
या कापसाच्या म्हातार्यांची मला थोडी गंमत वाटली. उडतच नव्हत्या त्या. नुसत्याच झाडाखाली पडून होत्या. बी जरा जास्त मोठी आणि जड आहे, म्हातारीचे केस लहान. त्यामुळे असेल बहुतेक.
Pages