आयपीएल-१०

Submitted by फेरफटका on 20 February, 2017 - 12:23

आयपीएल - १० चं रणशिंग फुंकलं गेलय. कालच्या लिलावात बेन स्टोक्स ने विक्रमी १४.५ कोटी चा आणी टायमल मिल्स ने १२ कोटी चा बार उडवलाय, तर बहूचर्चित जेसन रॉय १ कोटी (फक्त?) च्या बार्गेन डील मधे गुजराथ लायन्स कडे गेलाय. ईरफान पठाण, ईशांत शर्मा वगैरे भारतीय खेळाडू आणी अ‍ॅलेक्स हेल्स, जॉनी बेअरस्ट्रॉ, ईम्रान ताहीर शॉन अ‍ॅबॉट, रॉस टेलर सारखे टी-२० मधले तगडे परदेशी खेळाडू ह्या वेळी 'अनसोल्ड' आहेत. अन्कॅप्ड कॅटेगरीमधे भारताचे नटराजन, थंपी, गौथम आणी सिराज ह्यांना लॉटरी लागलीये तर अंकित बावणे चा सुद्धा यंदा लिलावात नंबर लागलाय.

पुन्हा एकदा ह्या रणधुमाळी मधे मायबोलीकरांच्या चर्चा, विचार, व्यंगचित्रं, मत-मतांतरं ह्या सगळ्यांसाठी हा धागा सुरू करतोय. होऊ दे चर्चा!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज मॅथ्यू मॉरिस च्या पुढे आला, तेही बाराव्या ओव्हर मधे जेंव्हा दहा अकराचा रेट हवा होता. दिल्ली उगाच नाहि शेवटच्या चार पर्यंत पोहोचत नाही, अनाकलनीय निर्णय असतात.

मग काय तर!
मॉरीस वरती आला असता तर एखादी ओव्हर ठेवून जिंकले असते दिल्ली!
अति-डिफेन्सिव्ह स्ट्रॅटेजी होती
बर त्या मॅथ्यूजला तरी कळायला नको का?..... नाही झेपत आपल्याला तर विकेट फेकावी ना हाणामारी करुन.... चेंडू तटवत बसलेला!

मॉरीस वैतागलेला वाटत होता!

असामी, स्वरूप, सहमत.

मॉरीस ने मॅथ्यूज च्या पुढे यायला हवं होतं. निदान पंत जेव्हा स्वस्तात परतला तेव्हा तरी.

"दिल्ली उगाच नाहि शेवटच्या चार पर्यंत पोहोचत नाही" - अजून पहिल्या चारात आहेत Wink (हे 'म्हैस' मधल्या 'अजून जीव आहे' च्या चालीवर वाचावं). पण थँक्स टू अ बिग विन अगेन्स्ट पुणे, त्या नेट रनरेट मुळे ते तगले आहेत अजून.

"दिल्ली उगाच नाहि शेवटच्या चार पर्यंत पोहोचत नाही" - अजून पहिल्या चारात आहेत >> अरे मी जनरल म्हणत होतो. असेच खेळत राहिले तर बाहेरच जातील शेवटी.

"असेच खेळत राहिले तर बाहेरच जातील शेवटी." - सहमत.

म्हणुनच म्हटलं की ते एका मॅच ने तगवलय. पण तुझं खरं आहे की त्यांना आता जिंकायला हवं.

मुंबई वि. पंजाब.

मुंबई ची टॉस जिंकून बॉलिंग. पंजाब कडून शॉन मार्श खेळतोय.

"We are playing the same team. Everything is falling in place for us. I don't see why we should change the team' - रोहित शर्मा च्या ह्या विधानाशी मी सहमत आहे (माझ्या सहमतीने काही फरक पडत नाहे म्हणा. पण असं म्हटलं की बरं वाटतं Wink )

मलिंगा चे रडार अजूनही हुकलेलेच वाटते आहे. अमला नि मॅक्सी क्लास खेळले. मॅक्लेशानची ती एक ओव्हर काढली तर उरलेल्या ओव्हर्स चांगल्या होत्या.

मुंबई काय खेळलाय, तुफान कत्तल , मजा आली. DD ला शिकण्यासारखे होते पांड्याला वर पाठवणे. पंजाब ने स्पिनर्स अधिक वापरून पहायला हवे होते असे वाटले. राणा is a class act though.

आज cricinfo वर सगळे आमला आणि बटलर ला बसवा म्हणत होते.... दोघेही मजबूत खेळले!

तुफ्फान चेस केले मुंबईने..... 'राणा'दा जवाब नही!

जबरदस्त खेळले मुंबई आज. बॉलिंग मधे जे गमावलं, ते बॅटींग मधे दामदुपटीनं कमावलं. नितीश राणा जबरदस्त पोटेन्शिअल असलेला खेळाडू आहे. घासून पुसून लक्ख होऊन ईंडियन टीम मधे खेळला तर आवडेल.

उद्या गुजराथ वि.कोलकता. बहुदा कोलकता सहज जिंकावी.

मुंबईच्या बॅट्समनना नेमकं काय झालं होतं आज?

अमला अप्रतिम खेळला, पण रोहीतची कॅप्टनसी काहीशी अनाकलनीय होती. हरभजनला २ ओव्हर्सनंतर पुन्हा बॉलिंगला का आणलं नाही? मलिंगा - मॅक्लेनेगनच्या २ ओव्हर्समध्ये ५० रन्स गेल्यावरही?

बायदवे, नितीश राणाने एकही बाऊंड्री न मारता आयपीएलमध्ये सर्वात जास्तं रन्स फटकावण्याचा रेकॉर्ड केला. फक्तं ७ सिक्स मारल्या.

गुजराथ ची टॉस जिंकून बॉलिंग. फॉकनर खेळतोय. पण परत तीन परदेशी बॅट्समेन आहेतच. रैना ला दोन परदेशी बॅट्समेन आणी दोन परदेशी बॉलर्स खेळवण्याचा कॉन्फिडंस का नाही ते कळत नाही. क्रिकेट मॅचेस - टेस्ट असो किंवा टी-२०, बॉलर्स विकेट काढून / रन्स रोखून जिंकून देतात.

हो ना. नारायणास्त्राची मात्रा चांगलीच लागू पाडतीये. नारायण हा ह्या आयपीएल चा नवीन कालुविथरणा होणार असं दिसतय.

असामी, एक्झॅक्टली मी हेच म्हणत होतो. टाय आणी फॉकनर हे दोन बॉलर्स आणी मॅक्कलम आणी स्मिथ / फिंच हे दोन बॅट्समेन असे चार परदेशी खेळाडू खेळवले तर गुजराथ ची टीम बॅलन्स्ड होईल. त्यांच्या जोडीला रैना, कार्थिक, ईशान किशन, जडेजा असताना, तीन तीन परदेशी बॅट्समेन च्या cushioning ची गरज नाही वाटत. स्वतः फॉकनर सुद्धा चांगल्यापैकी लोअर ऑर्डर बॅट्समन आहे.

फॉकनर ला १७ व्या ओव्हरलाच संपवण्याचं कारण काय होतं? मला वाटलं होतं की तो १९ वी ओव्हर टाकेल. २ च विकेट्स गेल्या होत्या त्यामुळे १७ व्या ओव्हर मधे अजून १-२ विकेट्स गेल्या असत्या तरी खूप मोठा फरक पडला नसता.

रैना ने काढली ही मॅच गुजराथ साठी. खरं तर कोलकता हरेल असं वातलं नव्हतं. कोलकता आणी मुंबई ह्या दोन्ही खूप स्ट्राँग आणी बॅलन्स्ड टीम्स आहेत ह्या आयपीएल मधे. पण रैना मस्त खेळला. सगळा अनुभव पणाला लावून खेळला.

स्मिथ मला कुठल्याच सिरीजम्ध्ये मध्ये आवडला नाही अगदी चेन्नई मध्ये असतांनाही कधीच नाही. कधी खेळतो का हा प्राणी? मला तरी त्याची एकही मॅच खेचणारी ईनिंग आठवत नाही ४० वगिरे करत असेल कधी मधी का घेतात त्याला?

गुजराथ कडे सगळेच टॉप ऑर्डर बॅट्समेन आहेत. मॅक्कलम, स्मिथ, फिंच, रैना, कार्थिक. त्यामुळे त्यातल्याच काहीजणांना मिडल ऑर्डर मधे खेळावं लागतं. त्याची त्यांना सवय नसल्यामुळे सगळ गोंधळ उडतो.

मला तरी त्याची एकही मॅच खेचणारी ईनिंग आठवत नाही >> मुंबई कडून खेळताना शेवटच्या ओव्हर मधे ४ sixes मरलेलेले हफेनहौस ला नि मॅह जिंकून दिलेली आठवत नाही ?

Pages