Submitted by फेरफटका on 20 February, 2017 - 12:23
आयपीएल - १० चं रणशिंग फुंकलं गेलय. कालच्या लिलावात बेन स्टोक्स ने विक्रमी १४.५ कोटी चा आणी टायमल मिल्स ने १२ कोटी चा बार उडवलाय, तर बहूचर्चित जेसन रॉय १ कोटी (फक्त?) च्या बार्गेन डील मधे गुजराथ लायन्स कडे गेलाय. ईरफान पठाण, ईशांत शर्मा वगैरे भारतीय खेळाडू आणी अॅलेक्स हेल्स, जॉनी बेअरस्ट्रॉ, ईम्रान ताहीर शॉन अॅबॉट, रॉस टेलर सारखे टी-२० मधले तगडे परदेशी खेळाडू ह्या वेळी 'अनसोल्ड' आहेत. अन्कॅप्ड कॅटेगरीमधे भारताचे नटराजन, थंपी, गौथम आणी सिराज ह्यांना लॉटरी लागलीये तर अंकित बावणे चा सुद्धा यंदा लिलावात नंबर लागलाय.
पुन्हा एकदा ह्या रणधुमाळी मधे मायबोलीकरांच्या चर्चा, विचार, व्यंगचित्रं, मत-मतांतरं ह्या सगळ्यांसाठी हा धागा सुरू करतोय. होऊ दे चर्चा!!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जिंकली आपली दिल्ली!
जिंकली आपली दिल्ली!
ॲंडरसन, मॉरीस, कमिन्स मुळे
ॲंडरसन, मॉरीस, कमिन्स मुळे डीडीची लोअर ऑर्डर एकदम तगडी झालीय
झहीर चांगली कॅप्टन्सी करतोय
चांगली सुरुवात.... long way to go!
नारायणला पुढे पाठवण्यामागचा
नारायणला पुढे पाठवण्यामागचा विचार आपण गेसच करू शकतो. जर त्याला यापुढेही ओपनिंगला पाठवत राहिले तर यामागे धक्कातंत्र एवढाच हेतू नसून काही वेगळा विचारही असू शकतो.
जसे त्याला पुढे पाठवून त्याची एक विकेट पहिल्याच ओवरला जाणे यात आपले काहीच नुकसान नाही आणि तो बाद झाल्यावरही स्कोअरबोर्ड ‘फॉर नो लॉस’ असाच वाचायचा आहे या मेंटेलिटीने जर पुढचा बॅटसमन खेळणार असेल तर त्यात अॅक्चुअली काही नुकसान नाही. मागच्या क्रमांकावर त्याने कधी खेळून सामना काढून दिला आहे असे क्षण विरळेच, तर एक गिणतीतही नसलेला बॅटसमन आपण खर्च करत आहोत. ऊलट तो खेळून झाला तर फायदाच आहे असा विचार असू शकतो.
यात प्रॉब्लेम तेव्हा होईल जेव्हा तो काही विशेष न मारता पॉवरप्ले खेळून काढेल जे ईतर प्रॉपर बॅट्समन करतात. आणि तसे होऊ नये म्हणून त्याला फारसा विचार न करता बॅट फिरव असाच सल्ला दिला असणार आणि त्यामुळे तो अपयशी व्हायचे प्रमाणही तितकेच वाढणार. ईथे आणखी एक विचार म्हणजे हल्ली बरेच संघ नवीन बॉलवर स्पिनरने सुरुवात करतात. ते देखील अगदीच पहिलीच ओवर. कारण स्पिनर्ससमोर आल्या आल्या पाय हलत नसल्याने स्कोरींग अवघड जाते आणि प्रॉपर बॅट्समन उगाच रिस्क न घेता दोन ओवर सेट घ्यायला वापरतात. बरेचदा हे यशस्वी होते. तर अश्या चालीला उत्तर म्हणूनही तो कामात येऊ शकतो. स्पिनर्सनाही पहिल्याच ओवरला बिनधास्त फिरवू शकतो किंवा तो तसे करणार या विचाराने प्रतिस्पर्धी कर्णधार या चालीचा वापरच करणार नाही.
आज मोदी विरुद्ध अंबानी
आज मोदी विरुद्ध अंबानी
"आज मोदी विरुद्ध अंबानी" -
"आज मोदी विरुद्ध अंबानी" -
मग ह्या लॉजिकने नंतर कलमाडी वि. मल्ल्या का?
राणाचा इंटरव्हियू आवडला.
राणाचा इंटरव्हियू आवडला. मुंबईसाठी राणा मस्त फाईंड आहे.
फेफ, ते मी आमच्या क्रिकेटच्या
फेफ, ते मी आमच्या क्रिकेटच्या व्हॉटसप्ग्रूपलाही नाव ठेवलेले आज... आणि आताच्या सामन्याला कॅप्टन वर्सेस कॅप्टन्स असे नाव दिलेय..
एकीकडे आपला आजचा कर्णधार विराट कोहली, तर दुसरीकडे माजी कर्णधार धोनी + उपकर्णधार रहाणे + नुकताच गाजलेला ऑस्ट्रेलियन कर्णधार स्मिथ
मुंबईसाठी राणा मस्त फाईंड आहे
मुंबईसाठी राणा मस्त फाईंड आहे. >> +१ .. पांड्या ब्रदर्स, बुमराह हे मुंबईपासूनच चमकलेले आहेत ना. खरे तर रोहीत शर्मा जेव्हा मुंबईत आला तेव्हा त्यानेही त्या आधी काही फार मोठे पराक्रम गाजवलेले नव्हते, नसावे... कारण माझ्या आठवणीप्रमाणे मुंबईने त्याला एवढी भली मोठी रक्कम मोजून का घेतला याचे बरेच जणांना आश्चर्य वाटलेले. पण पुढे त्याने ती पुरेपूर वसूल करून दिली.
उनाडकटने नावाला जागून विचित्र
उनाडकटने नावाला जागून विचित्र कट करून घेतला आहे.
धोनीचा आजचा सिक्स एकच मारा पण
धोनीचा आजचा सिक्स एकच मारा पण जबरदस्त मारा कॅटेगरीतील होता. आजची खेळपट्टी पाहता त्या पंचवीस तीस धावाही उपयुक्त ठरल्या. तसेच एक धोनी स्पेशल स्टंपिंग. ती सुद्धा एबीडीची, मॅचटर्निंग विकेट. आज पहिल्यांदा धोनीने या आयपीएलमध्ये योगदान दिले असे वाटले
कालच धोनीसोबत फ्लॉप म्हणून रोहीतचाही उल्लेख केलेला. त्यानेही चांगले योगदान दिले. सामना व्यवस्थित संपवला. योग्य वेळी पोलार्डला स्ट्राईक दिला, योग्य वेळी स्वता बाऊंडरया मारल्या. तो असे पर्यंत सामना त्याच्या आणि मुंबईच्या कंट्रोलमध्ये वाटत होता. आणि तो शेवटपर्यंत राहिला.
त्यानेही त्या आधी काही फार
त्यानेही त्या आधी काही फार मोठे पराक्रम गाजवलेले नव्हते, नसावे... कारण माझ्या आठवणीप्रमाणे मुंबईने त्याला एवढी भली मोठी रक्कम मोजून का घेतला याचे बरेच जणांना आश्चर्य वाटलेले. पण पुढे त्याने ती पुरेपूर वसूल करून दिली. >> डेक्कन चार्जरस कडून बहुतेकगिल्ख्रिस्ट बरोबर एक सीजन दणकून खेळयावर त्याला मुंबई ने उचलला होता. त्यावे ळच्या जिंकण्यामधे त्या दोघांनी जबरदस्त खेळ केला होता. त्या वेळी WhatsApp नव्हते
ओके चेक करतो. आयपीएलमध्ये
ओके चेक करतो. आयपीएलमध्ये चमकलेला असेल तर सर्वच तितकेसे फॉलो न केल्याने माहीत नसेल. पण तरी तेव्हा रोहीत शर्मा हा मोठा धडाकेबाज फलंदाज आहे असे नाव झाले नव्हते. आणि मुंबईने फार मोठी किंमत खर्च करून त्याला घेतल्याने तसे वाटलेले. म्हणजे त्या किंमतीत तेव्हा ईतर संघांकडे सेहवाग, गंभीर, युवराज, धोनी असे भारतातर्फे खेळणारे प्लेअर होते आणि हा नवखा. त्यामुळे बाकीचे मेन प्लेअर संपल्यावर नाईलाजाने जो उरलाय त्याला जास्तीचे पैसे मोजून घ्यावे लागले असे वाटलेले. अर्थात आपण आपल्या ईतर गोष्टी सांभाळून जेवढे क्रिकेट फॉलो करतो आणि या संघमालकांची स्पेशल टीम जगभरात संशोधन करून ट्वेंटी ट्वेंटी स्पेशालिस्ट प्लेअर शोधून आणतात यात फरक असणारच.
आरसीबीला आता स्पर्धेत
आरसीबीला आता स्पर्धेत रहाण्यासाठी खेळ खूपच उंचवावा लागेल! ५ सामन्यात केवळ २ गुण उर्वरित ९ सामन्यात किमान ६-७ सामने चांगल्या फरकाने जिंकावे लागतील!
रोहित शर्माने डेक्कन चार्जर्स
रोहित शर्माने डेक्कन चार्जर्स कडून बॅटिंग तर चांगली केलेलीच शिवाय मुंबई विरुद्ध एक हॅट्रीक घेऊन काही दिवस पर्पल कॅपच्याही रेस मध्ये होता. याच आयपीएलमध्ये युवराजनेही दोन हॅट्रीक घेतल्या होत्या.
रोहीत शर्मा डेक्कन चार्जर्स
रोहीत शर्मा डेक्कन चार्जर्स कडून पहिला सीझन जबरदस्त खेळला होता. त्याचा नुकताच ईंडिया डेब्यू सुद्धा झाला होता आणी प्रचंड प्रॉमिसिंग वाटत होता. म्हणून मुंबई ने त्याला घेतले.
आज पंत छान खेळला. करुण नायर नावाप्रमाणेच करुण फॉर्म मधे आहे. करुण आणी मॅथ्यूज च्या बॅटींग मुळे दिल्ली ला आज किमान १५-२० रन्स कमी पडले.
Just when I thought Pant and
Just when I thought Pant and Rana has taken a step ahead of Pandey ....
रोहित २००७ च्या पहिल्या टी२०
रोहित २००७ च्या पहिल्या टी२० वर्ल्डकपमधेही चांगला खेळला होता. एक - दोन ५० मारले होते. पण त्यावेळी तो मुख्यतः देमार बॅटिंग ऐवजी स्टेबल बॅटिंग करायचा. टेस्टमधेही चमकेल असं वाटलं होतं. पण आयपीएलमधे त्यानी गिअर्स बदलले अन टोटल लिमिटेड ओव्हर्स स्पेशॅलिस्ट झाला.
राणा यावर्षीच्या आयपीएलचा मोठ्ठा फाईंड वाटतोय. इतिहास बघता नजिकच्या भविष्यात नॅशनल टेममधे चान्स मिळू शकेल त्याला.
हार्दिक पांड्या ऐवजी कृणाल पांड्या मला कायम जास्ती प्रॉमिसिंग वाटतो.
आज गुजरात वि. बंगलोर.
पुण्याकडूनही हरलेल्या बंगलोरला आता मूड बदलायची गरज आहे. एका मोठ्ठ्या विजयाची गरज आजचा सामना भागवू शकतो. फक्त टीमवर्क हवं. आतापर्यंतच्या बहुतेक सामन्यात एक जण खेळतो, बाकी ढेपाळतात असंच दिसलंय.
बंगळुरू ची जोरदार सुरूवात
बंगळुरू ची जोरदार सुरूवात झालीये. आज एबीडी नसल्यामुळे त्यांना जवाबदारीने बॅटींग करावी लागणार आहे. गुजराथ ची बॉलिंग टाय आणी जडेजा मुळे चांगली वाटतीये. पण मला अजूनही वाटतं की त्यांना फिंच, स्मिथ आणी मॅक्कलम अशा तीन परदेशी बॅट्समेन ची गरज नाहीये. रैना च्या जोडीला दिनेश कार्थिक सुद्धा चांगल्या फॉर्म मधे आहे. त्यापेक्षा त्यांनी जर फॉकनर ला घेतलं तर जबरदस्त बॅलन्स्ड टीम होईल.
बंगलोरची लोअर मिडल एकदमच
बंगलोरची लोअर मिडल एकदमच बेभरवश्याची आहे रे!
मनदीप, केदार जाधव, बिन्नी, नेगी... पहीले दोन तीन गेले की मग काही खर नाही!
"बंगलोरची लोअर मिडल एकदमच
"बंगलोरची लोअर मिडल एकदमच बेभरवश्याची आहे रे!" - हो ना. टॉप हेवी टीम आहे. तरी यंदा केदार जाधव फॉर्म मधे आहे म्हणून बराच फरक पडतो. आरसीबी नेहमीच एखादा स्टार बॉलर घेऊन उतरतात (यंदा तो बद्री आहे, मागच्या वर्षी स्टार्क होता). चहल ठीक आहे, पण परवा असामी म्हणाला तसं हल्ली स्पिनर्स ना खेळण्याचं टेक्निक खूपच गंडलय, त्यामुळे कुठलाही रिस्ट स्पिनर एकदम भेदक वाटायला लागतो.
गुजराथ ने जर मॅक्कलम, स्मिथ/फिंच, रैना, कार्थिक, इशान किशन, जडेजा, फॉकनर, टाय आणी ३ भारतीय बॉलर्स खेळवले तर त्यांची टीम बॅलन्स्ड होईल असं माझं मत आहे.
स्वरूप, कालच्या दिल्ली च्या
स्वरूप, कालच्या दिल्ली च्या पराभवाबद्द्ल सांत्वन!
उद्या दिल्ली वि. हैद्राबाद आहे. दोन तुल्यबळ बॉलिंग युनिट्स एकमेकांना भिडतील. Keeping everything else the same, David Warner could be the deciding factor.
अरे डीडीच्या मागच्या दोन्ही
अरे डीडीच्या मागच्या दोन्ही मॅचेस निवांत बघताच आल्या नाहीत.... कालची अगदीच नेलबायटींग झाली ना?
डीडीची बॅटींग बघितली थोडीफार.... करुण नायरला जरा एखाद दोन मॅचेस बाहेर ठेवले पाहिजेल... त्याच्यासाठीही ते चांगलेच असेल..... He has the skills, its all about application पण सध्या फारच चाचपडतोय तो!
मॅथ्यूज पण फॉर्ममध्ये दिसत नाहीये
कमिन्सला विश्रांती देवून एखादी मॅच रबाडाला खेळवून बघायला हरकत नाही पण त्या मॅचमध्ये ॲंडरसन आत पाहिजेल!
"कालची अगदीच नेलबायटींग झाली
"कालची अगदीच नेलबायटींग झाली ना?" - अजून एखादा बॉल (शेवटच्या ओव्हर मधे) जर पांडे ला नॉन-स्ट्राईकर एण्ड ला उभं रहावं लागलं असतं तर चित्र पालटलं असतं. असो, क्रिकेट मधे जर-तर ला अर्थ नाही. पण मॅच जबरदस्त झाली. कालच्या दोन्ही मॅचेस जबरदस्त झाल्या.
नायर फॉर्म मधे येणं दिल्ली साठी खूप गरजेचं आहे कारण तसा उल्लेखनीय बॅक-अप नाहीये त्यांच्याकडे. मॅथ्यूज ची मोठ्या लेओव्हर नंतर पहिलीच मॅच होती कालची.
उद्या रबाडा खेळेल कदाचित. नदीम / यादव सुद्धा आत येऊ शकतील. हैद्राबाद कडे वॉर्नर, धवन, युवराज असे तगडे लेफ्ट हँडर्स आहेत.
आज बंगलोर ने गुजराथ ला धू धू धूतलाय. गुजराथ कसा प्रतिसाद देतात हे बघायचय. कदाचित ही एक बिग-स्कोअरिंग मॅच होऊ शकेल.
राजकोट पिचमधे बॉल थांबून
राजकोट पिचमधे बॉल थांबून यायचा, काय झाले आज देव जाणे ..... आज RCB ला जिंकता आले नाही तर सोडून द्यावे.
मस्तच ओढली होती राव इशान
मस्तच ओढली होती राव इशान किशनने मॅच.... पण टारगेट जरा जास्तच आवाक्याबाहेरचे होते
मला या इशान किशन, पंत, नितेश राणा वगैरे मंडळींचा फिअरलेस ॲटीट्यूड भारीच आवडतो बुवा.... At the same time कोहली over agressive वाटला!
जाडेजाला इशन किशन च्या अगोदर
जाडेजाला इशन किशन च्या अगोदर का पाठवले ?
"मस्तच ओढली होती राव इशान
"मस्तच ओढली होती राव इशान किशनने मॅच" - शेवटच्या ओव्हर ला २६ हवे असताना, पहिल्या बॉल वर ईशान किशन आणी टाय ने पळायला हवे होते. मॅच चा निकाल काहीही लागो, पण ईशान किशन ला काहीतरी संधी होती.
"मला या इशान किशन, पंत, नितेश राणा वगैरे मंडळींचा फिअरलेस ॲटीट्यूड भारीच आवडतो बुवा" - सहमत. किंबहूना आयपीएल मधे आंतरराष्ट्रीय पातळीवर अजून न खेळलेले, किंवा नुकतेच खेळायला लागलेले प्रॉस्पेक्टीव्ह ईंडियन खेळाडू चमकताना बघून बरं वाटतं. ह्या यादीत ईशान किशन, ऋषभ पंत, नितीश राणा, यजुवेंद्र चहल, संजू सॅमसन, मनीश पांडे, श्रेयस अय्यर, शाहबाझ नदीम, करुण नायर, बसिल थंपी, केदार जाधव, मनदीप सिंग, वोहरा असे कितीतरी आहेत.
"आज RCB ला जिंकता आले नाही तर सोडून द्यावे." - मॅक्कलम ने विकेट टाकली नसती, तर मॅच फिरू शकली असती. चहल ची शेवटची ओव्हर होती आणी त्याला त्याच कामासाठी (विकेट घ्यायला) आणलं होतं. मला वाटलं होतं की मॅक्कलम त्याला एखादी लो रिस्क बाऊंड्री मारेल, पण आऊट झाला.
"मला या इशान किशन, पंत, नितेश
"मला या इशान किशन, पंत, नितेश राणा वगैरे मंडळींचा फिअरलेस ॲटीट्यूड भारीच आवडतो बुवा" - >> पंत नि विशेषतः राणा थेट कोहली ODI चेस करताना खेळतो तसे calculated खेळतात असे वाटते. दिल्ली मधे काही खास training center वगैरे आहेत कि काय ह्याचे देव जाणे
आज दिल्ली वि. हैद्राबाद. ह्या
आज दिल्ली वि. हैद्राबाद. ह्या आयपीएल मधल्या दोन बॉलिंग जायंट्स चा सामन!!
ह्या वेळी भाऊ नमसकरांची - त्यांच्या शब्दिक प्रतिक्रिया आणी व्यंगचित्र दोन्हीची - अनुपस्थिती ह्या धाग्यावर जाणवतीये.
हैद्राबाद ची टॉस जिंकून पहिली
हैद्राबाद ची टॉस जिंकून पहिली बॅटींग. नबी ऐवजी केन विल्यमसन खेळतोय.
दिल्ली ने अपेक्षेप्रमाणे जयंत यादव ला खेळवलंय. लेफ्ट हँडर्स विरुद्ध ऑफ-स्पिनर. पण अँडरसन बाहेरच आहे आणी मॅथ्यूज खेळतोय. मला वाटलं होतं की रबाडा ला संधी मिळेल, पण तसं नाही झालं.
Pages