आयपीएल-१०

Submitted by फेरफटका on 20 February, 2017 - 12:23

आयपीएल - १० चं रणशिंग फुंकलं गेलय. कालच्या लिलावात बेन स्टोक्स ने विक्रमी १४.५ कोटी चा आणी टायमल मिल्स ने १२ कोटी चा बार उडवलाय, तर बहूचर्चित जेसन रॉय १ कोटी (फक्त?) च्या बार्गेन डील मधे गुजराथ लायन्स कडे गेलाय. ईरफान पठाण, ईशांत शर्मा वगैरे भारतीय खेळाडू आणी अ‍ॅलेक्स हेल्स, जॉनी बेअरस्ट्रॉ, ईम्रान ताहीर शॉन अ‍ॅबॉट, रॉस टेलर सारखे टी-२० मधले तगडे परदेशी खेळाडू ह्या वेळी 'अनसोल्ड' आहेत. अन्कॅप्ड कॅटेगरीमधे भारताचे नटराजन, थंपी, गौथम आणी सिराज ह्यांना लॉटरी लागलीये तर अंकित बावणे चा सुद्धा यंदा लिलावात नंबर लागलाय.

पुन्हा एकदा ह्या रणधुमाळी मधे मायबोलीकरांच्या चर्चा, विचार, व्यंगचित्रं, मत-मतांतरं ह्या सगळ्यांसाठी हा धागा सुरू करतोय. होऊ दे चर्चा!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नोहिट गुगली समोर परत एकदा गळपटला. पोलार्ड आज त्याच्या प्राईस टॅग ला जागला. नाहीतर मुंबई चं अवघड होतं. पोलार्ड आणी कृणाल ने पद्धतशीरपणे बंगळुरू च्या हातातून मॅच काढून घेतली.

नोहिट गुगली समोर परत एकदा गळपटला. पोलार्ड आज त्याच्या प्राईस टॅग ला जागला. नाहीतर मुंबई चं अवघड होतं. पोलार्ड आणी कृणाल ने पद्धतशीरपणे बंगळुरू च्या हातातून मॅच काढून घेतली. >> +१. रोहित चा अगदीच पोपट केलाय गुगलीने. लागोपाठ तीनदा. पोलार्ड चे बाद होणे थोडे खटकले. चहल बॉल ला फ्लाईट देऊन पूर्ण फुल लेंग्थ ठेवणार नाही हे उघड होते. पोलार्ड जास्त ओपन झाला. तो थकला होता म्हणून बहुतेक ? पण इथेच अनुभव कामी यायला हवा. क्रुनाल पांड्याने डोके शांत ठेवले. मॅक्लेशान परत लाईनवर यायला लागलाय हे जबरदस्त आहे मुंबईसाठी. बद्री नि चहल एव्हढीच अरविंद चांगली बॉलिंग केली. देशासाठी खेळताना असे केले असते तर .... चिन्नास्वामी विकेट बदलली आहे असे दिसतेय.

"चिन्नास्वामी विकेट बदलली आहे असे दिसतेय.' - ह्या विषयावर आज कॉमेंटेटर्स बोलत होते. स्लो आणे लो झाल्यामुळे बॅटींग पॅरेडाईझ राहिलेली नाहीये चिन्नास्वामी ची विकेट. पण हे बॅकफायर होऊ शकतं आरसीबी वर कारण त्यांची टीम ही पॉवरपॅक्ड बॅट्समेन नी भरलीये वगैरे.

"बद्री नि चहल एव्हढीच अरविंद चांगली बॉलिंग केली. देशासाठी खेळताना असे केले असते तर" - मला तर नेहेमीच बद्री, गेल, ब्राव्हो, नरीन, सॅमी आणी कधी कधी पोलार्ड कडे बघून वेस्ट ईंडीज टीम (वन-डे / टेस्ट) विषयी 'what it could have been' असं वाटतं.

गुजराथ ची टॉस जिंकून बॉलिंग. आज जडेजा आणी टाय आल्यामुळे त्यांची बॉलिंग पुष्कळ रिस्पेक्टेबल वाटतीये. टाय ऐवजी फॉकनर जास्त चांगला ऑप्शन होता का?

मला तर नेहेमीच बद्री, गेल, ब्राव्हो, नरीन, सॅमी आणी कधी कधी पोलार्ड कडे बघून वेस्ट ईंडीज टीम (वन-डे / टेस्ट) विषयी }}}}} अगदी!
एकत्र खेळताना त्यांचा फॉर्म घसरतो.

रैना ला टेंशन आलं असणार. त्याने सगळ्या प्लॅनिंग मधे ४०-५० रन्स दिंडा कडून धरल्या असणार आणी पुण्याने त्याला न खेळवून गुजराथ च्या प्लॅनिंग वर बोळा फिरवला.

एकाच दिवशी दोन हॅट-ट्रीक्स!!!!

पहिली हॅट-ट्रीक झाली, तेव्हा हॅट-ट्रीक काढणार्या बॉलर ची टीम मॅच हारली आहे. आता दुसर्या हॅट-ट्रीक च्या वेळी काय होतं ते बघायची उत्सुकता आहे. १७० अगदीच वाईट स्कोअर नाहीये. पुण्याकडे बॉलिंग ऑप्शन्स भरपूर आहेत. ही मॅच इंटरेस्टींग व्हावी अशी अपेक्षा आहे.

डॅनी मॉरीसन नि स्कॉट स्टायरिस काय घेऊन बसतात कॉमेंट्री ला ? शार्दुल ठाकूर ने सरळ follow through मधे कॅच सोडला (हार्ड होता मान्य) पण self preservation ? ठाकूरच्या बॉलिंग बद्दल काही अंदाज बांधता येत नाहिये कशी आहे ते.

"कोणी तरी ताहिरला फोडून काढावा अशी इच्छा होती, आज पुरी झाली." - Happy

अश बॉलर्स विरुद्ध दोनच स्ट्रॅटेजीस आढळतात. एक तर त्यांचं स्पेल खेळून काढायचं किंवा सरळ सरळ अ‍ॅटॅक करायचा. मेरीट वर वगैरे फारसं कुणी खेळत नाही, रेप्युटेशन वर खेळतात.

बेन स्टोक्स पुण्याने तसाही महागात घेतलाय (फुकट ते पौष्टीक पुण्य-तत्वाचा विसर पडला असावा). त्यातून तो अशी बॉलिंग करणार असेल, तर आणखीन महागात लागेल (मग आमचा श्रीकांत मुंढे काय वाईट होता? - एक पुणे-३० चिमटा).

मेरीट वर वगैरे फारसं कुणी खेळत नाही, रेप्युटेशन वर खेळतात. >> +१. खुद्द पाकिस्तानात त्याल क्लब मॅचेस च्या वरती येता आले नसते असे माझे प्रामाणिक मत आहे. आफ्रिकेसारख्या स्पिनर्सचा दुष्काळ असलेल्या देशातून खेळतोय म्हणून फावलय. आज एक विकेट घेतल्यावर धावत सुटला तेंव्हा त्याला अडवून आधिच्या दोन ओव्हर्स मधे काय दिवे लावले ते बघ असे सांगावेसे वाटत होते Happy हातातून स्पिन ओळखू शकणारे बॅटस्मन गेल्यामूळे सुमार दर्जाच्या स्पिनरस ना फार मह्त्व आलयं राव.

त्या अनुषंगाने तो फेल गेला असता तर काय झाले असते असा विचार करून बघ.
>>>>
मला नाही वाटत काही झाले असते. कारण तो मूळात बॅट्समन नसून बॉलर असल्याने बॅटींग फेलने त्याच्या आत्मविशासाचे काहीही झाले नसते. असो, तो अ‍ॅडीशनल मुद्दा होता. त्याला पुढे पाठवताना तसा विचारही केला नसावा.

धोनी पिंच हीटर दर्जाचा बॅट्समन होता हे जाहीर केलय ऋन्मेष ने >>>> पिंच हिटरचे उदाहरण वेगळे होते आणि धोनीचे वेगळे. बाकी पिंच हिटर दर्जाचा बॅट्समन असे काही नसते. ज्या बॅट्समनला नैसर्गिकरीत्या हिटींग जमते त्याला त्या भुमिकेत पाठवू शकतो.

हातातून स्पिन ओळखू शकणारे बॅटस्मन गेल्यामूळे सुमार दर्जाच्या स्पिनरस ना फार मह्त्व आलयं राव. >>>> याला प्लस वन! हे मी देखील बरेचदा म्हणतो. आणि महत्वाचे म्हणजे २०-२० सारख्या फॉर्मेटमध्ये चमकणारे हे वीर स्पिनर कसोटी क्रिकेटच्या क्लासिकल फॉर्ममध्ये तितके प्रभावी ठरत नाहीत कारण तिथे तुलनेत उत्तम तंत्र असलेलेच फलंदाज असतात.

पोलार्डचा चार शिव्या काय घातल्या आज पठ्ठ्याने तोंडावर पाडले. पण तो अशी एखादीच म्याच खेळतो, सामना समोरच्यांच्या घशातून गिळतो आणि परत त्याचा अजगर बनतो. यावेळी तसे होऊ नये. पांड्या ब्रदर्स, राणा, आणि नुकताच खेळू लागलेला पोलार्डस हे चौघे चेसला भारी झालेत.

"हातातून स्पिन ओळखू शकणारे बॅटस्मन गेल्यामूळे सुमार दर्जाच्या स्पिनरस ना फार मह्त्व आलयं राव." - सहमत!!

हातातून स्पिन न ओळखणे, टी-२० ची गरज असेल कदाचित, पण लाईन मधे येऊन न खेळणे, हातातल्या मुदगलासारख्या बॅट मुळे, लहान बाऊंड्रीजमुळे मिस-हीट्स सुद्धा बाऊंड्रीपार जात असल्यामुळे फूटवर्क चं महत्व कमी होणे ह्या सगळ्या गोष्टींंमुळे स्पिनर्स हे काहीतरी अद्भूत प्रकरण आहे असं वाटायला लागलय. दुर्दैव म्हणजे हे भारतीय खेळाडूंच्या बाबतीत होतय. Sad

"पोलार्डचा चार शिव्या काय घातल्या आज पठ्ठ्याने तोंडावर पाडले." - आता सिझनभर काहीही न करायला मोकळा झालाय तो. अजून एखादी मॅच खेळेल.

काहीही म्हणा, पोलार्डने कसला कॅल्क्युलेटेड अ‍ॅसॉल्ट केला राव. कोहलीचे स्पिरिट चॅनेल करत होता की काय.

कालच्या दोन्ही मॅचेस निवांत बघायला मिळाल्या नाहीत त्यामुळे नो कॉमेंट्स!

आजच्याही निवांत बघायला मिळतील असे वाटत नाही!

आजच्या दोन्ही मॅच बऱ्यापैकी समतोल आणि तुल्यबळ संघात आहेत.... तरीही पहिली मॅच हैद्राबाद आणि दुसरी मॅच डीडीने जिंकावी अशी इच्छा आहे!

उमेश यादव परत आल्यानंतर केकेआरची बॉलींग स्स्ट्रॉग वाटायला लागली आहे पण हैद्राबादची बॉलींग जास्त रिलायबल आहे!

दुसऱ्या मॅचमध्ये डीडीची बॉलींग विरुद्ध पंजाबची बॅटींग असा मुख्यत्वे मुकाबला होइल

सॅमसन खेळला, पंत खेळला आता करुण नायरची एक मोठ्ठी इनींग ड्यू आहे.... आज बहुतेक तरेच्या ऐवजी श्रेयस अय्यर आत येइल.... बाकी काही बदल करायची डीडीला गरज नाही!

स्वरूप, पहिली मॅच तर केकेआर ने जिंकली आहे. आता दिल्ली - पंजाब मधे काय होतं ते बघू. दिल्ली चा स्कोअर चांगला आहे, पण पंजाब ची बॅटींग पण तगडी आहे.

असामी, जसं तुला ताहीर च्या बाबतीत होतं, तसं मला अक्षर पटेल ला पिटताना बघायचं आहे. बॉलिंग मधे विशेष दम नाही पण किलोभर अ‍ॅटीट्यूड असलेला बॉलर आहे तो. आज १९ व्या ओव्हर मधे कॉरी अँडरसन ने २ सिक्सेस मारलेल्या बघून थोडं बरं वाटलं.

बॉलिंग मधे विशेष दम नाही पण किलोभर अ‍ॅटीट्यूड असलेला बॉलर आहे तो. >> अ‍ॅटीट्यूड पेक्षा कॉन्फिडण्स योग्य शब्द होइल.

आजही नरीन ओपनिंग ला आला. आता काय म्हणता ?

दिल्ली जिंकली.

आता उद्या गुजराथ वि. मुंबई आणी बंगळुरू वि. पुणे.

Pages