Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 04:33
क्रिकेटवरील पहिले तीन धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या बरीच झाली आहे. बर्याच दिवसांत तिथे कोणी काही म्हटलेलेही नाही. सध्याच बर्याच सिरीज संपल्यात, तर काही नव्याने सुरू होतायत. त्यामुळे नवीन धागा काढायला हा आयडियल टाईम आहे. आता क्रिकेट टॉक इथे करूया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
२००४ मधे वानखेडेवर्.
२००४ मधे वानखेडेवर्..ऑस्ट्रेलियाला १०६ चे टरगेट होते पण मुरली कार्तिक्,भज्जी व कुंबळेने त्यांना ९३ मधेच गुंडाळले होते...तेही त्या टिममधे हेडन्,लँगर्,पाँटिंग्,मायकेल क्लार्क्,डेमियन मार्टिन्,कटिश व गिलख्रिस्ट अशी बॅटींग लाइन अप असुनही!.. मजा आली होती बघायला..
आपण पण तश्याच गंटागळ्या खाउ असे वाट्त नाही. तसे झाले तर मग वुइ डोंट डिझर्व्ह टु विन असेच म्हणायला लागेल.
हल्लीच्या फिटनेस च्या आणी
हल्लीच्या फिटनेस च्या आणी फिल्डींग ड्रिल्स च्या काळात राहूल आणी करूण नायर ईतके कच्चे मडके कसे आहेत? >> slip catches is different beast. Just because you are good fielder does not make you good slip fielder. राहुल किंवा नायर दोघांचेही reflexes sharp वाटत नाहीत नि त्यांचा स्लिप मधे उभे राहतानाचा स्टान्स बघा. कोहली चा आधी असा असे जो त्याने बदलला. द्रविड नि लक्ष्मण नंतर reliable slip fielders आलेच नाहित.
तुम्ही हायलाईट पाहीले का? >> नाही मॅचच पाहिली. तिसरा शॉर्ट बॉल होता पण पहिले दोन मारल्यावर लगेच तिसरा मारायलाच हवा होता असे जरुरी नाही विशेषतः त्याचा फॉर्म बघता. त्याच्या नुसत्या असण्याने केव्हढा फरक पडतो ते बघा.
मुकुंद २००४ मधे वानखेडे चे पिच माईन फिल्ड होते. सचिन नि लक्ष्मण होते म्हणून तरले होते.
धर्मशाळाचे आउटफिल्ड खूप फास्ट
धर्मशाळाचे आउटफिल्ड खूप फास्ट आहे, पिचही अजून चांगली वाटतेय, त्यामुळे उद्या आपण जिंकू असे वाटते.
उद्या आपल्या किती विकेट जाणार
उद्या आपल्या किती विकेट जाणार आणि किती विकेटने जिंकणार अंदाज लावा, मी अडीचचा भाव देतो
माझा अंदाज, ७ विकेटने जिंकणार !
"slip catches is different
"slip catches is different beast. Just because you are good fielder does not make you good slip fielder. " - सहमत आहे. मी त्यांच्या स्लिप फिल्डींग विषयी (स्पेसिफिकली) बोलत नव्हतो. राहूल क्लोज-ईन किंवा शॉर्ट एक्स्ट्रॉ कव्हर वगैरे पोझिशन मधे, ज्या मुद्दाम एखाद्या सापळ्यासारख्या लावल्या जातात, तिथे सुद्धा कॅचेस सोडले आहेत. करूण नायर डोमेस्टीक क्रिकेट मधे कर्नाटक चा डेझिग्नेटेड स्लिप फिल्डर आहे. अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणी डोमेस्टीक क्रिकेट मधे फरक आहेच. दोघही अजून लहान आहेत आणी सुधारणेला वाव आहे.
"सचिन नि लक्ष्मण होते म्हणून
"सचिन नि लक्ष्मण होते म्हणून तरले होते." - एक मोठी (५०) किंवा दोन छोट्या पार्टनरशिप्स (२५-३०) ची गरज आहे उद्या मॅच काढण्यासाठी.
नंबर १ ची (ऑलमोस्ट) टेस्ट टीम
नंबर १ ची (ऑलमोस्ट) टेस्ट टीम जिचा पुण्याची मॅच सोडली तर र्ड्रीम रन चालू आहे, ८-९ नंबर पर्यंत बॅटिंग लाईनअप आहे त्या टीमला ८७ रन्स जमतील का नाही ह्या बद्दल शंका नक्की का वाटत आहे? क्रिकेट मधली अनसर्टेनटी सोडून काही स्पेसिफिक ऊत्तर आहे का?
फेफका ओ फेफका तुझको क्या डर है रे ये पीच अपनी है अपना जड्डू है रे.
केन विल्यमसन ______/\______
केन विल्यमसन
______/\______
Take a bow अजिंक्य राहणे!
Take a bow अजिंक्य राहणे!
काय शॉट होता.... ग्रेट!
जिंकले
जिंकले
गुढीपाडव्याच्या शुभ दिवशी अजिंक्य रहाणेच्या हातून विजयाची गुढी उभारली
(No subject)
रहाणे जबरी खेळला काल. राहुल
रहाणे जबरी खेळला काल. राहुल सुद्धा बराच पेशण्टली खेळत होता. साधारण ५० रन्स हव्या होत्या तेव्हा रहाणेने एकदम आक्रमक खेळून मारलेल्या त्या दोन सिक्स ने ऑसीज ना 'शट डाउन' करून टाकले. त्यांना बहुधा तेथे लक्षात आले असावे की यावेळेस कोलॅप्स वगैरे काही होत नाही :). या सिरीज मधे मी पाहिलेल्या भागांत मला ऑसी फास्ट बोलर्स वर उलटा अॅटॅक आपले लोक करताना दिसत नव्हते. काल ते दिसले.
अशा वेळेस दुसरा बॅट्समन काय करतोय त्यावरून टीम मधले कोऑर्डिनेशन लक्षत येते. रहाणे मारतोय म्हंटल्यावर राहुलने अजिबात रिस्क न घेता दुसरी बाजू लावून धरली होती. रहाणेने ही राहुल ची फिफ्टी (सिरीज मधली पाचवी - बहुधा) होत आहे हे पाहिल्यवर त्याला संधी दिली हे ही बरोबर होते.
अफलातून विजय!! झक्कास!!!
अफलातून विजय!! झक्कास!!! भारताने तिसर्या इनिंग ला ऑसी बॅट्समेन ना शॉर्ट पिच बॉलिंग वर सतावल्यावर, भारतीय बॅट्समेन ना - त्यातही कॅप्टन रहाणे ला त्याच गोष्टी ला तोंड द्यावं लागणार हे उघड होतं. पण ज्या पद्धतीनं रहाणेनं त्या टॅक्टीक वर प्रतिआक्रमण केलं ते निव्वळ लाजवाब होतं. असं वाटत होतं की तो आधी बॉल चा विचार करतोय आणी मग बॉलर ला बॉल कसा टाकावा हे सांगतोय. कमिन्स (राऊंड द विकेट) ला लेग स्टंप च्या बाहेर येत (माईंड यू, बॉल हातातून सुटायच्या आधी रहाणे ची मूव्ह झाली होती) एक्स्ट्रॉ कव्हर बाऊंड्री वरून मारलेली सिक्स हा कालचा हायलाईट होता. त्यानंतर ऑसीज हवा गेलेल्या फुग्यासारखे झाले.
क्लार्क कॉमेंट्री करताना, ऑसी टीम मधून खेळत असल्यासारखा बोलत होता. एकदा आवेगानं, तो 'we need eight wickets .... sorry, Australia need eight wickets' असं ही म्हटला. अशा लोकांबरोबर कॉमेंट्री ला बसला की मांजरेकर ला चेव चढतो. मांजरेकर ची कॉमेंट्री ऐकताना मला बरेच वेळा 'गच्चीसह झालीच पाहीजे' मधलं 'हाकला रे, हाकला कुणीतरी ह्याला' आठवत रहातं.
ह्या सिरिज मधील हायलाईट
ह्या सिरिज मधील हायलाईट माझ्यासाठी :
जडेजा : जडेजाच्या प्रत्येक ५० मुळे आपण जिंकलो आहोत. ( इग्लंड विरोधी पण त्याने मारलेल्या ५० मुळेच जिंकलो.) जर जडेजाने अश्विन कडून थोड्या बॅटिंगच्या टिप्स घेतल्या तर आपली बॅटिंग खूप खोलवर जाईल, अन मे बी, मे बी जडेजा हा ऑलटाईम बेस्ट टेस्ट ऑलराउंड ( फॉर होम सिरिज ) होईल.
राहूल : राहूल हा एक बेभरवश्याच्या बॅटसमन ते क्लासिकल ओपनरचा प्रवास करतोय. पुजारासारखेच तो असताना त्याची विकेट जाणार नाही, ह्याची आता खात्री वाटायला सुरूवात झाली आहे. शिखरला आता मध्ये येणे अवघड होईल.
रहाणे : पूर्ण सीरिज चाचपडला, पण त्याच्यावर कप्तानपदाची जबाबदारी दिल्यावर त्याचा खेळ हा खूपच आत्मविश्वासपूर्ण खेळला. त्याचे क्रिझवर आल्यापासूनचे वावरणे अन ते दोन्ही सिक्स ( किंवा त्याचा पहिला फोर) मारणे हे म्हणजे त्यांच्या बॉलिंगला अॅटिंसिपेट करून तुच्छ लेखने होते. हॅट्स ऑफ. एक कप्तान म्हणून त्याच्या सर्व चाली यशस्वी झाल्या. कोहली नंतर कोण? हा प्रश्न आत्ता पडायला नको, पण रहाणे इज अ सायलेंट किलर ! अ सर्जन.
अन मे बी, मे बी जडेजा हा
अन मे बी, मे बी जडेजा हा ऑलटाईम बेस्ट टेस्ट ऑलराउंड ( फॉर होम सिरिज Wink ) होईल. >> तात्या कमीत कमी आजच्या शुभ दिवशी शुभेच्छा देताना तरी मनभरून दे कि
राहुल ची coming of the age series म्हणायला हरकत नाही. त्याने पुण्याच्या टेस्ट नंतर आपल्या शॉट्स वर नियंत्रण ठेवले हे भरवशाचा टेस्ट बॅट्समन होण्याच्या द्रुष्टीने झालेली सुरूवात आहे.
त्याच्यावर कप्तानपदाची जबाबदारी दिल्यावर त्याचा खेळ हा खूपच आत्मविश्वासपूर्ण खेळला. त्याचे क्रिझवर आल्यापासूनचे वावरणे अन ते दोन्ही सिक्स ( किंवा त्याचा पहिला फोर) मारणे हे म्हणजे त्यांच्या बॉलिंगला अॅटिंसिपेट करून तुच्छ लेखने होते. >> +१. एकदम Down Under कोहली जॉन्ह्सन समोर चाचपडत असताना राहआणेने असाच aggressive stance घेऊन ऑसीजची हवा काढलेली आठवले.
अरे असाम्या, जडेजाची स्तुतीच
अरे असाम्या, जडेजाची स्तुतीच केली आहे. ऑलटाईम बेस्ट असे माझ्याच लेखणीतून उतरले. त्याच्या बॉलिंगबद्द्ल नाही तर बॅटिंग बद्दल माझी चिडचिड होते की त्यात पोटँशियल असूनही ते इंटरनॅशनल लेवलला दिसत नाही. कधीकधी झलक दिसते पण तेवढीच. हरभजन जर टेस्ट १०० मारू शकतो, तर जडेजाने मल्टी १०० मारायला हवेत. बार इज सेट अ टच हाय.
पण जडेजाच्या ५० मुळे निदान ३ ते ४ मॅच जिंकायला मदत झाली हे निर्विवाद आहे.
राहूल आवडला होताच, पण त्याचं
राहूल आवडला होताच, पण त्याचं हे ट्रान्सफॉर्मशन खरच सुखावह आहे. (धवन नको रे बाबा!). तसा दुसरा एक खेळाडू ज्याने लीप्स अॅण्ड बाऊंड्स सुधारणा दाखवली तो म्हणजे उमेश यादव. कन्सिस्टंट फास्ट बॉलिंग, चांगली फिल्डींग आणी फिटनेस (टच वूड) तिन्ही आघाड्यांवर तो मस्त आहे. बर्यापैकी बॅटींग पण करतो. जडेजा च्या बाबतीत केदार शी सहमत.
येस केदार! रहाणे ची दुसर्या
येस केदार! रहाणे ची दुसर्या डावातील बॉडी लॅन्ग्वेज जबरी होती.
पण त्याचं हे ट्रान्सफॉर्मशन खरच सुखावह आहे. >> सहमत.
जडेजा वन डे मधे ओपनर म्हणूनही चालेल असा वाटतो :).
धवन चे नक्की काय झाले माहीत
धवन चे नक्की काय झाले माहीत नाही. जेव्हा आला तेव्हा सुरूवातीला जबरी खेळायचा.
"जडेजा वन डे मधे ओपनर
"जडेजा वन डे मधे ओपनर म्हणूनही चालेल असा वाटतो :)" - Another Jaysurya in making?
आता सगळ्यांनीच सगळे
आता सगळ्यांनीच सगळे लिहण्यासारखे लिहून झालय..... आता मी काय लिहू?
राहूल आवडला होताच, पण त्याचं
राहूल आवडला होताच, पण त्याचं हे ट्रान्सफॉर्मशन खरच सुखावह आहे. (धवन नको रे बाबा!).
>>>
मी तर आयपीएलपासून या पोरात क्लास आहे म्हणून व्हॉटसपग्रूपवर भांडायचो, अगदी या मालिकेच्या सुरुवातीला त्याला काढून धवनला आणा असा काही लोकांनी आवाज दिल्यावर त्यांच्यावर मी आणि माझ्यावर ते तुटून पडलेले. पण एकूणच ही मालिका संपता संपता मी त्या सर्वांचा आवाज बंद करून टाकलाय.
अर्थात ईथून तो आणखी पुढे जाऊ शकतोच. कारण शॉट सिलेक्शन किंबहुना त्याहीपेक्षा टेंपरामेंट बाबत अजून खूप सुधारणा करायला स्कोप आहे त्याच्याकडे. म्हणजे त्याचा बेस्ट परफॉर्मन्स अजून यायचाच आहे.
"मी तर आयपीएलपासून या पोरात
"मी तर आयपीएलपासून या पोरात क्लास आहे म्हणून व्हॉटसपग्रूपवर भांडायचो" - माझ्या वाक्यातला आधीपासूनच हा ऑस्ट्रेलियातल्या त्याच्या डेब्यू सिरीजपासून होता.
चार पाने पाठी जाऊन पहिल्या
चार पाने पाठी जाऊन पहिल्या टेस्ट नंतरच्या कमेंट्स वाचायला मजा येतेय आता
धवन नको रे बाबा! >> धवन नको हे ठीक आहे पण तिसरा ओपनर हवा. पुढच्या वर्षी असेच एकामागोमाग एक सामने तेही भारताबाहेर खेळणार असू तर बॅकप लागणार. तीच गोष्ट बॉलिंग ची विशेषतः फास्ट बॉलर्सची आहे. शमी, यादव, भुवी, इशांत ह्यांच्याबरोबर अजून एक तयार लागेल. स्पिनर्स ही एकमेव कॅटेगरी आहे जिथे मिश्रा, नि दोन यादव असे तीन बॅकप आहेत. (त्यावरून यादवचा wrist स्पिन वाचण्याचे ऑसीज्चे एकंदर कौशल्य बघता, मिश्राजींना आधी एखाद्या सामन्यात खेळवले गेले असते तर फरक पडला असता का अशी पुसटशी शंका चाटून गेली)
हरभजन जर टेस्ट १०० मारू शकतो, तर जडेजाने मल्टी १०० मारायला हवेत. >> भज्जी नि जडेजा दोघेही वेगेवेगळ्या कारंणांसाठी दाढी मिशा राखून आहेत ह्यापलीकडे हि तुलना कशी करतोयस रे ?
आज ची जाडेजा ची press conference ऐकलीत का ? काय perfect बोललाय नशिबाबद्दल.
"तिसरा ओपनर हवा" - खरय.
"तिसरा ओपनर हवा" - खरय. पार्थिव पटेल चा विचार होऊ शकतो. बॅकप विकेटकीपर आणी ओपनर. किंवा मुकूंद ला अजुन एक संधी मिळू शकते. पण बहुदा धवन येईल.
फास बॉलर्स मधे टीम बरोबर ४ च जातील. लागलाच तर एखादा शार्दुल ठाकूर, बुमराह वगैरे चा विचार होऊ शकतो. पण ४ पेक्षा जास्त फास्ट बॉलर्स आपण जनरली कुठे नेत नाही.
ईशांत ऐवजी पंड्याला तयार केला
ईशांत ऐवजी पंड्याला तयार केला पाहिजे टेस्ट साठी.
साहा लवकर वेअर आऊट होणार आहे. टेस्ट आणि वन-डे (पंत?) दोन्ही मध्ये विकेट कीपर ची लवकरच नितांत गरज आहे. अफ्रिकेला डीकॉक च्या रुपाने काय एकदम आखुडशिंगी बहुदुधी वगैरे गवसला आहे.
माझ्यामते कॅलिस आणि संगाकारा (?) सारखा ऑल राऊंडर दर्जा गाठायला जडेजा आणि अश्विनला बॅटिंग मध्ये खूप मोठा पल्ला गाठायचा आहे.
मला वाटते बॅट्समन-कीपर ही ऑलराऊंडर मध्ये गणायला हवा, त्यांचा जॉब बोलिंगशी म्युच्युअली एक्स्ल्युझिव आहे.
इतरांशी तुलना न करता बघायल
इतरांशी तुलना न करता बघायल हावी असे मला वाटते. पंड्याला ग्रूम करता येउ शकते. भुवी ची बॅटींग चांगली आहे ती अजून सुधारता येउ शकते. फक्त हे सगळे होताना त्यांचा 'इरफान पठाण' होउ नये एव्हढीच आशा ठेवूया.
मला वाटते की कप्तानीमधला बदल
मला वाटते की कप्तानीमधला बदल आपल्या पथ्यवर पडला. खरेच आपल्याला विराट्सारख्या सतत 'इन युअर फेस' अग्रेशनची आवश्यकता आहे का? अलीकडे बर्याच वेळा ते तथाकथित अग्रेशन बालिश, अकारण आणि महत्वाचे म्हणजे फारच वैयक्तिक इमेज जपण्यासाठी चालले आहे असे वाटते. प्रेस कॉन्फरंसमधेही, 'ऑसीज बरोबर माझी पहिल्यासारखी मैत्री राहीली नाही' वगैरे, बाबा रे, व्हाय शूड वी केअर?
मला वाटते की कप्तानीमधला बदल
मला वाटते की कप्तानीमधला बदल आपल्या पथ्यवर पडला.>>
सुरवातीपासून जे colonial hangover inferiority complex पोटी शेळपटासारखा भारतीय संघ वावरायचा ते सौरव गांगुलीने कमी केलं आणि आता कोहली त्यांचा वार त्यांच्यावरच उलटवतो आहे हे पाहून त्याच्या आक्रमकतेचा अभिमान बाळगायचा की इन्ग्लंड / ऑसिजनी डोळे वटारले की निमूटपणे मान खाली घालून ऐकायची शिकवण देऊन त्याचं खच्चीकरण करायचं? सभ्य आणि पोक्त वावर याचा अर्थ शेळपटपणा करणे नव्हे. अरेला कारे करणाराच टिकतो.
'ऑसीज बरोबर माझी पहिल्यासारखी मैत्री राहीली नाही' वगैरे, बाबा रे, व्हाय शूड वी केअर? >> याचा अर्थ तुम्ही मैदानावर वाट्टेल ते कराल आणि बाहेर मैत्रीची अपेक्षा ठेवाल तर जमणार नाही. फेअर प्ले हॅज टू बी देअर. मग पाहू काय ते. तसं होणार नाही हे उघड असताना उगाच मैत्रीची अपेक्षा ठेऊ नका - म्हणजे आता आम्ही काहीही चालवून घेणार नाही. Total zero tolerance हो
बापरे एकदम खच्चीकरण? आक्रमक
बापरे एकदम खच्चीकरण? आक्रमक होऊ नका असे कोण म्हणतेय? मुद्दा त्याच्या फ्रिक्वेन्सी, इन्टेन्सीटी आणि रॅशनालचा आहे. शेवटी हा खेळ आहे आणि यात चांगला खेळ खेळणारा टिकतो, ते आरे ला कारे हे केवळ फ्रिल्स आणि चीप थ्रील्स आहेत कोअर नव्हे.
असो, अभिनिवेश आला की चर्चा थांबते
Pages