क्रिकेट - ४

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 04:33

क्रिकेटवरील पहिले तीन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या बरीच झाली आहे. बर्‍याच दिवसांत तिथे कोणी काही म्हटलेलेही नाही. सध्याच बर्‍याच सिरीज संपल्यात, तर काही नव्याने सुरू होतायत. त्यामुळे नवीन धागा काढायला हा आयडियल टाईम आहे. आता क्रिकेट टॉक इथे करूया.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चामारी करुण नायरची अवस्था काही सुधरत नाही. फेलच गेलाय. सहा अश्विन उत्तम खेळत आहेत त्यापेक्षा. अश्विन नेहेमीच चांगला खेळतो पण आजवर त्याने प्रुव्ह केले आहे.

९५ ची पारटनरशिप तुटताच १५ ला ४ गेल्या..
जडेजाने आता ती अर्धशतक झाल्यावर बॅट फिरवणे सोडायला हवे... अल्पसंतुष्टपणा आहे तो.. स्वतःकडून त्याने आता शतकाची अपेक्षा ठेवायला हवी

काय जबरदस्त बॉलिंग चालू आहे आपल्या फास्टरची... बेटसमन आणि कीपर नुसते उड्या मारत आहेत.. वॉर्नर गेला.. रेन शॉही जाईल .. स्मिथही गेला पाहिजे.. त्याने एक बाजू अडवली तर कठीन होणार पुन्हा..

स्मिथ गेला. काढा लवकर बाकीच्यांनाही. देवाचा धावा मनात चालू राहू दे, लोकहो.

जडेजाने आता ती अर्धशतक झाल्यावर बॅट फिरवणे सोडायला हवे... अल्पसंतुष्टपणा आहे तो.. स्वतःकडून त्याने आता शतकाची अपेक्षा ठेवायला हवी
>>>
सचिनला / धोनी ला सांगायला गेला होता का कधी? की ५० नंतर बॅट वर करू नका रे, अल्पसंतुष्ट कुठले.

शतकाची अपेक्षा वेगळी, अन गरज असताना मोलाच्या धावांची भर घालताना ५० चा माईलस्टोन ओलांडल्याचं सेलेब्रेशन वेगळं.
५० नंतर बॅट उंचावणार्‍यांची शतकं होत नाहीत असं तर नाहिये ना...

६ ओव्हर २०-२० सारखे खेळा पहिल्या विकेटसाठी किमान ३०-४० धावा जरी आजच्या दिवसात ठोकून काढल्या दडपण एकदम निघून जाईल.

बॅट ऊंचावणे वेगळे आणि मोठा तीर मारल्यासारखे फिरवणे वेगळे.
गरजेच्या वेळी ते चांगलेही वाटते, आणि आज नक्कीच गरजेची खेळी होती.
मात्र ओवरऑल गरज असो नसो तो हे करतोच.
आधी तो फलंदाज म्हणून फ्लॉप होता. हळूहळू तो स्वतःला सिद्ध करू लागला आणि तेव्हा ड्रेसिंगरूमकडे बघून प्रत्येक अर्धशतकानंतर बॅट फिरवू लागला.
आता त्याने स्वतला सिद्ध केल्यानंतर याची गरज नाही. ईथून त्यानेच स्वतःची लेवल उंचवायला हवी.
जर त्याची कारकिर्द शतकाशिवाय संपली तर मात्र त्याने माझ्याकडे रडत येऊ नये.

तो मॅचच्या आधी ॠन्म्याचे दर्शन आणि मार्गदर्शन दोन्हीही घेत असेल. Lol
पुढच्या वेळी आला की त्याची कान उघडणी कर हा ॠन्म्या. Proud

>>जर त्याची कारकिर्द शतकाशिवाय संपली तर मात्र त्याने माझ्याकडे रडत येऊ नये.

हे जरा संझगिरी स्टाईल वाटतय ना? Wink
की कणेकरी स्टाईल?

३ विकेट्स गेल्यानंतर ऑसीज ना १०० च्या आत की बाहेर रोखत आहेत हा मोठा प्रशन होता. आता कॉन्फिडन्टली Game is ours to lose म्हणता येईल. अजून ४० एक जास्तीचे रन्स झाले असते तर मला वाटतं सॉलिड थ्रिलर बघायला मिळाला असता. ह्या पीच वर ऑसीज अजूनही ३-४ विकेट्स घेत फाईट बॅक नक्कीच करतील पण कदाचित थ्रिलर होणार नाही.
रहाणेचे कौतूक!. पहिल्या ईनिंग मधले यश बघता कुलदीप यादवला पहिल्या पासून आणि अधिक ओवर्स बोलिंगला न लावण्या मागे नक्की काय कारण असावे हे जाणून घ्यायची ऊत्सुकता आहेच. कदाचित बाकीचे धक्के देतच होते म्हणून त्यांचं मोमेंटम काढून घ्यायचं नसेल. रात्री ऊठून जेव्हा बघितले की यादव ला विकेट्स पडत आहेत माझा समज झला कुलदीप यादवला तेव्हाच वाटले पीच चे काही खरे नाही आणि १५० च्या आसपास स्कोअर झाल्यास मॅच गेलीच.

स्मिथ ने अगदी hit me ball असला तरी one shot too many च्या नादात घाई गडबड करून काम सोपे करून टाकले. २०० पर्यंत लीड असता तर कठीण असते. ऑसीज will come hard but as scoreboard will tick away beyond 50, it might get easier. उगाच नसता बाऊ न करता खेळले कि झाले. It is our game to lose.

जाडेजाने ह्या सीजन मधे ६ ५० स्कोर केलेत हे लक्षात आले नव्हते.

साहाने किपिंग बद्दलचा वाद आज मिटवून टाकला अस म्हणायचे का ?

ह्या ४ टेस्ट्स मस्त झाल्या तरी हा सीजन थोडा अधिकच लांबलाय असे वाटते. एका सीजनमधे दोन मोठ्या प्रदीर्घ सिरीज ठेवणे अति होतेय. फक्त प्लेयर्स नाही तर प्रेक्षकांसाठी पण. पुढे लगेच आयपील नि चँपीयन्स ट्रॉफी आहेतच. प्लेयर्स ची शारिरीक नि मानसिक क्षमता पूर्ण डावाला लावल्यासारखे वाटतेय. उमेश यादव नि जाडेजा चे विशेष कौतुक करायला हवे त्यांनी पूर्ण सीजन फीट राहून जेव्हढ्या ओव्हर्स टाकल्या आहेत ते बघून. अश्विन जर पूर्ण फीट असता तर ही शेवटची सिरीज अधिक रंगतदार झाली असती. सोन्याचे अंडे देणारि कोंबडी कापायची घाई बीसीसीआय ला होउ नये.

"हे जरा संझगिरी स्टाईल वाटतय ना? की कणेकरी स्टाईल?" - संझगिरी म्हणजे उपमांचा भडिमार. कधी कधी मुर्गीपेक्षा मसालाच जास्त होतो तसा. त्यातून, ते घड्याळापेक्षा कॅलेंडर वर नजर ठेवून खेळणे, शरीरात बचावात्मक पेशी नसणे, वगैरे एकदम स्टॉक डिलिव्हरीज.

कणेकर - कट्ट्यावरचे जोक्स लिखीत स्वरूपात. खेचणे, हटाई करणे हा स्थायीभाव.

असो, आजची मॅच पाहिली नाही (कितीवेळ जागणार?) पण हायलाईट्स मधे जाणवलेल्या काही गोष्टी: जडेजा चा काऊंटरअ‍ॅटॅक, उमेश आणी भुवनेश ची फायरी स्पेल्स (भारतीय फास्ट बॉलर्स ऑसी फलंदाजांना शॉर्ट बॉल्स वर नाचवताना पाहून भरून आलं मला), साहा ह्या इलॅस्टीक च्या माणसाची तुफान विकेटकिपींग (वादासाठी नाही, पण खरच धोनी मुळे ह्या माणसाच्या टेस्ट करियर ची काही वर्ष वाया गेली. टेस्ट विकेटकिपींग मधे साहा ईतर जे विकेटकीपर्स बघितले आहेत, त्यांच्यात फारच सरस आहे.), रहाणे चे स्लिप मधले रिफ्लेक्सेस आणी शेवटी ऑसी फास्ट बॉलर्स चा भारतीय ओपनर्स वर हल्ला. उद्याच्या जबरदस्त क्रिकेट ची जबरदस्त तयारी झाली आहे.

हायझेनबर्ग, दिली होती आज हॅंड्सकॉंब आणि मॅक्सवेल आल्यावर कुलदीपला बॉलींग पण मॅक्सवेलने जरा धुतला त्याला!
मॅक्सवेल आउट झाल्यावर त्याला परत काढू म्हणून ठेवला असेल मागे पण तोपर्यंत आपले नेहमीचे यशस्वी भरात आले होते!

एक तो रहाणे सोडला तर आपल्याला स्लीपमधल्या कॅचेसवर काम करायची फारच गरज आहे!

"एक तो रहाणे सोडला तर आपल्याला स्लीपमधल्या कॅचेसवर काम करायची फारच गरज आहे!" - सहमत. मला आश्चर्य वाटतं की हल्लीच्या फिटनेस च्या आणी फिल्डींग ड्रिल्स च्या काळात राहूल आणी करूण नायर ईतके कच्चे मडके कसे आहेत?

जबरी खेळलेला दिसतोय जडेजा. अजून हायलाइट्स पाहिले नाहीत.

पहिल्या डावात मात्र रहाणे ने पुन्हा एक संधी सोडली मोठ्या स्कोअर ची. तो ४०-५० च्या पुढे फारसा गेलेला नाही इतक्यात.

करुण नायर सिली पॉइंटला चांगले पकडतो कॅचेस!

आश्विनने कसला सीटर सोडला राव आज स्लीपमध्ये; उमेश यादवच एक्स्प्रेशन बघण्यासारखे होते!
मुरली विजयला पण आज वरच्यावर उचलायला जमला नाही कॅच!

स्मिथ ने अगदी hit me ball असला तरी -----

तुम्ही हायलाईट पाहीले का? म्हणून
पहीले दोन हिट मी आउटस्वींग होते तिसरा नेमका त्याने इनस्विंग टाकला त्यात आतली कड घेतली

रहाणे आणि स्मिथ स्लिप मधे कसले कॅचेस उचलताहेत राव... स्मिथनी मागे झूकत घेतलेला कॅच काय किंवा रहाणेनी अश्विनच्या बॉलिंगवर मागे होते घेतलेला कॅच काय... एक नंबर कॅचेस होते..

आज ऑसीजच्या बॅटींगची सॉलिड ततपप झाली पण, तुफान बॉलिंग भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादव..

आपण बॅटींगला आल्यावरची इएसपीएन वरची कॉमेंट्री जबरी होती, पहिली फोर बसल्यावर हव्या असलेल्या २७ पैकी ही पहिली..

मॅच खिशात आहे पण उद्या सकाळी पहिल्या सत्रात ऑसी फास्ट बॉलरला नीट खेळले पाहिजे, जर ते सकाळीच घुसले तर मात्र कहानी मे ट्वीस्ट होऊ शकतो.

Pages