मायबोलीच्या ऊर्ध्वश्रेणीकरणानंतर ..
मायबोलीच्या गाभ्याचे (core software ) उर्ध्वश्रेणीकरण (Upgrade) यशस्वीरित्या पार पडले आहे. तुम्हा सगळ्यांच्या सहकार्याबद्दल आभारी आहोत.
इतके मोठे उर्ध्वश्रेणीकरण या अगोदर आपण २००७ मधे केले होते. नंतर मधून मधून छोटे बदल आपण नेहमीच करत आलो आहोत. पण गेल्या १० वर्षात मायबोली वापरत असलेल्या संगणक प्रणालीच्या गाभ्यात काही मूलभूत बदल झाले आणि त्यामुळे आपल्यालाही हे बदल करणे आवश्यक झाले. यातले मुख्य बदल सभासदांना दिसणारही नाहीत. पण मायबोलीच्या भविष्यासाठी ते खूप महत्वाचे आहेत. किंवा सभासदांना फारसे बदल न जाणवू न देता , हा मुख्य बदल कसा करता येईल हे एक महत्वाचे उद्दीष्ट या प्रकल्पामागे होते. एकदम खूप नवीन सुविधा उपलब्ध होतील अशी काही सभासदांची अपेक्षा असेल आणि आम्ही ती पूर्ण केली नसेल तर त्याबद्दल दिलगीर आहोत.
सभासदांना लक्षात येणारे मुख्य बदलः
१. मोबाईलवरून मायबोली पाहणे सुलभ झाले आहे.
२. सदस्याना आपली संपूर्ण विचारपूस अप्रकाशीत करायची सोय सध्या तांत्रीक कारणामुळे उपलब्ध नाही. पण आता स्वत:ची विचारपूस तुम्ही मॉडरेट करू शकता. नको असलेले प्रतिसाद काढून टाकायची सोय दिली आहे.
खालील गोष्टींवर अजून काम चालू आहे:.
१. Smileys (स्मीतचित्रे) देता येत नाही आहेत.
२. ग्रूपमधल्या सदस्यांची संख्या आणि यादी दिसत नाही आहे.
३. ग्रूपमधल्या लेखांची विषयवार यादी दिसत नाही आहे पण शब्दखुणांचा वापर करून किंवा शोध सुविधा वापरून कुठल्याही धाग्यावर जाता येईल.
४. निवडक १० मध्ये नोंद केलेले धागे दिसत नाहीत.
५. ग्रूपच्या नावावरून ग्रूपच्या मुख्य पानावर जात येत नाही : पण धाग्याखाली ग्रूपचे नाव दिलेले आहे. त्या दुव्यावरून तुम्ही ग्रूपच्या मुख्य पानावर जाऊ शकता.
६. तांत्रीक कारणांमुळे मायबोली बखर सध्या चालत नाही आहे. त्यामुळे एका विशीष्ट दिवशीच्या धाग्यांचा शोध घेण्याची सुविधा नाही. त्या ऐवजी प्रत्येक पानावर असलेल्या शोध सुविधेचा वापर करू शकता. लेखक स्वतःच्या व्यक्तिरेखेतूनही त्यांच्या जुन्या लेखनावर जाऊ शकतात.
चाचणी समितीत काम केलेल्या खालील मायबोलीकरांचे खूप आभार. त्यांनी वेळोवेळी तत्परतेने केलेल्या सुचनांमुळे आणि शोधलेल्या चुकांमुळेच आम्ही हा मोठा प्रकल्प पार पाडू शकलो.
rmd, चिन्नु, प्रिंसेस, राया, वैद्यबुवा, श्री, संपदा, स्वप्ना_राज, हर्पेन
अजून काही चुका राहून गेल्या आहेत. चाचणी समितीने काढलेल्या सगळ्याच चुकांवर काम करणे वेळेअभावी शक्य नव्हते. त्यामुळे काही चुका तशाच ठेवून मायबोली पुन्हा सुरु करण्याचा निर्णय आम्हाला जाणीवपूर्वक घ्यावा लागला. येत्या काही दिवसात या दुरुस्त करण्याचा आमचा प्रयत्न राहील..
या व्यतिरिक्त काही चुका /अडचणी / नवीन प्रश्न आढळते तर कृपया याच पानावर खाली प्रतिसादांमधे लिहा.
तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याबद्दल आभारी आहोत.
फोन च्या सेटींगमधे ऑप्शन
फोन च्या सेटींगमधे ऑप्शन असायला हवा, उदा. आयफोन-settings-Safari-Clear History and Website data
प्रतिसाद लिहिताना "ओळींचे
प्रतिसाद लिहिताना "ओळींचे जस्टिफिकेशन" चुकत आहे. निव्वळ स्पेस दिला तरी काही शब्द प्रतिसाद save केल्यानंतर दुसर्या ओळीवर दिसतात. खर नुसता स्पेस दिल्यावर ते शब्द त्याच ओळीवर पुढे दिसायला हवे. तसे न दिसता खालच्या ओळीवर दिसत आहे. हे खासकरून मोठा प्रतिसाद लिहिल्यावर लक्षात येते.
>प्रतिसाद लिहिताना "ओळींचे
>प्रतिसाद लिहिताना "ओळींचे जस्टिफिकेशन" चुकत आहे
हे तुम्ही कुठल्या ब्राऊझर मधून , कुठल्या ऑपेरेटींग सिस्टीम, कुठल्या स्क्रीन साईझमधून मधून पाहता यावर अवलंबून असते. त्यातही इंग्रजी शिवाय इतर भाषेतले शब्द घेऊन ब्राऊझरची पुरेशी चाचणी झालेली नसते त्यामुळेही असे होऊ शकते. मायबोलीला त्याबद्दल काही करता येईल असे वाटत नाही.
हं आता फक्त प्रतिसादापुरताच हा प्रश्न असेल आणि पानावरच्या मुख्य मजकुरात येत नसेल तर काहीतरी शोधता येईल.
फोन च्या सेटींगमधे ऑप्शन
फोन च्या सेटींगमधे ऑप्शन असायला हवा, उदा. आयफोन-settings-Safari-Clear History and Website data>>> धन्यवाद वेमा. हे केल्यावर माझा प्रॉब्लेम सुटला.
आधी दोनदा सांगूनही काय लक्ष
आधी दोनदा सांगूनही काय लक्ष देत नाही बॉ
शेवटचा प्रतिसाद
6 दिवस ago
अजून तसंच आहे, अगदी या पानावरही !!!
मलाही आता काही प्रॉब्लेम येत
मलाही आता काही प्रॉब्लेम येत नाहीये. धन्यवाद, वेमा.
@दिनेश.
@दिनेश.
वर शीर्षकाजवळ असलेला "शेवटचा प्रतिसाद 6 दिवस ago" हे मायबोलीच्या २% पेक्षा कमी पानांवर आहे ९८%+ पानांवर नाही. ते बदलले नाही कारण त्यावर (माहीती चूक असण्यावर) अजून उपाय सापडलेला नाही आणि म्हणूनच इतर ९८% पानांवर सुरु केलेले नाही. मला हे काढून् टाकायचे तर २ मिनिटात काढता येईल. पण ते इथूनही काढूनच टाकले तर मूळ प्रश्न सोडवणे अजूनच अवघड जाईल. इतर २% मधली पाने या पानाइतकी अपडेट होणारी नाहीत. त्यामुळे कुठल्यातरी पानावर, चुकीची माहीती असली तरी, प्रश्न नेमका कुठून येतो आहे हे सोडवण्याची माहीती गोळा करण्यासाठी ते आवश्यक आहे. म्हणून ते इथेच ठेवले आहे.
@स्वाती_आंबोळे,आऊटडोअर्स
@स्वाती_आंबोळे,आऊटडोअर्स
धन्यवाद आवर्जून सांगितल्याबद्दल
गुगल क्रोम , विंडो ७, वापरत
गुगल क्रोम , विंडो ७, वापरत आहे. हा प्रोब्लेम आता आता सुरु झाला आहे. या आधी म्हणजे अपडेट केल्यानंतर असा प्रोब्लेम नव्हता. आता काही दिवसांपासून सुरु झाला. प्रतिसाद तपासा वर क्लिक केल्यानंतर save केले की ओळ व्यवस्थित दिसते.
@दिपस्त
@दिपस्त
१३ जानेवारी २०१५ नंतर मायक्रोसॉफ्ट स्वतः विंडो ७ सपोर्ट करत नसल्यामुळे याबद्दलची तांत्रिक माहिती मिळवणे अवघड आहे. त्यामुळे मायबोलीला तुमचा प्रश्न सोडवणे अवघड आहे. प्रोब्लेम आता आता सुरु झाला असला तरी त्याची कारणे अनेक असू शकतात आणि त्यावर मायबोलीचा कंट्रोल असेलच असे नाही.
https://www.cnet.com/news/windows-7-support-ends-today/
धन्यवाद
धन्यवाद
मला असं वाटतंय, माबो ची
उत्तम....
मला असं वाटतंय, माबो ची
मला असं वाटतंय, माबो ची डागडुजी चालुच आहे. तर थोडेसे ग्राफिक्स दिले तर उत्तम, शिवाय लोगो ही माॅडीफाय करू शकलात तर....असं माझं तरी मत आहे.....त्या साठी माझी काही मदत झाली तर माझ्यासाठी पर्वणीच ठरेल...
अॅडमीन, हे उर्ध्वश्रेणीकरण
अॅडमीन, हे उर्ध्वश्रेणीकरण पूर्ण होईपर्यंत विपु बघणार नाही, त्यावर अंमल करणार नाही, जमणार नसेल तर तसे कळवणार सुद्धा नाही असे ठरवले आहे का? इथे हे लिहायचे नव्हते पण निदान इथले वेळच्यावेळी कोणीतरी वाचते आहे हे दिसतंय म्हणून तिथलं धुणं इथे ओढुन आणून धुते आहे. __/\__
Webmaster , i can not type in
Webmaster , i can not type in marathi from my phone on mabo. I can type only one word. thereafter it does allow to type other word. I am using chrome browser . However I can easily type in marathi on facebook and whatsapp .
i can not type in marathi
i can not type in marathi from my phone on mabo. I can type only one word. >> एक अक्षर टाईप केल्यानंतर दुसरे अक्षर टाईप केल्यावर ओव्हरटाईप होते का? असे असेल तर तुम्ही नविन मराठी किबोर्ड इन्स्टॉल करा. माझा पण सेम प्रोब्लेम होता. मोबाईल मधला ओरिजनल किबोर्ड चालत नाही. मला नविन दुसरा इन्स्टॉल करावा लागला.
हो दीपस्त, म्हणजे शब्द टाईप
हो दीपस्त, म्हणजे शब्द टाईप केल्यावर ओव्हर राईट होऊन ब अ असं येत . माझ्याकडे गुगल इंडिक कीबोर्ड आहे हे हि आता कॉपे केलेय . तुम्ही सांगितलेलं करून पाहते . धन्यवाद
मला वाटत कि हा प्रॉब्लेम
मला वाटत कि हा प्रॉब्लेम क्रोम ब्राउझरचा असावा. दिपस्तनी सांगितल्याप्रमाणे करून बघितलं पण काहीच फरक पडला नाही. शेवटी दुसऱ्या ब्राउझर मधून मायबोली ओपन केलं. सध्या तरी प्रॉब्लेम सुटला आहे
@जाई,
@जाई,
मला असे वाटते आहे की काही कारणामुळे तुमच्या ब्राऊझर मधे देवनागरी लिहण्यासाठी लागणार्या सगळ्या फाईल डाऊनलोड झाल्या नसाव्यात. ब्राऊझरची कॅश साफ केली तर हा प्रॉब्लेम सुटू शकेल कदाचित. हा प्रॉब्लेम क्रोम ब्राउझरचा असता तर क्रोम वापरणार्या अजून अनेकांना आला असता. जर तुमचा क्रोम ब्राऊझर खूप जुन्या OS वर असेल तर मात्र तो क्रोम ब्राऊझर चा असून शकतो कारण तुमच्याकडे नवीन वर्जन नसू शकेल.
मलाही सेम प्रॉब्लेम आहे.
मलाही सेम प्रॉब्लेम आहे. क्रोम जेव्हा डेस्कटॉप वर वापरते तेव्हा मराठीत लिहिता येते पण मोबाईलवर नाही.
दुसरीकडे टायपुन ईकडे पेस्ट करावे लागते.
मग ईतका खटाटोप करण्यापेक्शा प्रतीसाद देणेच टाळते
https://play.google.com/store
https://play.google.com/store/apps/details?id=com.green.key.marathi&hl=en
जाई मी हा कीबोर्ड वापरतोय त्याने माझा प्रोब्लेम संपला आहे.
अभार वेमा,
अभार वेमा,
गेल्या काही दिवसात आय ई आणि क्रोमवरही मायबोलीचे(च) पान डेड होत आहे. प्रतिसादाच्या खिडकित क्लीक करता येत नाही. रिफ्रेश करावे लागतेय.
वेबमास्टर , धन्यवाद! तुम्ही
वेबमास्टर , धन्यवाद! तुम्ही सांगितलेला उपाय करून पाहते.
दिपस्त , थँक्स
@दिनेश,
@दिनेश,
काही कारणामुळे तुमच्या ब्राऊझर मधे मायबोलीवर लिहण्यासाठी लागणार्या सगळ्या फाईल डाऊनलोड झाल्या नसाव्यात. ब्राऊझरची कॅश साफ केली तर हा प्रॉब्लेम सुटू शकेल.
आज मला आयफोनवरून टाईप करायला
आज मला आयफोनवरून टाईप करायला खूप त्रास पडला. प्रत्येक अक्षर उमटायला भरपूरच वेळ लागत होता. ब्राऊझर कॅश साफ करून पाहीन आणि परत कळवीन.
आज मि सहज माझि विपु चेक केली
आज मि सहज माझि विपु चेक केली तर मला काही नविन विपु दिसल्या.
पण त्यांचं नोटिफिकेशन मला दिसलं नाहिये. उदा. मी माझे सदस्यत्व मध्ये गेले की बार मध्ये विचारपूस च्या समोर कंसात मला आलेल्या विपुंची संख्या कळत होती. पण ती मला इतके दिवस तिथे एक पण आकडा दिसला नाही, आणि मी त्यामुळे मेन विपुत जातच नव्हते. आज सहज उघडली तर ८ नविन विपु दिसल्या.
कृपया याचं काहीतरी करा. किंवा माझं काही चुकत असेल तर तसं कळवा.
मी मायबोली क्रोम मध्ये उघडते.
@दक्षिणा
@दक्षिणा
हा प्रश्न सगळ्यानाच आहे. त्यावर काम सुरु आहे पण अजून उपाय सापडलेला नाही. तुम्ही मायबोलीवर दिलेला ईमेल योग्य असेल तर विपूच्या ईमेल मात्र येत आहेत याची चाचणी करून खात्री केली आहे.
आडमिंन -अँड्रॉइड chrome
आडमिंन -अँड्रॉइड chrome मध्ये मायबोली ओपन केली की भलत्याच साईट्स उगडतायत.. युअर फोने has virus वगैरे पोप उप येतायत.. फायरफॉक्स वापरला कि issue नाहीय...
वेबमास्टर त्वरित उत्तर
वेबमास्टर त्वरित उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद. मायबोलीवर दिलेला इमेल आयडी योग्य आहे, पण तो ही मी वारंवार तपासत नाही, त्यामुळे हा विपुचा प्रश्न सुटेपर्यंत रोज विपुत जाउन तपासेन.
धाग्याखाली असलेल्या बॉक्स
धाग्याखाली असलेल्या बॉक्स मधली जाहिरात रिफ्रेश झाली (जी बहुतेक दर मिनिटाने होते) कि पेज ऑट्मॅटिकली स्क्रोलप होउन ती जाहिरात बघायला भाग पाडते. पेज सतत वर-खाली करत राहणं वैतागवाणं झालेलं आहे. अपॅरंट्ली धिस सीम्स लाइक ए न्युली इंट्रोड्युस्ड बग...
मॅकोएस १०.१२.३ (सिएरा); सफारी
Pages