काही वर्षांपूर्वी वडिलांचा मृत्यू झाला. आमच्या मूळ गावापासून दूर शहरात असणाऱ्या मोठ्या इस्पितळात आयसीयूमध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ती त्यांची अखेरची रात्र होती हे त्यांना कळून चुकले होते. ते त्यांनी आम्हाला डोळ्याच्या खुणेने सांगायचा प्रयत्न केला पण आम्हाला ते कळले नाही. पोक्तपणाने सल्ला देणारे मोठे असे कोणी आमच्याजवळ नव्हते. आईच्या मनाला हि गोष्ट फार लागून राहिली आहे. इतक्या वर्षानीही तिला असे वाटते कि त्यांना त्या रात्री आपण गावाकडे हलवले असते तर बरे झाले असते. एकटेपणी आयसीयूमध्ये त्यांचा शेवट झाला. त्यापेक्षा निदान आसपास सर्व असताना घरी मृत्यू आला असता तर त्यांचा मृत्यू मनाला इतका लागून राहिला नसता असे ती वारंवार बोलून दाखवते.
जेंव्हा वारले तेंव्हा तर हि गोष्ट तिच्या मनाला खूप लागली होती. कित्येक दिवस ती "ते सांगत होते. आपल्याला कळले नाही. त्यांचा आत्मा इस्पितळातच राहिला" असे बडबडत असायची. त्यांच्या आत्म्याला मुक्ती मिळालीच नाही असे तिच्या मनाने घेतले आहे.
जिथे व्यक्तीचा मृत्यू होतो तिथेच तो आत्मा रेंगाळत असतो हे सत्य आहे का? वडिलांचे मृत्यूनंतरचे सर्व विधी घरीच केले. तरीही त्यांच्या आत्म्याला शांती/मुक्ती मिळाली नाही असे आईच्या मानाने घेतले आहे. समजून सांगितले तरी ती मानत नाही. काही दिवसांनी पुन्हा तेच तेच तिच्या मनात येत राहते. रात्री-बेरात्री उदासपणे उठून बसते. वडील इस्पितळातून हाक मारत आहेत अशी स्वप्ने तिला अधूनमधून पडतात. यावर कृपया उपाय सांगावा.
लिंबूरावाना संपर्क करा.
लिंबूरावाना संपर्क करा.
वाईट वाटले. तुमच्या
वाईट वाटले. तुमच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत माझ्याकडे पण तुमच्या आईच्या समाधानासाठी काहि विधी/पुजा करता येण्यासारखं असेल तर निदान तुमच्या आईची रुखरुख तरी कमी होईल.
तुमच्या आईच्या समाधानासाठी
तुमच्या आईच्या समाधानासाठी काहि विधी/पुजा करता येण्यासारखं असेल तर निदान तुमच्या आईची रुखरुख तरी कमी होईल. >> +१ क्लोजर मिळेल असं काहीही करा, आणि मन गुंतवायला काही साधन तयार करा.
राया यांच्याशी सहमत.
राया यांच्याशी सहमत.
ओळखीचा भटजी पुजारी वगैरे पकडून आईंचा विश्वास बसेल असे विधी करून घ्या. एकदा मनातून ते निघून जाणे गरजेचे.
माझे आजोबा-आजी गेवराईला
माझे आजोबा-आजी गेवराईला राहायचे. तेव्हा तिथे हार्टअॅटॅक नन्तर करायचे उपचार नसायचे, बीड ला जावं लागायचं.
जेव्हा माझया आजोबांना तिसरा हार्टअॅटॅक आला, ते माझया आज्जीला म्हणाले "तू माझयासोबत चल". माझी आज्जी नाही गेली सोबत. बीडला आजोबांनी देह ठेवला. ही गोष्ट माझया आज्जीला खूप लागून राहिली.
माझी आज्जी नेहमी आजोबांसोबत राहिली मात्र शेवटच्या क्षणी ती आजोबांसोबत नव्हती.
मृत्यूनंतर आत्म्याला एखाद्या
मृत्यूनंतर आत्म्याला एखाद्या ठिकाणी जायचे असेल तर वास्तुपुरुषाची परवानगी घ्यावी लागते. ह्याला अपवाद २
जिथे मृत्यू झाला ती जागा आणि जिथून स्मशानात नेले ती जागा.
पण मुक्तीशी संबंध नसावा.
मृत्यूनंतर आत्म्याला एखाद्या
मृत्यूनंतर आत्म्याला एखाद्या ठिकाणी जायचे असेल तर वास्तुपुरुषाची परवानगी घ्यावी लागते. ह्याला अपवाद २
जिथे मृत्यू झाला ती जागा आणि जिथून स्मशानात नेले ती जागा.
पण मुक्तीशी संबंध नसावा.
संज्योत देशपांडे यांचे अटळ दु
संज्योत देशपांडे यांचे अटळ दु:खातून सावरताना हे पुस्तक जरुर वाचा. http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5560281914542244014?BookNa...
शास्त्रीय दृष्टया आत्मा हां
शास्त्रीय दृष्टया आत्मा हां शरीराच्या मृत्यू नंतर लगेचच फ्री होत असतो पण आपण जे विधी करतो ते त्या आत्म्याच्या पुढील सुखरूप प्रवासासाठी म्हणजेच पुन्हा चांगल्या ठिकाणी जन्मास यावा ह्या शुद्ध भावनेपोटी. जे जे काही करु ते सर्व आपल्या मनास संतोष लाभावा म्हणून असते कारण त्या वैयक्तिक मनुष्याने जे काही कर्म आयुष्यात केले त्यांप्रमाणेच पुढील गती मिळत असते हे आपणास कर्मफल सिद्धांत सांगतो. आपला ह्या प्रवसातील हातभार लावण्यासाठी मृत व्यक्तीच्या नावाने रामरक्षा पठण केल्यास (शक्यतो आप्त मंडळी एकत्र जमुन म्हणजेच सामूहिक पठण) निश्चित फायदा होतो. रामनाम हेच तारक आहे हे काही वेगळे सांगायला नकोच. बाकी आपल्या व्यक्तिगत सामजिक चालिरितीप्रमाणे सर्व विधि करणे हे आवश्यक सोपस्कार पार पाडणे इतपतच महत्वाचे आहे.
श्रीराम
रायांच्या सल्ल्याशी सहमत.
रायांच्या सल्ल्याशी सहमत.
प्रकाश घाटपांडे तुमचा अशा पुस्तकांचा व्यासंग दिसतोय. अशा पुस्तकांची यादी मिळाल्यास छान होईल.
घाटपांडे सर स्वतःही अशा
घाटपांडे सर स्वतःही अशा विषयांवरील पुस्तकांचे लेखक आहेत.
>>>> तरीही त्यांच्या
>>>> तरीही त्यांच्या आत्म्याला शांती/मुक्ती मिळाली नाही असे आईच्या मानाने घेतले आहे. समजून सांगितले तरी ती मानत नाही. काही दिवसांनी पुन्हा तेच तेच तिच्या मनात येत राहते. रात्री-बेरात्री उदासपणे उठून बसते. वडील इस्पितळातून हाक मारत आहेत अशी स्वप्ने तिला अधूनमधून पडतात. यावर कृपया उपाय सांगावा. <<<<<
धाग्यात्/शीर्षकात विचारलेले प्रश्न, व वर उल्लेखिलेली अवस्था, या भिन्न बाबी आहेत.
मातोश्रींना वेळीच चांगल्या मानसोपचार तज्ञाकडे नेऊन आणा, त्याने भागले नाही, तर त्यांचे समाधानाकरता काही एक विधी/कृति करा.
धाग्याचा विषय "मृत्यूचे ठिकाण आणि आत्म्याची मुक्ती" हा संपुर्णपणे भिन्न असुन सखोल आहे.
पण सद्यस्थितीतील अन्निसधार्जिणे व धर्मविरोधी कायदे बघता या विषयावर काही एक बोलायची/लिहायची आमची टाप राहिलेली नाही इतकी अघोषित वैचारिक दहशत या अन्निसवाल्यांच्या, जे स्वतः देव/आत्मा वगैरे मानितच नाहीत, त्यांच्या तथाकथित बुद्धिप्रामाण्यवादी वैज्ञानिक्दृष्टीच्या(?) आग्रहामुळे झालेल्या कायद्यामुळे आहे.
सबब वरील विषयावर उघड बोलणे/लिहिणे अशक्य.
मोदीसरकार आले आहे, निर्भय हो
मोदीसरकार आले आहे, निर्भय हो लिंबू !
घाटपांडे सर स्वतःही अशा
घाटपांडे सर स्वतःही अशा विषयांवरील पुस्तकांचे लेखक आहेत.>>>
अच्छा! वाचायला पाहिजे.
तुमच्या आइच दु:ख समजु शकते ,
तुमच्या आइच दु:ख समजु शकते , काळ हेच औषध आहे यावर , तुमच्या आइच्या जवळच आणी वयाने ज्येष्ठ कुणि याबाबत मदत करु शकेल , माझे वडिल ३ वर्शापुर्वी आइशी बोलता बोलता सडन कार्डियेक अॅरेष्ट ने गेले, जनरली काय झाल कस झाल यामधे कुठेतरी प्रिसिम्टम्स कनेक्ट केले जातात , त्याचा बोल आइने स्वतःला लावुन घेतला होता , तिला आपण थोड् अजुन केअरफुल असायला हव होत अस स्तत १ वर्ष वाटत राहिल . कुठेतरी तुमच्या आइने जोडिदाराच जाण अजुन स्विकारलच नाहिये.
लिन्बु म्हणतोय तस एखाद्या मानसोपचार तद्य व्यक्तिचा सल्ला घ्या. ते क्लोजर मिळण आवश्यक आहे.