निसर्गाच्या गप्पा (भाग ३१)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 November, 2016 - 02:23

सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३१ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.

थंडीच्या दिवसांचे आगमन होत आहे. वातावरण अगदी गार गार होत जाणार आहे. दवबिंदूंचे मोती गवता पानांवर अलंकार सजवणार आहेत. आता शेकोटी आणि त्या भोवतालच्या गप्पा रंगणार. भाजीचे मळे हिरवेगार होऊन पिकाला येऊ लागले आहेत. सकाळच्या थंड हवेत पशु पक्षांची कुडकुडती किलबिल चालू होणार. सकाळची सूर्यकिरणे हवीहवीशी वाटू लागणार. चला तर स्वागत करूया येणार्‍या हिवाळी ऋतूचे.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण ते गिरिपुष आहे. चेरी ब्लॉसम नाही. >> हो का!
मला माहित नव्हते, कोणीतरी चेरी ब्लॉसम सांगितलेले.

धन्यवाद दिनेशदा Happy
अवांतर>>> दिनेशदा.....असे मी तुम्हांला दादा या अर्थाने म्हणत आहे Happy

जिप्सी, धन्यवाद
पण ज्या दिवशी तुमच्यासारखी फोटोग्राफी जमेल तो दिवस सुदीन Happy
तुम्ही काढलेले सुंदर फोटो पाहून जळायला होत अगदी Sad (कृपया हलके घेणे.)

वा. आज खुप बर वाटत आहे इतका फुललेला धागा पाहून. खरच धाग्याचा पण वसंत सुरु झाला आहे. सगळ्यांनी काय सुंदर फोटो काढले आहेत. अस वाटत ते फोटो जिथे काढलेत तिथे प्रत्यक्श जाऊन ती फुले पहावीत.

हे आयरीस शांकली कडून साधना आणि साधना कडून माझ्याकडे अस भेट देत आल आहे. मागिल वर्षी फुले धरली होती. आताही फुलाचे कोंब आले आहेत.

अय्यो. बघते परत प्र यत्न करुन.

टिना कालचे तुम्ही काढलेले झाडाचे सगळे फोटो आणि वृत्तांत टाक ना इथे.

काल मी आणि शांकली/अंजली पुरंदरे दोघींनी तिच्या घराजवळील परिसर पिंजुन काढला.. तिने मला भरपूर वृक्ष दाखवले..
सांयकाळ झाल्यामुळे काही वृक्ष बघायचे मात्र सुटले.. आता आणखी दोन चार ठिकाणं बघायचे आहेत Happy .
सोबतीला अंजलीची मैत्रीण निलिमा सुद्धा येणार होती पण काही कारणास्तव तिला येता आले नाही पण तिने आम्ही निघण्यापूर्वी मात्र आठवणीने तिचा Canon eos 600d आणुन ठेवला..आणि त्याने आम्हाला भरपूर मदत केली...
माझ्या सुदैवाने त्यातली बरीच झाडं फुलावर होती.. माझ्यासोबत चालती बोलती डिक्शनरी असल्यामूळे अगदी हे काय म्हटल्याम्हटल्या नावं समोर यायची.. अर्धा वेळ माझा आ वासण्यातच गेला होता आधी..आता जरा सवय होतेय..
तिची डायरी बघीतली. त्यात तिने पुण्यात बघीतलेल्या वृक्षांची पत्त्यासहित नोंद करुन ठेवलीए..केवढा तो व्यासंग..
मला दोन आयरिस झाडांची भेट सुद्धा मिळालीए Happy आणि त्यासुद्धा बाळसेदार...येत्या दोन चार दिवसात मीपन इथे आयरिसचा झब्बु देणारे Wink
आता काही नव्या जुन्या वृक्षांचे प्रचि टाकते इथं..माहिती असलेली नावं पण देते...
गर्दी व्हायला नको म्हणुन एका प्रतिसादात दोन चार दोन चार प्रचि देते..

मागे कात्रज घाटात गेलेलो तेव्हा परतताना आठवणीने या पुण्यातील एकुलत्या एक आणि नेमक्या शांकलीच्या घराजवळ असलेल्या व्हाईट शेव्हिंग ब्रश ट्री ला भेट दिलेली आंम्ही.. मोठ्ठा आणि उंच वृक्ष आहे तो म्हणुन त्याची फुलं दिसण अवघडच बनलेलं..पण आता त्याला कळ्या आलेल्या. काही दिवसात त्या फुलतील आणि निदान यावर्षी तरी मला ती फुलं बघता येतील अशी आशा मी बाळगून आहे...
याचं शास्त्रीय नाव : PSEUDOBOMBAX ELLIPTICUM 'ALBA'
.

.
.
हा काकड ज्याचे शास्त्रीय नाव आहे गारुगा पिन्नाटा..
एका बसक्या घरासमोर रिठ्याचं झाडं म्हणुन लावलेले त्यांनी..
.

.
.
हा वावळ..पैस्याचं झाड..
.

.
काही फोटो ठळक दिसावे म्हणुन क्रॉप करुन दिलेले आहे म्हणुन स्टँडर्ड साईझ पेक्षा जरा इकडे तिकडे वाटतील ते खपवुन घ्या.. Happy

अभ्यासाच्या भुगोलाच्या पुस्तकातील हे नावं असं समोर येईल आणि त्याचं ध्यान असं दिसेल याची सुतराम कल्पना मला नव्हती Lol
बांधकाम आणि फर्निचर साठी उपयुक्त असलेलं लाकुड म्हणजे शिसवं..
मला पूर्णपणे त्याला कॅमेरात बसवता आले नाही नाहितर तोंडात बोटं जावी अश्या प्रकारे वाढणार्‍या या झाडाचं फर्निचर कसं बनवत असतिल हा प्रश्न तुम्हालाही पडल्याशिवाय राहणार नाही ..
.
हेसुद्धा फुलावर होतं..पण याची मळकी फुले आणि सुंदर अश्या चपट्या पोपटीसर शेंगा उन्हाच्या झळाळीत दिसत सुद्धा नाही..
.

.
.
हि त्याची पानं..शंकरपाळी पिंपळासारखी पण छोटी आणि मऊसुत नाजुक..
अश्या या मऊसुत पानांच्या, बारक्या नाजुक फळाफुलांच्या झाडाचं खोडं कठीण म्हणे..मज्जाच कि नै ?
.

.
.
या त्याच्या चपट्या ओल्या सुक्या शेंगा..
.

हा मळलेला, धूळीने माखलेला पाचुंदा..
"हा पाचुंदा पारोसा आहे म्हणजे त्यावर प्रचंड धूळ बसली होती. वडाराचं झिपरं, क्वचित अंगाला आणी लागलेलं पोर जसं दिसेल, तसा दिसत होता हा."-- इति शांकली Happy
.

.
.
पुढं जाऊन अजानवृक्षाशेजारी आणखी एक कमी मळलेलं पाचुंदाचं झाडं दिसलं..गम्मत म्हणजे एक लाजरं,रुसवं फुलसुद्धा दिसलं...काही केल्या त्याच्या पूर्ण चेहर्‍याला मला टिपता आलं नाही..ते एकलचं होतं त्या पूर्ण झाडावर म्हणुन खुप भाव खात असावं Lol
.

आता बारी अजानवृक्षाची.. हा आणखी पुण्यात कुठं कुठं मिळतो याची कल्पना नाही. आम्ही पाहिला तो पर्वती पायथ्याच्या फॉरेस्ट विभागाच्या ऑफिसजवळ..
संत ज्ञानेश्वरांच्या समाधीस्थानी असलेला अत्यंत पूज्य आणि पावन समजल्या जाणार्‍या या वृक्षाला फुलं तसेच फळ्सुद्धा धरलेली होती..
याचे शात्रीय नाव : Ehretia laevis
.
हि त्याची चांदणी फुले.
.

.
.
आणि हि केशरी फळे..
.

.
.
.
हा रोहितक वृक्ष...
याची फळे...
.

.
.
नजरेत भरतील अशी मोठ्ठी पाने...
.

वा टीना, सुंदर फोटो. झाडांचे फोटो सकाळी चांगले येतात, फुले पण ताजी असतात तेव्हा. आणि पाचुंदा खराच पारोसा दिसतोय,
कारण एरवी याची पाने छान पोपटी रंगाची असतात आणि फुले तर खासच असतात.

पारोसा तरी किती..कित्येक वर्षाचा मळका झालाय बिचारा...
तयार नजरेला कळेल तो फक्त...माझ्यासारखा नवा गडी नवा राज्य असेल तर ओळखणारच नाही अजिब्बात..

टीना, दिवाळी सुरू केलीस की Lol
एकदम २६ पोस्टी बघून मी धावत आले, काय झालंय म्हणून बघायला Lol
छान परिचय करून दिलास. अजान्वृक्षाची फळं तर अगदी युरोपातल्या berries सारखी आहेत. ते वावळ, पाचुंदा वगैरे नावं एरवी कधी ऐकायला मिळाले असते? इथे नि.ग. मुळे खजिना खुला होतोय. सगळ्यांचेच फोटो मस्त.
जिप्सी, पांगार्‍याचा N लय लय लय आवडला. अप्रतिम!!

पर्वती पुलाच्या वरुन सहकार नगर कडे जाताना डाव्या बाजुला गोविंदफुल आणि करवंदाची एकात एक असलेली जाळी दिसते..

गोविंदफुल फुलल्यावर असं पांढर दिसत..
.

.
.
तर जरासं जुन झाल कि याचा रंग असा बदलतो..
सुरुवातीला लाजरे बुजरे असणारे पुंकेसर अगदी ताठ मानेने उभे राहतात..
.

.
.
त्यातच गुंतलेली हि करवंदाची जाळी..
.

सुलक्षणा,
अगं ती पळसाची फुलं हायती...पांगार्‍याची नाहीत.. पांगार्‍याची टोकदार असतात..
सद्ध्या भटकंती सुरु आहे अगं..माझी नविन वर्षाची सुरुवात छान झालीए.. कुठं ना कुठं भटकणं अन् तिथे दिसलेल्या; खरतर दाखवलेल्या झाडांचे फोटो घेउन इथेपन दाखवणं असा एकंदर प्रकार चाल्लाय..

हा गोडालिंब..
याची पाने, फुले, फळे आपल्या कडूलिंबापेक्षा जर्रा वेगळी आहेत..
.

.
.
इंडियन फर्न ट्री..
.

.
.
हा कदंबाचा चुलत भाऊ 'नीव' वृक्ष.. त्याचं फळं..मलाजरी ते काटेरी दिसत असलं तरी ते तसं नाहिए म्हणे.. याची पाने कदंबापेक्षा लहान असतात आणि खोडं, फांद्याची रचना कदंबापेक्षा वेगळी असते...
.

.
.
हे आपलं भोकर..
शात्रीय नाव : Chordia dichotoma
काही दिवसांत फुलावर येईल..संध्याकाळ झालेली म्हणुन मला फोकस नाही करता आला तर फोटो ब्लर आलाय जरासा..
.

.
.
आणि हे बारतोंडी...संयुक्त फळ..एकात एक असे अनेक असल्यामुळे हे नाव पडलं असावं..
काय गम्मत पाहा.. आत्ता वाचलेल्या 'आरण्यक' पुस्तकात याचा उल्लेख आलेला. नाव मोठं मजेशीर वाटलं म्हणुन ते झाडं कसं असेल आणि कुठं बघता येईल हेच डोक्यात होतं..आणि नेमकं शांकलीने मला काल दाखवलं...अगदी ज्यामुळे त्याचं ते मजेशीर नावं पडलं त्या कारणासहीत बघायला मिळालं..हे वर्ष बहोतचं मस्त जातयं माझं Wink ..
.

.
.
इति कालची भटकंती व्याखान ऑलमोस्ट संपूर्णम्..

टीना, फोटो व वर्णन मस्त.
इंडिअन फ्लोरामधील एका पोस्टप्रमाणे दोन्ही नावे फोटोवर दिलीस हे चांगले केले.
वावळ ,बारतोंड,भोकर यांचे माझ्याकडील फोटो टाकेन मग.

अगं सरिवा, इतर नावे सुद्धा देणार होती पण मग म्हटलं न जाणो एखादं चुकलचं तर चुकिची माहिती पसरेल ना म्हणुन नाही दिलं..
रच्याकने धन्यवाद _/\_..

पांगाराचा फोटो टाकल्याबद्दल धन्यवाद...

हा माझा झब्बु.. कात्रज घाटातला..
.

.
.

पुण्यात कौशीचे झाड नाही का ? कौशीचा कळ्यांचा बहर ( ही फुले उमलत नाहीत ) फार देखणा दिसतो. गोव्यात खुप झाडे आहेत. एखाद्या हिरव्यागार डोंगरावर मधेच बहावा, मधेच पांगारा, मधेच कौशी, मधेच पळस असे असले म्हणजे फार सुंदर दृष्य दिसते. आणि मग तिथे मधूनच मेढशिंगीचा तूराही दिसतो.

लाल गुंजीच्या बियांवर जसा डोळा ( काळा स्पॉट) असतो तसाच पांढर्‍या गुंजांवर पण असतो. पण या फोटोत तसे काही दिसत नाही.>>>>>मेधा, याबद्दल काहि माहित नाही. Sad
जाणकार सांगतीलच. Happy

@ टीना <<<<काटेसावरीला फुलं आली का निरु?
मी एम्प्रेस गार्डन मधे बाळ काटेसावर पाहिली.. किती ते काटे... तुम्ही कशी लावली ती?>>>

येस्स..... फुलं आलीयत....
काटेसावर लावली नाही मी.
मी फक्त होत्या, नवीन आल्या त्या जपल्या. वाढु दिल्या....
आमच्या कडे त्या आपोआप येतात, उगवतात...
पण आधीच्या मालकाने जमीनीलगत तोडलेल्या काटेसावरींचे काही अचाट जाडीचे बुंधे होते (जे बघून डोळे पाणावायचे), तेवढ्या जाड मात्र अजून नाही झाल्यायत....
आणि त्या फुलांच्या चषकातुन मधुरस प्राशन करणार्‍या खारींची मात्र लगबग आणि ये जा सुरु झालीय...

ह्यो पांगारा हाय का!! मी नेहमी पळस-साग-पांगारा यांच्यात गोंधळ घालते Proud
दिनेशदा, कौशी आणि मेढशिंगी...भारी नावं आहेत. मेढशिंगी ची फुलं नेटवर बघितली, किती सुंदर आहेत!!
कौशी ला मी प्रत्यक्ष पण बघितलं आहे, नाव आज कळालं Happy

दिदा,
मेढशिंगी आणि कौशी दोन्हीचे फुलं मस्त दिसताहेत..
याबद्दल काही माहिती अनुभव असल्यास इथेपन येउ द्या.. Happy

तरीच म्हटलं मेढशिंगीच्या फोटो खाली जकॅरांदा का दिलाय गुगलबाबाने..हे दोघं नातेवाईकच आहे तर..हाहाहा..तरीच रुपडं सारखं वाटलं जराजरा..

एक दिड इंचाची अळी चिमण्यांनी खाल्ली असेल का? >>> मधुरा घाबरू नका. लिंबाच्या झाडावर म्हणजे बहुतेक मॉर्मॉन असेल ते. अळी एकदम हिरवी होती ना? त्यांच्या रंग आणि शरीरावरील पॅटर्न पक्षांना त्यांना खाण्यात धोका आहे हे सांगणारे असतात असे वाचले आहे. शक्यतो कोष दिसणार नाही अशा बेताने केलेले असतात. खोडावर खालपर्यंत चेक करा. खेटून दुसरी झाडे असल्यास त्यावर पण बघा. मला फोटो शेअर करायला जमत नाहिय... common Mormon ह्या नावाच्या फुलपाखराचे आणि कोषाचे फोटो गुगलुन बघा...

टीना इतकी माहिती लिहिलियस, वाचुन काढायला वेळ जाइल... Happy त्यावर प्रतिक्रिया उद्या, क्रोमात (नेहेमी कोमात वाच्ते Happy ) फोटो बघितल्यावर...

Pages