मायबोलीच्या ऊर्ध्वश्रेणीकरणानंतर ..

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

मायबोलीच्या गाभ्याचे (core software ) उर्ध्वश्रेणीकरण (Upgrade) यशस्वीरित्या पार पडले आहे. तुम्हा सगळ्यांच्या सहकार्याबद्दल आभारी आहोत.
इतके मोठे उर्ध्वश्रेणीकरण या अगोदर आपण २००७ मधे केले होते. नंतर मधून मधून छोटे बदल आपण नेहमीच करत आलो आहोत. पण गेल्या १० वर्षात मायबोली वापरत असलेल्या संगणक प्रणालीच्या गाभ्यात काही मूलभूत बदल झाले आणि त्यामुळे आपल्यालाही हे बदल करणे आवश्यक झाले. यातले मुख्य बदल सभासदांना दिसणारही नाहीत. पण मायबोलीच्या भविष्यासाठी ते खूप महत्वाचे आहेत. किंवा सभासदांना फारसे बदल न जाणवू न देता , हा मुख्य बदल कसा करता येईल हे एक महत्वाचे उद्दीष्ट या प्रकल्पामागे होते. एकदम खूप नवीन सुविधा उपलब्ध होतील अशी काही सभासदांची अपेक्षा असेल आणि आम्ही ती पूर्ण केली नसेल तर त्याबद्दल दिलगीर आहोत.

सभासदांना लक्षात येणारे मुख्य बदलः
१. मोबाईलवरून मायबोली पाहणे सुलभ झाले आहे.
२. सदस्याना आपली संपूर्ण विचारपूस अप्रकाशीत करायची सोय सध्या तांत्रीक कारणामुळे उपलब्ध नाही. पण आता स्वत:ची विचारपूस तुम्ही मॉडरेट करू शकता. नको असलेले प्रतिसाद काढून टाकायची सोय दिली आहे.

खालील गोष्टींवर अजून काम चालू आहे:.
१. Smileys (स्मीतचित्रे) देता येत नाही आहेत.
२. ग्रूपमधल्या सदस्यांची संख्या आणि यादी दिसत नाही आहे.
३. ग्रूपमधल्या लेखांची विषयवार यादी दिसत नाही आहे पण शब्दखुणांचा वापर करून किंवा शोध सुविधा वापरून कुठल्याही धाग्यावर जाता येईल.
४. निवडक १० मध्ये नोंद केलेले धागे दिसत नाहीत.
५. ग्रूपच्या नावावरून ग्रूपच्या मुख्य पानावर जात येत नाही : पण धाग्याखाली ग्रूपचे नाव दिलेले आहे. त्या दुव्यावरून तुम्ही ग्रूपच्या मुख्य पानावर जाऊ शकता.
६. तांत्रीक कारणांमुळे मायबोली बखर सध्या चालत नाही आहे. त्यामुळे एका विशीष्ट दिवशीच्या धाग्यांचा शोध घेण्याची सुविधा नाही. त्या ऐवजी प्रत्येक पानावर असलेल्या शोध सुविधेचा वापर करू शकता. लेखक स्वतःच्या व्यक्तिरेखेतूनही त्यांच्या जुन्या लेखनावर जाऊ शकतात.

चाचणी समितीत काम केलेल्या खालील मायबोलीकरांचे खूप आभार. त्यांनी वेळोवेळी तत्परतेने केलेल्या सुचनांमुळे आणि शोधलेल्या चुकांमुळेच आम्ही हा मोठा प्रकल्प पार पाडू शकलो.
rmd, चिन्नु, प्रिंसेस, राया, वैद्यबुवा, श्री, संपदा, स्वप्ना_राज, हर्पेन

अजून काही चुका राहून गेल्या आहेत. चाचणी समितीने काढलेल्या सगळ्याच चुकांवर काम करणे वेळेअभावी शक्य नव्हते. त्यामुळे काही चुका तशाच ठेवून मायबोली पुन्हा सुरु करण्याचा निर्णय आम्हाला जाणीवपूर्वक घ्यावा लागला. येत्या काही दिवसात या दुरुस्त करण्याचा आमचा प्रयत्न राहील..

या व्यतिरिक्त काही चुका /अडचणी / नवीन प्रश्न आढळते तर कृपया याच पानावर खाली प्रतिसादांमधे लिहा.
तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याबद्दल आभारी आहोत.

प्रकार: 

@सपना हरिनामे आणि मोरपंखीस
तुमच्या संगणकावर मालवेअर आले आहे का ते तपासून पहा. मला व्यक्तिशः https://www.malwarebytes.com/ या सॉफटवेअरचा चांगला अनुभव आहे. त्यांचे मोफत वर्जनही चांगले आहे.

>@नन्द्या४३
असं समजा तुम्ही पुण्यातले पुणेकर आणि बीटर गाव या दोन ग्रूपचे सभासद आहात. तुम्ही मायबोलीला भेट दिली त्यानंतर पुण्यातले पुणेकर मधे १० प्रतिसाद आणि बीटर गाव मधे ९ प्रतिसाद प्रकाशीत झाले.
तुम्ही "माझ्यासाठी नविन" आणि "ग्रूपमधे नविन" पाहिलेत तर दोन्ही कडे सारखेच प्रतिसाद आणि ग्रूपची नावे दिसतील.
पण तुम्ही जर बीटरगावला भेट दिलीत आणी परत पाहिलेत तर " माझ्यासाठी नवीन" मधे फक्त पुण्यातले पुणेकर (१० नवीन) असा एकच ग्रूप दिसेल . आणि "ग्रूपमधे नवीन" मधे बीटर गाव दिसेल पण एकही नवीन प्रतिसाद दिसणार नाही आणि पुण्यातले पुणेकर (१० नवीन) असे दिसेल. तुम्ही पुण्यातले पुणेकर इथेही भेट दिली की माझ्यासाठी नवीन मधे काहीच दिसणार नाही कारण तुमच्या कुठ्ल्याच ग्रूपमधे तुमच्यासाठी नवीन प्रतिसाद नसतील.

काल मोबाईलवरुन पहिल्यांदाच मायबोली ऑपरेट केली. पण डेस्कटॉपच्या तुलनेत प्रचंड स्लो झाली आहे. लोड होताना बर्‍याचदा मोबाईल हँग झाला.
बाकी इतर वेबसाईट याहू सारख्या स्मुथ चालत आहे. पण मायबोली पटकन ओपन होत नाही.

>>कुठला बुकमार्क चालत नाही ते कळवाल का? >>

मोबाइलचा डेटा कमी वापरला जावा याकरता मी "opera mini browser" वापरतो. तो वेब ब्राउजर ९०% डेटा वाचवतो. पण आता माझ्या लक्षात आले की नवीन रचना html 5 साठी सुसंगत आहे आणि त्यात मायबोलीचा नेहमीचा बुकमार्क उघडल्यावर अनुक्रमणिका येतच नाही. असो.

मोबाइलमधल्या IE 11, UC अथवा इतर ब्राउजरात व्यवस्थित पेज उघडते.
त्यामुळे माझी तक्रार मागे घेत आहे.

नवीन बदलांशी जुळवून घेत आहे.
धन्यवाद .

वेबमास्टर, धन्यवाद.
मला वाटते कळले मला.
पण पूर्वीहि बर्‍याच गोष्टींबद्दल वाटत असे की मला कळले, पण प्रत्यक्षात काहीहि समजले नसायचे.
असो.

वेबमास्टर आभार.
मालवेअर बद्दल तुमचं म्हणणं खरं आहे. काही दिवसांपूर्वी आढळला होता. पण काढून टाकला. मला ही समस्या फक्त मायबोलीला येत होती. आज अजून नाही आलेली ( लॅपटॉप चालू करताना रेसिडेण्ट व्हायरस , मालवेअर, अ‍ॅडवेअर आपोआप डिलीट केले जातात . तसेही झाले असेल ).

आता वर तिथे Navigation च्या ऐवजी तुम्हालाच तुमचा आयडी दीपस्त आहे याची आठवण करून दिल्याने काही फरक पडेल का?>>
वेमा कोंकणी आहेत का मूळचे?
कुसकटपणा पुरेपूर भरलाय वरच्या वाक्यात, अगदी आमच्यासारखा!
Wink

कुठल्याही लेखकाच्या "लेखनात" गेल्यावर शीर्षक आणि प्रतिसाद इतकेच दिसते. त्यामुळे लिस्ट मधून कविता कुठल्या आणि कथा कुठल्या हे समजायला अवघड जाते. धागा उघडल्यावर कळते कथा आहे की कविता.
तिथे गृपचे अथवा प्रकाराचे नाव दिल्यास सोपे जाईल.

धन्यवाद दीपस्त. चांगली सूचना. तुम्ही सुचवलेला बदल केला आहे. तुम्ही लॉगीन केलेले असे तर लगेच बदल दिसेल. नसेल तर १-२ तासांनंतर दिसेल.

पाककृती पाहताना अधिक टीपा भागात मला इतर ४-५ युझर्सच्या पाककृतींची लिस्ट दिसली. म्हणजे हे पाहलेत का ब्लॉक चुकून अधिक टीपा मध्ये आल्यसारखा वाटला. कृपया बघा. मी एकच पाकृ बघितली आहे. अजुन २-४ उघडून टेस्ट करायला वेळ नसल्याने केले नाही.

@बस्के
कुठल्या पाककृतीला असे दिसले हे सांगता येईल का? मी ३-४ पाककृती पाहिल्या पण हे दिसले नाही.

वेमा
आधी दिलेल्या तक्रारीसंदर्भात डॉक्टरशी चर्चा केल्यानंतर कळाले की माझ्या लॅपटॉपवर असलेल्या फायरवॉल मधे मायबोली डॉट कॉम ला पूर्ण अ‍ॅक्सेस न दिल्याने फायरवॉलकडून प्रत्येक पेज नंतर एक पेज उघडत होते. यातलं ज्ञान नसल्याने आपल्यालाही माझ्यामुळे त्रास झाला. मनापासून क्षमस्व !

हरकत नाही. इथे लिहिल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला येणारी अडचण इतर कुणाला आली तर हे वाचून त्याना उपयोग होईल कदाचित.

त्या लेखिकेने स्वतःहून दिलेल्या लिंक्स आहेत. आपोआप आलेल्या नाहीत.>>>>

ओह ही शक्यता लक्षातच आली नाही! थँक्स!

मोबाईलवरून (क्रोम) मायबोलीच्या कुठल्याही धाग्यावरून पुन्हा मुख्य पानावर जाताना वेबपेज हँग होते.
बाकीच्या साईट्स त्यावेळेस बरोबर चालतात. परंतू फक्त मायबोली थांबते.

हे फक्त मलाच प्रोब्लेम येतोय की इतरांना सुध्दा ?

आज दिवसभरात मोबाईलच्या क्रोम ब्राऊझरवरून दोन तीन वेळा मायबोलीवर (सर्व नवीन लेखन) आल्यावर अचानक स्पॅम जाहिरातीचे पॉप अप्स आले. मी कुठेही क्लिक केलेले नसताना अचानक अशी पेजेस उघडण्याचे काय कारण असेल?

पॉपअप आल्यावर कृपया त्याचा screenshot देऊ शकाल का? आणि कृपया तुमच्या ब्राऊझरची cache स्वच्छ करू शकाल का?
असे पॉप अप्स येणे आणि पेजेस उघडणे अपेक्षीत नाही.

मला आज फोनवरून 'नवीन' प्रतिसादावर नेत नाहीये नॅव्हिगेटर. शेवटचं पान उघडतं, पण नवीन प्रतिसाद स्क्रोल करून शोधावा लागतो आहे.

आज माबो रिफ्रेश केली किंवा एखादा बीबी उघडला की अगदी तळाशी ओपन होतोय. अगदी प्रतिसाद वगैरे लिहीला तरी तो न दिसता पानाचा तळच दिसतोय.

तसंच मला माबो फक्त वायफाय वर असतानाच उघडता येतं. ३जी/४जी वर उघड्लं तर माबो उघडल्यावर एकामागून एक अनेक अ‍ॅड्स उघडतात. काय प्रॉब्लेम असावा?

Pages