क्रिकेट - ४

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 04:33

क्रिकेटवरील पहिले तीन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या बरीच झाली आहे. बर्‍याच दिवसांत तिथे कोणी काही म्हटलेलेही नाही. सध्याच बर्‍याच सिरीज संपल्यात, तर काही नव्याने सुरू होतायत. त्यामुळे नवीन धागा काढायला हा आयडियल टाईम आहे. आता क्रिकेट टॉक इथे करूया.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

U-19 संघाला DA मिळत नाहीये आणि महागड्या हॉटेल्समधून स्वताच्या पैश्यातून डिनरची व्यवस्था करायला लागतीय म्हणे!

"अंडर १९ संघातल्या सहा खेळाडूना DDच्या ट्रायलसाठी recommend केले म्हणे.... which may damage the morale of other 12 players in U-19 squad.... which was not expected from a player like Dravid असा एकंदर बातमीचा रोख होता!" - एक मेंटॉर म्हणून जे तयार आहेत पुढच्या लेव्हल साठी त्यांचीच तो शिफारस करणार ना. उगाच कशाचीही न्यूज बनवतात. DD चा मेंटॉर म्हणून सुद्धा तिथे तयारीचे खेळाडू आणायची जवाबदारी त्याची आहे.

U-19 team च्या DA चं वाचलं. वाईट वाटलं. BCCI कडे खजिनदार पदावर कुणी नसल्यामुळे त्यांच्या चेक्स वर सह्या करता येत नाहीयेत अशी टेक्निकल अडचण सांगितली आहे.

महिला क्रिकेट विश्वचषकाच्या पात्रता फेरीतल्या सामन्यातला भारताच्या मानसी जोशीने टाकलेला एक भन्नाट इनस्विंगर खालच्या लिन्क वर..
एकदम प्रेक्षणीय..
http://www.loksatta.com/krida-news/a-brilliant-ball-from-india-mansi-jos...

मुरली विजयला बॅटिंग करताना बघणे निव्वळ आनंद असतो. गावस्कर म्हणतो की, 'यु निड टू पुट अ प्राईज ऑन युवर विकेट', मुरली त्याचे उदाहरण आहे.

वयाच्या २८ वर्षा पर्यंत सचिन तेंडूलकरचे ६० आंतरराष्ट्रीय शतक झाली होती तर विराट कोहलीचे ४३ झाली आहे. तर पॉटींगचे ३४ शतक झाली होती. (फेसबूक सभार)

त. टी. सचिन ने १७व्या वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधे पदार्पण केले होते. तर विराट ने १९व्या वर्षी पदार्पण केले होते.

मुरली विजय आणी पुजारा (विजारा किंवा पुजय म्हणावं का? पुजय फारच पुळचट वाटतं, विजारा मधे एक विखार आहे) हे गेल्या काही दिवसात निव्वळ परिणामकारकता ह्या निकषावर सेहवाग-द्रविड जोडीसारखे झाले आहेत. अर्थात त्यांना त्यांचं रनिंग बीटवीन द विकेट्स मधलं सामंजस्य वाढवावं लागणार आहे, पण ते होईल. विको आणी रहाणे जोडी सुद्धा अफलातून आहे.

राहूल ला सिरियसली ब्रेक ची गरज आहे. वन-डे पाठोपाठ टेस्ट मधे सुद्धा त्याचं शॉट सिलेक्शन अगदीच आयपीएल दर्जाचं होतं. तो आऊट झाल्यावर मांजरेकर (आणखी कोण?) उगाचच 'त्याने कव्हर ड्राईव्ह च्या ऐवजी स्क्वेअर ड्राईव्ह मारायला हवा होता' वगैरे भलावण करत होता. गावसकर ने सगळी बडबड ऐकून 'सौ लुहार की, एक सुनार की' स्टाईल त्याला, 'तो बॉल त्याने सोडून द्यायला हवा होता, ही ५ दिवसाची टेस्ट मॅच आहे' असं सांगितलं. तसच मंजुबाबा ते करूण नायर ने ३०० केल्यावर ही त्याला बाहेर बसवलं, अर्थात मी सुद्धा रहाणे ला च खेळवलं असतं, पण तरीही' वगैरे वायफळ बोलत असताना, गावसकर ने त्याला एकदाही उत्तरही नाही दिलं.

सचिन आणे विको ची तुलना करण्यापेक्षा, आपल्याला लागोपाठ ईतके उत्तम दर्जाचे दोन फलंदाज मिळाले आणी त्यांचा खेळ बघता आला ह्यात मी धन्यता मानतो. गावसकर चा खेळ अगदी शेवटी शेवटी बघितला आणी तेव्हा क्रिकेट ईतकं कळत नव्हतं (आताही कळतं अशातला भाग नाहे, पण असं काही लिहीलं की इगो सुखावतो). पण सचिन, द्रविड, लक्ष्मण, सेहवाग, विराट, रहाणे, पुजारा, विजय, कुंबळे, श्रीनाथ, हरभजन (एके काळचा) ह्यांचा खेळ पहायला मिळाला आणे हे सगळे भारताकडून खेळले ह्याचा आनंद मोठा आहे.

अगदी फेफ ! विराट अन सचिनची उगाच तुलना करून नसत्या वादाला तोंड फोडायचे. आनंद घ्या.

पुजारा जेंव्हा अगदी लेट कट करतो ते डोळ्यात प्राण आणून बघण्यासारखे असते. अगदी किपरच्या हातातून बॉल काढून घेण्यासारखे. पण विजय अन पुजाराचे पळणे म्हणजे फारच थोर. आज विजय गेलाच होता.

शेवटच्या १५ ओव्हर्स मध्ये विराटने कमाल केली. रहाणेचेही चौके बघण्यासारखे होते. उद्या रहाणेचे १०० व्हायला हवेत. म्हणजे निदान ऑस्ट्रेलियासोबत पहिल्या दोन मॅचेस साठी पक्का होईल. अन्यथा अवघड आहे.

पुजारा विजय धावा कढल्या नाहित तेंव्हाही बॉल जुना होइतो मैदानात राहातात ह्याचा जबरदस्त फायदा कोहली नि राहाणे ला होतो.

म्हणजे निदान ऑस्ट्रेलियासोबत पहिल्या दोन मॅचेस साठी पक्का होईल. अन्यथा अवघड आहे. >> असे काही होत नाहि रे. कुंबळे नि कोहली दोघांनीही निर्विवाद्पणे He is one of our best असा स्टँप दिला आहे.

पुजार्‍याची स्पिन विरुद्ध बॅटींग बघणे हे अविस्मरणीय असते. पुढे येऊन सरळ बॅट ने दोन्ही बाजूंना सहजपणे डॅब करून स्पिनरला discourage करतो ते जबरदस्त असते. मग बॉलर शॉर्ट टाकायला लागतो, पुजारा बॅक फूटवर जाऊन square shots खेळून पिसे काढतो.

"म्हणजे निदान ऑस्ट्रेलियासोबत पहिल्या दोन मॅचेस साठी पक्का होईल. अन्यथा अवघड आहे. " - रहाणे ची जागा ईतकी vulnerable वाटत नाही. टेस्ट मधे तरी त्याची जागा बर्यापैकी पक्की आहे.

आज डिक्लेअर करायला उगाच उशीर केला. साहाचे शतक नाही झाले असते तरी चालले असते. किमान ३०-३५ ओव्हर त्यांना खेळायला दिले असते तर दिवसभर फिल्डींग करून थकलेल्या फलंदाजांच्या विकेट्स लवकर घेता आले असते.
नेमका काय प्लॅन होता कोहलीचा ते कळत नव्हते. साहाच्या शतकासाठी थांबले होते असे म्हणाले तरी साहा ८० धावानंतर प्रचंड कुर्मगतीने खेळत होता. एक तर लवकर धावा काढ असा संदेश दिला नसेल अथवा साहा स्वतःच्या शतकासाठी मुद्दामुन थांबला असेल. प्लँनिंग नव्हते. १५१ व्या ओव्हरला साहाचे ८० धावा ११५चेंडू खेळून झाल्या होत्या. पण पुढील २० धावा काढायला पठ्ठ्याने तब्बल १२ ओव्हर वाट बघितली. आणि त्यासाठी ३७ चेंडू घेतले. कसोटीवर आपली पकड त्याआधीच फार घट्ट झाली होती अशा वेळेस वेगाने धावा काढण्याऐवजी कुर्मगती चे प्लॅनिंग कोणी ठरवले ? ही चुक आहे. कोहलीने साहाला ८० धावानंतर ताकीद द्यायला हवी होती.
चला शतकासाठी थांबले होते तर शतक झाल्यावर घोषीत करायला हरकत नव्हती पण ते ही केले नाही मग ? ७०० धावांसाठी थांबले? ते ही केले नाही? मग उगाच २-४ ओव्हर का वाया घालवले ?

आपण जिंकतोय म्हणून अशा चुकांकडे दुर्लक्ष होत आहे पण असेच काहीसे इंग्लंडविरुध्द सुध्दा झाले होते. डाव कधी घोषित करायचा याची परफेक्ट टायमिंग कोहलीने नेहमी चुकत आहे.

रहाणे ची जागा ईतकी vulnerable वाटत नाही. टेस्ट मधे तरी त्याची जागा बर्यापैकी पक्की आहे.
>>>
जर आपण भारतात खेळत असू आणि त्याचा फॉर्म गम्डला असेल तर त्याची जागा घ्यायला त्रिशतकवीर आणि वनडेतील द्विशतकवीर रांगेत उभे आहेत. जागा पक्कीही आहे असे ही एवढ्यात बोलू शकत नाही. त्यात आपण ५ च फलंदाजांनी खेळतोय.

भारताची कसोटीवरची पकड ढिली झाली. ३र्‍या दिवशी खेळपट्टीने स्पिनर्सना अपेक्षित अशी साथ दिली नाही. बांग्लादेशी फलंदाजांनी टिच्चून बॅटींग केली एकदम खडूसगिरी. समोर अश्वीन जाडेजा असुन पण अवघे २ विकेट्स गेले.
इंग्लिश बॅट्समन नक्कीच टिव्ही लावून बसले असतील.
उद्याचा चौथा दिवस पहिल्या सत्रात उरलेले ४ विकेट गेल्या तर काही चांसेस आहे अन्यथा ३ र्‍या सत्रापर्यंत डाव चालला तर अनिर्णित होणार आणि तो बांग्लादेशचा विजय म्हणून पाहिले जाईल.

जातील पहिल्या सत्रात ४ विकेट .. ४०० च्या आसपास सर्वबाद .. २७५ किमान लीड .. आपण दिड सेशन खेळून तो ४०० वर पोहोचवला तरी किमान १०५ षटके त्यांना गुंडाळायला मिळतील.. आणि बांग्लादेश आजवरचा रेकॉर्ड पाहता ते त्या इनिंगला जोरदार माती खाण्याची शक्यता जास्त आहे..

भारताने अंधांचा टी-२० वर्ल्डकप पाकिस्तानाला हरवून जिंकला.
भारतीय संघाचे हार्दिक अभिनंदन

अभिनंदन Happy
आणि पाकिस्तानला हरवून जिंकला हे त्यांच्या प्रसिद्धीसाठीही चांगले झाले Happy

अरे वा अभिनंदन.

रच्याकने कालचा आपला खेळ भारी होता. पटापट रन बनवुन त्याना खेळायला लावणे या निर्णयाचे कौतुक. रहाणेला पण जागा पक्की करण्यापेक्षा लवकर जास्ती स्कोअर करायला लावणे हे आवडले.

भारताने अंधांचा टी-२० वर्ल्डकप पाकिस्तानाला हरवून जिंकला. >>> हार्दिक अभिनंदन..

पटापट रन बनवुन त्याना खेळायला लावणे या निर्णयाचे कौतुक>>> सहजच काल जाणवलं. द्रविड -लक्ष्मणच्या त्या वेरी वेरी स्पेशल इनिंग नंतर आजकाल कोणतीही टिम समोरच्याला फॉलो ऑन देण्याच्या फंदात पडत नाही ! Happy

जिंकली बाबा मॅच. त्या कमरुल इस्लामने ७० बॉल मधे ३ धावा काढुन काटा काढला होता आपला.

महिला टिमचे अभिनंदन. WC Qualifier ९ विकेटने जिंकल्या.

द्रविड -लक्ष्मणच्या त्या वेरी वेरी स्पेशल इनिंग नंतर आजकाल कोणतीही टिम समोरच्याला फॉलो ऑन देण्याच्या फंदात पडत नाही ! >>>

मित - भारताला त्यानंतर बरेच दिवस देत नसत हे खरे आहे. पण खुद्द भारतानेच पुढच्या दोन वर्षात इंग्लंड व पाक ला त्यांच्याच घरी फॉलो ऑन देउन मोठे विजय मिळवले होते.
इंग्लंड विरूद्ध २००२ मधे लीड्स ला
http://www.espncricinfo.com/ci/engine/match/63999.html

पाक विरूद्ध २००४ मधे मुलतान ला.
http://www.espncricinfo.com/ci/engine/match/64081.html

याउलट त्याच्या आधीच्याच मॅच मधे ऑस्ट्रेलियाविरूद्ध ७०५ मारून तीनशेचा लीड घेउनही फॉलो ऑन दिला नव्हता.
http://www.espncricinfo.com/ci/engine/match/64062.html

बहुतांश वेळेस याचे कारण सकाळी किती लौकर पहिली इनिंग संपते यावर असते. लीड्स व मुलतान दोन्हीकडे सकाळी लौकर पहिली इनिंग संपली होती इंग्लंड व पाक ची. त्यामुळे बोलर पुन्हा दिवसभर बोलिंग करायला फ्रेश होते. सिडने ला ४० ओव्हर्स दिवसातील टाकून झालेल्या होत्या, आदल्या दिवशीच्या पूर्ण बोलिंग नंतर. त्यामुळे बोलर्स ना ब्रेक द्यावा असे ठरले असेल. मला वाटते कॅप्टन बोलर्स व सिनीयर खेळाडूंशी बोलून ते ठरवत असेल.

शेवटच्या जोडीने जोडलेले ५० रन्स महाग पडण्याची दाट शक्यता आहे.
ऑसीच्या २ बाद १५० धावांवरून ९ बाद २०५ हे खेळपट्टीचा रंग फिरण्याचे लक्षण आहे. उमेशला सुरुवातीला कोहलीने वापरला नाही. जर वापरला असता तर ऑसी लव्कर बाद झाले असते. शेवटी शेवटी सुध्दा उमेशकडून दिवसाचा शेवट करण्याऐवजी अजिबात न चालणार्‍या इशांत शर्माला वापरले. उमेशला वापरले असते तर किमान ५ वी विकेट घेण्यासाठी त्याने जीव तोडून गोलंदाजी केली असती.

२०५/९ झाल्यावर मी खुश होऊन २२५ मध्ये उडवतील ह्या आशेवर होतो. कसचं काय! हे ५० रन्स शेवटच्या दिवशी महागात पडू नयेत म्हणजे झालं.

"शेवटच्या जोडीने जोडलेले ५० रन्स महाग पडण्याची दाट शक्यता आहे.' - सहमत.

ईशांत टीम मधे नेमकं काय काम करतो, म्हणजे त्याचं जॉब डिस्क्रिप्शन काय आहे, ह्याचा एकदा खुलासा झाला तर बरं होईल. अजुनही नवख्या बॉलर सारखीच क्ल्यूलेस बॉलिंग करतो. शामी लवकर परत येवो हीच सदिच्छा!

रेनशॉ ह्या सिरीज चा लॅथम होणार की काय? आपण प्रत्येक सिरीज मधे एका बॅट्समन ला डोक्यावर चढवतो. जिमी अ‍ॅडम्स, डेरिल कलीनन पासून ही थोर परंपरा चालू आहे. आधी सुद्धा असेल, पण 'त्ये काई आपुन आपल्या प्रतेक्श डोळ्यानी पाह्यल्यालं न्हाई'.

ईशांत टीम मधे नेमकं काय काम करतो, म्हणजे त्याचं जॉब डिस्क्रिप्शन काय आहे, ह्याचा एकदा खुलासा झाला तर बरं होईल >> गंभीर ने आयपीएल मधे इशांतला का घेतले नाही याचे अचूक कारण दिले आहे

बी पॉजिटीव्ह.. जेव्हा शेवटची जोडी खेळते तेव्हा खेळपट्टी चांगली असते. असा विचार करून उद्या आपली सलामीची जोडी उतरेल आणि विजय-पुजारा जोडगोळीच १५०-२०० धावांचा टप्पा पार करून देईल.

झाला एकदाचा ऑलआउट. मुरलीची विकेट पण घेतली. हे शेपटाचे लोक आपल्याला नेहेमीच त्रास देतात राव. कसला ठोकला स्टोक्सने.

ईशांत टीम मधे नेमकं काय काम करतो, म्हणजे त्याचं जॉब डिस्क्रिप्शन काय आहे, ह्याचा एकदा खुलासा झाला तर बरं होईल. अजुनही नवख्या बॉलर सारखीच क्ल्यूलेस बॉलिंग करतो. शामी लवकर परत येवो हीच सदिच्छा!>> +१

खेळापट्टी चहापानानंतर खराब होत आहे. थांबून खेळाण्याच्या ऐवजी आपण आक्रमक खेळत आहे. त्यामुळे ३ गेले .. रहाणे या खेळपट्ट्टीवर टिकणार आहे हे नक्की.

ईशांत टीम मधे नेमकं काय काम करतो, म्हणजे त्याचं जॉब डिस्क्रिप्शन काय आहे, ह्याचा एकदा खुलासा झाला तर बरं होईल. अजुनही नवख्या बॉलर सारखीच क्ल्यूलेस बॉलिंग करतो. शामी लवकर परत येवो हीच सदिच्छा!>>>>+१

खरेच काल ११ व्या फलंदाजाला तो ५ चेंडू खेळविताना एकही योर्कर चा प्रयत्न करू नये! अक्षश: चेंडू वाया घालविले ऑफ च्या बाहेर टाकून..

Pages