Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 04:33
क्रिकेटवरील पहिले तीन धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या बरीच झाली आहे. बर्याच दिवसांत तिथे कोणी काही म्हटलेलेही नाही. सध्याच बर्याच सिरीज संपल्यात, तर काही नव्याने सुरू होतायत. त्यामुळे नवीन धागा काढायला हा आयडियल टाईम आहे. आता क्रिकेट टॉक इथे करूया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
असामी, फेफ :)
असामी, फेफ
मात्र नेहराची 'लास्टिंग इमेज' ही कायमच २००३ च्या कप मधल्या इंग्लंड विरूद्धचे बनाना स्विंग्ज आणि आज्ञाधारकपणे स्लिप/कीपर कडे 'निक' देउन परतणारे इंग्लिश बॅट्स्मेन - अशीच राहील. तो निवृत्त झालेला नाही, पण यापेक्षा भारी काही केले तर आश्चर्यच वाटेल. पुलंच्या त्या "दोन वस्ताद" प्रमाणे नेहरा या मॅच बद्दलच सांगत असेल लोकांना पकडून कायम
२००३ च्या कप मधल्या इंग्लंड
२००३ च्या कप मधल्या इंग्लंड विरूद्धचे बनाना स्विंग्ज आणि आज्ञाधारकपणे स्लिप/कीपर कडे 'निक' देउन परतणारे इंग्लिश बॅट्स्मेन >> हो त्या सहा विकेट्स भन्नाट होत्या. इंग्लंड विरुद्ध होत्या म्हणून अजूनच खास.
फा, अगदी खरय. नेहरा ती एकच
फा, अगदी खरय. नेहरा ती एकच मॅच 'जगला'. सलग स्पेल होता मला वाटतं तेव्हा त्याचा. Irony म्हणजे, २०११ च्या वर्ल्डकप ला ईंग्लंड च्याच विरुद्ध जेव्हा तो शेवटच्या ओव्हर मधे १४ रन्स डिफेंड करू शकला नव्हता आणी मॅच टाय झाली होती.
पंत ला उद्या संधी मिळणं अवघड वाटतय. कोहली ओपनिंग ला यायचे संकेत आहेत. म्हणजे बहुतेक राहूल, कोहली, रैना, युवराज, धोनी, पांडे, पंड्या, मिश्रा, नेहरा, भुवनेश, रसूल अशी टीम खेळेल.
बुमराची बॉलिंग इतकी
बुमराची बॉलिंग इतकी प्रिडिक्टेबल आहे की कोणीही त्याला ठोकू शकतो. ( सध्या तरी) वनडे पासून तो काही शिकला आहे असे वाटत नाही. पहिल्या ओव्हर मध्येच २० धावा. १४७ मध्ये २० अश्याच दिल्या तर कसे जिंकणार?
भारताची डॅडी आर्मी हारली.
भारताची डॅडी आर्मी हारली. आजची भारताची टी-२० ची टीम बघून मला २००८ आयपीएल मधली आरसीबी ची टीम आठवत होती. तेव्हा निदान टी-२० प्रकार नवीन होता असं म्हणता येईल. पण आज देशो-देशीच्या टी-२० लीग्ज खेळत उपजिवीका करणार्या खेळाडूंच्या काळात भारताने वेचून वेचून जुने-जाणते(?) खेळाडू निवडावेत हे वैचारिक दिवाळखोरीचं लक्षण आहे की टॅलेंट नसण्याचं?
राहूल ला थोडा ब्रेक गरजेचा आहे असं वाटतय (लिमिटेड ओव्हर्स क्रिकेट मधे सलग ४ अपयशांनंतर). बुमराह च्या जागी भुवनेश यावा. (शामी, लवकर फीट हो रे बाबा). युवराज च्या कटक च्या १५० धावांनंतर वाटलं होतं की वात विझायच्या आधी मोठी होते. पूर्वी धोनी शेवटच्या ओव्हर्स मधे समोरच्या बॅट्समन ला स्ट्राईक न देता, स्वतःकडे ठेवायचा तेव्हा hopes वाटायच्या. आता anxiety वाटते. ज्या टीम ने युवा खेळाडू हवेत म्हणून ज्येष्ठांना बाहेरचा रस्ता दाखवला, तीच टीम आज ज्येष्ठांना परत बोलावून खेळतीये. What an irony!
रिषभ पंत, इशान किशन, पृथ्वी शॉ, करूण नायर, दिपक हूडा अशांपैकी काही यंगस्टर्स ना मुख्य प्रवाहात - प्लेयिंग ११ मधे हळू हळू सामावून घ्यायला हवं असं मला वाटतं. 'सन्माननीय' आणी 'आदरणीय' ह्या संबोधनांना एकंदरीतच समाजजीवनातून, पण ह्या धाग्यापुरतं बोलायचं तर क्रिकेट मधून तरी काही काळ हद्दपार करायला हवं.
फेरफटका ती नेहराच्या
फेरफटका ती नेहराच्या फिल्डींगची पोस्ट भारी
आज पुन्हा मिसिंग रोहीत शर्मा.
रिषभ पंतला प्लेईंग ईलेव्हनमध्ये बघायला आवडले असते. बॉलरमध्येही एक मिश्रा हवा होता.
आणि हो केदार जाधवलाही बघायला आवडले असते. वनडे मध्ये तो आल्या आल्या कामाला लागायचा. जसे की रैना करतो. तर जाधवचा वनडेतला तो फॉर्म पाहता या 20-20 फॉर्मेटला सूट होता.
नेहरा चांगला वा वाईट हा प्रश्नच नाही, त्याला अजून का खेळवतात ते देखील 20-20 या फॉर्मेटमध्ये. मला तर हा फॉर्मेट ज्यांना अकरा खेळाडूंच्या मर्यादेमुळे एकदिबसीय खेळवता येत नाही अश्या बेंच स्ट्रेंथला वा नवोदितांना चाचपण्यासाठी, मॅच प्रॅक्टीसमध्ये ठेवण्यासाठी आणि ईंटरनॅशनला अनुभव देण्यासाठी वाटतो. याऊपर उगाच महत्व द्यायचे नाही. फार तर 20-20 चा वर्ल्डकप वगैरे असेल तर ईमानईतबारे बेस्ट टीम निवडायची.
आजचा सामना फार बेक्कार झाला. धडाकेबाज 20-20 कोणी खेळलेच नाही. एक रैना थोडाफार आपल्या नेहमीच्या शैलीत खेळला बाद होईपर्यंत. पण त्यातही कमबॅक सामना खेळतोय जाणवत होते. धोनीचा खेळ टारगेटचा अंदाज चुकल्यासारखा वाटला. स्कोअरकार्डवर नजर टाकल्यास त्याचा स्ट्राईकरेट वाईट वाटणार नाही. पण तो 150 चे टारगेट फायटींग स्कोअर ठरेल या अंदाजाने खेळला. ते 170 चे टारगेट ठेवून पाच ओवर आधीच फटकेबाजीला सुरुवात करायला हवी होती. पण आपले शेपूट आज फारच लसपशीत होते हे देखील विसरून चालणार नाही. गेला बाजार कोण हरभजनसिंगही नव्हता. तो हार्दिक पांड्याचा भाऊ कृणाल पांड्या होता ना मुंबई ईंडियन्समध्ये. त्यालाही या लेव्हलला खेळवून बघायला हवे.
नेहरा म्हटले की पहिला त्याचा
नेहरा म्हटले की पहिला त्याचा बेस्ट परफॉर्मन्स ईंग्लण्डची मॅच आठवतेच पण मला त्यासोबत पाकिस्तान सोबतची मॅच सेव्हिंग लास्ट ओवर सुद्धा आठवते. साडेतीनशे वगैरे टारगेटला लास्ट ओवरला 8-9 रन पाहिजे असताना बहुतेक मोईन खान मारत असताना 3-4 धावांची ओवर टाकून आपल्या अपेक्षेविरुद्ध सामना जिंकवून दिल्याने आणि या सामन्याचा आनंद लाईव्ह उचलल्याने आठवणीत पक्की आहे.
Only Dravid Can Do This,
Only Dravid Can Do This, Decline An Honorary Doctorate With An Aim To Earn One Through Research
टोटल रिसपेक्ट!
"Only Dravid Can Do This" - +
"Only Dravid Can Do This" - ++++१ रिस्पेक्ट!!
उद्या रिषभ पंत डेब्यू करेल का
उद्या रिषभ पंत डेब्यू करेल का? बुमराह च्या जागी भुवनेश खेळेल का? रसूल च्या जागी मिश्रा खेळेल का? काय अंदाज?
हे तीन्ही बदल आवश्यक आहेत....
हे तीन्ही बदल आवश्यक आहेत..... निदान मी कॅप्ट्न असतो तर मी हे तीन्ही बदल केले असते.... रादर ते तिघेच माझा फर्स्ट चॉइस असते!
बुमराह विश्रांती हवीच!
बुमराह विश्रांती हवीच!
"स्लो अॅण्ड लो" पिच दिसत आहे
"स्लो अॅण्ड लो" पिच दिसत आहे. बॉल बॅटवर येत नाही म्हणतात तसे. कोणालाच झेपत नाहीये.
Os is Bumrah back in form now
Os is Bumrah back in form now ? I think key was he mixed up slow balls well in last 2 overs.
नेहरा इथे येऊन वाचून जातो कि काय ?
हो असाम्या. दोन स्लो व एक
हो असाम्या. दोन स्लो व एक फास्ट हा ट्रॅप मस्त होता शेवटच्या ओव्हर मधे. तो एलबी डब्ल्यू लाइव्ह बघताना आउट वाटला पण नंतर जरा वर होता असे वाटले ना?
तो एलबी डब्ल्यू लाइव्ह बघताना
तो एलबी डब्ल्यू लाइव्ह बघताना आउट वाटला पण नंतर जरा वर होता असे वाटले ना? >> रूट चा म्हणतोयस का ?
मिश्रा नि त्याचे नो बॉल !!!
हो रूट चा. आता वाचले तर एज ही
हो रूट चा. आता वाचले तर एज ही होती.
रिप्लेत क्लीअर एज दिसत होती.
रिप्लेत क्लीअर एज दिसत होती. तेवढे एक गालबोट लागले. बाकी मजा आली शेवटच्या चार ओवर बघायला. नेहरानेच म्याच काढलेली. बस्स शेवटच्या तीन बॉलमध्ये 12 रन्स देत बुमराहला हिरो बनायला चान्स दिला. बूमराहच्या वेरीएअशन्सला हा पिच अगदी सूट होता. अर्थात तरीही लाईनलेंथची अचूकता पकडावी लागतेच. लास्ट ओवर जबरीच टाकली. अगदी लास्ट बॉलही ऑफला वाईड लो फूल्टॉस, त्याला सिक्स मारणे अवघडच.
No balls are unpardonable!
No balls are unpardonable! मस्त जिंकली. India still need youngsters for T20.
बुमराह ने शेवटचे षटक उत्तम
बुमराह ने शेवटचे षटक उत्तम टाकले आणि निशिब पण जोरावर असल्याने मुळेचा पायचित मिळाला!
सातत्य महत्वाचे जे जॉर्डन आणि मिल्स ने दोन्ही सामन्यात दाखविले! आणि महत्वाच्या क्षणी बळी मिळविले! मोईन अली ने अचुक टप्पा वेग ह्यांचे फिरकी गोलंदाजासाठी किती मह्त्व आहे हे पुन्हा अधोरेखित केले. अर्थात इन्ग्रजांच्या गोलंदाजांनी आपल्या खेळपट्टीवर कशी गोलंदाजी करावी ह्याचे धडे बुमराह आणि नेहराला दिल्याने ते यशस्वी ठरले!
कोहलीने बुमराला आपली फलंदाजी सुरु असताना सांगितलेले पण 'बघ ते कशी बोलींग करायेत'!
कृ
कृ
Stoinis ची इनिंग बघा लोकहो.
Stoinis ची इनिंग बघा लोकहो. १० व्या विकेटच्या भागीदारीमधे हेझलवूड चे शून्या बॉल्मधे शून्य रन्स होते पन्नास झाले तेंव्हा. त्या आधी कमींग्सबरोबर खेळताना कमिग्स स्ट्राईक ठेवून होता.
"Stoinis ची इनिंग बघा लोकहो.
"Stoinis ची इनिंग बघा लोकहो. " - अफाट खेळला Stoinis. झोपायच्या आधी स्कोअर बघितला तेव्हा असं वाटलं होतं की it's just a matter of time before Aussies fold. पण सकाळी स्कोअरकार्ड बघून कमाल वाटली.
http://www.espncricinfo.com
http://www.espncricinfo.com/india-v-england-2016-17/content/story/108007... >> Really was there a better chance of Root winning the match than Buttler or Moin Ali ? Root was struggling after hitting 2 fours in the beginning of his inning. He was unable to find timing towards end and so many times he looked mistiming shots. In second last over from Boomrah he faced 2 dot balls which started cascading effect. It is hard to buy that argument. England lost when Buttler struggled in last over and got out. Momentum or not momentum, he was the guy who was on strike and Root at no time appeared to be the one who could have pulled anything magical there.
सहमत आहे. मला मॅच पाहतानाही
सहमत आहे. मला मॅच पाहतानाही रूटची भिती न वाटता, मोईन अलीची वाटली
मला मॅच पाहतानाही रूटची भिती
मला मॅच पाहतानाही रूटची भिती न वाटता, मोईन अलीची वाटली >> +१. मी रूट ला बाद दिल्याबद्दल वैताग व्यक्त केला होता (त्यावर बाप चक्रम आहे अशा टाईप्सचे लुक्स पोरीने दिले) युवराजला बाद दिल्यावर धन्यवाद पण दिले होते. मोईन अलीला शेवटच्या दोन सामन्यांनंतर आपण मुरली असल्याची स्वप्ने पडत असावीत. युवराज हा फिरकी खेळायला हवे असलेले पदलालित्य नसलेला एकमेव भारतीय बॅट्समन असावा.
मला मॅच पाहतानाही रूटची भिती
मला मॅच पाहतानाही रूटची भिती न वाटता, मोईन अलीची वाटली >> मला पण. असलेच खेळाडु आपल्याला कायम जड जातात.
भारताच्या २०२ धावा. अर्थात
भारताच्या २०२ धावा. अर्थात चिन्नास्वामीवर २०० धावांचा पाठलाग कितपत आव्हानात्मक ठरू शकेल हे सांगता नाही येत. स्कोअरबोर्ड प्रेशर हा एक प्रकार आहेच. keep taking wickets is the key.
अमेझिंग !
अमेझिंग !
रैना, धोणी, युवी, चहल बुमरा अन शेवटच्या ओव्हर मध्ये पंड्याचा सिक्स पण. क्लास मॅच. एकतर्फी होईल असे अजिबात वाटले नव्हते. पण मिश्राच्या त्या ओव्हरने कमाल केली अन चहलने त्यावर कळस चढवून दोन विकेटस घेतल्या. मग काय. इंग्लड बॅटिंग = सायकल स्टॅन्ड
सिरीज संपली.. आज चहाल छा गया.
सिरीज संपली.. आज चहाल छा गया..
Pages