सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३१ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.
थंडीच्या दिवसांचे आगमन होत आहे. वातावरण अगदी गार गार होत जाणार आहे. दवबिंदूंचे मोती गवता पानांवर अलंकार सजवणार आहेत. आता शेकोटी आणि त्या भोवतालच्या गप्पा रंगणार. भाजीचे मळे हिरवेगार होऊन पिकाला येऊ लागले आहेत. सकाळच्या थंड हवेत पशु पक्षांची कुडकुडती किलबिल चालू होणार. सकाळची सूर्यकिरणे हवीहवीशी वाटू लागणार. चला तर स्वागत करूया येणार्या हिवाळी ऋतूचे.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
दवबिंदू, सरीवा फोटो सुंदर.
दवबिंदू, सरीवा फोटो सुंदर.
हायड्रेंजिया गुच्छात येतो. फोटो सुंदर आलाय एका फुलाचा. माझ्याकडे ह्याच रंगातला आहे. सध्या कळ्या धरताहेत.
सरीवा गुलाबाच्या पाकळ्यांची क्वालीटी फार सुंदर दिसतेय. ह्याला नक्कीच जास्त सुगंध येत असणार.
गवतफुले
![](https://lh3.googleusercontent.com/1PHoNEwkQhnJBsHJ_wjFmfxPzmGK0qBs8lGHMYOB5587USMg3Nj41MLTP9Lr8GHeW04kwl6LYmomNS8v6hhT8waaHsHxzwq2MDc6Z_Q=w1366-h768-rw-no)
![](https://lh3.googleusercontent.com/qxgyL0ITibc6U4EaPGsy8VVxq6XtCZh1nIz0eUwa9iWHXXg0EQH-I3XBo2fkukcPV3w7M5Z2OWQQOXt_hSrzAPd6Up3PeKO7viPgQNc=w1366-h768-rw-no)
आहा...काय सुंदर रंग रचना आहे.
आहा...काय सुंदर रंग रचना आहे..
जागू,गवतफुले सुंदरच.
जागू,गवतफुले सुंदरच.
hydrangea ची माझ्या संग्रहातील काही फुले
सध्या एवढीच देते. अजून आहेत काही.
सरीवा, सुंदर फोटो. हे जरा
सरीवा, सुंदर फोटो. हे जरा वेगळे प्रकार आहेत !
दिनेशदा,पण ते hydrangea च
दिनेशदा,पण ते hydrangea च आहेत.मेधा ने दिलेल्या link मधे ते दिसतात.
कसली सुंदर फुले टाकलीस तू
कसली सुंदर फुले टाकलीस तू सरिवा... छानच...![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
६१६६२ वर भाषा शुद्धीकरणावरुन रान पेटलयं.. दिवसेंदिवस माबोवर यायला भिती वाटायला लागलीए मला..
माझ्या भाषेवरुन सुद्धा ऐकलय मी .. कसं करावं.. मला एक्झिट घ्याविशी वाटतेय इतक्यात...
सुंदर फोटो सारिवा. २ आणि ४
सुंदर फोटो सारिवा. २ आणि ४ नंबरची फुले लेसलीफ किंवा लेसकॅप व्हरायटी आहेत. बाकीचे दोन बहुतेक मॅक्रो फायला व्हरायटी आहेत
हायड्रेंजिया कटिंग पासून सहज रुजतात. जमिनीलगत फांद्या असतील तर त्यांचं ग्राफ्टिंग पण सहज करता येतं.
मला एक्झिट घ्याविशी वाटतेय
मला एक्झिट घ्याविशी वाटतेय इतक्यात >>> नो नो टीना, तुझी भाषा, स्टाईल आवडते मला. इथे नि ग वर पण आवडत असणारंच.
इथे आपण निसर्गप्रेमी म्हणून एकत्र येतो टीना. तू माहीर आहेस त्यात, चांगली माहीती लिहीतेस. फोटो टाकतेस. तू गेलीस तर आमचं नुकसान होईल सो नो एक्झिट, प्लीज.
फोटो सर्वच सुंदर.
फोटो सर्वच सुंदर.
ओके गं अन्जू...
ओके गं अन्जू...
खरतरं या ग्रुपमुळेच निदान मी तरी इथे टिकुन आहे.. नाही तर आजकाल पहिलं पान उघडल्या उघडल्याच डोक भणभणायला सुरुवात होते...
इथे जे काही लोक नविन आले आहे जे बहुधा अॅडमिनने हाकललेले जुनेच लोक वाटताहेत ते सर्व राग, गरळ इथे अत्यंत चीप शब्दात अन आग्रही भाषेत इथे ओकत सुटलेयत...खुप घाण वाटत बघुन सारं.. क्वालिटी तर राहिलीच नाही कुठल्या लेखामधे वा त्यावरील प्रतिसादामधे..म्हणुन जीवावर येत...
हे तेच फुल जरा लांबून ...
हे तेच फुल जरा लांबून ... हायड्रेंजिया काही वेगळेच दिसतेय ना.,,,, कि हे अर्धे उमलले आहे म्हणून असे दिसतेय
आमच्याकडे दोन तीन वर्षापूर्वी
आमच्याकडे दोन तीन वर्षापूर्वी मुसांडाचे तीन प्रकार, अॅलामांडाचे दोन आणि कण्हेरीचे दोन अशी सहासात झाडे नर्सरीतून आणून खाली जमिनीत लावली. अॅलामांडापैकी एक करणचाफा किंवा करणा होता. त्याचे सहासात फुटांचे चांगले जोमदार झाड झाले. पुष्कळ फुले आली. पण नंतर ते खूप वाढले. फांद्या कमकुवत होऊन खाली येऊ लागल्या. इतक्या उंचीवर फांद्यांना आधारही देता येईना. आणि फुले येण्याचे बंदच झाले. दुसरा अॅलामांडा वेल प्रकारातलाच होता. विकत घेताना त्यावर तुरळक फुले, कळ्या होत्या त्या फुलल्या. मात्र त्या नंतर एकही फूल नाही. कण्हेरींचेही तसेच. नुकता कुठे कळ्यांचा एक तुरा आला आहे. मुसांडांना बरेच कळे आले पण ते पूर्णपणे वाढले नाहीत. त्यातली एखादद्सरी पाकळी रंगीत निघते. सगळे झाड रंगीत पानांनी झळाळलेय असे होत नाही. फुलांसाठी काय करावे? करण्याच्या फांद्या कापाव्या का? झाडांवर कीड नाही. रोजची देखभाल असते. झाडे छान निरोगी दिसतात. पाण्याच्या फवार्याने झाडावरची धूळ धुवून टाकतो. अधूनमधून शेणखत, हिरव्या पाल्यापाचोळ्याचे खत, नवी माती घालतो.
काय करावे?
जागू तुझं गवत फूल लय लय लय
जागू तुझं गवत फूल लय लय लय आवडलं. especially दुसरा फोटो.
दवबिंदू, सरिवा, खूप छान फोटो. सरिवा तुमचं कलेक्शन झकास आहे की! माझ्याकडे गुलाबी hydrangea आहे.
दवबिंदू , तुम्ही पोस्ट केलेला hydrangea च आहे. त्याचे बरेच प्रकार असतात.
टीना, मी २-३ वर्षांपासून माय्बोली ची वाचक आहे, इथली रणधुमाळी, गरळ त्या सगळ्याला घाबरून २ वर्षं फक्त वाचकच होते. हिंमत गोळा करून मेंबर्शिप मागच्या वर्षी घेतली. शेवटी चांगले वाईट प्रवृत्ती सगळीकडेच असतात. वाईटाला घाबरून चालत नाही.
And you know, we ni.ga. people definitely appreciate you. जर फार पकली असशील तर छोटास ब्रेक घे. छो-टा-सा-च.
टीना, निगच्या धाग्यावर
टीना, निगच्या धाग्यावर तुझ्याकडून आणि सगळ्यांकडून खूप छान माहिती मिळते. मी नेहमी वाचत असते.
धन्य वाद सुलक्षणा, दिनेशजी
धन्य वाद सुलक्षणा, दिनेशजी अन्जू टीना![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सारिवा तुमचे हि फोटो सुरेख आहेत , पहिला अतिशय सुंदर !!
व्वा मस्त धावतोय धागा...
व्वा मस्त धावतोय धागा...
![](https://www.flickr.com/d589e64b-fc93-458e-b760-14a9dc1cfb4d)
![](http://farm1.staticflickr.com/757/32003166803_01f50dfc6d_b.jpg)
(No subject)
वॉव, सर्वच फोटो सुरेख.
वॉव, सर्वच फोटो सुरेख.
धन्स अन्जु...
धन्स अन्जु...
तुझ्याकडचा सोनटक्का काय म्हणतोय! यंदा फुलं मिळालीत का नाही?
बापरे..खूपच दिवसांनी....नाही
बापरे..खूपच दिवसांनी....नाही महिन्यांनी इथे येणं झालं..खूप सुंदर फोटोज आणी माहिती..
नाहीना, यंदा रुसला सोनटक्का
नाहीना, यंदा रुसला सोनटक्का माझ्यावर.
या हायड्रेंजिया ची माझी आठवण
या हायड्रेंजिया ची माझी आठवण मजेशीर आहे. सुप्रिया पिळगावकर च्या एका नाटकासाठी मी गोव्याच्या कला अकादमीत गेलो होतो. माझ्या सवयीप्रमाणे वेळेच्या बर्याच आधी गेलो होतो. म्हणून त्या अकादमीच्या मागे खाडी किनारी गेलो होतो. तिथे हि फुले खुप फुलली होती. निवांत जागा होती ती, पण एक तरुणी पाठमोरी बसलेली दिसली.. फुलांचे फोटो काढत मी बघितलं तर ती चक्क सुप्रिया होती.. माझी अत्यंत अवडती अभिनेत्री.. त्यामूळे हि फुले आणि सुप्रिया अशी सांगड मनात बसली..
पुढे जेव्हा कुर्ग ची ट्रिप प्लान करत होतो, तेव्हा कावेरी पोनाप्पा च्या वेबपेज वर तिथे मिळणार्या एका निळ्या फुलांपासून करतात त्या एका
पेयाची / रंगाची माहिती वाचली. त्या पानावर याच फुलांचा फोटो आहे ( मी तेव्हा बारकाईने नाव वाचले नाही ) त्यामूळे याच फुलांचा अर्क ते
वापरतात असा समज होऊन बसला.
खरं तर ती वेगळी फुले आहेत... बघतो लिंक सापडल्या तर दोन्ही.
हे कावेरीचे वेबपेजhttp:/
हे कावेरीचे वेबपेज
http://kaveriponnapa.com/coorg-medicinal-payasa-madde-payasa.html
हे त्या फुलांचे नाव
Justicia wynaadensis
आणि हि त्या फुलाची माहिती
https://www.flowersofindia.net/catalog/slides/Wayanad%20Justicia.html
अरे हीराचं शंकानिरसन करा
अरे हीराचं शंकानिरसन करा जाणकारांनो..
हीरा, ही तशी नेहमी फुलत
हीरा, ही तशी नेहमी फुलत राहणारी झाडं आहेत. आणि एवढी काळजी तर घेता आहातच. थोडे दिवस वाट बघावी, हेच बरं.
हीरा, ही तशी नेहमी फुलत
हीरा, ही तशी नेहमी फुलत राहणारी झाडं आहेत. आणि एवढी काळजी तर घेता आहातच. थोडे दिवस वाट बघावी, हेच बरं.>> दिदा, फांद्या जराश्या छाटल्या तर मदत होईल का?
लास व्हेगास, सॅन डिएगो, लॉस अ
लास व्हेगास, सॅन डिएगो, लॉस अॅन्जेलीस या शहरांमधे , अमेरिकेतल्या वाळवंटी भागात कण्हेर एकदम जोमाने वाढतात आणी बहरत असतात. रस्त्याच्या कडेने किंवा दुभाजकावर, कुंपणालगत लावायला एकदम सुटेबल आणि पॉप्युलर ,
लहान झाड, किंवा नव्याने लावलेले रोप असेल तर व्यवस्थित पाणी लागेल. पण एकदा एस्टॅब्लिश झाल्यावर ही बर्यापैकी ड्राउट टॉलरंट झाडं आहेत.
फुलं येत नसतील तर
१. एस्टॅब्लिश्ड झाड असल्यास थोडी छाटणी करा . दर वर्षा दोन वर्षांनी छाटणी करावी. लेट फॉल हा बेस्ट टाइम. फुलं नेहमी नव्या ग्रोथ वर येतात. मुंबईत आता अर्ली स्प्रिंग मधे सुद्धा थोडी छाटणी करायला हरकत नाही. जोमाने वाढणारे झाड आहे.
२. दुसर्या कुठल्या मोठ्या झाडाची सावली येत असल्यास त्या फांद्या ट्रिम कराव्यात. हायवेच्या कडेने दिवस भर उन्हात असणारी झाडं भरभरून फुलत असतात,
३. १०-१०-१० ( एन पी के) असलेलं स्लो रिलीझ फर्टिलायझर घालू शकता. फांद्यावरुन पाणी जिथे जमिनीवर पडेल त्या परिघ रेषेत घाला ( ड्रिप लाइन)
छान माहिती मेधा..
छान माहिती मेधा..
छान माहिती दिनेशजी ,
छान माहिती दिनेशजी , कावेरीचे वेबपेज मस्त आहे आणि त्यावरचे फोटो सुद्धा अप्रतिम !!
टीना, दिनेशजी, मेधा, धन्यवाद.
टीना, दिनेशजी, मेधा, धन्यवाद.
Pages