Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 04:33
क्रिकेटवरील पहिले तीन धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या बरीच झाली आहे. बर्याच दिवसांत तिथे कोणी काही म्हटलेलेही नाही. सध्याच बर्याच सिरीज संपल्यात, तर काही नव्याने सुरू होतायत. त्यामुळे नवीन धागा काढायला हा आयडियल टाईम आहे. आता क्रिकेट टॉक इथे करूया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ईंग्लंड च्या विकेट्स चा धबधबा
ईंग्लंड च्या विकेट्स चा धबधबा! अफलातून जिंकली मॅच. विको च्या नेतृत्वाखाली भारताने तीन्ही सिरीज जिंकल्या. झक्कास सुरूवात.
चहल कि चहल पहल ने शेवटी ८
चहल कि चहल पहल ने शेवटी ८ धावात ८ बळी केवळ १८ मिनिटात इंग्रजांचा खेळ खलास!! वेल प्लेड!!
धोनीचा टी२० आंतरराष्ट्रीय
धोनीचा टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यातली सर्वाधिक धावांची खेळी आणि पहिले अर्धशतक. दॅट्स इन्टरेस्टिंग. आंतरराष्ट्रीय २०-२० सामन्यात आजवर धोनीने ५० धावा केल्या नव्हत्या.
लीग २०-२०मध्ये अजून धोनीचे शतक नाहिये
लीग २०-२०मध्ये अजून धोनीचे
लीग २०-२०मध्ये अजून धोनीचे शतक नाहिये > >तो ज्या क्रमांकावर येतो तिथे शतक करणे कठीण आहे रे खूप. Only freak inning under freak situation can get that.
विको च्या नेतृत्वाखाली भारताने तीन्ही सिरीज जिंकल्या. झक्कास सुरूवात. >> तेंडूलकरची सुरूवात आठवा नि धडा घ्या
मिश्राला नो बॉल चा issue डोक्यात ठेवूनही लिमिटेड ओव्हर्ससाठी पहिला स्पिनर अशी चॉईस सध्या जरुरी आहे. इंग्लंड्मधे तर अजूनच. भाऊ पण परत येतील अशाने
धोनीने अर्धशतक मारूनही कु.ॠ. नाही अजून आला ? सब खैरियत तो है !
धोनीने अर्धशतक मारूनही कु.ॠ.
धोनीने अर्धशतक मारूनही कु.ॠ. नाही अजून आला ? सब खैरियत तो है !
>>>
बस्स माझी आठवण कोणी काढतेय का याची वाट बघत थांबलेलो..
स्टार ऑफ द शो चहल झाला, समोरून युवराजने एकाच षटकात त्याचे कडक शॉट मारत फोकस आपल्यावर खेचून घेतला, रैनाने आपले नेहमीसारखे आल्याआल्या कामाला लागायचे काम चोख बजावले, पण या सर्वात धोनी त्याचे पहिले अर्धशतक मारताना प्रॉमिसिंग इनिंग खेळून गेला. त्याला आज योग्य नंबरवर पाठवला. आपली गाडी जिथे नेमकी घसरते, त्या पिरीअडमध्ये तो स्कोअर स्मूथली पुढे घेऊन गेला, आणि तो हे ईतर कोणापेक्षाही जास्त सातत्याने करू शकतो.
धोनीचे आजचे हे पहिले च अर्ध
धोनीचे आजचे हे पहिले च अर्ध शतक असले तरी त्याचा एवरेज ३६.६३ आहे
(वर्ल्ड ट्रेड सेंटरवरच्या
प्रतिसाद संपादीत
-अॅडमीन
इतके बुळचट..????
इतके बुळचट..????
काल धोनीचा रुद्रअवतार
काल धोनीचा रुद्रअवतार पहिल्यांदा पाहून चहल इतका घाबरलेला कि इंग्लंडच्या ५ विकेट काढल्या.
तो रनआऊट फार महाग पडला असता जर रॉय १० ओवर पर्यंत टिकला असता. रॉय आणि रूट यांनी मॅच खेचली असती. त्या रनआउटचे मुल्य चुकवावे लागले असते
बहुदा धोनीच फिल्डिंग लावत
बहुदा धोनीच फिल्डिंग लावत असतो. तशा सुचना कोहलीला देतोय असे सातत्याने दाखवले जाते.
धोनी: बुमरा तु थर्ड मॅन पे जा. नेहरा तु कव्हर पे . रिशू तु पॉईंट पे आ जा. युवी कवर कर उसे. रैना तु लाँग ऑफ पे रेह
कोहली :- माही. यार कॅप्टन मै हु.. कुछ तो खयाल रख..
धोनी :- पता है... तु लाँग ऑन पे जा. !!
जनरली क्रिकेट मध्ये कॅप्टन
जनरली क्रिकेट मध्ये कॅप्टन कोणीही असो, किपरचा फिल्डिंग लावण्यात महत्त्वाचा हातभार लावत असतो. हे सामान्य ज्ञान देखील अनेक लोकांना माहिती नाही असे सोशल मिडियावर कोहली वन डे कप्तान झाल्यापासून फार दिसत आहे. मग धोणीने फिल्डिंग लावली ह्यात नवल काय?
धोणीला मोठा दाखवण्यासाठी कोहलीला खाली दाखविणे गऱजेचे आहे का? टेस्ट मॅच मध्ये धोणी असतो का? तिथेही ४-० ने जिंकले आहेत. जिथे ड्यु आहे तिथे क्रेडीट द्यायला का त्रास जावा? अगदी जोक वगैरे करण्याइतके ! :|
फिल्डिंग मधे धोनीच्या
फिल्डिंग मधे धोनीच्या अनुभवाचा फायदा कोहली घेत आहे हे दिसून येते. बॉलर फिल्डर यांच्याशी वारंवार संवाद साधण्याकरीता १२ टीमचे सगळे कॅप्टन हे फिल्ड पोजिशन मधे ३० यार्डच्या आत उभे राहतात. यात अपवाद "कोहली"चा दिसून येतो कारण तो एकटाच सीमेजवळ उभा असतो. काल पुर्ण मॅच तो सीमेजवळ उभा होता. १५ व्या ओवर नंतर तो आत आला.
हे वेगळेपण उठून दिसते .
जनरली क्रिकेट मध्ये कॅप्टन
जनरली क्रिकेट मध्ये कॅप्टन कोणीही असो, किपरचा फिल्डिंग लावण्यात महत्त्वाचा हातभार लावत असतो. हे सामान्य ज्ञान देखील अनेक लोकांना माहिती नाही असे सोशल मिडियावर कोहली वन डे कप्तान झाल्यापासून फार दिसत आहे. मग धोणीने फिल्डिंग लावली ह्यात नवल काय? >>हुश्श ! मला वाटत होतं हे असं वाटणारा मी एकटाच की काय !
कालची मॅच अनपेक्षित रित्या फिरवली चेहेल ने. सायकल स्टॅन्ड परफेक्ट !
८ विकेट ८ धावांमधे गमवणारा
८ विकेट ८ धावांमधे गमवणारा इंग्लंड हा एकमेव संघ ठरला आहे
त्यांचे तब्बल ६ फलंदाज शुन्यावर आऊट झाले हा ही एक रिकॉर्ड आहे.
२ बाद ११९ वरून सर्वबाद १२७ . इतका तर पाकिस्तान सुध्दा ढेपाळत नाही
IPL auction परवा आहे ना ४
IPL auction परवा आहे ना ४ तारखेला की पुढे ढकललय?
कुणाला काही आयडीया?
"नेहरा तु कव्हर पे" - नेहरा
"नेहरा तु कव्हर पे" - नेहरा त्याच्या प्राईम मधे असताना (म्हणजे कधी?) सुद्धा कधी त्याला कव्हर ला वगैरे उभं करायची कल्पना कुणी केली नव्हती. २००३ च्या ऑस्ट्रेलिया दौर्यात सुद्धा ईतक्या मोठ्या ग्राऊंड्स वर नेहराची जागा थर्ड मॅन असायची.
पहिल्या टी-२० मधे नासर हुसेन जेव्हा म्हणाला की 'England are targeting Nehara and Yuvraj in the field', तेव्हा 'हाय गे उज्जैनी' असं वाटलं. भारताच्या एके काळच्या सर्वोत्कृष्ट फिल्डर चं नाव नेहराबरोबर जोडलं गेलं. एके काळी अमिताभ (७० च्या दशकातला) बॉलिवूड चा सुपरस्टार असताना त्याने ज्या लोकांना त्याच्या सिनेमात मॉब सीन मधे सुद्धा कधी जागा मिळाली नसती, ते जसं हल्ली त्याच्या सिनेमात, त्याच्या जीवलग मित्राचं वगैरे काम करतात, तसं वाटलं युवराज आणी नेहरा च्या फिल्डींग ची तुलना ऐकून.
कोहलीने ३ कॅच घेतले की.
कोहलीने ३ कॅच घेतले की. म्हणजे तो योग्यच ठिकाणी उभा होता म्हणायचे
अमिताभ (७० च्या दशकातला)
अमिताभ (७० च्या दशकातला) बॉलिवूड चा सुपरस्टार असताना त्याने ज्या लोकांना त्याच्या सिनेमात मॉब सीन मधे सुद्धा कधी जागा मिळाली नसती, ते जसं हल्ली त्याच्या सिनेमात, त्याच्या जीवलग मित्राचं वगैरे काम करतात, तसं वाटलं युवराज आणी नेहरा च्या फिल्डींग ची तुलना ऐकून.>>
याच्या जीवलग मित्राचं वगैरे
याच्या जीवलग मित्राचं वगैरे काम करतात, तसं वाटलं युवराज आणी नेहरा च्या फिल्डींग ची तुलना ऐकून.>>>
अगदी अगदी!! मला ती अन्योक्ती आठवली!
राहुच्या वदनी आज गवसता तो भानु दैवे अहा
कैसे क्षुद्र काजवे चमकती त्याच्या पुढे हे पहा
द. अफ्रिका वि. श्रीलंका ओअन
द. अफ्रिका वि. श्रीलंका ओअन-डे कुणी फॉलो करतय का? जबरदस्त चाललीये मॅच. द. अफ्रिकेच्या ३६७/५ च्या प्रत्त्युत्तरादाखल श्रीलंकेचा १५ ओव्हर्स मधे १३७/०. दोन्ही ओपनर्स च्या जबरदस्त हाफ सेंच्यूरीज!!
बघताँय बघताँय फेरफटका. दु
बघताँय बघताँय फेरफटका. दु प्लेसिस १८५ करून कर्स्टनच्या अगदी जवळ आलेला. श्रीलंकेने सीरीज हरल्यानंतर एकदम गीअरच बदलले की. आता दिकवाला गेला. श्रीलंका नीड्स २१६ इन ३० ओव्हर्स विथ ९ विकेट्स इन हँड्स!
सहीये, बघतो आता... श्रीलंका
सहीये, बघतो आता... श्रीलंका जिंकली तर बघायला मजा आहे. त्यांना अश्या एखाद्या विजयाची गरज आहे.
थरंगा ७३ बॉलात सेंच्युरी!
थरंगा ७३ बॉलात सेंच्युरी! श्रीलंका २५ ओव्हर्स १९५/१! जाळ काढलाय.
श्या, थोडक्यात हारले. अर्थात,
श्या, थोडक्यात हारले. अर्थात, टारगेट खुप मोठं होतं, पण मस्त फाईट दिली. ४४ बॉल्स मधे ७१ हवे होते तेव्हा, काढतील असं वाटलं होतं.
लंका अशी एखाद्या सामन्यात
लंका अशी एखाद्या सामन्यात मधेच पेटून खेळते. Overall त्यांच्याकडे big winners नाहित आधी सारखे असे वाटत राहते. बरीच तरुण टीम आहे पण limited talent ची वाटते. एकदम हा पुढे जाऊन धमाल करणार अशा टाइप्समधले कोणी वाटत नाही.
भारी खेळली लंका.
भारी खेळली लंका.
बर ते T20मधे ३०० रन वाचल्या का? कितीही लिग मॅच का असेना. ४००+ स्कोर २० ओव्हर मधे. नक्की काय केले काय माहीत.
"ते T20मधे ३०० रन वाचल्या का?
"ते T20मधे ३०० रन वाचल्या का? ' - वाचलं. दिल्ली डेअरडेव्हिल्स नी ट्रायल्स साठी बोलावलय त्याला.
उद्यापासून भारत-बांगलादेश (एकमेव) टेस्ट सुरू. बांगलादेश कसं खेळतात ही उत्सुकता आहे.
४० यार्डाच्या मैदानावर मारले
४० यार्डाच्या मैदानावर मारले. जर गोलंदाजीचा दर्जा सुमार असेल तर ताकदीचा खेळ.
"४० यार्डाच्या मैदानावर मारले
"४० यार्डाच्या मैदानावर मारले. जर गोलंदाजीचा दर्जा सुमार असेल तर ताकदीचा खेळ.' - सहमत. म्हणूनच हे असले रेकॉर्ड्स गांभिर्यानं घेता येत नाहीत. त्यातूनही खूप कमी लोक असल्या स्टेपिंग स्टोन्स चा चांगला उपयोग करून घेतात. विनोद कांबळी पासून, उन्मुक्त चांद, विजय झोल, अरमान जाफर अशी कित्येक नावं आहेत.
र
राहुल द्रवीडला Conflict of Interest च्या सबबीखाली DDचे मॅंटॉरपद सोडावे लागण्याची शक्यता आहे अश्या आशयाची बातमी वाचली मी काही वेळापूर्वी amp वर.... आता शोधायला गेलो तर गायबलीय बहुतेक!
त्याने अंडर १९ संघातल्या सहा खेळाडूना DDच्या ट्रायलसाठी recommend केले म्हणे.... which may damage the morale of other 12 players in U-19 squad.... which was not expected frm a player like Dravid असा एकंदर बातमीचा रोख होता!
Pages