Submitted by maitreyee on 5 August, 2015 - 11:41
अमेरिकेच्या निवडणुका जवळ आल्यात !! २०१६ च्या रेस मधे रंग भरू लागलेत !! त्यावर चर्चा करायला हा धागा:
डेमोक्रॅटिक पक्षातर्फे मुख्य उमेदवार म्हणजे नारी शक्तीची एकमेव प्रतिनिधी हिलरी !! बाकी बर्नी सँडर्स आणि सध्याचे व्हाइस प्रेसिडेन्ट जो बायडन (कदाचित) ही चर्चेत असलेली नावं.
रिपब्लिकन्स मधे मात्र डझनावारी उमेदवार बाशिंग बांधून उभे आहेत !! टॉपची चर्चेतील नावं - फ्लोरिडा चे एक्स गवर्नर आणि थोरल्या प्रेसिडेन्ट बुश यांचे धाकटे पुत्र जेब बुश, फ्लोरिडाचेच सिनेटर मार्को रुबिओ ,न्यू जर्सी गवर्नर क्रिस क्रिस्टी, सिनेटर्स रँड पॉल आणि टेड क्रुज, आणि लास्ट बट डेफिनेटली नॉट द लीस्ट - बिलिनेयर बिझ्नेसमन आणि अचाट वक्तव्यांसाठी आणि तेवढ्याच अचाट हेअरस्टाइलसाठी प्रसिद्ध डोनाल्ड ट्रम्प!!
एकूण पुढचे काही महिने मज्जाच मज्जा येणार !!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=RWmcW9dEd2c
ओबामा गेले ८ वर्षे फॉक्सला जी सापत्न वागणूक देत होता ती माध्यमांना रुचत होती. पण आता ट्रंप सी एन एन ला तसे वागवतो आहे ते मात्र खटकते आहे. दुटप्पीपणा म्हणतात तो हाच!
एल एल बीनवर बहिष्कार घाला अशी एक टूम निघाली आहे. त्याला हे चोख प्रत्युत्तर आहे.
अहो चोख प्रत्युत्तर द्या की.
अहो चोख प्रत्युत्तर द्या की. पण शेंन तुम्ही इनिशिएटिव्ह घेऊन हे ट्वीट करायला हवं आता. तो लवकरच प्रेसिडेंट होणारे. काही नाही तर त्या पदाची तरी शोभा करू नका!
>> तो लवकरच प्रेसिडेंट
>> तो लवकरच प्रेसिडेंट होणारे. काही नाही तर त्या पदाची तरी शोभा करू नका!
लोकशाही म्हणजे लोकांचे, लोकांसाठी, लोकांनी निवडलेले सरकार. राष्ट्राध्यक्ष काही आकाशातून पडत नाही. तो सामान्य माणूसच असतो. ह्या ट्वीटने कुणाची शोभा होते आहे वा जाते आहे असे मला वाटत नाही. उलट राष्ट्रपतीपदाची निव्वळ शोभा वाढवणारे अध्यक्ष आता नकोसे झाल्यामुळेच ट्रम्प निवडून आला आहे.
विश्वासार्हता/अब्रु वेशीला
विश्वासार्हता/अब्रु वेशीला टांगली गेलेली आहे...
बिच्चारे सी एन एन.
आणि ट्रंप च्या विश्वासार्हतेचे नि अब्रूचे मात्र पूर्णपणे धिंडवडे काढले सगळ्या मिडियाने, एस एन एल ने.
ते चालते?
विश्वासार्हता/अब्रु वेशीला
विश्वासार्हता/अब्रु वेशीला टांगली गेलेली आहे...
बिच्चारे सी एन एन.
आणि ट्रंप च्या विश्वासार्हतेचे नि अब्रूचे मात्र पूर्णपणे धिंडवडे काढले सगळ्या मिडियाने, एस एन एल ने.
ते चालते?
एस एन एल ही एक जबाबदार
एस एन एल ही एक जबाबदार वृत्तसंस्था आहे असा आपला समज झाला आहे का? माझ्या मते ह्या कार्यक्रमाचे काम विनोदनिर्मितीचे आहे आणि त्यांनी ते केले तर ट्रंपच्या अब्रूचे खोबरे होत नाही. निदान लोकांना तरी तसे वाटत नाही नाही तर तो निवडून आला असता का?
सी एन एन ने ट्रंपच्या लफड्याचे जे तथाकथित पुरावे दिलेत पूर्ण खोटारडे असल्याचे निष्पन्न झाले आहे त्यामुळे ती सनसनाटी बातमी आता सी एन एन करता अत्यंत बेजबाबदार आणि लाजिरवाणी असल्याचे सिद्ध होत आहे.
ट्रंप हा अत्यंत नालायक आहे असे म्हणणे आणि ट्रंपने असे केले आणि त्याचे हे पुरावे असे म्हणणे ह्यात फरक आहे. आपले मत मांडणे आणि वस्तुस्थिती सांगणे ह्यात फरक असतो. वस्तुस्थितीकरता जास्त ठोस पुरावे लागतात. मत मांडण्याकरता फार पुरावे लागत नाहीत.
सी एन एन ने ट्रंपच्या
सी एन एन ने ट्रंपच्या लफड्याचे जे तथाकथित पुरावे दिलेत पूर्ण खोटारडे असल्याचे निष्पन्न झाले आहे >>>> कधी निष्पन्न झाले म्हणे हे?
== कधी निष्पन्न झाले म्हणे
==
कधी निष्पन्न झाले म्हणे हे?
==
गेले काही दिवस बातम्या बघत असाल तर असे विचारायची वेळ आली नसती. ट्रंपचा वकील प्राग मधे जाऊन रशियन लोकांशी वाटाघाटी करत होता म्हणे अशी छातीठोक बातमी बझफीड नामक कुण्या सडकछाप वेब साईटवर आली. तो ट्रंपचा वकील आयुष्यात कधी प्रागला गेला नाही. त्याने त्याचा पासपोर्ट दाखवून त्याची खातरजमा केली.
ज्या बातमीचा मुख्य घटक हा इतक्या धडधडीत खोट्या पुराव्यावर आधारित आहे त्याची आणखी शहानिशा करायची गरज नाही.
फोर चॅन ह्या साईटवरून ट्रंपच्या वेश्येकडून काही हीन कृत्य करवल्याच्या कहाण्या पसरवल्या त्याही बझफीडने तत्परतेने खर्या म्हणून सांगितल्या.
अत्यंत सवंग, उथळ आणि खोटारड्या गोष्टी केवळ ट्रंपची बदनामी होत आहे म्हणून मुख्य मथळा म्हणून सी एन एन ने ती बातमी छापली. ह्यातून त्यांचा पक्षपातीपणा आणि अप्रामाणिकपणा सिद्ध होतो.
तिथे सीएनएन इथे एनडीटीव्ही
तिथे सीएनएन इथे एनडीटीव्ही
काही फरक नाही.
काल मी हे लिहिले होते त्याला
काल मी हे लिहिले होते त्याला कोणी उत्तर दिले नाही. पाहतो परत टाकून !
माध्यमांनी खातरजमा न करता बातमी छापणे वाईट आहे. त्याने खर्या बातम्यांचा गंभीरपणाही बाजूला जाऊन त्याही फेक न्युज वाटायला लागतात. त्यामुळे बझफीड आणि सीएनएन ची चूक झालीच !!
पण या सगळ्या गदारोळापेक्षा महत्त्वाची बातमी मला ट्रंप त्याचा बिझनेस ब्लाईंड ट्रस्ट कडे सोपोवणार नाही म्हणजे खुप मोठा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट होणार ही वाटते आहे. त्यामुळे आपल्या पदाचा गैरवापर करण्याचे प्रकार वाढीस लागतील असे वाटते. आणि आता खुद्द प्रेसिडेंटच असे करतोय म्हणजे त्याला सरसकट परवानगी आहे असे लोकांना वाटेल की जे चूक आहे.
http://www.cnn.com/2017/01/18
http://www.cnn.com/2017/01/18/politics/betsy-devos-elizabeth-warren-stud...
एन्टरटेनिंग आहे
ट्रंपसाहेब आज शपथ घेऊन
ट्रंपसाहेब आज शपथ घेऊन अध्यक्षपदावर आरूढ होणार असे दिसते आहे. अनेक लोकप्रतिनिधींनी ही निवडणूक अवैध आहे म्हणून सोहळ्यावर बहिष्कार घातला आहे. याआधी लिंकनच्या अध्यक्षपदभारग्रहण सोहळ्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात बहिष्कार घातला गेला होता. तोही डेमोक्रॅट पक्षाकडूनच. पण तेव्हा ते काळ्यांना दास्यातून मुक्त करण्याच्या विरोधी होते.
ट्रंपकरता कारकीर्दीतला प्रत्येक दिवस हा अडथळ्याची शर्यत असणार आहे असे दिसते आहे.
तो व्हाइट हाउस च्या समोर दोघे
तो व्हाइट हाउस च्या समोर दोघे (चौघे) भेटतात तो प्रसंग एकदम ग्रेसफुल होता. आता शपथ असेल.
बिल-हिलरी लुक ग्रेशस, रेस्ट
बिल-हिलरी लुक ग्रेशस, रेस्ट आॅफ दि डेम्स हॅव ए लाॅंग वे टु गो...
ग्रेशस असून काही उपयोग होत
ग्रेशस असून काही उपयोग होत नाही हे त्यांच्या उदाहरणावरूनच शिकले असतील
कॉरोनेशन (राज्याभिषेक) कोण
कॉरोनेशन (राज्याभिषेक) कोण बघत आहे का?:)....ट्रंप राजा आला..
आज शेंनं च्या घरी अगदी लगबग
आज शेंनं च्या घरी अगदी लगबग असेल. वर्ष भर पाण्यात ठेवलेले देव बाहेर काढून पूजा, पुरणा वरणाचा नेवैद्य, संतोषी मातेचे उद्यापन वगैरे. काही हिलरी समर्थक माबो भगिनी हळूच जाऊन नैवेद्याच्या खिरीत लिंबू पिळतील की काय?
विकु, :हाहा:
विकु,
अरे लोक डी सी ला गेले नाहीत
अरे लोक डी सी ला गेले नाहीत का ? की इतक्या लवकर भ्रमनिरास झाला
https://qz.com/890683/trump-inauguration-crowds-at-donald-trumps-swearin...
विकु :हहगलो: आज शेंन आणि राज
विकु
आज शेंन आणि राज ह्यांनी वर्चुअल का होईना पण मायबोली जेवण घालायला हरकत नाही. 
आम्ही ऑनलाईन गिफ्टकार्ड्स पण
आम्ही ऑनलाईन गिफ्टकार्ड्स पण स्विकारायला तयार आहोत
नेकी और पुछपुछ? ईमेल/सेल#
नेकी और पुछपुछ? ईमेल/सेल# मिळताच गिफ्ट वाउचर्स (जीओपी मेंबरशीप फाॅर्म सोबत) पाठवतो...
ईमेल/सेल# मिळताच >> नको हो
ईमेल/सेल# मिळताच >> नको हो उगीच रजीस्टरीत नोंद व्हायची भिती वाटतेय
== काही हिलरी समर्थक माबो
== काही हिलरी समर्थक माबो भगिनी हळूच जाऊन नैवेद्याच्या खिरीत लिंबू पिळतील की काय?
अहो विकु, मी कॅलिफोर्नियात आहे. त्यामुळे माझा आनंदोत्सव लोकांच्या डोळ्यात खुपला तर माझीच मुंडी मुरगाळतील. लिंबू पिळण्यापेक्षा मला ती जास्त धास्ती आहे!
तेव्हा आपला घरच्या घरीच नवस फेडलेला बरा!
जबरदस्त भाषण. अगदी धडाकेबाज.
जबरदस्त भाषण. अगदी धडाकेबाज.
भारतीयांनी याचे हिंदी व्हर्जन २०१४ सालीच ऐकले होते.
>मी कॅलिफोर्नियात आहे
>मी कॅलिफोर्नियात आहे
बापरे ! येते काही दिवस,
१ नकली दाढी व मिशा लावून घ्या.
२ चेहरा आनंदी ठेवू नका.
३ मेक अमेरिका ग्रेट अगेन असे लिहिलेली लाल टोपी असेल तर ती घालून हिंडू नका. किंबहुना ती जाळून तिची राख परसदारात पुरून टाका. जान बची लाखो पायें!
>> >मी कॅलिफोर्नियात आहे
>> >मी कॅलिफोर्नियात आहे
म्हणजे तुमची स्वप्नपुर्ती होण्यात तुमचा काहीच हातभार नाही तर! सगळा नियतीचा खेळ
म्हणजे तुमची स्वप्नपुर्ती
म्हणजे तुमची स्वप्नपुर्ती होण्यात तुमचा काहीच हातभार नाही तर << त्यांची स्वप्न पुर्ती व्हायला अमेरिकेचा तरी हात आहे का?
==१ नकली दाढी व मिशा लावून
==१ नकली दाढी व मिशा लावून घ्या.
हो. आणि त्या जांभळ्या किंवा हिरव्या अशा भडक रंगी वा अनेकरंगीअसतील तर सोन्याहून पिवळे!
==२ चेहरा आनंदी ठेवू नका.
अहो सॅन फ्रान्सिस्को हे आनंदी लोकांचे माहेरघर आहे असे ऐकून होतो. असो! ते वेगळे आनंदी असावेत!
== मेक अमेरिका ग्रेट अगेन असे लिहिलेली लाल टोपी असेल तर ती घालून हिंडू नका. किंबहुना ती जाळून तिची राख परसदारात पुरून टाका. जान बची लाखो पायें!
==
छे छे! असले काही मी बाळगत नाही. हेट क्राईम म्हणून माझ्यावर केस होईल! माझ्याकडे चे गव्हेरा आणि तत्सम लोकांची चित्रे असलेले टी शर्ट आणि टोप्या आहेत. त्याच वापरतो आहे.
हेट क्राईम म्हणून माझ्यावर
हेट क्राईम म्हणून माझ्यावर केस होईल!
आता नाही होणार. उलट तुमच्या फोटोच्या हजारो कॉपीज (सरकारी खर्चाने) काढून प्रसिद्धी करतील, फॉक्स न्यूजवर, की सॅन फ्रान्सिस्को मधे लक्षावधी लोकांचा ट्रंपला पाठिंबा?
शिवाय तुमच्या घरी टॉयलेट फ्लश करायला सोन्याची साखळी लावून देतील. कारण आता व्हाईट हाऊस चे गोल्डन हाउस होणार आहे.
म्हणजे पन्नास वर्षांनी कुणि मुसलमान सदाशिवराव भाऊ व्हाईट हाउसची तोडफोड करेल.
Pages