अमेरिकेतल्या निवडणुका - २०१६

Submitted by maitreyee on 5 August, 2015 - 11:41

अमेरिकेच्या निवडणुका जवळ आल्यात !! २०१६ च्या रेस मधे रंग भरू लागलेत !! त्यावर चर्चा करायला हा धागा:

डेमोक्रॅटिक पक्षातर्फे मुख्य उमेदवार म्हणजे नारी शक्तीची एकमेव प्रतिनिधी हिलरी !! Happy बाकी बर्नी सँडर्स आणि सध्याचे व्हाइस प्रेसिडेन्ट जो बायडन (कदाचित) ही चर्चेत असलेली नावं.
रिपब्लिकन्स मधे मात्र डझनावारी उमेदवार बाशिंग बांधून उभे आहेत !! टॉपची चर्चेतील नावं - फ्लोरिडा चे एक्स गवर्नर आणि थोरल्या प्रेसिडेन्ट बुश यांचे धाकटे पुत्र जेब बुश, फ्लोरिडाचेच सिनेटर मार्को रुबिओ ,न्यू जर्सी गवर्नर क्रिस क्रिस्टी, सिनेटर्स रँड पॉल आणि टेड क्रुज, आणि लास्ट बट डेफिनेटली नॉट द लीस्ट - बिलिनेयर बिझ्नेसमन आणि अचाट वक्तव्यांसाठी आणि तेवढ्याच अचाट हेअरस्टाइलसाठी प्रसिद्ध डोनाल्ड ट्रम्प!!

एकूण पुढचे काही महिने मज्जाच मज्जा येणार !! Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नवीन धागा विनोदी विभागात असावा, याला जोरदार समर्थन!

आजच केलीअ‍ॅनकॉनवेकाकू पहा काय वदल्या (ट्रम्पबाबाने एका अपंग पत्रकाराच्या केलेल्या नकलेच्या संदर्भात):

“Why is everything taken at face value?” she said. “You can’t give him the benefit of the doubt on this and he’s telling you what was in his heart? You always want to go by what’s come out of his mouth rather than look at what’s in his heart.”

==
शेंनं, तुम्ही दिलेली समाजवादाच्यी व्याख्या ही कॅरिकेचर प्रकारातील आहे. आयन रँड ला समाजवादाची व्याख्या करायला सांगितली तर ती अशी करेल.
==
हे समाजवादाचे व्यंगचित्र वाटत असल्यास नाईलाज आहे. पण खर्‍याखुर्‍या भारतात स्वातंत्र्य मिळाल्यावर ५० वर्षे हा हास्यास्पद प्रकार चालू होता. २-३ पिढ्यांनी हा भोग भोगलेला आहे. सरकारी खर्चाने अनेक पांढरे हत्ती पोसून जनतेचे हाल करणे हे चालू होते ही विदारक वस्तुस्थिती आहे.
एका वरवर पहाता आकर्षक वाटणार्‍या पण अत्यंत अव्यवहारी तत्त्वज्ञानाला जबरदस्तीने अमलात आणले की अशीच हास्यास्पद परिस्थिती उद्भवते. असो. ट्रंपकडून तसा धोका नाही! मूळ विषयाकडे यावे.

http://www.dailymail.co.uk/news/article-3790226/Trump-s-impression-disab...

इथे असे म्हटले आहे की ट्रंपने त्या पत्रकाराच्या व्यंगाची नक्कल केली नव्हती. अनेक प्रसंगी कुणाला वेडावून दाखवताना अभावितपणे तो एक हात तसा करतो. त्याआधी टेड क्रुझची नक्कल करतानाही तसेच केले होते. आता टेड क्रुझला काही तसे व्यंग नाही. अजूनही अन्य लोकांची नक्कल करताना तसेच केलेले आढळते. तेव्हा इथे तसे झाले असणे अशक्य नाही. आता ज्यांना ठाम विश्वास आहे की तो व्यंग असणार्‍या लोकांची टिंगल करणारा दुष्ट मनुष्य आहे त्यांनी जरूर तसे मानावे. पण निदान दुसर्या बाजूकडे संशयाला जागा येण्या इतपत पुरावे आहेत हेही लक्षात घ्या.

ट्रंपच्या केसावरून, त्वचेच्या शेंदरीपणावरून म्हणजेच त्याच्या शारिरिक व्यंगावरून केलेल्या असंख्य विनोदांना निखळ विनोद मानून कधी मंद स्मित करुन तर कधी खळखळून तर कधी पोट धरधरून हसणारे पुरोगामी लोक ट्रंपने तसे केले अशा संशयावरुनही आकाशपाताळ एक करतात हे नाही म्हटले तरी थोडे विसंगत वाटते. ट्रंपच्या शारिरिक वैशिष्ट्यांवरुन केलेल्या विनोदाबद्दल कुठल्या पुरोगाम्याने निषेध वा टीका केल्याचे ऐकले आहे का?

But pro-Trump website Catholics 4 Trump says that the Republican candidate has a long history of making similar gestures while mocking other people.
हे आर्ग्युमेंट ऑलरेडी डिबन्क केलं गेलं आहे:

Both impressions involve open-mouthed hand-waving, but there are obvious differences. Only when Trump mocks Kovaleski does he curl his right hand and wrist in a way that mimics the effect of the reporter's condition. And only when Trump mocks Kovaleski does he simulate involuntary spasms.
...
What about Coulter's claim that Trump "has done the exact same imitation of Ted Cruz"?
It's definitely closer than Trump's impression of the general but, again, the wrist and finger contortions are missing. What's more, this footage of Trump making fun of Cruz is from February, after the original controversy.

ट्रंपच्या शारिरिक वैशिष्ट्यांवरुन केलेल्या विनोदाबद्दल कुठल्या पुरोगाम्याने निषेध वा टीका केल्याचे ऐकले आहे का
>> शे न. आपली ओळख नाही. पण ट्रंप ह्यांचे फायबर ग्लासचे नागडे स्टॅच्यू न्यू यॉर्क व इतर ठिका णी
अचानक पने दिसले होते व अनेक नागरिकांनी तिथे सेल्फीज काढणे हसणे असे उद्योग केले होते. हे फेसबुक वर व सी एन एन, रूटर्स. कॉम वर फोटो आले होते. हे मला अगदी खालच्या दर्जाचे व अव्हॉइड करण्याजोगे वाटले होते. एखाद्याची पर्सनल डिग्निटी इतकी कशी सोपी जाते नाकारायला? कँपेनची काही डिग्निटी आहे कि नाही? असे वाटले होते. त्यांची बरीच मते पटत नव्हती कँपेन दरम्यान पण हे जरा बिलो द बेल्ट वाटले होते तेव्हा. ह्या सर्व प्रकाराला आर्टीस्टिक एक्स्प्रेशन वगैरे नाव दिले होते. जेझ बेल साइट प्रामुख्याने शोधून शोधून त्यांच्या चुका मांडत असते.

मी समर्थक नाही. किंवा काही संबंध पण नाही. पण आता एक जागता पहारा टाइप धागा काढा. वाचन मात्र राहून फॉलो जरूर करेन.

हे मला अगदी खालच्या दर्जाचे व अव्हॉइड करण्याजोगे वाटले होते.

हे नक्कीच खालच्या दर्जाच्या लोकांचे काम.
मग ट्रंपनेहि तसेच केले तर काय बिघडले असे जेंव्हा लोक म्हणतात तेंव्हा मला प्रश्न पडतो की ट्रंप खोटे बोलतो, अतिशयोक्तिपूर्ण भाषणे करतो. हे सर्व शोभते का राष्ट्राध्यक्ष होऊ पहाणार्‍याला? त्याच्या वैयक्तिक आयुष्यात त्याने केलेले धंदे (दोन्ही अर्थांनी) यामुळे त्याच्या पर्सनल डिग्निटी बद्दल किती जणांना फारसा आदर आहे हे दिसतेच आहे. ट्रंप वर टीका केलेली बोचते, मग, त्याने खोटे नाटे सांगून इतरांवर टीका केली, वाट्टेल त्या बढाया मारल्या तर चालते?

काय माहित आहे त्याला आयसिस बद्दल जे जनरल्स ना, इंटेलिजन्स च्या लोकांना माहित नाही. रशिया च्या हॅकिंगबद्दल म्हणे त्याला काहीतरी माहित आहे, मग त्या माहितीचा उपयोग फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी? आयसिस, रशियन हॅकिंग यांनी देशाच्या सुरक्षिततेला धोका आहे तर योग्य त्या सरकारी खात्याला ती माहिती देणे हे सर्वसाधारण नागरिकांकडून अपेक्षित आहे. का करत नाही तो?

कितीतरी गोष्टी फारशा चांगल्या नाहीत त्या व्यक्तीबाबत.

he’s telling you what was in his heart?

Then why does he not learn how to be eloquent? Many people who aspire for the high level jobs take care that they do not utter words or behave in a way that they are not misunderstood.

He is behaving like somebody's wife - never speaking what she really means, expecting husband to understand anyway.

And when he doesn't, cries and gets mad!
People do not like that - that's why they criticize him.

>>
काय माहित आहे त्याला आयसिस बद्दल जे जनरल्स ना, इंटेलिजन्स च्या लोकांना माहित नाही.
<<

एक व्यावसायिक असल्यामुळे आयसिसच्या आर्थिक नाड्या आवळता आल्या तर आयसिसचा नाश करता येईल असा त्याचा बेत असावा. सैन्याची प्रमुख हे थेट युद्धात तरबेज असतील पण एखाद्या बेबंद संघटनेची आर्थिक नाकाबंदी कशी करता येईल हे त्यांना फार माहित असेलच असे नाही. आणि ही युक्ती म्हणजे काही जादूची कांडी नाही. हळूहळू उपाय करुनच ते साध्य होईल. आणि काम करण्याआधीच बोभाटा करुन शत्रूला सावध का करा?

असो. हे तथाकथित त्याच्या पत्रकाराच्या व्यंगावरून चिडवण्याचे डिबंकिंग हे ज्याला पटायचे ते पटो पण मला ते निट पिकिंग ह्या जातकुळीचे वाटते आहे.

ट्रंपच्या व्यंगावर मनमुराद अश्लाघ्य विनोद करणारे जेव्हा ट्रंपच्या तथाकथित व्यंगाच्या टिंगलीचा निषेध करतात तेव्हा असे वाटते की एखादा गुंड इतरांना कायम आयाबहिणीवरून शिव्या देतो तोच दुसर्‍या दुबळ्या व्यक्तीने साला किंवा हलकट म्हणतो असा संशय घेऊन मारहाण करण्यासारखे आहे.

आयाबहिणीवरून शिव्या देतो तोच दुसर्‍या दुबळ्या व्यक्तीने साला किंवा हलकट
बरोबर.

फरक असा की नुसते साला हलकट म्हंटले तरी एखाद्याला आयाबहिणींवरून शिव्या दिल्यासारखे वाटते नि स्वतः खोटे बोलून, अतिशयोक्ति करून, दुसर्‍याला आया बहिणींवरून शिव्या दिल्या तरी त्यांनी ते इतके वाईट समजू नये असे वाटते.

नि दुसर्‍या बाजूला याच्या बरोब्बर विरुद्ध!

वाटते हा शब्द महत्वाचा खरे काय नि खोटे काय हे बहुजन, जे बाळबोध वृत्तीचे असतात, नि ज्यांना खर्‍या खोट्याची चिकित्सा करणे कष्टाचे वाटते, अश्यांना महत्वाचे वाटत नाही. त्यांना फक्त स्वतःला काय वाटते तेच महत्वाचे.

शेंडेनक्षत्र, ट्रंपने नक्की काय केलं की तुम्ही कोलांट्या उड्या थांबवून आता बस्स म्हणाल? मला वाटतं बहुतेक नल सेट आहे तो. राहुद्या.

, ट्रंपने नक्की काय केलं की तुम्ही कोलांट्या उड्या थांबवून आता बस्स म्हणाल? मला वाटतं बहुतेक नल सेट आहे तो. राहुद्या.

Trump che meetha hehi alanee aahe ase mhanane aapan thambwal tevha !

मीठ अळणी नाही., तिखट नि त्यात वाईट किडे पडलेले आहेत.

तुमचा मुख्य मुद्दा असा मला जाणवतो की एखाद्या गोष्टीकडे एकाच दृष्टीने बघण्यापेक्षा, जरा दुसर्‍या बाजूने हि विचार करून बघावा, नि मग ठरवावे की बरोबर काय नि चूक काय. जसे शाळेत वादविवाद स्पर्धेत दोन गटांना एकच विषय दोन्ही बाजूंनी मांडायला सांगतात तसे.
तुम्ही ट्रंपबद्दल जे लिहीता ते मी याच दृष्टीने पहातो.
नाहीतर एव्हढा नालायक माणूस, उघड उघड खोटे बोलणारा नि त्याच्याकडेहि वेगळ्या दॄष्टीने पाहिल्यास काय दिसू शकते हे तुम्ही सर्वांच्या निदर्शनास आणून देता आहात.
पण एकूण तुम्ही जे म्हणता आहात त्यातून बरेच विचार करण्यासारखे आहे.

फक्त एकच - लोकांची मते पक्की बनलेली, नि:संशय स्वार्थापोटी, नि ती मते बदलायला ते तयारच नसतात म्हणून कधी कधी सोडून द्यावे.
ट्रंप गेला खड्ड्यात, पण इतर बाबतीत जरी फक्त चार लोक जरा दुसर्‍या बाजूने त्याच विषयाकडे बघू लागले तर तुमचे लिहीणे सार्थकी लागेल.

तो काहीतरी खोटे, अद्वातद्वा बोलणार, कुणालाहि काहीहि शिव्या देणार, ही लोक त्याचे समर्थन करणार, सगळाच विनोदी प्रकार.
कारण ट्रम्पला टाचणी बोचली तरी सुर्‍याने भोसकले म्हणणार तो नि त्याने जरी भर टाईम स्क्वेअर मधे खून केला तरी त्याला कुणि काही करणार नाही असे तोच म्हणतो.
आता काय?

त्याचे बोलणे ऐकून त्याच्या बद्दल माझे वैयक्तिक मत अगदी कटू बनले आहे. बोलणे असे की "मी म्हणीन तेच खरे! बाकीचे सगळे खोटे " .
सरकारी इंटेलिजन्सला, सरकारी अहवालातल्या माहितीला सरळ खोटे म्हणायचे नि म्हणायचे खरे काय ते मला च माहित आहे नि मी योग्य वेळी सांगीन. आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवायचा नि निवडून दिलेल्या सरकारवर नाही?
आणि हे उदाहरणा दाखल. खरे तर

तसेहि आजकाल पक्षांधळेपणा, हटवादीपणा एव्हढा वाढलेला दिसतो राजकारणात की सगळे विनोदीच झाले आहे. एकाहि विषयाबद्दल खरे काय खोटे काय काही कळत नाही बातम्या वाचून.

त्यामुळे उगाच काहीतरी लिहायचे - समर्पक आहे असे काहींनी म्हणायचे, तर कुणि पहाटे २ वाजता उठून त्याला ओव्हर रेटेड असे म्हणायचे! खोटे आहे म्हणायचे!

मी आपला अशक्त, सेवा निवृत्त, फारसे पैसे नसलेला माणूस, माझी हीच करमणूक.

पहिलीच प्रेस काँफरंस गाजवली की ट्रंपने Biggrin , सी.एन.एन.च्या वार्ताहराकडे बघून काय ते हातवारे आणि डायलॉग्स! कठीण आहे.

सी एन एन ला अशी एक चपराक लगावून देणे आवश्यक होते. अत्यंत पक्षपाती वागणे, कायम डेमॉक्रॅटिक पक्षाचे मुखपत्र असल्याप्रमाणे बातम्या देणे. शत्रूपक्षाची बातमी असेल तर कुठलीही खातरजमा न करता सनसनाटी बातमी मथळा म्हणून देणे.

डॉना ब्राझिल ही नीच बाई जी डेमोक्रॅटिक पक्षाची पदाधिकारी होती तिने डिबेटचे प्रश्न आधीच हिलरीला सांगितले होते. तरीही सी एन एन ने त्या अधम बाईला हाकलून देण्यात अनेक दिवस टाळाटाळ केली होती.

जाता जाता: ओबामानेही फॉक्स न्यूजवर अशाच प्रकारे आगपाखड केलेली आहे. पण ओबामा आमचा लाडका आणि फॉक्स न्यूज मात्र दोडकी त्यामुळे ते खुपत नाही. ट्रंपने सीएनएन वर धार धरली तर मात्र आमचा तिळपापड होतो.
चालायचेच!

ओबामा हा कट्टर ट्रंप विरोधी आहे त्यामुळे त्याच्या अखत्यारीखाली असणारी एफ बी आय वा अन्य संस्था ही नि:पक्ष कारभार करेल असे वाटत नाही. जॉन मॅकेन हाही ट्रंपद्वेष्टा आहे. त्याने एक बिनबुडाचे कागदपत्र जे अत्यंत सवंग व उथळ प्रकाशनाने कुठलाही पुरावा नसताना प्रकाशित केले ते कागदपत्र मॅकेनने एफ बी आयला दिले. आणि ट्र्ंप व रशियाचे साटेलोटे असण्याचा सगळा डोलारा ह्या बिनबुडाच्या कपोलकल्पित कहाणीवर उभारला होता.

ओबामाने गुप्तचर संस्थांना अत्यंत दुबळे करुन सोडले आहे. अनेक दहशतवादी कृत्यांच्या तपासात असे लक्षात आले आहे की सदर दहशतवादी हा एफ बी आयच्या रडारखाली आला होता. पण त्यांच्या ढिसाळपणामुळे किंवा जाणून बुजून केलेल्या हयगयीमुळे हे दहशतवादी सुटले आणि मग त्यांनी त्यांचे भयंकर कृत्य केले.

खरोखरच्या समाजविघातक कृत्यांकडे दुर्लक्ष करुन आपल्या विरोधकांना कचाट्यात पकडण्याकरता गुप्तचर संस्था वापरल्या जात आहेत की काय असा संशय येतो आहे.

सी एन एन ला अशी एक चपराक लगावून देणे आवश्यक होते. >>> Lol

वरची दिलेली लिंक वाचली का नाही?

- "Russian regime has been cultivating, supporting and assisting at least 5 years. Aim, endorsed by PUTIN, has been to encourage 5 divisions in western alliance"

-" So far TRUMP has declined various sweetener real estate business deals offered him in Russia in order to further the Kremlin?s cultivation of him. However he and his inner circle have accepted a regular ?ow of intelligence from the Kremlin, including on his Democratic and other
political rivals.."

-"Source A confided that the Kremlin had been ieedmg TRUMP and his team valuable intelligence on lus opponents, including Democratic presidential candidate Hillary CLINTON, for several years"

डॉक्युमेंटमधला नुसता हायलाईट केलेला भाग वाचलात तरी बरीच माहिती मिळेल ;).
पण ट्रंप म्हणे - DNC इमेल्स हॅक केल्या हेच फक्त खरं, बाकी सगळं खोट्टं. अजून बरीच माहिती येईल बाहेर.

>> अजून बरीच माहिती येईल बाहेर.<<

बरोबर, कारण तो डाॅसीए अनवेरीफाय्ड इंफर्मेशनवर (एकेए रुमर) आधारीत आहे, अजुनपर्यंत तरी. ती बातमी/डाॅसीए कुठल्याहि अधिक्रुत इंटेल एजंसी (सीआयए, एमआय६ वगैरे) कडुन प्रसिद्ध झालेली नाहि. जेम्स क्लॅपरचं स्टेटमेंट वाचा. सीएनेन ने या घटनेची खातरजमा न करता प्रसिद्धी दिल्याने त्यांची विश्वासार्हता/अब्रु वेशीला टांगली गेलेली आहे...

बरीचशी माध्यमे इतकी टोकाची ट्रंप विरोधी आहेत (हे निवडणूकीच्या आधीही उघड दिसत होते) की कुठली ट्रंपची प्रतिमा डागाळेल अशी बातमी आली की ते हुरळून जातात आणि कुठलीही खातरजमा न करता ते सगळ्यांच्या आधी प्रकाशित करतात. ट्रंप बदनामीचा हव्यास मग कधी कधी असा उलटतो आणि खजिल व्हायची पाळी येते.

माध्यमांनी खातरजमा न करता बातमी छापणे वाईट आहे. त्याने खर्‍या बातम्यांचा गंभीरपणाही बाजूला जाऊन त्याही फेक न्युज वाटायला लागतात. त्यामुळे बझफीड आणि सीएनएन ची चूक झालीच !!

पण या सगळ्या गदारोळापेक्षा महत्त्वाची बातमी मला ट्रंप त्याचा बिझनेस ब्लाईंड ट्रस्ट कडे सोपोवणार नाही म्हणजे खुप मोठा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट होणार ही वाटते आहे. त्यामुळे आपल्या पदाचा गैरवापर करण्याचे प्रकार वाढीस लागतील असे वाटते. आणि आता खुद्द प्रेसिडेंटच असे करतोय म्हणजे त्याला सरसकट परवानगी आहे असे लोकांना वाटेल की जे चूक आहे.

ट्रंप जेव्हा इंटेलवर उगा आगपाखड करत होता तेव्हाच वाचलेलं की इंटेल पुढेमागे काही बातम्या लिक करेल. तसच होतंय.
कालची प्रेस कॉन्फ मात्र जाम विनोदी झाली. हॅकिंगच्या मागे राशा आहे हे आपलंच विधान ५३ मिनिटात निकाली काढून त्यामागे कुणीही असू शकतं चीन पण किंवा एखादा वजनदार माणूसपण वर साहेब परत आले.

==अगदी अपेक्षीत प्रतिसाद. तुम्ही डॉक्युमेंट पूर्णपणे वाचलं नसेलच ना?

अहो एखादे कागदपत्र धादांत खोटे, कपोलकल्पित आहे हे माहित असेल तर ते वाचण्याची तसदी आम्ही का म्हणून घ्यावी? त्यातून काय हशील आहे?

ट्रम्पचे आजचे ट्विटः

Thank you to Linda Bean of L.L.Bean for your great support and courage. People will support you even more now. Buy L.L.Bean. @LBPerfectMaine

L.L.Bean ने ट्रम्पच्या कॅम्पेनला पैसे दिले; त्यांची उत्पादनं विकत घ्या!

Pages