Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 04:33
क्रिकेटवरील पहिले तीन धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या बरीच झाली आहे. बर्याच दिवसांत तिथे कोणी काही म्हटलेलेही नाही. सध्याच बर्याच सिरीज संपल्यात, तर काही नव्याने सुरू होतायत. त्यामुळे नवीन धागा काढायला हा आयडियल टाईम आहे. आता क्रिकेट टॉक इथे करूया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
१.५ दिवस पावसानं वाया गेला,
१.५ दिवस पावसानं वाया गेला, पाकिस्तान ने पहिल्या इनिंग मधे ~४५० धावा गेल्या आणी तरीही डावाने हारले. कमाल आहे. पाकिस्तान च हे करू जाणे.
पाकिस्तान च हे करू
पाकिस्तान च हे करू जाणे.
>>>>
अगदी अगदी. मी सकाळी पाकिस्तानची पहिली विकेट पडलेली तेव्हाच मला वाटलेले की ईथून हे हरणे कठीण नाही. पण कामाच्या नादात पुढे मॅच फॉलो करता आली नाही. आताच स्कोअर बघितला तर हा असा..
बाकी हायलाईटस बघायला हवेत. काही संशयास्पद फटके आहेत का
एक फारच ईटरेस्टींग
एक फारच ईटरेस्टींग स्टॅटस,
पहिल्या इनिंगला ४००+ धावा मारून डावाने हरायची नामुष्की -
गेल्या पाच कसोटी सामन्यात असे तीन वेळा झाले.
एक आजचा पाकिस्तान ऑस्ट्रेलिया सामना
तर दोनदा आपण ईंग्लंडला दिलेली मात.
आणि त्या आधीच्या कसोटी क्रिकेटच्या २२००+ सामन्यांच्या ईतिहासात असे केवळ दोनदाच झाले होते.
A double-century from Azhar
A double-century from Azhar Ali. Pakistan batting until after lunch on day three. No fewer than 141 overs lost to rain. Fifteen wickets in four days on a surface more concrete than pitch. Australia won the Boxing Day Test. Yep, really. From Cricinfo
http://www.espncricinfo.com/i
http://www.espncricinfo.com/india/content/story/1075558.html
धोनी कॅप्टनपदावरून पायउतार!
नजिकच्या काळात तरी धोनी संघात
नजिकच्या काळात तरी धोनी संघात नक्कीच असेल असे वाटते. रैना गायब आहे, पांडे फॉर्म मधे नाहिये नि त्या दोघांव्यतिरिक्त धोनी शिवाय अजून कोणि फिनिशर नाहिये, नुसत्या किपिंग वर प्लेयर घेणे आपल्याला परवडणारे नाही. रोहित फिट झाला लिमिटेड ओव्हर्स साठी ?
रोहित, राहुल, कोहली, धोनी, रैना/पांडे/राहाणे, पांड्या, अश्विन, जाडेजा, बुमराह, शमी, यादव्/मिश्रा असे वाटतेय.
कॅप्टनशिपची जबाबदारी नसताना
कॅप्टनशिपची जबाबदारी नसताना फ्रीली खेळणारा धोनी बघायला मजा येइल पुन्हा. वन डे मधे ते १८०+ वाले स्कोअर्स केले तर जबरी होईल.
तिकडे दादा बीसीसीआयचा अध्यक्ष बनू शकेल अशी चिन्हे दिसत आहेत. त्याने स्वतःच यावर आपण अजून पात्र नाही असा खुलासा केला आहे, पण असे नियम बदलू शकतात, त्यामुळे अशक्य नाही हे.
http://indianexpress.com/article/sports/cricket/i-dont-qualify-for-bcci-...
बरं झाले योग्य वेळी योग्य
बरं झाले योग्य वेळी योग्य निर्णय. आता पुढच्या चार सहा महिन्यांत धोनी येता विश्वचषक खेळणार की नाही समजेल. तुर्तास त्याची संघातील जागा घेणार तरी कोणी दिसत नाहीये. कोहली सुद्धा योग्य वेळी कर्णधारपद मिळाल्याने सुखावला असेल. आता मजा येईल सामने बघायला
"नजिकच्या काळात तरी धोनी
"नजिकच्या काळात तरी धोनी संघात नक्कीच असेल असे वाटते. रैना गायब आहे, पांडे फॉर्म मधे नाहिये" - अजुन काही काळ तरी धोनी खेळेल. एक खेळाडू म्हणून त्याने अजुन काही काळ खेळावं असं वाटतं.
बाकी धोनी ने कॅप्टन्सी सोडल्याचं कळल्यावर आरशातल्या स्वतःच्या प्रतिबिंबाकडे पाहून, दीवार मधल्या अमिताभ प्रमाणे मी 'आज खुश तो बहुत होगे तुम' असं म्हणून घेतलं.
एक खेळाडू म्हणून त्याने अजुन
एक खेळाडू म्हणून त्याने अजुन काही काळ खेळावं असं वाटतं. >>> मलाही.
रणजी करंडक कोणी फॉलो करतं का?
रणजी करंडक कोणी फॉलो करतं का? गुजराथ ६५ वर्षांनी फायनला पोहोचलय. बडोद्याची टीम असल्याने गुजराथची टीम कधी फार पुढे गेल्याचं पाहिलं नव्हतं. बुमराह ने भारी बॉलींग केली म्हणे फायनलला
रणजी आणी दोन्ही टेस्ट्स फॉलो
रणजी आणी दोन्ही टेस्ट्स फॉलो करतोय. मस्त चालल्या आहेत. बुमराह आणी आर. पी. सिंग ने मस्त बॉलिंग केली. बुमराह टेस्ट मधे आला तर बॉलिंग खूप स्ट्राँग होईल.
मी करतो. शॉ एक आश्चर्य होते.
मी करतो. शॉ एक आश्चर्य होते. नायर फे.फे. च्या रणजी चँपियन लिस्ट मधे हवा
काल क्रिकैंफो वर मुंबई ११ टीम होती. कसली जबरदस्त टीम आहे. अफिले चार गावस्कर, हजारे, वेंगसरकर, तेंडूलकर.
शॉ मस्त खेळला. आणखीन एक राहूल
शॉ मस्त खेळला. आणखीन एक राहूल द्रविड स्कूल ऑफ क्रिकेट चं प्रॉडक्ट! द्रविड च्या १६ वर्षाच्या प्लेयिंग करियर बरोबरच हे सगळं योगदान सुद्धा काऊंट केलं पाहीजे. माझा अंदाज - मुंबई परत एकदा रणजी करंडक जिंकेल. अशा मोठ्या स्पर्धा जिंकायचा अनुभव आणी सवय असायला लागते.
फेरफटका, मुंबई जिंकणार नाही
फेरफटका, मुंबई जिंकणार नाही असले काही भाकीत करून खरे करून दाखवा
स्कोअरकार्ड अधूनमधून फॉलो करतो मी रणजीचा. अर्थात आधी मुंबईचा. . हल्ली फारशी मोठमोठाली नावे वाटत नाहीत, कोणी यातला फार पुढे जाईल असेही वाटत नाही, आणि तरीही एकूण मुंबईची ११ जणांची टीम कॉम्बिनेशनमध्ये चांगलीच कामगिरी करते. ईतर संघात दोनतीन प्रोमिसिंग खेळाडू असले तरी ओवरऑल ११ मध्ये टीम तितकीही भारी वाटत नाही. एखादा कर्नाटक अपवाद. म्हणून अगदी आजही मुंबई फेव्हरेट वाटते.
बुमराह ने आज सहा विकेट स्वस्तात खोलल्या.. फायनलला मुंबई इंडियन्स बुमराह मुंबईविरुद्ध उतरेल.. तो आणि आरपी दोघेही यात चमकले, फायनल कुठे आहे आणि त्यांना मदत आहे का बघायला हवे
"मुंबई जिंकणार नाही असले काही
"मुंबई जिंकणार नाही असले काही भाकीत करून खरे करून दाखवा " - असलं काही करायला मला मा. श्री. अझहरुद्दिन, रा. रा. अजय जडेजा, ह,भ.प. नयन मोंगिया वगैरेंचं पाठबळ लागेल
अच्छा मोंगिया पण त्या टीमचा
अच्छा मोंगिया पण त्या टीमचा होता का?
"मुंबई जिंकणार नाही असले काही
"मुंबई जिंकणार नाही असले काही भाकीत करून खरे करून दाखवा " - मुंबई रणजी ट्रॉफी फायनल हारली हे जरा अघटीत च घडलं. अच्छे दिन ह्यापेक्षा वेगळे काय असणार? रणजी ट्रॉफी सुद्धा मुंबईहून अहमदाबाद ला नेली.
काल भारत वि. ईंग्लंड मॅच जबरदस्त झाली. केदार जाधव, विको आणी हार्दिक पंड्या मस्त खेळले. युवराज, धवन आणी धोनी ने निराशा केली. धोनी कॅप्टन असताना त्याने त्या परिस्थितीत असा शॉट मारला नसता, त्यामुळे त्या शॉट मुळे जास्त निराशा आली. तीन-तीन लायेबिलिटीज (धवन, युवराज, धोनी) घेऊन खेळणं अवघड आहे.
धोनी चा कॅप्टन्सी का सोडली ह्या विषयावरचा ईंटरव्ह्यू वाचला. त्याच्या बर्याचश्या वक्तव्यांसारखाच पोकळ वाटला. एक तर कुठलंही विधान करताना ते सिद्ध करण्याची किंवा निदान त्याला सबळ पुरावा देण्याची पद्धत नसल्यामुळे, 'स्प्लिट कॅप्टन्सी भारतात चालत नाही' वगैरे तो म्हणाला आणी ते खपून गेलं. ह्या आधी असे किती प्रयोग भारतात झाले आहेत, त्याचं यशापयश काय ह्याचा कुठलाही धांडोळा घेतलेला नाहीये. ऑस्ट्रेलियामधे एक मॅच बाहेर बसल्यावर, एक मॅच कॅप्टन्सी केल्यावर तिसर्या मॅच च्या आधी अचानक कॅप्टन्सी सोडून, टीम ला नवीन कॅप्टन, नवीन रणनीती आखण्यासाठी पुरेसा वेळ न देता, वर साहा ला संधी मिळावी म्हणून मी असं केलं हे स्पष्टीकरण फारच बाळबोध होतं. ह्याच विचाराने कॅप्टन्सी सोडायची होती / निवृत्ती घ्यायची होती, तर दौर्याच्या आधी सुद्धा तसं करता आलं असतं.
आत्ता सुद्धा दौर्याच्या आठवडाभर आधी कॅप्टन्सी सोडून सगळा फोकस स्वतःकडे आणी स्वतःच्या पास्ट ग्लोरी कडे वळवण्यात धोनी यशस्वी झालाय. गेले १.५ वर्ष तो पूर्वीसारखा खेळत नाहीये, मॅचेस संपवू शकत नाहीये हे सगळं एका फटक्यात बाजूला जावून, २००७, २०११ चे वर्ल्ड-कप्स वगैरे गोष्टींवर स्तुतीसुमनं उधळण्यात मिडीया आणी फॅन्स दंग आहेत.
धोनी लिमिटेड ओव्हर्स क्रिकेट मधला एक चांगला खेळाडू होता. लिमिटेड ओव्हर्स क्रिकेट मधे एक चांगला कॅप्टन होता. टेस्ट क्रिकेट मधे तो एक खेळाडू म्हणून आणी एक कॅप्टन म्हणून खूप मर्यादित होता. त्याने केलेले राजकारण आणी बर्याच खेळाडूंचं अकाली संपवलेलं करियर आणी मर्जीतल्या काही कमी क्षमतेच्या खेळाडूंची घडवलेली कारकीर्द, टेस्ट क्रिकेट मधलं अपयश / मर्यादीत यश (२०११ मधे सलग हारलेले ८ कसोटी सामने, न्यूझीलंड, साऊथ अफ्रिका दौर्यात कसोटी सामन्यांमधे आखलेले बचावात्मक डावपेच), आणी ह्याच बरोबरीने लिमीटेड ओव्हर्स क्रिकेट मधे मिळालेलं यश (जिंकलेल्या तीनही आयसीसी च्या लिमिटेड ओव्हर्स स्पर्धा, शेवटपर्यंत खेचून जिंकलेल्या वन-डे मॅचेस) ह्या सगळ्यासकट च त्याच्या कारकीर्दीचं मूल्यमापन करायला हवं.
बांग्लादेशचा स्टनिंग डिफीट अ
बांग्लादेशचा स्टनिंग डिफीट अॅट द हॅण्ड्स ऑफ न्यूझीलंड बघितला का कोणी? विलिअमसन इज अ जेम!
"बांग्लादेशचा स्टनिंग डिफीट अ
"बांग्लादेशचा स्टनिंग डिफीट अॅट द हॅण्ड्स ऑफ न्यूझीलंड बघितला का कोणी? " - बघितला. काल बांगलादेश ने मॅच सोडून दिल्यासारखं वाटत होतं. त्यांचे काही काही फिल्डींग लॅप्सेस अगदीच गल्ली क्रिकेट सारखे होते. बाऊंड्रीलाईन वर बॉलपर्यंत पोहोचून सुद्धा बॉल न उचलता त्याच्यावरून उडी मारणं, किंवा शकिब-अल-हसन ने स्वतःच्या बॉलिंग वर सरळ आलेला बॉल हाताखालून सोडून देणं वगैरे अगदीच अनप्रोफेशनल वाटलं.
अच्छे दिन ह्यापेक्षा वेगळे
अच्छे दिन ह्यापेक्षा वेगळे काय असणार? रणजी ट्रॉफी सुद्धा मुंबईहून अहमदाबाद ला नेली. >>>>>
@ बांग्लादेश , संस्कृती भिन्न असली तरी तो पूर्वाश्रमीचा पाकिस्तान आहे हे विसरू नका.
अरे पुण्यातल्या वन डे बद्दल
अरे पुण्यातल्या वन डे बद्दल एकही पोस्ट नाही , की माझा धागा चुकला ?
टेनिस बॉल टुर्नामेंटचा
टेनिस बॉल टुर्नामेंटचा चॅम्पियन केदार जाधव ची इंडियन एक्स्प्रेस वरची जरा वेगळी माहिती. वेगळी या करता, की कालपासून अनेक ठिकाणी त्याच्या पुण्यातल्या खेळी बद्दलच वाचायला मिळालं होतं.
http://indianexpress.com/article/sports/cricket/kedar-jadhav-a-salman-fa...
http://indianexpress.com/article/sports/cricket/kedar-jadhav-tennis-ball...
मी अजूनही कोहलीच्या 'त्या'
मी अजूनही कोहलीच्या 'त्या' शॉटच्या हँगओव्हरमधून बाहेर आलेलो नाहि. कसा काय शक्य आहे तो शॉट !
तो समोर उचललेला छकडा का?
तो समोर उचललेला छकडा का?
अंडरआर्म क्रिकेट मध्येच या आधी पाहिलेला तो शॉट
मी शेवटच्या ८-९ ओव्हर्स
मी शेवटच्या ८-९ ओव्हर्स लाइव्ह बघितल्या होत्या. काल हायलाइट्स पाहिले. जबरी शॉट्स आहेत दोघांचेही. काही काही शॉट्स एकदम वेगळे होते. फारसे आधी न पाहिलेले. पण नंतर उरलेले ६०-६५ मारणेही तितकेच महत्त्वाचे होते. पंड्या ही चांगल खेळला प्रेशर मधे.
अंडरआर्म क्रिकेट मध्येच या
अंडरआर्म क्रिकेट मध्येच या आधी पाहिलेला तो शॉट >> अंडरआर्म क्रिकेट असा बॉल टाकणे शक्य वाटत नाही त्यामूळे आपण वेगळ्या शॉट्स बद्दल बोलतोय असे वाटते. बॉलची हाईट बघता मिडविकेट पर्यंत समजू शकतो पण हा काहि जबराच प्रकार आहे.
http://thecricketlounge.com/2017/01/kohlishotwoakes/
अंडरआर्म क्रिकेट असा बॉल
अंडरआर्म क्रिकेट असा बॉल टाकणे शक्य वाटत नाही त्यामूळे आपण वेगळ्या शॉट्स बद्दल बोलतोय असे वाटते.
>>>>
मी जेवढा सामना पाहिला त्यात मला तो एक शॉट अचाट वाटला. यापेक्षा वेगळा आणि जास्त भारी त्याच सामन्यात मारला असेल तर कमाल आहे.
आणि मी हाईटबद्दल नाही तर लेंथ बद्दल बोलत आहे. अश्या लेंथच्या बॉलला असा फटका फक्त अंडरआर्ममध्येच शक्य आहे..
बॉलची हाईट बघता मिडविकेट पर्यंत समजू शकतो >>> या वर्णनावरून तोच शॉट वाटतो
त्या शॉट चे टायमिंग अफलातून
त्या शॉट चे टायमिंग अफलातून होते!!
केदार ने सामन्याचा रंग
केदार ने सामन्याचा रंग पालटला.. त्यामुळे कोहली सहज खेळू शकला!
Pages