नोटबंदी चे आर्थिक परिणाम

Submitted by सिम्बा on 16 December, 2016 - 02:02

राज्य या रघुनाथाचे कळीकाळाशी नातुडे
बहुबृष्टी अनावृष्टी या जगी ना कधी घडे

एका प्रसिद्ध कवींनी रामराज्याचे हे असे वर्णन केलेले आहे.

त्यावेळेप्रमाणे अर्थात राज्यावर येणारी परकीय आक्रमण सोडल्यास इतर संकटे ही ओला दुष्काळ - सुका दुष्काळ हीच असावीत.
त्यावेळीही सामन्य लोक यावेळी माझे शेत पिकणार नाही, माझे खाण्यापिण्याचे वांधे होतील असा विचार करत असतील.
मात्र अर्थशास्त्रज्ञ, सेवादाते, व्यापारी आणि राज्यकर्ते एका वर्षाच्या पावसाचे चार महिने हे असे गेलेत याचा पुढिल वर्षावर, उद्योगधंद्यावर, परकीय व्यापारावर आणि एकंदरच राज्याच्या आर्थिकस्थितीवर काय परिणाम होईल याचा विचार करत असणार.

आठ नोव्हेंबर २०१६ ला चलनबंदीच्या स्वरूपात अस्मानी नाहीपण जी सुलतानी देशावर कोसळली त्याचा वैयक्तिक आयुष्यावर, कौटूंबिक कार्यप्रसंगांवर काय परिणाम होतोय याविषयी प्रचंड उहापोह मायबोली आणि इतरत्रही झालेलाच आहे.
परंतु या चलनबंदीचा एकंदर उद्योगधंद्यांवर, कुशल /अर्धकुशल कामगारांवर, शेतीवर, शेतीआधारित व्यवसायांवर आणि परकीय गुंतवणूकीवरही काय परिणाम झाला हे पाहिले पाहिजे.

आपल्यापैकी कुणाचे स्वतंत्र उद्योगधंदे असतील, कुणी शेअर बाजारात गुंतवणून करत असेल, कुणी परकीय गुंतवणूकीच्या क्षेत्रात असेल, कुणी इतरांच्या उद्योगधंद्यात सहाय्यक म्हणून काम करत असेल किंवा कुणी नुसतंच या सगळ्या उलाढालींवर लक्ष ठेवून पुढच्या मार्केट इकॉनॉमीचा अंदाज घेत असेल. तर अशा लोकांनी आपापली मते, निरीक्षणे इथे मांडावीत म्हणून हा धागा. भारतीय/अभारतीय अर्थपंडितांची मते सुद्धा मांडता येतील.

(कृपया या धाग्यावर मे २०१४ पासूनचे सगळे काढायची गरज नाही. आठ नोव्हेंबर २०१६ नंतरच्या आर्थिक घडामोडी इतकेच या धाग्याचे परिप्रेक्ष्य आहे.)
धन्यवाद!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

डॉ नरेंद्र जाधव,

महाराष्ट्रातले वेल नोन ईकॉनॉमिस्ट, आर बी आय मध्ये ३१ वर्षे काम केलेले, नॉमिनेटेड मेंबर ऑफ राज्य सभा, प्लॅनिंग कमिशनचे माजी मेंबर, एज्युकेशन स्पेशॅलिस्ट,

यां ची मुलाखत, नोटबंदी विषया वर त्यांचे विचार,

https://www.youtube.com/watch?v=bKUpPbPn_eo&feature=youtu.be

बघण्यासारखी आहे. जरुर लाभ घ्यावा !!

सून, फार्मर्स विल सेल देअर प्रॉड्क्ट टु रिलायन्स फ्रेश, अँड यू कॅन बाय इट बाय स्वायपिंग कार्ड ओर युजिंग जिओमनी.

अचे दिन Wink

हेच नरेंद्र जाधव, सध्याचे राज्यसभेचे "नॉमिनेटेड" मेंबर. बरोबर ना?

>>
While Ramesh and many others missed it, a bonhomie between Jadhav and the saffron establishment began last year, when RSS affiliated magazines Organiser and Panchjanya came out with an issue on the birth anniversary of Ambedkar. Krishna Gopal, the RSS joint general secretary who liaise with the BJP, got Jadhav to write for both magazines.

Soon after, Modi named Jadhav to a high-powered committee constituted to commemorate Ambedkar's 125th birth anniversary.

The bonding to such an extent that RSS chief Mohan Bhagwat launched four of Jadhav's Hindi books on Ambedkar last August. Jadhav has enough credentials to deserve a seat in the Upper House.

Read more at:
http://economictimes.indiatimes.com/articleshow/51971653.cms
<<

पाळीव विचारवंत असा एक संघिष्टांचा लाडका शब्दप्रयोग आहे.

रडगाणे न गाता थोडासा जरी सकारात्मक विचार करायचा ठरवला तरी बऱ्याच चांगल्या गोष्टी घडत असतात आजुबाजुला! >> प्रॉब्लेम्स सांगितले आणि ते जर सरकारमुळं झालेत असं वाटत असेल तर त्याचं रडगाणं होतं का हल्ली?

https://decipherdemon.blogspot.in/2016/12/500-note-pivot-note-of-notes-i...

या बाबा ला मी ट्विटर वर फॉलो करतो आहे,
तिकडे तो खूप डिटेल मध्ये लिहू शकत नाही,
तुपाच्या ब्लॉग वर खूप खोलात जातो,
वापरलेला सगळा डेटा पब्लिक डोमेन मधला असतो.

डु रीड इट

साती,
तुम्ही सर्वज्ञ असालही पण याचा अर्थ इतर कुणाला काही कळत नाही असा होत नाही ना?
समोरच्याला पर्सनली न ओळखता अमुकअमुक बाबतीत मला तुमच्यापेक्षा जास्त माहित आहे म्हणण्याचे धाडस कुठुन आणता हो तुम्ही?

वरच्या तुमच्या संपूर्ण पोस्टीत तुम्ही डॉक्टर आहात, शेतकरी/अडते वगैरे सगळे तुमचे पेशंटस आहेत, गरीब लोक उधारीउसनवारी करुन तुम्हाला पैसे देतात किंवा बुडवतात या माझ्या त्या वरच्या पोस्टशी काहीही संबंध नसलेल्या गोष्टी लिहण्याचे प्रयोजन कळले नाही

"अडत दुकानावर जाऊन त्यावर्षीच्या एखाद्या एकरातील मालाचा अडत्या म्हणेल त्या रेटने सौदा करणे" ह्या उदाहरणाने बाजारातील दराचा शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मोबदल्याशी फारसा संबंध नसतो हेच तुम्ही मान्य करताय का?

>>सून, फार्मर्स विल सेल देअर प्रॉड्क्ट टु रिलायन्स फ्रेश, अँड यू कॅन बाय इट बाय स्वायपिंग कार्ड ओर युजिंग जिओमनी.

बर मग? रिलायन्सने शेतकऱ्यांना अडत्यांपेक्षा जास्त पैसे दिले तर विकतील पण ते रिलायन्सला? ऑलरेडी काही हायटेक शेतकरी organic farming करुन विकतायत शेतीमाल मोठमोठ्या मॉल्सना!
तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का?

विरोधी पक्ष पूर्वी काय म्हणत होते आणि आज काय म्हणत आहेत, हे पाहिले तर त्यांच्या पाठिराख्यांचे डोळे पांढरे होतील... ह्याचे पुरावे आहेत,

https://www.youtube.com/watch?v=ropDUc0xt8Q&feature=youtu.be

मोदी जी किती विचार करत आहेत ह्याची एक झलक !!

स्वरूप, if you think that so called "organic" jumla is affordable for everyone, congratulations.

Secondly, a few progressive farmers is NOT all agro based economy.

Enjoy your view, I'm not interested in arguing with you. You don't have any idea about how अग्रिचुल्तुरल economy works.

>> You don't have any idea about how अग्रिचुल्तुरल economy works

हे आले अजुन एक सर्वज्ञ!
कुणाला काय माहीत आहे आणि कुणाची काय "खदखद" होत आहे ते या दोन तीन धाग्यांवर दिसतेच आहे तेंव्हा असोच!

शेतकऱ्यांच्या हाती पैसा आला तरी यांना त्रास (का तर तो रिलायन्सकडून येतो म्हणून) आणि नाही आला तरी त्रास (त्रास कसला म्हणा उलट सरकारच्या नावाने खडे फोडायची आयती संधी! )

एकंदरीत असोच!

स्वरुप,

सोडा हो, बरी होणार्यातली केस न्हाई ती !!

कृपया हा व्हिडीयो बघा !! मगच आपल मत बनवा !! नोटबंदी कित्येक वर्ष चर्चेला होती पण करण्याच धाडस नव्हत कोणातही !!

https://www.youtube.com/watch?v=ropDUc0xt8Q&feature=youtu.be

समोरच्याला पर्सनली न ओळखता अमुकअमुक बाबतीत मला तुमच्यापेक्षा जास्त माहित आहे म्हणण्याचे धाडस कुठुन आणता हो तुम्ही?
>>
तुमच्या पोस्टवरून!

:d

>>>>शेतकऱ्यांच्या हाती पैसा आला तरी यांना त्रास (का तर तो रिलायन्सकडून येतो म्हणून) आणि नाही आला तरी त्रास (त्रास कसला म्हणा उलट सरकारच्या नावाने खडे फोडायची आयती संधी! )<<<<

स्वरुप,

सरकारचे आणि बँकांचे नियम रोज बदलतात तसे त्या सर्वांचे पण मुद्दे रोज बदलतात. नोटाबंदीच्या पहिल्या दोन चार दिवसांत झाडबुकेंनी 'काळा पैसा नसतोच' अशी वाचकांच्या ज्ञानात भर पाडली होती. त्यानंतर 'मोघे गुरुजींनी' काळा पैसा इतर स्वरुपात असतो हे स्तोत्र सुरू केले. आता रुदाली 'आमच्या प्रोफेशन'मधील समस्या सांगून रडवत आहेत

तुमच्या 'एकंदरीत असोच' ह्याला अनुमोदन!

=========

विषयाबाबतः

बिझिनेसवर झालेला परिणाम कायमस्वरुपी आहे का ह्यावरही विचार व्हायला हवा. जितका आक्रोश जालावर दिसत आहे तितका रस्त्यावर का दिसत नाही ह्याचे उत्तर गेल्या ४०-४२ दिवसांत देण्यात आलेले नाही.

दंगेखोरांना विरोध म्हणजे रस्त्यावरची तोडफोड इतकाच दिसतो
शेवटी भाजप्ये ते भाजप्येच

बेफिकीरांना ना रस्त्यावर मोर्चे, जाळपोळ, नासधूस यांची फारच फिकीर आहे असं दिसतंय एकूण!
बहुतेक हे सगळं एकदा सुरू झालं कीच समाधानी होणार हे!

हो कारण गेली १० वर्ष त्यांचा आणि त्यांच्या पक्षाने तसाच विरोध केला आहे. जाळपोळ मोर्चे नासधूस केल्या शिवाय त्याच्या पक्षाचे समाधान होत नाही

>>> बेफिकीरांना ना रस्त्यावर मोर्चे, जाळपोळ, नासधूस यांची फारच फिकीर आहे असं दिसतंय एकूण!
बहुतेक हे सगळं एकदा सुरू झालं कीच समाधानी होणार हे! >>>>

तुमचे खरे असेलही, पण मग लोकांचा संताप्/आक्रोश वगैरे महाराष्ट्रातील गावोगावच्या "म्युनिशिपालटींच्या" इलेक्शनमधे दिसायला हवा होता ना..... तो का दिसला नाही? उलट या म्युन्शिपाल्टीच्या राजकारणात भाजपा खिजगणतीमधेही नसायचि, ती नोटाबंदीच्याच अडचणींच्या काळात नंबर एकला कशी काय आली?

माझ्यामते "नोटाबंदी" करुन भ्रष्टाचार्‍यांचे कंबरडे मोडून मोदीकाकांनी २०१९ च्या विजयाचे भूमिपूजन करुन ठेवले आहे, बर्का.... !

काँग्रेस एक वर आली मग काँग्रेस ला पण जनतेने आपलेसे केले असे म्हणा Wink

>>> काँग्रेस एक वर आली मग काँग्रेस ला पण जनतेने आपलेसे केले असे म्हणा डोळा मारा <<<<
तसेही म्हणले अस्ते, पण ते आले ते त्यांच्याच बालेकिल्ल्यात अन कॉन्गी/राकॉन्गी या आपापल्या भावकीतच भांडत वर आले.... ! कॉन्ग्रेस वर आली असे म्हणायचेच असेल तर फारफार इतके म्हणता येईल की त्या त्या जागी राष्ट्रवादीला लोकांनी नाकारले Wink

BJP-SAD alliance sweeps Chandigarh municipal corporation poll

http://timesofindia.indiatimes.com/city/chandigarh/bjp-sad-alliance-swee...

Giving major jolt to the Congress, which had been ruling the Chandigarh Municipal Corporation from past 14 years, BJP-SAD alliance clinched 21 municipal seats out of total 26 seat of Municipal Corporation, Chandigarh. Congress won merely 4 seats, while one seat was won by an independent candidate, who was a BJP rebel.
With this BJP-SAD alliance has come with a comfortable majority in the Chandigarh Municipal Corporation. As there is need of 19 votes in the mayoral poll to win seats of mayor, senior deputy mayor and deputy mayor, it seems that BJP-SAD will have their mayor for next five years. BJP had contested on 22 seats, while SAD was given 4 seats.

शेतकऱ्यांच्या हाती पैसा आला तरी यांना त्रास (का तर तो रिलायन्सकडून येतो म्हणून) आणि नाही आला तरी त्रास (त्रास कसला म्हणा उलट सरकारच्या नावाने खडे फोडायची आयती संधी! )
<<
बोलाचा भात.
कुठे व किती पैसा आला? तिसरंच बोलू नका

कळत नाही तर किमान ज्यांना कळतं ते म्हणतात ते ऐकावं.

Pages