नोटबंदी चे आर्थिक परिणाम

Submitted by सिम्बा on 16 December, 2016 - 02:02

राज्य या रघुनाथाचे कळीकाळाशी नातुडे
बहुबृष्टी अनावृष्टी या जगी ना कधी घडे

एका प्रसिद्ध कवींनी रामराज्याचे हे असे वर्णन केलेले आहे.

त्यावेळेप्रमाणे अर्थात राज्यावर येणारी परकीय आक्रमण सोडल्यास इतर संकटे ही ओला दुष्काळ - सुका दुष्काळ हीच असावीत.
त्यावेळीही सामन्य लोक यावेळी माझे शेत पिकणार नाही, माझे खाण्यापिण्याचे वांधे होतील असा विचार करत असतील.
मात्र अर्थशास्त्रज्ञ, सेवादाते, व्यापारी आणि राज्यकर्ते एका वर्षाच्या पावसाचे चार महिने हे असे गेलेत याचा पुढिल वर्षावर, उद्योगधंद्यावर, परकीय व्यापारावर आणि एकंदरच राज्याच्या आर्थिकस्थितीवर काय परिणाम होईल याचा विचार करत असणार.

आठ नोव्हेंबर २०१६ ला चलनबंदीच्या स्वरूपात अस्मानी नाहीपण जी सुलतानी देशावर कोसळली त्याचा वैयक्तिक आयुष्यावर, कौटूंबिक कार्यप्रसंगांवर काय परिणाम होतोय याविषयी प्रचंड उहापोह मायबोली आणि इतरत्रही झालेलाच आहे.
परंतु या चलनबंदीचा एकंदर उद्योगधंद्यांवर, कुशल /अर्धकुशल कामगारांवर, शेतीवर, शेतीआधारित व्यवसायांवर आणि परकीय गुंतवणूकीवरही काय परिणाम झाला हे पाहिले पाहिजे.

आपल्यापैकी कुणाचे स्वतंत्र उद्योगधंदे असतील, कुणी शेअर बाजारात गुंतवणून करत असेल, कुणी परकीय गुंतवणूकीच्या क्षेत्रात असेल, कुणी इतरांच्या उद्योगधंद्यात सहाय्यक म्हणून काम करत असेल किंवा कुणी नुसतंच या सगळ्या उलाढालींवर लक्ष ठेवून पुढच्या मार्केट इकॉनॉमीचा अंदाज घेत असेल. तर अशा लोकांनी आपापली मते, निरीक्षणे इथे मांडावीत म्हणून हा धागा. भारतीय/अभारतीय अर्थपंडितांची मते सुद्धा मांडता येतील.

(कृपया या धाग्यावर मे २०१४ पासूनचे सगळे काढायची गरज नाही. आठ नोव्हेंबर २०१६ नंतरच्या आर्थिक घडामोडी इतकेच या धाग्याचे परिप्रेक्ष्य आहे.)
धन्यवाद!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विरोधात मत दिली नाही की गुंड धनदांडग्यांना हातीशी धरून मत वळवून घेतली? हे येणार्‍या काळात ठरणार आहे.. प्रभार पध्दत राबवून त्याचा लाभ भाजपाने घेतला आहे. हे समोर दिसून येत आहे.

पाच पाच धागे काढून सामूहीक अरण्यरुदन केले तरी राज्यात नोटबंदी यशस्वी झाली. नोटबंदी आणि पुण्यातल्या रिकाम्या खुर्च्यांवरून असभ्य विनोद प्रसवणा-यांचे दात मतदारांनी घशात घातले....

तर नेताजी पालकर नावाच्या सरदारास, जो मोघलांना जाऊन मिळाला होता, त्याचे शिवरायांनी परत शुद्धिकरण करुन घेतलेच व शिवाय जबाबदारीच्या पदावरही ठेवले>>
असे जरी असले तरी माझ्या माहितीतले असेच लोक पडले आहेत. तेव्हा त्या व्हाईट्ट कॉलरच्या पांढर्‍याधोप शर्टाच्या बाहीने आप्ले शेंबडे फुरफुरते नाक पुसले बरोब्बर.

नोटबंदी यशस्वी झाली?
जरा एक दोन यशस्वी फायदे सांगा सपनाभाऊ? बघू जमते का?
कि फायदा सांगताना तुमचेच दात घशात जातात ते पाहू.

पाच पाच धागे काढून सामूहीक अरण्यरुदन केले तरी राज्यात नोटबंदी यशस्वी झाली. नोटबंदी आणि पुण्यातल्या रिकाम्या खुर्च्यांवरून असभ्य विनोद प्रसवणा-यांचे दात मतदारांनी घशात घातले.... >>

दिल्ली बिहार नंतर भोकाड पसरणार्‍यांनी किमान बोलायच्या आधी स्वतःची अवस्था बघावी. Wink असो.

>> आता तुम्हाला त्या भ्रमात रहायचे असेल तर मी काय करणार?

कशाला त्या गॅंगच्या जखमांवर मीठ चोळताय..... गेले अनेक दिवस अनेक बीबींवर भाजपाविरोधात गरळ ओकुन दमले असतील ते!
आणि तशीही "गिरे तोभी टांग उपर" कॅटेगरी आहे ती!

हजार खुसपटे काढत बसतील...... उन्हे उनके हालपर छोड दो!
People are wise enough and they express their true feelings through voting..... No one can take them for a ride just like that.... They are really wise!

Local Election मध्ये नोटबंदी वगैरे सारख्या निर्णयाचा फारसा डायरेक्ट संबंध नसला आणि लोक उमेदवार आणि त्याचे काम बघून मत देत असले तरी एकूण लोकांचा कल कळतो आणि जो स्पष्टपणे भाजपाच्या बाजुने आहे!

अरे भक्तांनो

नोटबंदीचे फायदे सांगा बोलल्यावर दातखिळी का बसू लागली आहे Biggrin एकतर तुम्हालाच त्याचे फायदे माहीती नाही. आणि दुसरे म्हणजे तुमच्या मालकांनाच माहीती नाही त्यामुळे तुम्हाला फिडबॅक मिळत नाही.
भक्तांनो फायदे सांगा फायदे.

दिल्ली बिहार नंतर भोकाड पसरणार्‍यांनी >>> झाले सुरू. धागा नोटबंदीवर आहे ना ?
एनी वे, मी भाजपसमर्थक किंवा संघी नाही हे आता हजाराव्यांदा सांगून कंटाळा आलेला आहे....

शेअर मार्केटचा रिकामा बैल हत्तीचं नाव घेऊन आला हा नोटबंदीचा सर्वात मोठा फायदा !

परळीत "चिक्कीताईंचा दारूण पराभव"

चिक्कीताई रुसल्या आहे. "राजिनामाचे नाटक" पुढे केले म्हणे.
दानवे यांच्या सुपुत्रींचा सुध्दा पराभव झाला. म्हणजे जनतेने "भाजप्यांच्या परिवारवादाला नाकारले"

झाले सुरू. धागा नोटबंदीवर आहे ना ? >>>>>> सपनाताई. "अरण्यरुदन" म्हणत सुरुवात तुम्हीच केली होती आता मागे कशाला वळत आहे ? Biggrin
हवेतले फायदे सांगू नका. प्रत्यक्ष व्यवहारातील खरेखुरे अनुभवलेले फायदे सांगा.

हवेतले फायदे तर गुजरातमधले गाढव पण सांगत फिरत असतात.

>>>>> गेले अनेक दिवस अनेक बीबींवर भाजपाविरोधात गरळ ओकुन दमले असतील ते! <<<<< अर्रर्र.. त्यातुन आजही ड्राय डे...... ! मग कस व्हायचं? Proud
तरी बर त्या कुणा म्हमईकरांनी ड्रायडे विरोधात कोर्टात दावा ठोकला होता म्हणे... पण काहि उपयोग झालेला दिसत नाहीये.... आजही ड्राय डेच...!
मग दमछाक दूर कशी व्हायची? झालेले "दु:ख" बुडवायचे कशात? अर्रर्र..... फारच वाईट परिस्थिती... सहनही होत नाही अन सांगताही येत नाही कुणाला Wink
अन इथे काही सांगाव, तर माझ्यासारखे रिकामटेकडे (भक्त) सोडले तर कुणी ढुंकुनही बघत नाही Rofl

मला वाटते की अ‍ॅडमिनसाहेबांना सांगुन हे असले सगळे धागे "कोतबो" मध्ये हलवावेत.... Proud काय म्हणता लोकहो??? Biggrin

सपनाजी, नोटाबंदीच्या धाग्यावर आपणच निकालांच्या कलावरुन नोटाबंदीबद्दलचे निष्कर्ष काढत आहात... मुळात हेच चुकीचे आहे...

असे मतदारांच्या कलाने समजून घेतले तर मग "७० वर्ष राज्य केले ७० वर्ष काही नाही केले" ची जी काही कॅसेट घासत असतात प्रचारमंत्री ती राजवट ह्याच मतदारांच्या कलाने ७० वर्षे चालली होती हेही लक्षात घ्यायला पाहिजे....

जी काही कॅसेट घासत असतात प्रचारमंत्री >>> त्याच्याशिवाय दुसरे काही त्यांना जमते का? पोपट कसा मालकाने जे शिकवले तीच कॅसेट येणार्‍या जाणार्‍यांना सतत ऐकवत असतो सध्या तेच चालू आहे. Biggrin

बाकी फायदे सांगा विचारल्यावर इथल्या सगळ्याच "भामट्यांची" दातखिळी बसली आहे. Wink

इतके दिवस समस्त देश म्हणत होता.

आज "साहेबांनीच" कन्फर्म करून टाकले आहे Biggrin कबुलीजवाब

२०१९ ला अशाच एका धाग्यावर असेच संभाषण आपण करू..

मफ करा. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीनंतरच करू..
मोदीजींकडे यावेळी असलेली पंतप्रधानपदाची जबाबदारी आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या दृष्टीने नाजूक वेळ यामुळे त्यांना प्रचारकार्यात म्हणावा इतका वेळ देता आलेला नाही. याचा फायदा अखिलेश यादव किंवा मायावती यांना थोडाफार होईल. मायावतींनी तीच ती जुनी छापील भाषणे वाचून संपूर्ण जातीयवादी समीकरणे मांडायला सुरूवात केली आहे. अखिलेश निवडून आले तर केंद्रातले भाजप सरकार आणि तरूण व सुशिक्षित मुख्यमंत्री यामुळे उत्तर प्रदेशचा विकास होईल.
पण काही केल्या नोटबंदीच्या विरोधात गळे काढणा-या कॉंग्रेस पक्षाला डिपॉझिट देखील वाचवता येणार नाही. त्यामुळे उत्तर प्रदेशात त्यांचा विजय झाला तरी तो नोटबंदीचा पराभव नसेल हे आताच क्लिअर केलेलं बरं !

तुम्ही तो पर्यंत असाल तर नक्कीच >> हे कोण बोलतंय ? उइआ इमानदार आयडीतच अस्त आहे. उदयचा पत्ताच नाही Lol
चालूद्या.

सोशल मिडीयावर अचानक भक्तांना "गाढव प्रेमाचे" इतके भरते आले आहे की आगामी काळात "गोरक्षा" ऐवजी आता "गाढवरक्षा" करण्यास आंदोलन सुरु झाल्यास आश्चर्य वाटणार नाही Wink

किरणोत्सर्ग जास्त झाल्यामुळे बहुदा सपनाभाऊंच्या डोक्यांवर परिणाम झालेला दिसून येत आहे. चालायचेच .

बाकी.
सपनाताई/भाऊ नोटबंदीच्या फायद्यावर बोलणार का? की किरणोत्सर्ग सुरुच ठेवणार आहात ?

मला राजकारण आणि निवडणुका समजायला लागल्यापासून म्हणजे २००२ पासून आजपर्यंत. माझे भारतीय मतदारांबद्दल काहीही निश्चित मत झालेले नाही. याची कारणे अनेक आहेत. मी आकडेवारीच्या खेळात अजिबात विश्वास ठेवत नाही कारण निवडणुकीच्या आदल्या रात्री जो जलवा करतो तो निवडुन येतो हे एव्हाना बघितलं आहे. आता हा जलवा अनेक प्रकारचा असतो, केवळ पैसा, दारु नव्हे. मतदार फोडणे, वळवणे, भडकवणे, अफवा आणि हजार प्रकार असतात. त्यामुळे मतदारांची पसंती, टक्केवारी, सर्व उमेदवारांत वाटली गेलेली मते असे अनेक कंगोरे निवडणुकीच्या निकालाला असतात. १०० पैकी ३० लोकांनी तुमच्या बाजूने मत दिलं म्हणून तुम्ही निवडून येता.. बाकीच्यांना ३० पेक्षा कमी टक्केवारी असते, पण ७० लोक तुमच्याविरुद्ध आहेत हे लक्षात घेतले जात नाही. राज्य करायला पक्ष जेव्हा सत्ता हातात घेतो तेव्हा तो ह्या सर्व ७०+३० लोकांसाठी काम करत असतो. नोटाबंदीविरुद्ध किंवा समर्थनार्थ निवडून आलेले उमेदवार दाखवणे ही हातचलाखी आहे. जरी सर्व भाजपचे उमेदवार पडले असते तरी मी नोटाबंदीचा हा परिणाम आहे असे म्हणालो नसतो, कारण नोटाबंदीचा परीणाम हा मतांवर होईल असे मानणे अर्धवट माणसांचे कामे आहेत.

आताही युपीत जो काय निकाल लागेल त्यामधूनही नोटाबंदीमुळे भाजपची हार झाली असे समजू नये. किंवा भाजप जिंकले तर नोटाबंदी यशस्वी झाली असे समजु नये....

नोटाबंदी यशस्वी किंवा अयशस्वी झाल्याचे निर्देशांक मतदानामध्ये शोधू नये.... हे म्हणजे आसाराम बापूने बलात्कार केला की नाही हे त्याच्या भक्तांच्या संख्येवरुन ठरवण्यासारखे होईल....

ते नोटाबंदीच्या उद्दिष्टपूर्तीसाठी निर्धारित केलेल्या गोष्टींमध्ये शोधावे...

ते नोटाबंदीच्या उद्दिष्टपूर्तीसाठी निर्धारित केलेल्या गोष्टींमध्ये शोधावे.. >> तेच तर भक्तांना काय त्यांच्या मालकांना सुध्दा सापडत नाही. मालकांनी मंदीरापासून शोधायला सुरुवात केली ते पार स्मशानापर्यंत पोहचले तरी अजुन शोध घेणे सुरुच आहे.

मितरों,
हा काही "त्या यांचा "धागा नाही ज्यात सुपरिणाम सोडून सगळ्या गोष्टी चर्चिल्या जातात,
निवडणुकीतील यश अपयशा बद्दल BMC 2017 च्या धाग्यावर चर्चा करू शकता,
नोट बंदी च्या आर्थिक परिणाम बद्दल किंवा फायद्यांबद्दल काही माहिती असेल तर इकडे जरूर शेअर करा.

सिम्बा तेच.
ते काय लिम्बू आणि सपनाभाऊ यांना निकालानंतर हर्षोल्हास झाला आहे. त्यामुळे काय करावे काय करू नये हे सुचेनासे झाले आहे.

मी फायदा विचारतोय तर ते भलतेच काही घेऊन बसतात. अगदी किरणोत्सर्ग चालु आहे

मनमोहन सिंग यांच्या काळात एटीएम मधून पैसे काढताना फक्त पैसे मोजावे लागत होते.
परंतू मोदीच्या काळात एटीएम मधून पैसे काढल्यावर त्या खोट्या आहे की खर्‍या हे ही सोबत बघावे लागते.

परिवर्तन होणार देश बदलणार.

हाहा

उठलात का?... उठा.... झडझडून कामाला लागा.......
दिवस रात्र वैर्‍याचे आहेत (या चालिवर)...
केंद्रराज्य पालिका बीजेपीचे आहेत (हे विसरू नका... Proud )
आता "जागते पहारे" नावाने किती केंद्र/राज्ये / पालिका/झेडप्यांच्या नावाने धागे काढणार, कोण काढणार ते ठरवुन घ्या,
अन कामाला लागा... Lol
उठा.... उत्तीष्ठ जाग्रतः

Pages