Submitted by योकु on 26 June, 2016 - 11:55
तर लोक्स, झी मराठी वाहीनीवर १८ जुलै पासून खुलता कळी खुलेना ही नवी मालिका सुरू होतेय. त्याबद्दल काथ्याकूट करायला, कधीकधी पिसं काढायला हा धागा!
हो जाओ शुरू...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे त्या आजोबांना अटॅक आला
अरे त्या आजोबांना अटॅक आला ना??
शनिवारचा भाग संपताना दाखवलं की मानसीने लपवलेली नोटीस आजोबांना मिळते आणि वाचल्यावर ते छातीवर हात धरुन वाकडेतिकडे होत असतात तेवढयात आजी बाहेर येत असते. त्याचं काय झालं?? अजून झालं नाही का ते??
ते मान्शीनं उभ्या उभ्या
ते मान्शीनं उभ्या उभ्या स्वप्न पाहिलं.
हायला! उभ्या उभ्या असली कसली
हायला! उभ्या उभ्या असली कसली स्वप्न बघतात ह्या पोरी!
आणि एक कळलं नाही मनूला ती जर
आणि एक कळलं नाही मनूला ती जर नोटीस घरच्यांपासून लपवायच्येय तर ती नोटीस हातातच ठेऊनच इकडे तिकडे नाचत कशाला होती ?. पटकन पर्स मध्ये ठेऊन द्यायची ना . आणि मग दार वगैरे लावून वाचायची संधी साधून . पण ते नाही . ती नोटीस हातातच ठेऊन लपवून लपवून घरात फिरत होती आणि मग अशीच उघड्यावर टाकून गेली . ती आजोबानी वाचली हे तीच स्वप्न होत पण खरंच आजोबानी वाचली असती तर ? इस्त्री वाल्याला कपडे देताना पण स्वतःबरोबर हातात घेऊनच जायची ना ती नोटीस
मला तर वाटलं त्या
मला तर वाटलं त्या कपड्यांबरोबर जाणार ती नोटीस
हिला इ - त - का धक्का वगैरे
हिला इ - त - का धक्का वगैरे बसायचं काय कारण? माहित नाही का आपली बहिण कशी आहे ते! हे आज ना उद्या होणारच तर होतं!
काहीही....
तिला घेरदार कुडते (च) फक्त आहेत का? नो जीन्स, नो एनी अदर वार्डरोब?
प्लीजच आता ती नोटीस परत नको घेऊ म्हणा विक्रांत ला...
प्रोमो पााहीला. मानसी
प्रोमो पााहीला. मानसी विक्रांतला म्हणते, मी निरागसपणे दिलेल्या माहितीचा तू असा वापर केलास..!!

काल नोटीस सौ दळवीच्या नावावर
काल नोटीस सौ दळवीच्या नावावर असते मात्र पोस्टमन मात्र देशमुख(?) म्हणुन वाचतो. म्हणजे पाकीटावर एक नाव आणि नोटीसीवर दुसरेच नाव ? पोस्टमन पण दुसर्या दिवशी सकाळी सकाळी घेउन येतो. पोस्टाची एवढी तत्पर सेवा कधीपासुन झाली?
पत्ता आजोबांचा दिलाय
पत्ता आजोबांचा दिलाय ना.
स्पीड पोस्टाने पाठवलं असेल.
काय फालतुगिरी आहे ...!! नोटीस
काय फालतुगिरी आहे ...!!
नोटीस ही सौ दळवीच्या नावावर आहे तर पाकीटा वरच नाव पण तेच असणार...
तस असेल तर मानसी कि कोण ती..ती अस दुसर्याच आलेल पाकीट / पत्र कस वाचु शकते...
आता किती दिवस नोटीस / काडीमोड दळण चालणार ...!!!
विक्रांत परत चुकीचं वागतोय.
विक्रांत परत चुकीचं वागतोय. एवढं केलं आहे तर तिच्या डिलिव्हरी पर्यंत थांबायला हवे त्याने. मिन्व्हाईल स्वतः च्या घरातल्या काहींना विश्वासात घेउन खरे काय ते सांगावे (वडील, काका, आत्या तर आहेच). मानसी तर रोजच प्रात्यक्षिक देतेय, भोचक म्हणजे काय त्याचे. वैत्ताग नुसता.
अशाच थीमवर रेणुका शहाणे- सलिल
अशाच थीमवर रेणुका शहाणे- सलिल अंकोलाची कोरा कागज नावाची एक जुनी मालिका होती. रेनुकाचा नवरा तिला फसवतो, सलिल तिचा दीर असतो. शेवटी बहुदा तिचं सलिलशी लग्न होतं. म्हणजे इथे मोठी बहिण खलनायिका, आणि मेव्हणी- जिजाजी प्रेमप्रकरण आहे, तिथे मोठा भाऊ खलनायक, आणि दीर व भाभीचं प्रेमप्रकरण होतं.
पण फारच छान , संयत हाताळलं होतं सगळं. शेवटी प्रेक्षकही या जोडीसाठी सपोर्ट करु लागतात.
इथे तसं दिसत नाही कारण विक्रांतबद्दल सहानुभूती वाटत नाही. त्याला मुळातच मोनिकात काही रस होता का हा प्रश्न पडतो. आणि सलिल अजिबात भोचक किंवा वहिनीकडे वखवख बघणारा असा दाखवला नव्हता. इथे मानसी विक्रांतकडे हावरटपणे बघत असते. शिवाय भोचकपणा इतका की अशी बहिण शत्रूलाही मिळू नये असं वाटतं.
सनव, मी पण बघायचे कोरा कागज,
सनव, मी पण बघायचे कोरा कागज, शेवट मात्र आठवत नाही काय झाला. त्यात रेणुकाची एक मैत्रिण असते, तिचं पण तिच्या बहीणीच्या नवर्याशी दुसरं लग्न होतं असा काहीतरी ट्रॅक होता.
काल काय झालं ? विक्रांत बोलला का घडाघडा ?
कोरा कागज मधे रेणुका-सलील चं
कोरा कागज मधे रेणुका-सलील चं लग्न होतं शेवटी.
इथे मानसी विक्रांतकडे हावरटपणे बघत असते.>>>
काय चोकोलेट पेस्ट्री आहे का ती?
राग म्हणे तै ला नोटीस पाठवल्याचा नाहीये तर मी निरगसपणे दिलेल्या महितीचा तु असा वापर केलास त्याचा आहे.
पण हिने काय माहिती दिली
पण हिने काय माहिती दिली निरागसपणे? मला तर ते कळलंच नाही. तै लग्ना आधी प्रेग्नंट होती ही माहिती विक्रांत ने स्वतःच्या हिमतीवर मिळवलेली आहे!! काय समजलात?

खर तर ती तै ला घाबरली असणार,
खर तर ती तै ला घाबरली असणार, तै ला कळलं की मी माहीती दिली तर ती मलाच जबाबदार ठरवेल, पण मी तर निरागसपणे माहीती दिली होती, अस म्हणायचं असेल तिला.....
मान्शी स्वतःला फारच इनोसेंट समजते...
अरे पण मानसीने कोणती माहिती
अरे पण मानसीने कोणती माहिती दिली त्याला??
माॅनिका लग्नाआधी प्रेग्नंट होती हे विक्रांतला स्वतःलाच समजलं आणि आता माॅनिकाला ती प्रेग्नंट असल्याचं लग्नाआधीच माहिती होतं, हे पण त्याने रिचा-माॅनिकाचं बोलणं ऐकल्यामुळे कळलं.. मग हिने अशी कोणती माहिती विक्रांतला निरागसपणे दिली ज्याचा त्याने गैरवापर केला??
वकिलाचा फोननंबर निरागसपणे दिला की कै??? ज्याचा वापर करुन विक्रांतने माॅनिकाला डिवोर्सची नोटीस पाठवली??
की लग्नाच्या आदल्या रात्री तै
की लग्नाच्या आदल्या रात्री तै रिचा ला भेटायला गेली होती...वगैरे वगैरे
अजून एक प्रश्न पडलाय..
अजून एक प्रश्न पडलाय..
माॅनिका रिचाला जेव्हा सगळं सांगते तेव्हा ती त्यांच्याच घराबाहेर विक्रांतच्या गाडीच्या अगदी जवळ उभी असते. ती विक्रांतची गाडी आहे हे ती ओळखत कशी नाही??? ते पण एवढ्या शेजारी उभी राहून.. स्वतःच्याच घराबाहेर???
लग्नाच्या आदल्यादिवशी मोनिका
लग्नाच्या आदल्यादिवशी मोनिका रिचाबरोबर बाहेर गेली होती हे विक्रान्तने मानसीकडून कन्फर्म करून घेतले. तीच निरागस माहिती.
म्हणजे एखाद्याने फास लावून घेतला, तर तो दोर विकणारा दुकानदार जबाबदार.
कथेच्या वळणाची गरज म्हणून ऐकू
कथेच्या वळणाची गरज म्हणून ऐकू न येण्याची मुभा घेतली
म्हणजे एखाद्याने फास लावून
म्हणजे एखाद्याने फास लावून घेतला, तर तो दोर विकणारा दुकानदार जबाबदार. >>>
'अंगूर' सिनेमातला तो 'ठहरो, दूसरी देता हूं...' म्हणणारा दुकानदार आठवला.
निधी..मलाही तेव्हा अगदी सेम
आणि आधी विक्रांत काचा बंद करुन बसलेला असतो...मला तर नाही बुआ ऐकू येणार जर मी काचाबंद गाडीत असले व कुणी अगदी हलक्या आवाजात थोड्या अंतरावर उभं राहून बोलत असलं तर!
(आमच्या घरासमोर मुलं मुली बरेचदा उभी असतात जोडी जोडीनं..गुलूगुलू बोलत....एक अक्षर कळेल तर शपथ!!)
ते काचा बंद मी पण म्हणालेच
ते काचा बंद मी पण म्हणालेच घरी.
पण ही मान्शी इतकी उदासवाणी बापुडवाणी का दाखवलेय? हसती खेळती, अल्लड, थोडीशी नाचरी, बोलताना (जानुतैसारखी) टुण्ण्कण छोटीशी उडी मारणारी, खळाळुन हसणारी वैगेरे दाखवली असती तर काय बिघ्डलं असतं? प्रेक्षकांना निदान काहीतरी चांगलं बघायला मिळालं असतं. ही नुसती रडका चेहरा घेउन वावरते. बोलतेही तसाच चेहरा ठेवुन. हसते तीही रडकीच.
इथे मानसी विक्रांतकडे
इथे मानसी विक्रांतकडे हावरटपणे बघत असते.>>
आधी मानसी विक्रांतला 'अहो'
आधी मानसी विक्रांतला 'अहो' 'तुम्ही' म्हणायची. पण आता प्रोमोमध्ये तिने विक्रांतचा ऊल्लेख 'तू' असा एकेरी केलेला बघितला. हा बदल कधी आणि कसा झाला? मालिका बघायची मी कधीच सोडली, त्यामुळे मला माहित नाही. फक्त अधुनमधुन इथे येऊन वाचते.
गंमत आहे!. मोनिका फसवते आहे
गंमत आहे!. मोनिका फसवते आहे हे अगदी स्पष्ट दाखवलेलं असुनही इथे महिला मुक्तीवादी गळे काढत आहेत..>>> मोनिकाची चूक आहे हे मान्य. तिला शिक्षा ही व्हायलाच हवी. विक्रान्तने तिला डिवोर्स दयायलाच हवा याबाबत माझ काही दुमत नाही. पण हाच न्याय मानबा मध्ये गुरुला का नाही लावला? म्हणजे पुरुषाने चुक केली तर त्याला माफ करा, पण बाईने मात्र चुकू नये हेच सिरियल्सच्या जगात आणि समाजातही चालत. का?
तुम्ही जर काही हिन्दी, मराठी सिरियल्स observe केलीत तर काय दिसून येईल? लग्नाच्या पहिल्या रात्री नायिकेला नायक सान्गतो की बाई ग, माझे अमक्या मुलीवर प्रेम आहे. आई-वडीलान्नी जबरदस्तीने माझे लग्न तुझ्याशी लावून दिले. सो, मी त्या मुलीला विसरु शकणार नाही. मी तुला बायकोचा दर्जा देऊ शकत नाही वै वै. नायिका हे ऐकून काही क्षणासाठी रडते आणि गप्प बसते. ती नवर्याविरुद्द काहीच action घेत नाही, वकिलाकडेही जात नाही. उलट ती एक ना एक दिवस नवरा आपल्याकडे परत येईल या आशेने नवर्याचे आणि सासरच्यानचे मन जिन्कण्याचा प्रयत्न करते. सासु तिचा छळ करते पण तिची याबाबत साधा विरोधही करत नाही. एक दिवस नवर्याला तिच प्रेम कळत आणि तो तिच्याकडे परत येतो.
थोडक्यात काय तर नायक कसाही वागला तरीही तो नायकच असतो, खलनायक नसतो. (कोरा कागज सारख्या सिरियल अपवादात्मक असतात. पण अश्या सिरियल्सचे प्रमाण नगण्यच असते.) पण हेच जर नायकाची बाय को वागली तर ती मात्र खलनायिका. सिरियल्समध्ये हा भेदभाव का?
आणि तसही विक्रान्तला लग्नाच्या मन्डपातच कळले होते की मोनिका आपल्याला फसवते आहे. तेव्हाच का नाही त्याने लग्न मोडले? इतके दिवस हा थाम्बून का राहिला?
लग्नाच्या पहिल्या रात्री
लग्नाच्या पहिल्या रात्री नायिकेला नायक सान्गतो की बाई ग, माझे अमक्या मुलीवर प्रेम आहे. आई-वडीलान्नी जबरदस्तीने माझे लग्न तुझ्याशी लावून दिले. सो, मी त्या मुलीला विसरु शकणार नाही. मी तुला बायकोचा दर्जा देऊ शकत नाही वै वै. नायिका हे ऐकून काही क्षणासाठी रडते आणि गप्प बसते. ती नवर्याविरुद्द काहीच action घेत नाही, वकिलाकडेही जात नाही. उलट ती एक ना एक दिवस नवरा आपल्याकडे परत येईल या आशेने नवर्याचे आणि सासरच्यानचे मन जिन्कण्याचा प्रयत्न करते. >> "जुळून येती रेशीमगाठी" विसरलीस का गं??
ससुराल गेंदा फूल.
ससुराल गेंदा फूल.
< तेव्हाच का नाही त्याने लग्न
< तेव्हाच का नाही त्याने लग्न मोडले? इतके दिवस हा थाम्बून का राहिला?>
याचं उत्तर त्याने त्याच्या आत्याला दिलंय तेव्हा.
Pages