Submitted by योकु on 26 June, 2016 - 11:55
तर लोक्स, झी मराठी वाहीनीवर १८ जुलै पासून खुलता कळी खुलेना ही नवी मालिका सुरू होतेय. त्याबद्दल काथ्याकूट करायला, कधीकधी पिसं काढायला हा धागा!
हो जाओ शुरू...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पण हाच न्याय मानबा मध्ये
पण हाच न्याय मानबा मध्ये गुरुला का नाही लावला? >>>>> आम्ही नाही हो न्याय करायला बसलेलो. आम्ही सामान्य प्रेक्षक.. मानबा बद्दल त्या धाग्यावर लिहा ना !
बाकी निधी आणि मयेकरांनी उत्तरं दिलेलीच आहेत.
अवंतिकेने नवर्याचा व्यभिचार
अवंतिकेने नवर्याचा व्यभिचार कळल्यावर त्याला सोडलेलं बहुतेक.
आभाळमायात काय झालेलं?
प्रतिमा कुलकर्णींची अंकुर नावाची एक मालिका होती. थोडीशी स्वयंसिद्धासारखी. त्यात तर बायको, नवरा सन्मानाने वागवत नाही या (ढोबळ) कारणावरून माहेरी आलेली आणि माहेरच्यांनीही तिला परतच जा असं काही सांगितलं नव्हतं.
त्यात नवर्याचे विबासं वगैरे नव्हते. (तुषार दळवी, कविता मेढेकर)
त्यावेळचे निर्माते, दिग्दर्शक, प्रेक्षक आताच्या लोकांपेक्षा मॅच्युअर , स्त्रीवादी, संतुलित , इ.इ. होते की काय?
अजुन एक उदाहरण म्हणजे गुंतता
अजुन एक उदाहरण म्हणजे गुंतता हृदय हे मध्येपण मृकु धडा शिकवते नवर्याला बरच नाटक (literally) करून.
मोनिकाचं समर्थन करण्याचा
मोनिकाचं समर्थन करण्याचा प्रश्नच नाही कारण तिचं कॅरेक्टर काळंच दाखवलंय. पण विक्रांत-मानसीसाठी सपोर्ट करावा अशी त्यांचीही कॅरेक्टर्स दाखवली नाहीयेत. मानसी बहुतेकांना भोचक व इरिटेटिंग वाटते. विक्रांत सॅडिस्ट वाटतो. म्हणजे शिव-गौरी किंवा आदित्य-मेघनासारखे हे दोघं प्रेक्षकांना आपलेसे, सरळसाधे वाटत नाहीत. यात आता प्रेक्षकांचा काय दोष? त्यातून स्टोरी प्रचंड इलॉजिकल दाखवली आहे. आदित्यने मेघनाचं दुसर्यावर प्रेम आहे हे कळल्यावर होणारा त्रास, एकटेपणा चांगला दाखवला होता. विक्रांतने अशी काहीच प्रतिक्रिया दाखवली नाही. अॅबॉर्शनच्या बाबतीतही मोनिकाला त्याने निर्णय घेऊन दिला नाही. (मला तर ते बघून इथलं row /vs wade आठवलं. स्त्रीवादी भडकणारच की!)
मोनिका व्हँप असली तरी काम चांगलं करते, दिसते छान व स्वतःला होणारा त्रास चांगला दाखवते म्हणून प्रेक्षक तिच्या स्टोरीत इन्व्हॉल्व्ह झाले असावेत.
मालिकेवर बोलायला दोन धागे
मालिकेवर बोलायला दोन धागे काढायची गरज आहे. जे मालिका बघतात, जे मालिका बघतच नाहीत , अधूनमधून बघतत.
मालिका सिरियसली घ्यायची गरज नाही, हे मान्य. पण त्याच त्याच गोष्टी परत परत उगाळायला हा काय चालू घडामोडींतला धागा नाही![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
डिएनए टेस्ट वगैरे बद्दल
डिएनए टेस्ट वगैरे बद्दल माहिती नाहीये का लोकांना? मोनिका कशाच्या जोरावर लढणार केस म्हणे?
आजच्या भागात फारच अपेक्षाभंग
आजच्या भागात फारच अपेक्षाभंग झाला. विक्रांतने डायलॉग मारून डायव्होर्सची नोटिस सरळ हातातच दिली. अजिबात ताणलं नाही प्रकरण.
मोनिका तयार खेळाडू आहे.तिची धमकी आठवून खलनायिका सिनेमा आठवला.
>>>>>इथे मानसी विक्रांतकडे
>>>>>इथे मानसी विक्रांतकडे हावरटपणे बघत असते---
हो, खुपच सहेतुक बघत असते त्याच्याकडे.
मालिका सिरियसली घ्यायची गरज
मालिका सिरियसली घ्यायची गरज नाही, हे मान्य. पण त्याच त्याच गोष्टी परत परत उगाळायला हा काय चालू घडामोडींतला धागा नाही >> अगदीच.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
बरं अगदी डिट्टेलमध्ये यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली तरी ती न वाचताच परत तेच प्रश्न विचारतात.
डिएनए टेस्ट वगैरे बद्दल माहिती नाहीये का लोकांना?>> आता तुम्ही आयडिया दिली त्यांना.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मानबा बद्दल त्या धाग्यावर लिहा ना !>> हे च मी सांगतेय कधीपासून. दोन वेगवेगळ्या सिरियल्स आहेत तर त्या त्या धाग्यावर लिहा. पण परत गुंता करतायत.
शिव-गौरी किंवा
शिव-गौरी किंवा आदित्य-मेघनासारखे हे दोघं प्रेक्षकांना आपलेसे, सरळसाधे वाटत नाहीत.>> बाकीचे वाटतात हो आम्हाला आपलेसे पण गौरी???? त्या धाग्यावर जाऊन वाचा पोस्टी.
डिएनए टेस्ट वगैरे बद्दल
डिएनए टेस्ट वगैरे बद्दल माहिती नाहीये का लोकांना? मोनिका कशाच्या जोरावर लढणार केस म्हणे? >> + १
रमड, माझ्याही मनात हाच विचार आला. दोन डॉक्टरांशी पंगा घेतीय! एमबीए झालेली मुलगी! कायच्या काय!
भरत, तुम्ही बाकी सगळ्यांच्या प्रश्नांना चिकाटीनी उत्तरं देखाहात. लई भारी!
विक्रांतने "हा गर्भ
विक्रांतने "हा गर्भ लग्नाआधीचा असला तरी माझाच आहे" हे सगळ्या कुटुंबासमोर स्वीकारलंय; हे मोनिकाच्या मते ट्रंपकार्ड असावं. अगदीच काही नाही, तरी आणखी एक आणि तेही भयंकर खोटं बोलल्याबद्दल आजी विक्रांतला आणखी एक शिक्षा करतील; वकीलाला सध्या तरी ती खोटंच सांगतेय, पण त्याचा सल्ला अंमलात आणतेय का ते पाहूया.
राग आलेल्या प्रसंगात मोनिका
राग आलेल्या प्रसंगात मोनिका किती दात-ओठ खाऊन बोलते. प्रसंग क्षुलक असो की गंभीर, तिचा आविर्भाव कायम खाऊ-की-गिळू असाच असतो.
आदित्यने मेघनाचं दुसर्यावर प्रेम आहे हे कळल्यावर होणारा त्रास, एकटेपणा चांगला दाखवला होता. विक्रांतने अशी काहीच प्रतिक्रिया दाखवली नाही.
>>> मी मागे ते फिजिकल रिलेशनशिपबद्दल म्हटलं होतं तेव्हा मला हेच सुचवायचं होतं. विक्रांतची तळमळ कुठल्याच अँगलने दाखवलेलीच नाहीये.
बरं, रिसेन्टली दाखवलेल्या एका फ्लॅशबॅकमधे तो लग्नाच्या आदल्या दिवशी होणार्या बायकोला फोन करतो, तेव्हा बर्यापैकी आतूर, उत्सुक वगैरे दिसला. म्हणजे अरेंज्ड मॅरेज असलं तरी त्याला ती बायको म्हणून आवडलेली असते. या पार्श्वभूमीवर तर पुढचं सगळं कै-च्या-कैच वाटतं.
सगळं कळल्यावर इच्छा मेली असेल
सगळं कळल्यावर इच्छा मेली असेल त्याची.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
पण मोनिका क्लास अभिनय करते.
पण मोनिका क्लास अभिनय करते. तिचे डोळे, हावभाव, थरथरणार्या नाकपुड्या,....एकदम चरकल्या सारखे होते.. की आता ही काय चाल खेळणार...!!
विक्रम किती थंडपणे पहात होता तिच्या कडे...त्याला इतके कमी संवाद का दिले आहेत? त्यामुळे तो नीटसा एक्स्प्रेसच होऊ शकत नाही. आणि मानसी तरी तै ला घाबरुनच असे वागत्येय ना....
इव्हन आत्या बाई गप्प बसल्या.
मला पण त्या त्या धाग्याबद्दल
मला पण त्या त्या धाग्याबद्दल त्या धाग्यांवर लिहावे असेच वाटते. पण एखाद्याने दुसऱ्या धाग्याबद्दल लिहिलं आणि मी त्याच उत्तर दिल तर न वाचताच मलाच सांगताहेत लोक त्या धाग्यावर जाऊन लिहा म्हणून . कठीण आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>>पण मोनिका क्लास अभिनय
>>>पण मोनिका क्लास अभिनय करते. तिचे डोळे, हावभाव, थरथरणार्या नाकपुड्या,....एकदम चरकल्या सारखे होते.. की आता ही काय चाल खेळणार...!!-----
येस्स, संतापी, अविचारी, फटकळ मुलगी मस्तं दाखवते ती.
राया | 14 December, 2016 -
राया | 14 December, 2016 - 22:15
इथे मानसी विक्रांतकडे हावरटपणे बघत असते
हे नाही कळल निट..!!!
आणि तो विक्रांत मठठ असल्या सारख काय वावरत असतो..
त्याचा चेहरा कायम.. दाहावी मधे नापास मुला सारखा दिसतो..
अहो ते मी नाही, सनव ने
अहो ते मी नाही, सनव ने लिहिलेय. मी फक्त हो, खुपच सहेतुक पाहते असे लिहिलेय.
Got it..आल लक्षात .... पण ति
Got it..आल लक्षात ....
पण ति त्या मठठ विक्रांतकडे सहेतुक का पाहते..तिला काय लग्न करायच आहे कि काय त्याच्या सोबत...
अरे बापरे.. पुन्हा एक नविन दळण सुरु होईल मग..!!!
रमड, माझ्याही मनात हाच विचार
रमड, माझ्याही मनात हाच विचार आला. दोन डॉक्टरांशी पंगा घेतीय! एमबीए झालेली मुलगी! कायच्या काय!>>>
दोन नाही अडीच, हे प्रकरण मिटल्यावर नविन दळण चालु होईल . मागच्या काही महिन्यात त्याचे बीज रोवले गेले आहे. जर TRP खाली नाही गेले तर आजुन ६ महिने तरी ही सिरियल संपत नाही.
मानसी १००ग्रॅम doctor बाकी
मानसी १००ग्रॅम doctor बाकी एक्स्प्रेशन लेस ( फक्त तिला वाटत म्हणून - निरागस )
काल काय झालं थोडक्यात आढावा
काल काय झालं थोडक्यात आढावा घ्या. नेहमीचं प्रसारण आणि रिपिट दोन्ही चुकलेत माझे.
दक्षिणा, मोनिका तिची ती
दक्षिणा,
मोनिका तिची ती मैत्रिण रिचा व मानसी यांना भेटते व आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न करते.
मानसीच्या इंटेग्रिटी बद्दल आत्या शंका व्यक्त करते व इक्रांत व मानसी ला आपल्यातल्या घट्ट मैत्रीचा पुनर्साक्षात्कार होतो. व ते तो कॉफीच्या सहाय्याने सेलेब्रेट करतात.
पण ही मान्शी इतकी उदासवाणी
पण ही मान्शी इतकी उदासवाणी बापुडवाणी का दाखवलेय? हसती खेळती, अल्लड, थोडीशी नाचरी, बोलताना (जानुतैसारखी) टुण्ण्कण छोटीशी उडी मारणारी, खळाळुन हसणारी वैगेरे दाखवली असती तर काय बिघ्डलं असतं? प्रेक्षकांना निदान काहीतरी चांगलं बघायला मिळालं असतं. ही नुसती रडका चेहरा घेउन वावरते. बोलतेही तसाच चेहरा ठेवुन. हसते तीही रडकीच.
>> त्याशिवाय ती पोटात मुरडा आलेल्या.. एरंडेल चेहेरेवाल्या विक्रांतला 'अनुरुप' कशी होईल?
जान्हवीसारखी खेळकर आणि अल्लड बायको श्रीलाच शोभेन. याला नाही.
झी च्या सगळ्या नाइका तशाच
झी च्या सगळ्या नाइका तशाच पाहिजेत असा नियम आहे.
झी च्या सगळ्या नाइका तशाच
झी च्या सगळ्या नाइका तशाच पाहिजेत असा नियम आहे.
झी च्या सगळ्या नाइका तशाच
झी च्या सगळ्या नाइका तशाच पाहिजेत असा नियम आहे.
झी च्या सगळ्या नाइका तशाच
झी च्या सगळ्या नाइका तशाच पाहिजेत असा नियम आहे.
झी च्या सगळ्या नाइका तशाच
झी च्या सगळ्या नाइका तशाच पाहिजेत असा नियम आहे.
Pages