खुलता कळी खुलेना - नवी मालिका - झी मराठी

Submitted by योकु on 26 June, 2016 - 11:55

तर लोक्स, झी मराठी वाहीनीवर १८ जुलै पासून खुलता कळी खुलेना ही नवी मालिका सुरू होतेय. त्याबद्दल काथ्याकूट करायला, कधीकधी पिसं काढायला हा धागा!
हो जाओ शुरू... Wink

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झीवर दिलीप प्रभावळकर यांची सिरियल येणार आहे, त्यांनी लिहीलेल्या नाटकावर. ते स्वतः काम पण करणार आहेत. कुठल्या मालिकेला तिलांजली देणार आहेत काय माहीती. नाव चुकभूल द्यावी घ्यावी.

नाही.. शिव गौरीची सुहाग रात्र की काय राहिली आहे अजुन..
सगळी संकटं पार करत मुलं बाळं पण होतिल पण सुहाग रात्र काही व्हायची नाही..

ति रिचा साडी नेसून आली म्हणून अलका आणि गीताला ती गोड वाटली. जर ती वन पीस घालून आली असती तर ती त्यान्ना आगाऊ वाटली असती.

मोनीकाला जर आपल बाळ एखादया खेळाडूसारख Handsome व्हावस वाटत असेल तर तो तिचा choice आहे. त्यात आजीने तोन्ड वेगान्डण्यासारखे काय आहे? हिच का ती आजी जी एकेकाळी म्हणत होती की माझ्या नात सुनेने लग्नानन्तर job केला तरी चालेल, तीने घरकाम नाही केल तरी चालेल?

मोनिकाने मुलाचेच फोटो लावले? मुलीचे नाही? Uhoh

>>>सगळी संकटं पार करत मुलं बाळं पण होतिल पण सुहाग रात्र काही व्हायची नाही.
म्हणजे सगळी कर्तव्यपूर्तीच का? हौस मौज नाहीच Wink Proud

कालचा भाग उडत उडत पाहिला.. मॅटर्निटी फोटोशूटला २ लाख कोण घेतं? ही काय अंबानी समजते का स्वत:ला आणि तो फोटोग्राफर म्हणजे गौतम राजाध्यक्ष वगैरे की काय?
काहीही दाखवतात..::अओ:

हो ना...
:रागः
आणि मानसी म्हणे.."जाऊ दे नं...ती खुश तर राहील....!! अर्रे!!! एव्हढी लाडाकोडाची राणी ए का ती?
अंबानी....:-) टीना अंबानी तरी म्हणायचे!

विक्रांतला ती बिचारी वाटत होती म्हणून तो मूल स्वीकारायला तयार होतो का ? आता अचानक वकीलांना फोन वगैरे ?

आजी \ आजोबांपैकी कोणाला त्रास होउ नये म्हणून तो घटस्फोट घेणार नाही आणि त्याची आणि मानसीची गाडी काही पुढे जाणार नाही.

वकिलांना फोन? कुणी केला?
बाय द वे, त्या रिचा चे दात दोरी लावून आत ओढून घेतल्या सारखे आहेत. ऑर्थो डाँटिस्ट कडे जादा सिटींग्स झाले वाटतं!

आता अक्कल आली का विक्रांतला? >> प्रोमोत तरी आलेय पण पुर्ण एपिसोडमध्ये दिवेच लागणार आहेत. Proud

कालचा भाग बघताना माझी लेक बोलते ही सुषमा अजुन सुधारली नाही वाटतं Lol

सुषमाचे उच्चार किती विचित्र आहेत. थोडी जीभ जड असल्यासारखी वाटतेय तिची.
राखेचा बघणार्‍यांनो.. तिथे पण हिचे उच्चार असेच होते का?

राखेचा बघणार्‍यांनो.. तिथे पण हिचे उच्चार असेच होते का?>>> हो.मला वाटायच मालवणी बोलतेय म्हणुन अशी बोलत आहे की काय ??? आता ही तसेच उच्चार आहेत.

किती वेडपट चाळे करते ती रिचा... मोनिका घरी भेटणार नाही हे माहित होतं का तिला (पहिल्यांदा आली तेव्हा) बरी २ गिफ्ट्स घेऊन आली होती. एक मो च्या सासुला आणि एक काकूला दिलं... Uhoh

राखेचा बघणार्‍यांनो.. तिथे पण हिचे उच्चार असेच होते का? >>>> तिथे प्रत्येक वाक्याच्या शेवटी "हाSSSSS" असायचं ना. त्यामुळे फार कळलं नसेल. Proud

पर्वचच एपिसोद मधे पहिले कि शुभन्गि गोखले गौरि ल सन्ग्तात कि लग्नल २ महिने झ्हले वैग्रवैग्रेपन मग २ महिने होउन पन सुहग्रात झ्हलिच नहि? कस शक्य आहे?? कहिहि कय दख्व्तात.

इथे अनेकांच्या घरी मालिकेचं वेगळंच एडिटेड व्हर्शन दिसतं. Wink त्यांना ``विक्रान्त हे माझं क्रेडिट कार्ड आहे, ते मी असं कसं हातचं जाऊ देईन" हा संवाद दिसला का?

आजीआजोबांना बसायचा तो धक्का मागेच बसला. पण मोनिकाने फसवलंय हे कळल्याने विक्रान्तलाच मोठा धक्का बसलाय.

आपण तीन महिन्यांच्या गर्भार आहोत, हे कळल्यावरचा मोनिकाचा निरागसपणाचा अभिनय जास्तच जेन्युइन होता. नाही का? तिला कसं कळलं नाही, असे प्रश्न आपल्याला पडले होते.

लग्नादिवशी मोनिका प्रेग्नंट आहे हे कळल्यावर विक्रांतला फक्त आणि फक्त बाळाची काळजी होती, तर त्याने तिला घरात ठेवून घेण्यापेक्षा त्याच्या हॉस्पिटलमधे ९ महिने ठेवून घ्यायचं ना! तिच्यावर मोफत उपचार करायचे, फार फार तर. त्याचं डॉक्टर की हैसियतसे कर्तव्यही पार पडलं असतं. Wink

मोनिका आणि तिची मैत्रीण आपांपसांत प्रश्नोत्तरं करून गुपित फोडताना दाखवतात. यांच्याकडे स्मार्टफोन्स-व्हॉटसॅपसारखे पर्याय नसतात का? तिथे बिनआवाजी देवाणघेवाण करणं फायद्याचं नाही का? Uhoh

(तिकडे शिव-गौरीचंही तसंच. फोन उचलत नाही / फोनवर बोलता येत नाही / कुणीतरी ऐकेल असं वाटतं... अरे, मग मेसेज करा ना!)

फोनवर बोलता येत नाही / कुणीतरी ऐकेल असं वाटतं... अरे, मग मेसेज करा ना!) >> अरे मग ते आपल्याला दिसणार नाही ना. त्यासाठी पुन्हा जोरात बोलुनच टाईप करावे लागणार मेसेज मग तेव्हा ऐकणार कुणितरी Wink Lol

इथे अनेकांच्या घरी मालिकेचं वेगळंच एडिटेड व्हर्शन दिसतं. त्यांना ``विक्रान्त हे माझं क्रेडिट कार्ड आहे, ते मी असं कसं हातचं जाऊ देईन" हा संवाद दिसला का?>> माझ्या टिव्हीवर तरी हेच व्हर्शन दिसलं बा!
विक्रांतने माॅनिकाला कायमच माहेरी पाठवण्याची तयारी केलीय.. त्याचा आजीआजोबांना धक्का बसणार नाही का??

Pages