क्रिकेट - ४

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 04:33

क्रिकेटवरील पहिले तीन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या बरीच झाली आहे. बर्‍याच दिवसांत तिथे कोणी काही म्हटलेलेही नाही. सध्याच बर्‍याच सिरीज संपल्यात, तर काही नव्याने सुरू होतायत. त्यामुळे नवीन धागा काढायला हा आयडियल टाईम आहे. आता क्रिकेट टॉक इथे करूया.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< भाऊ बर्याच दिवसांनी ह्या धाग्यावर आले,>> गेल्या सामन्याच्या कांहीं ओव्हर्सच फक्त मीं पाहूं शकलों. त्यामुळे, ह्या धाग्यावर 'पचकणं' झालं नाही ! पण त्यांतही इंग्लंडच्या पहिल्या डावातला एक दुर्मिळ पायचीत पाहिला. जयंत यादवने 'राउंड द विकेट' गोलंदाजी करताना ऑफ स्टंपच्याबाहेर टप्पा असलेला चेंडू उलटा वळवून आंत आणला व उजव्या हाताच्या फलंदाजाला पायचीत केलं; मला वाटतं चेंडूच्या विषम चकाकीची साथ असणार्‍या 'रिव्हर्स स्विंग'पेक्षांही हें कठीण असावं.

मला इथली झक्कींची गैरहजेरी मात्र खूप जाणवते.

रहाणे होम-पीच वर खेळणार नाही - ईंज्युअर्ड / जायबंदी (हा शब्द मला युद्धात भाला वगैरे लागून जखमी झाल्याचा फील देतो).

शामी सुद्धा अनिश्चित. साहा अजुन अनफीट. पण राहूल फिट आहे.

कोहली चा ईंटरव्ह्यू पाहीला का?

http://www.espncricinfo.com/india-v-england-2016-17/content/story/107129...

"रहाणेला बसवला असेल अशी दाट शंका वाटतीय मला!" - अवघड आहे. सद्ध्या ची मॅनेजमेंट बघता, बसवलं असतं तर तसच सांगितलं असतं असं वाटतं. कुंबळे-कोहली स्पष्टवक्ते आहेत आणी सद्ध्या च्या टीम मधे अजुन तरी कुणी (थोडाफार कोहली चा अपवाद वगळता) 'लार्जर दॅन लाईफसाईझ' झालेलं नाहीये.

मी अगदी वरवर फॉलो करतोय खेळाडूंचा वैयक्तिक परफॉर्मन्स, पण रहाणे गेल्या काही मॅचेस अंडरपरफॉर्म करत आहे असा माझा समज आहे. कितपत खरा माहीत नाही.

फे फे +१ राहाणेबद्दल. राहाणे चे बाहेर राहाणे नायरसाठी परफेक्ट वेळी आलेय.

फा राहाणे गेले तीन मॅचेस अतिशय विचित्र रित्या खेळलाय. फॉर्म नसण्यापेक्षा काही तरी मुद्दा सिद्ध करण्याचा अधिक प्रयत्न वाटतोय. कदाचित गेल्या लिमिटेड सिरीजचे दडपण ?

रहाणेला बसवले असण्याची शक्यता मलाही वाटते. मागच्या कसोटीत खेळताना त्याला काही लागलेले की या मधल्या काळात लागले?

कुंबळे-कोहली स्पष्टवक्ते आहेत >>> प्रश्न स्पष्टवक्तेचा असेलच असे नाही. रहाणेला वाईट वाटतेय यापेक्षा एखाद्या आघाडीच्या फलंदाजाला बसवले अशी बातमी बाहेर आल्यास त्या न्यूजने, चर्चेने, त्याला विचारल्या जाणार्‍या प्रश्नांनी त्याचे आणखी मानसिक खच्चीकरण होऊ नये, त्यापेक्षा सुमडीत त्याने आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करून फॉर्म परत मिळवून पुढील टेस्ट सिरीजसाठी तयार राहावे असाही यामागे हेतू असू शकतो.

रहाणे ला प्रॅक्टीस च्या वेळी बॉल लागला अशी न्यूज आहे. काल फेसबूक वर बीसीसीआय ने रहाणे चा प्रॅक्टीस करतानाचा आणी रहाणे होम पीच वर फॉर्म मधे येण्यासाठी जोरदार प्रयत्न करतानाचा व्हिडीओ पोस्ट केला होता.

"राहाणे गेले तीन मॅचेस अतिशय विचित्र रित्या खेळलाय. फॉर्म नसण्यापेक्षा काही तरी मुद्दा सिद्ध करण्याचा अधिक प्रयत्न वाटतोय." - सहमत.

रहाणेच्या बाबतींत कांहीं मूलभूत गोची [ खेळाच्या तंत्राविषयक किंवा इतर ] असेल असं मला अजिबात वाटत नाहीं. कामगिरीत कांही तात्पुरती कमतरता अनेक कारणांमुळे येवूं शकते व ती दूर करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे यावर विश्वास ठेवणंच योग्य. निश्चित असं कांहीं माहित नसताना उगीचच कां निरनिराळे अंदाज बांधावेत .व शंका निर्माण कराव्या ? रहाणेला शुभेच्छा .

"रहाणेच्या बाबतींत कांहीं मूलभूत गोची [ खेळाच्या तंत्राविषयक किंवा इतर ] असेल असं मला अजिबात वाटत नाहीं. कामगिरीत कांही तात्पुरती कमतरता अनेक कारणांमुळे येवूं शकते व ती दूर करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे यावर विश्वास ठेवणंच योग्य. " - १+. सहमत

भाऊ, रहाणेच्या कॅपेबिलिटीबद्दल कुणालाच शंका नाहीये.... मी तर त्याचा पक्का फॅन आहे!
पण गेल्या काही सामन्यातला त्याचा परफॉर्मंस बघता बसवले असले तरी आश्चर्य नाही!

<< रहाणेच्या कॅपेबिलिटीबद्दल कुणालाच शंका नाहीये...>> मीं तेंच म्हणतोय; जर असा विश्वास असेल तर त्यावर आपण ठाम रहावं. कामगिरीतल्या अशा बारिक सारीक चढ- उतारानी आपला विश्वास कां डळमळूं द्यायचा ! म्हणूं दे मिडीयावाल्याना काय म्हणायचंय तें !!

खर तर ह्या सीझनमधले ३ + २ + ५ +४ + १ एव्हढे कसोटी सामने (मी लिमिटेड क्रिकेट धरतच नाहीये) बघता एकंदर ह्या मधल्या इंजरी खेळाडूंसाठी वरदान ठरताहेत अस म्हणायला हवे. थोडी तरी गॅप अगदी नकोशी वाटणारी असली तरी मिळते आहे. कोहली ने मधे मिळणार्‍या ब्रेक्सबद्दल वैताग व्यक्त केला आहे म्हणून आश्चर्य वाटले.

"कोहली ने मधे मिळणार्‍या ब्रेक्सबद्दल वैताग व्यक्त केला आहे म्हणून आश्चर्य वाटले." - मला तरी कोहली चं वक्तव्य (आपण एकाच वक्तव्याविषयी बोलतोय असं गृहीत धरून), 'त्यांना का म्हून स्पेशल ट्रीटमेंट द्यून राह्य्ले भौ. आमाला नै अशी स्पेशल ट्रीटमेंट मिळत बे' धर्तीवर वाटलं.

'त्यांना का म्हून स्पेशल ट्रीटमेंट द्यून राह्य्ले भौ. आमाला नै अशी स्पेशल ट्रीटमेंट मिळत बे' धर्तीवर वाटलं. >> हो तसेच आहे ते पण ब्रेक मिळतोय तर आनंद मानायचा सोडून वैतागायला काय झालं एव्हढ ? Happy

ऑल राईट, धिस इज भाचा रिपोर्टींग लाईव्ह फ्रॉम द स्टेडियम. Proud ह्याआधी जेव्हा टेस्ट स्टेडियममध्ये पाहिलेली, तेव्हा सेहवागने ३१९ ठोकलेल्या, पण मॅच ड्रॉ होती. होपफुली आजही काहीतरी लिजेंडरी होईल आणि आपण जिंकूसुद्धा.

<< रिपोर्टींग लाईव्ह फ्रॉम द स्टेडियम. >> हॅपी व्ह्यूइंग, भाचाजी ! मला आपुलकीच्या दोन-तीन ऑफर होत्या पण मीं त्या 'वेल-लेफ्ट' केल्या. आतां मजेपेक्षां त्रासाचं प्रमाण खूपच जास्त होतं म्हणून. अर्थात, स्टेडियममधे बसून मॅच पहाण्याचा आनंद वेगळाच असतो व माझ्यासारख्यांच्या तर अगणित सुखद आठवणीना तिथं उजाळाही मिळतो !

थँक्स भाऊ! आम्हालाही अशाच आठवणी मिळोत!

पहिल्या दोन ओव्हर माझे इम्प्रेशन- भुवी हिटींग गुड लाईन, उमेश बॉलिंग टू शॉर्ट. कोहली पब्लिकला आवाज करायला प्रोत्साहन देतोय!

विकेट जात नसल्याने हतोत्साह क्राऊड पुन्हा जागे व्हावे म्हणून सचिनच्या फेअरवेल इमेजेस स्क्रीनवर दाखवल्या बहुधा! 'सचिन सचिन' एकोइंग इन स्टेडियम!

पहिला तास संपला. ड्रिंक्स ब्रेक. कूक आणि जेनिंग्स खूपच खात्रीने खेळतायत.

चेंज ऑफ एंड वर्क्स! रूट गॉन. जडेजा पुटींग प्रेशर फ्रॉम अदर साईड. आश्विन शोइंग गाईल पोस्ट-लंच. इंग्लंड स्लाईटली डळमळीत वाटायला लागलेत. एकाएकी क्राऊड जागी झाली!

आज कुक क्रीजच्या बाहेर येवून फिरकी खेळत होता . त्यांतच त्याची विकेट गेली, तरीही धांवा झाल्या. जेनींग्जच्या खेळात आक्रमण व बचाव याचं छान मिश्रण पहायला मिळतं. त्याचा रिव्हर्स स्वीप तर अप्रतिम. कुक व रूट गेल्याने शक्य असूनही इंग्लंडला ४००ची मजल मारणं कठीण दिसतंय. बघूंया काय होतंय .

होय, भारताने ह्या सेशनमध्ये स्कोरींग आटोक्यात आणले, हे बरे केले. ऑफ द पिच, किंवा इन द एअर मूव्हमेंटच नाही. युज्वल स्विंग नाही, अन रिव्हर्सही नाही. चहापानानंतर विकेट जाण्याची भारतीय परंपरा कायम राहो, ही आशा.

जेनिंग्स अप्रतिमच खेळला. तुम्ही म्हणता ते आक्रमण व बचाव मिश्रण अगदी योग्य. मुंबईकर रसिकांनीही त्याला उभे राहून दाद दिली. फार छान वाटलं. Happy

आताचा लास्ट बॉल काहीतरी जबरदस्तच फिरवला आश्विनने.. ईंग्लंडला लवकर गुंडाळणे गरजेचे

समोरच्या ओवर स्किप करून फक्त आश्विनच्या ओवर बघाव्याश्या वाटत आहेत..

चार दिवसांत संपवायची आहे म्याच.. सोमवारी ऑफिसला जायचेय..

अजून एक विकेट मिळाली असती, तर दिवस आपला म्हणायला हरकत नव्हती. एक तरी रिव्ह्यू आपल्या बाजूने जायला हवा होता. पण ठीक आहे. उद्या होपफुली सीमर्सना जास्त मदत मिळेल.

बाय द वे, मुंबईचा एकही खेळाडू मुंबई टेस्टच्या प्लेइंग ११ मध्ये नसण्याची ही इतिहासातली पहिलीच वेळ.

Pages