Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 04:33
क्रिकेटवरील पहिले तीन धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या बरीच झाली आहे. बर्याच दिवसांत तिथे कोणी काही म्हटलेलेही नाही. सध्याच बर्याच सिरीज संपल्यात, तर काही नव्याने सुरू होतायत. त्यामुळे नवीन धागा काढायला हा आयडियल टाईम आहे. आता क्रिकेट टॉक इथे करूया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
<<भाऊ seriously pl tell tell
<<भाऊ seriously pl tell tell me you are not suggesting to roll out green tops for England ? >> ' ग्रीन टॉप' व पहिल्या दिवसापासून हातभर चेंडू वळेल अशी विकेट, हे फक्त दोनच टोंकाचे पर्याय असतात का खेळपट्टीसाठी ? कसोटी सामन्यात स्पर्धक संघांचं सर्व प्रकारचं कसब पणाला लागेल अशा विकेट असाव्यात, इतकंच माझं म्हणणं आहे . व 'होम अॅडव्हांटेज'ला वाव देवूनही अशा विकेटस असूं शकतात. पण पूर्णपणे फक्त स्वतःलाच फायदा होईल अशा एकतर्फी विकेट बनवणे [ जें आपण गेलीं तीन वर्षं करतोय ], तें मला खटकतं व तेंही कसोटी क्रिकेट व आपल्या क्रिकेटचंच त्यांत नुकसान आहे म्हणून !
]
[ असामीजी, किती वेळां तुम्ही मला या मुद्द्यावर असं आरोपीच्या पिंजर्यात उभं करून हेंच शपथपूर्वक सांगायला लावणार अहात ?
किती वेळां तुम्ही मला या
किती वेळां तुम्ही मला या मुद्द्यावर असं आरोपीच्या पिंजर्यात उभं करून हेंच शपथपूर्वक सांगायला लावणार अहात ? >> जोवर तुम्ही फक्त भारतीय संघाला ह्या पिंजर्यात उभे करणार आहत तोवर.
हे सर्वत्र चालते त्यामूळे एकाच देशाकडून अशी अपेक्षा करून कसोटी क्रिकेटचे नुकसान होउ नये असे म्हणणे अनफेअर वाटते.
राहुलला दुसर्या टेस्ट साठी
राहुलला दुसर्या टेस्ट साठी पंधरांमधे घेतलय नि विझाग मधेच त्याचे शतक झळकावलेय त्यामूळे गंभीर ऐवजी राहुल ह्यावर जवळजवळ शिक्कमोर्तब झालेले दिसतेय.
<< हे सर्वत्र चालते त्यामूळे
<< हे सर्वत्र चालते त्यामूळे एकाच देशाकडून अशी अपेक्षा करून कसोटी क्रिकेटचे नुकसान होउ नये असे म्हणणे अनफेअर वाटते.>> या बाबतींत, मीं फक्त माझ्या प्रिय देशाच्या आवडत्या संघाबद्दलच्याच अपेक्षा पूर्ण झाल्याचा आनंद व अपेक्षाभंगाचं दु:ख व्यक्त करूं शकतो [ व हें मीं चार तपांहून अधिक काळ करतोही आहे !
] !!
भाऊ कदाचित हि वरायटी हाच
भाऊ कदाचित हि वरायटी हाच कसोटी क्रिकेटचा खरा इसेन्स आहे असा विचार करून बघा. सर्वत्र एकाच प्रकारच्या विकेट्स यायला लागल्या तर त्यात काय मजा ? मधेच येणार्या एखाद्या माईनफिल्ड वर जेंव्हा एखादा फलंदाज रोवून उभा राहतो तेंव्हा त्याचा कसबावर खरे शिक्कमोर्तब होते असे मला वाटते. तुम्ही म्हणता " पूर्णपणे फक्त स्वतःलाच फायदा होईल अशा एकतर्फी विकेट बनवणे [ जें आपण गेलीं तीन वर्षं करतोय ]" आता तीन वर्ष एकाच प्रकारे आपण जिंकतोय (तीनच कशाला हे त्याआधीपासून सुरू आहे ) पण हे लक्षात येऊनही इतर देश त्यावर उपाय शोधू शकत नसतील तर त्याचा दोष नक्की कोणावर जातो ? आणि आपल्यालाच फायदा होईल म्हणजे नक्की काय ? आपल्याकडे दोन चांगले फिरकी गोलंदाज आहेत. आपण बाहेर गेलो कि त्यांच्यासाठी कुठलाही देश फिरकीला सहाय्य देइल अशा विकेट्स बनवत नाही. आपण बनवल्या तर कसोटी क्रिकेट चे नुकसान हे थोडे अती होत नाही का ?
परत फिरकी पिचेस वर टॉस जिंकणे तर रँडमच आहे. आपण द्सरी बॅटीम्ग करूनही जिंकून दाखवले आहे. अनिर्णितही ठेवलेले आहेत. समोर आहे त्या पिचला आपला खेळ अॅडॉप्ट करणे हे अधिक कसबाचे काम नाही का ? आपण देशाबाहेर गेलो कि ते करतो किमान करायचा प्रयत्न करतो. तीच अपेक्षा बाहेरून इथे येणार्या संघांकडून ठेवायला हरकत नसावी.
<< मधेच येणार्या एखाद्या
<< मधेच येणार्या एखाद्या माईनफिल्ड वर जेंव्हा एखादा फलंदाज रोवून उभा राहतो तेंव्हा त्याचा कसबावर खरे शिक्कमोर्तब होते असे मला वाटते.>> 'मधेच येणार्या एखाद्या माईनफिल्डवर' मीं समजूं शकतो व त्याबाबत मीं आपल्याशी सहमतही आहे. पण सतत अख्ख्या दौर्यावर आपण तशा विकेटसवर पाहुण्याना खेळायला लावतों, हें मला खटकतं. केवळ नाचायच्या कसबावर शिक्कामोर्तब होण्यासाठी 'शोले'मधल्यासारखं कांचा पेरून ठेवून त्यावर नामांकित नर्तकीला सतत नाचायला लावण्यासारखंच वाटतं मला हें !!
पण सतत अख्ख्या दौर्यावर आपण
पण सतत अख्ख्या दौर्यावर आपण तशा विकेटसवर पाहुण्याना खेळायला लावतों >> असे कधी झाले नक्की भाऊ ? प्रत्येक सिरीजमधे एखादाच असा सामना असेल अशा पिच वर. किवीज विरुद्ध तर एकही नव्हता. न्यूझीलंड, इंग्लंडमधे बॉल बनाना स्विंग होताना किंवा down under मधे जबरदस्त बाउन्स होत असतानाही असेच नृत्य चालते. सिडनी किंवा एगबॅस्टन सारखा एखादा अपवाद असतो. असो आपण सध्या agree to disagree म्हणूयात, ............. पुढच्या सामन्यापर्यंत (जो विझाग मूळे असल्यामूळे राजकोट पेक्षा अधिक स्पिन होइल हे उघड आहे)
<< असो आपण सध्या agree to
<< असो आपण सध्या agree to disagree म्हणूयात, .>> अगदीं खरंय. नाही तरी माझी बायको व मुलगी म्हणतच असतात मला,' हल्लीं हट्टीपणा फारच वाढलाय तुमचा; म्हातारपण लहानपणासारखंच असतं हें सिद्ध करताय वाटतं ! '
LOL भाऊ. विनोदाचा भाग सोडून
LOL भाऊ. विनोदाचा भाग सोडून तुम्ही लेग स्पिनर बद्दल काहीच लिहिले नाहि ह्यावेळी म्हणून आश्चर्य वाटले. मिश्रा फारच विचित्र खेळला हा सामना.
<< तुम्ही लेग स्पिनर बद्दल
<< तुम्ही लेग स्पिनर बद्दल काहीच लिहिले नाहि ह्यावेळी >> Admittedly, I have a soft corner for 'leg spin'; पण संघात स्थान मिळवण्याइतकं कसब व फॉर्म असल्याशिवाय केवळ लेग-स्पीनर संघात हवाच म्हणून एक लेग-स्पीनर घ्यावाच असा माझा दुराग्रह मात्र नाही.
तसे नाही भाऊ. मिश्रा ODI चे
तसे नाही भाऊ. मिश्रा ODI चे यश घेऊन टेस्ट मधे खेळत होता. कधी नव्हे ते, तो भंयकर कंसिस्टसी दाखवत होता. लेगस्पिनर ना हवा तसा पाथींबा नि aggressive field setup देणारा कप्तान नि भारताचा सर्वात यशस्वी लेग्स्पिनर कोच म्हणून आहे. एव्हढे सगळे असतानाही पण पहिल्या टेस्ट्मधे मूळचा मिश्रा उफाळून आला. का ? दडपण ?
असामीजी, << नि भारताचा सर्वात
असामीजी, << नि भारताचा सर्वात यशस्वी लेग्स्पिनर कोच म्हणून आहे.>> याचा फारसा संबंध नसावा कारण कुंबळे व मिश्रा हे अत्यंत भिन्न प्रकारचे लेग-स्पीनर आहेत. दडपण - विशेषतः संघातलं स्थान निश्चित नसल्याचं - हें कारण असूं शकतं. शिवाय,, मिश्रा हा शेन वॉर्नच्या दर्जाचा लेग-स्पीनर नक्कीच नाही व त्यामुळे खेळपट्टीची साथ अपेक्षेपेक्षां कमी पडली तर त्याच्या मर्यादा उघड पडणं स्वाभाविक असावं [जें गेल्या कसोटीत आपल्या इतर स्पिनर्सच्याबाबतीतही कमी-अधिक प्रमाणात घडलंच ].
या बाबतींत, मीं फक्त माझ्या
या बाबतींत, मीं फक्त माझ्या प्रिय देशाच्या आवडत्या संघाबद्दलच्याच ................. व्यक्त करूं शकतो
बरोब्बर. यालाच देशभक्ति म्हणतात.
जगात आजकाल खर्याची, दुनिया नाही. फसवाफसवी करून का होईना जिंकल्याशी कारण!! असामी, इथे काय वाट्टेल ते धंदे करून ट्रंप जिंकला यावरून बोध घ्या. अश्या जगात रहायचे तर प्रथम आपण काय वाट्टेल ते करून एकदम सुपर पॉवर बनायचे, मग हवे तसे करायला मुभा. वाटल्यास एक वेळा ऑस्ट्र्लिया, इंग्लंडसारख्या विकेट्स करून त्यांना जिंकू द्यावे! फुक्कट मिशीला तूप लावून फुशारकी मारायला लागले की आपण कुजकट हसायचे.
तर भाऊ, , हा वाद बंद करा - एक, दोन झक्कास व्यंगचित्रे टाका! तेच खरे.
२ बाद २२ अत्यन्त खराब
२ बाद २२ अत्यन्त खराब सुरुवात!
गंभीर ला बसवून राहुल ला घेतले तरी परिस्थिती गंभीर!
लंच पर्यंत पुजारा आणि कोहलीने
लंच पर्यंत पुजारा आणि कोहलीने अजून पडझड होणार नाही याची काळजी घेतली आहे. आता दुसरे सत्र खुप महत्वाचे आहे.
जर ही विकेट पोषक असेल [ व तसं
जर ही विकेट पोषक असेल [ व तसं वाटतंही आहे], तर पहिल्या डावाच्या स्कोअरला निर्णायक महत्व येवूं शकतं. दोन विकेट लवकर गेल्या तरीही आतां पुजारा-कोहली जोडीचा खेळ आश्वासक वाटतो आहे. [ आपली पहिली विकेट परंपरेनुसार ऑफ-स्टंपबाहेरच्या मार्याला बॅट घालण्याच्या संवयीमुळे गेली पण दुसरी मात्र एका अप्रतिम, किंचितच आंखूड टप्प्याचा असलेल्या उसळत्या चेंडूवर !]
पुजारा व कोहली दोघांचही
पुजारा व कोहली दोघांचही मनःपूर्वक अभिनंदन, त्यांच्या सुरेख शतकांबद्दल !
दिवस अखेर रहाणे ने इंग्रजांना
दिवस अखेर रहाणे ने इंग्रजांना दिलासा दिला थोडा!
रहाणे नीड्स टू क्विकली गेट
रहाणे नीड्स टू क्विकली गेट हिज अॅक्ट टूगेदर. जर भारत ५ बॅट्समेन घेऊन खेळणार असेल, तर त्यापैकी तिघांना तरी जवाबदारीने खेळले पाहीजे. दर वेळी अश्विन खेळेल ही अपेक्षा योग्य नाही (सरांकडून अपेक्षा च नाहीत). रहाणे माझा अत्यंत आवडीचा फलंदाज आहे कारण तो तंत्रशुद्ध आहे, बरेच वेळा जवाबदारी ओळखून खेळलाय आणी म्हणूनच त्याच्याकडून अपेक्षा जास्त आहेत. त्यातून तो ज्या क्रमांकावर खेळतो, ती जागा खूप महत्वाची आहे.
विको आणी पुजारा अप्रतिम खेळले. शक्यतो भारताला एकदाच बॅटींग करावी लागली तर चांगलं होईल.
मिश्रा ला ड्रॉप करण्याचा निर्णय थोडासा अपेक्षित होता, पण अजून एक संधी दिली असती तर कदाचित चाललं असतं असं वाटून गेलं.
मिश्रा ला ड्रॉप करण्याचा
मिश्रा ला ड्रॉप करण्याचा निर्णय थोडासा अपेक्षित होता, पण अजून एक संधी दिली असती तर कदाचित चाललं असतं असं वाटून गेलं. >> इंग्लंड ७ लेफ्टी बॅट्समन घेऊन खेळतेय नि त्याचा पहिल्या टॅस्टमधला एकंदर फॉर्म पाहता म्हटल्यावर मिश्रा बाहेर जाणे साहजिक होते. फक्त ह्याचे दडपण यादव वर येऊ नये म्हणजे मिळवली.
जर भारत ५ बॅट्समेन घेऊन खेळणार असेल, तर त्यापैकी तिघांना तरी जवाबदारीने खेळले पाहीजे. >> +१. राहुलने शून्या काढल्यामूळे दुसर्या इनिंगमधे नीट खेळेल असे धरूया.
अँडरसन कमाल माणूस आहे.
अँडरसन कमाल माणूस आहे. >> +१
अँडरसन कमाल माणूस आहे. >> +१ , मजा येते त्याची स्विंग बॉलिंग बघायला. आणि एक वकार होता.. बनाना स्विंग यॉर्कर. बॉलिंगही नेत्रसुखद होते
"अँडरसन कमाल माणूस आहे." -
"अँडरसन कमाल माणूस आहे." - सहमत.
रहाणे ची विकेट पाहिली. विकेट-टेकिंग बॉल होता तो.
अजुन दिडशे वैगेरे धावा! सामना
अजुन दिडशे वैगेरे धावा! सामना भारताच्या बाजुने आणण्यात सहाय्यक ठराव्यात खेळपट्टीचा रंग बघता!
<< "अँडरसन कमाल माणूस आहे." -
<< "अँडरसन कमाल माणूस आहे." - १ ! काल सुरवातीच्या षटकांत ऑफ स्टंपच्या बाहेरचा त्याचा मारा इतका नेमका होता कीं ऑस्ट्र्लियाच्या मॅग्राची सतत आठवण येत होती !
'अनइव्हन बाउन्स' दिवसेंदिवस फलंदाजांसाठी अधिकाधिक डोकेदुखी ठरेल असं वाटतंय.
४५० ची, कमीत कमी ४००+ची,
४५० ची, कमीत कमी ४००+ची, अपेक्षा होती पण ३६७-७ ही धांवसख्या व चेंडू ज्या तर्हेने वळायला लागलाय तें पहातां आतां तें कठीण वाटतंय. पण खेळपट्टीची लक्षणं पहातां आहे तो स्कोअरही भारताला वरचढ ठरवेल अशी अपेक्षा .
४००-७ !! प्लेझन्ट सरप्राईझ
४००-७ !! प्लेझन्ट सरप्राईझ !!!
अश्विन नेहमीप्रमाणे यावेळी
अश्विन नेहमीप्रमाणे यावेळी सुध्दा जबाबदारीने बॅटिंग करतोय. त्याला यादवने सुरेख साथ दिली आहे. ४५०+ होतील अशी अपेक्षा आहे.
(सरांकडून अपेक्षा च नाहीत)>>>. खरं आहे. आणि ते सिध्द सुद्दा झाले.
(सरांकडून अपेक्षा च
(सरांकडून अपेक्षा च नाहीत).>>>>> सरांनी आपली नसलेली अपेक्षा सार्थ ठरविली!
४५० च्या आसपास धावा निर्णायक ठरव्यात खेळपट्टीचा नूर बघता!
त्या मुळेने ह्या डावात देखिल
त्या मुळेने ह्या डावात देखिल मुळं रुजवली दिसतायेत भक्कम!
इंग्लंड ८०-५ !! यादवला कसोटीत
इंग्लंड ८०-५ !! यादवला कसोटीत पहिली विकेट !!
Pages