100 डेज - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 7 October, 2016 - 12:49

रात्रीस खेळ चाले निरोपतेय. त्याजागी 100 डेज ही नवी रहस्यमय मालिका सुरू होते आहे. त्याबद्दल हा धागा...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल अजय ठाकूर घरी आला तेव्हा दारात आई रांगोळी काढत होती, तो आत आला आणि शर्ट काढून अडकवला तेव्हा मी पाहिलं घड्याळात दुपारचे ३ वाजले होते.
दुपारी ३ वाजता रांगोळी? Uhoh

मोस्टली शेवटी ती जेवायला बोलावेल त्याला असं वाटतं त्याने प्रुव केलं की तीच गुन्हेगार आहे त्यानंतर, तो जाईल पण ती स्वतः विष वगैरे घेईल, तो पकडू नाही शकणार कारण ती वर जाईल.

कारण राणी आहे ती, तिला हरायचं नसतं. जिस्ममध्ये ती हिरोईन मरतेना पण हिरोला नाही मारत. तसं असेल असं जास्त करून वाटतं. १०० वा बघेन.

पण पुढे आई विचारते ना त्या ढम्याला, संध्याकाळी परत बाहेर जायचंय का म्हणून. म्हणजे दुपारचे तीनच वाजले होते घड्याळात (शिरेलितल्या)

मोस्टली शेवटी ती जेवायला बोलावेल त्याला असं वाटतं त्याने प्रुव केलं की तीच गुन्हेगार आहे त्यानंतर>> झी वाल्याच्या लक्षात आहे का पण आमत्रण?एवढी सुसुत्रता करतील का मेन्टेन्ड?

प्राजक्ता Lol

१०० वा भाग बघणार आहे मी म्हणून आशा ठेवलीय दोन तीन शेवटांची. आशा अमर असते किंवा उम्मीदपे दुनिया कायम आहे म्हणतात ना त्यासाठी Wink .

बाय द वे आत्ता ते पं ने abp माझा वर तिच्या साड्या आणि ज्वेलरीज दाखवल्या सगळ्या, सिरीयलमधल्या आणि मस्त सांगत होती. सिरीयलपेक्षा लहान दिसत होती आणि गोड वाटली. मला ती फारशी आवडत नाही एरवी पण इथे आवडली.

मन्जुडे अगदी ब्राह्ममुहुर्तावर नाही पण रान्गोळी दोनप्रहरीच काढावी असा पण काही नियम नैय्ये बरं का Proud

मन्जुडे अगदी ब्राह्ममुहुर्तावर नाही पण रान्गोळी दोनप्रहरीच काढावी असा पण काही नियम नैय्ये बरं का Proud

दिसण उग्र आहे तिच पण मस्त कॉन्फिडन्सने वावरते, तिचा एक वेगळा स्पेशल लुक तयार केलाय तिने या सिरीलियत आणि राणीची भुमिकाही तिने पहिल्या भागापासुन उत्तम वठवलीये she owns 100 days मालिका.
एकदा मी ऑनलाइन बघत होते आणि नवरा डोकावला तो म्हणे हीने काय लिपस्टिक लावली की खाल्ली?

पुढच्या भागात अजय मेमाणेंना विचारतोय - सरदेसाई आणि विकीचा खुनी एकच आहे. कोण असेल हा खुनी?
अरे यार! हा काय क्विझ आहे का? सुसंगत तर्क मांडताना दिसतच नाही हा प्राणी कधी. त्याच्यापेक्षा आज पटवर्धनपण व्यवस्थित विचार करत होते Happy

प्रोमोत की कुठल्याशा सीनमधे पाहिलं की अजय ठाकूर सरदेसाईंच्या जवळच्या सर्व व्यक्तींचे फोटो एक एक करून मांडतो आणि म्हणतो की त्यांचा खुनी यांच्यापैकीच एक असणार. हा निष्कर्ष काढायला इतके दिवस लागले! Uhoh
मर्डर मिस्ट्रीतला `सिडक्शन' हा भाग आपल्याला काय भारी जमलाय या स्व-आनंदात लेखकाचं इतर गोष्टींकडे सपशेल दुर्लक्ष झालं आहे!
पण पर्वा कोण करतो. पुढल्या टायमाला सर्वोत्कृष्ट खलनायिका - तेजस्विनी पंडित !!

विकीला उडवलेला ट्रक ड्रायव्हर हातत सापडून सुद्धा त्याच्या कडून काहीही माहीती काढून घेता आली नाही? अगदी सराईत , निर्ढावलेले अतिरेकी सुद्धा पोलोसी खाक्या दाखवला की पोपटा सारखे बोलतात इथे तर साधा ट्रक ड्रायव्हर आहे, बर्फाच्या लादी वरची पाच मिनिटे किंवा टायर मध्ये घालून दिलेले पाच फटके पुरेसे आहेत.

अगदी असेच त्या तिवारी ड्रायव्हर बद्दल म्हणता येईल. तो मुळातच घाबरट (बाल बच्चे वाला) दाखवला आह , काना खाली एक सणसणीट लगावली असती तरी पुरेसे होते , तेही जमले नाही याचे आश्चर्य वाटते.

मुळात 'मिसिंग केस' मध्ये

व्यक्ती स्वत:च घरातुन पळून जाणे
व्यक्तीचे अपहरण होणे (खंडणी साठी)
व्यक्तीचा खून करुन प्रेत गायब करणे
व्यक्ती अपघात ग्रस्त होऊन कोठेतरी हॉस्पीटल अथवा अन्य ठीकाणि असहाय स्थितीत किंवा बेवारस अवस्थेत पडणे

असे प्र्कार होऊ शकतात.

खरे तर धनंजय हा पूर्ण दिनक्रम चॉक डाऊन करुन रिव्हर्स क्रोनोलॉजीकल ऑर्डर प्रमाणे तपास करता आला असता.

खरेतर पोलिसांना या नित्याच्या गोष्टी आहेत. 'मिसिंग ' कंम्प्लेंट आल्यावर ह्याच शक्यतांचा विचार व्हायला हवा होता.

मुळात हाय वे वर (आतल्या बाजुला असले तरी) एखादे प्रेत असेच दहा दिवस पडून राहाणे आणि त्याचा सुगावा न लागणे अशक्यच कारण प्रेताची दुर्गंधी अशी लपून राहणार नाही, दुसर्‍या तिसर्‍या दिवशीच ही गोष्ट लक्षात आली असती. धनंजय च्या मृत देहाचे म्हणून जे फोटो दाखवले ते दहा दिवसाच्या डेड बॉडिचे वाटतच नाहीत कारण अशी उघड्यावर टाकलेली डेडबॉडी दहा दिवसांनंतर अशी राहाणारच नाही, केव्हाच सडून - कुजून जाईल, कावळे ,. गिधाडे , कुत्री यांनी बराच भाग नष्ट करुन टाकला असता.

मला या सिरीयल च्या लेखकाची / दिग्दर्शकाची कीव करावीशी वाटते, इतके अ‍ॅम्यॅच्युअर लोक कसे काय असू शकतात. साधी जेम्स हॅडली चेझ ची पुस्तके डोळ्या खालून घातली असती तरी हा प्लॉट बर्‍या पैकी खुलवता आला असता.

रिसर्च नामक काही प्रकार असतो हे या लोकांना माहीती नाही असे दिसते. एखाद्या अनुभवी / सेवा निवृत्त पोलिस अधिकार्‍याची मदत घेतली असती तर अशा प्रकारच्या गुन्हाचा तपास पोलिस कसा करतात या बद्दल निश्चित काही गाईड लाईन्स मिळाल्या असत्या आणी तयचा कथेत खुबीने वापर करुन घेता असता. एखाद्या वकीलाचा किंवा सी.ए. चा विचार घेऊन 'भागीदारी , विल ' याबद्दलच्या कायदेशीर बाबी समजाऊन घेता आलया असत्या.

मुळात अजय आणि त्याचा बॉस पोलिस अधिकारी वाटतच नाहीत , प्रत्यक्षातले पोलिस इतके मवाळ नसतत, बरेच कणखर, राकट काहीसे टगे असतात. 'अटेंशंस टू डिटेल्स' हाही प्रकार नाही, मेमाणे हवालदाराच्या युनिफॉर्म चा रंग आणि अजयच्या बॉस पासुन यच्च्यावत सर्व पोलिसांच्या युनिफॉर्म चा रंग यात मोठा फरक आहे.

suhasg Happy

सुहास छान पोस्ट. झीला माहीतेय काहीही दाखवलं तरी प्रेक्षक आहेत बघायला, त्यामुळे चालू आहे सर्व. प्रेक्षकांना गृहीत धरणं आणि प्रेक्षकांनी पण काहीही सहन करणं. अर्थात सगळीकडे तसंच आहे थोड्याफार प्रमाणात. असो. रिमोट आपल्या हातात असतो हे भाग्य, अर्थात तेपण स्वातंत्र्य नसेल कोणाला घरात. मला मात्र आहे. Happy

सर्व जण येऊन छोटारेंना रागावून जातात ! 'पोलीस ' असा शब्द ठाकूर 'पुलिस ' असा उच्चारतात.
पटवर्धन पण गेले ...अरे पुलिस काय करत आहेत ! नेहेमी शेवटी पोहोचतात .
ती पहिली बायको किती रडते. कंटाळा आला बाबा तिचा.>> थोडी ओव्हर ऍक्टिंग करते ती जरा .

पटवर्धन गेले म्हणजे? Uhoh
त्याना पण वरचं तिकीट दिलं का झी ने? Uhoh सगळ्यांना मारून शेवटी काय दाखवणार?
अजय ठाकूर आणि राणी सरदेसाई चा झिम्मा? Proud

ती पहिली बायको किती रडते. कंटाळा आला बाबा तिचा. >> राया अगदी अगदी बोअर होत अशानी
काल पटवर्धनचा पण राणीने गेम केला . आता पुढे कोण ? धनंजयच्या बहीण का बायको ? का त्या गायत्रीचे भाऊ ?राणीच बरं आहे . भसाभस मारत सुटल्येय सगळ्यांना. एका खुनाला शिक्षा तेवढीच आणि चार खुनाना पण तेवढीच असं असत ना ? आत्ता ती निर्ढावलेय

Pages