100 डेज - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 7 October, 2016 - 12:49

रात्रीस खेळ चाले निरोपतेय. त्याजागी 100 डेज ही नवी रहस्यमय मालिका सुरू होते आहे. त्याबद्दल हा धागा...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>ती पहिली बायको किती रडते. कंटाळा आला बाबा तिचा

म्हणुन तर धनंजयने सोडलं असणार तिला. Proud तिचे ते सोडलेले केस पण भयानक दिसतात.

काल पटवर्धनांनी ह्याला घरी या म्हटलं तेव्हा मी धास्तावलेच. राणीने गाणी ऐकवली आता हे काय करतात म्हणून. पण छोटारे लगेच बाईकवर स्वार होऊन एक्टेच गेले. बरोबर कोणाला कधी न्यायचं सुचतच नाही ह्याला. मग तिथून फोन करतात की टीम घेऊन या म्हणून. आणि टीम म्हणजे काय तर तो कॉन्स्टेबल आणि तो दुसरा इन्स्पेक्टर. धनंजयचं प्रेत सापडलं तेव्हा पटवर्धनांना संरक्षण पुरवायचं सुचलं नाही? मग प्रत्येक जण येऊन ह्यांना टिचकी मारून गेला. आता ह्याच्या साहेबांना आणखी किती प्रेशर येतंय वरून ते देवच जाणे. एव्हढ्या प्रेशरवर एव्हाना डाळ शिजली असती.
पटवर्धनांचा खून राणीने केला असेल असं मला वाटत नाहिये समहाऊ. ह्यात धनंजयचा तर हात नसेल?

पटवर्धनांनी आत्महत्या केली.
(कोणत्या तरी दुसर्‍या शिरेलीच्या तळाशी सरकत्या पट्टीवर "पटवर्धनांच्या आत्महत्तेला राणी जबाबदार असेल का?" अशी प्रेक्षकांकडे पृच्छा केली गेलेली स्मरते.)

>>पटवर्धनांनी आत्महत्या केली.

आं? मग घराभोवती कोणतरी आहे असं कसं म्हणत होते ते?

>>"पटवर्धनांच्या आत्महत्तेला राणी जबाबदार असेल का?" अशी प्रेक्षकांकडे पृच्छा केली गेलेली स्मरते

ह्या सिरियलच्या एका एपिसोडची पाच मिनिटं बघून मला आत्महत्या करावीशी वाटतेय ह्याला मात्र कोठारे आणि छोटारे दोघे जबाबदार. Angry

छोटारेंना म्हणावं आता 'अटक मटक चवळी चटक' करून एकदाचा खुनी शोधा.

फारच बाळबोध हाताळणी आहे ह्या सिरीयलची .... सुरु झाली तेंव्हा जरा अपेक्षा होत्या मात्र एकेका भागागणीक सगळ्या हवेत विरल्या!
थंड म्हणजे किती थंड असावे एखाद्या हिरोने.... आणि वरुन तो हिरो पोलीस इंस्पेक्टर!

काल त्या दोन हवालदारांना कशाला बोलवून घेतो तर दार तोडायला?..... लेका तुला तोडता येत नाही होय दार?

आणि मारायला आलेला माणूस गोळ्या बिळ्या घालायच्या सोडून ही असली विषाची परीक्षा का घेतोय म्हणे?

स्वप्ना च्या कॉमेन्टस भारी असतात,छोटारे ना मी इनीस्पेक्टरची कॅप घातलेली बघितली नाही कधी, बाकी खुनावर खुन होतायत आणी होमवर्क पाइलप व्हावा तस छोटारे आपला आता हा (शोध) करु का तो शोध) करु अस करतोय.

>>> छोटारे फारच सत्विक पोलिस वाटतो. गुणी बाळ ते.>>>

हे मात्र अगदी खरे ! कोणीही यावे बकाबका बोलून जावे याला काही नाही त्याचे, बॉस म्हणतो प्रेशर येतेय, हा गप्प. राणी त्याची बिनपाण्याने करतेय ,ते ही त्याच्या 'वुड बी' समोर, तरी हा थंडच ! ती मीरा सगळ्या स्टाफ समोर याची तासतेय तरी हा गप्पच !

काल मला एक खटकल असा कुठला इस्पेक्टर एखादी क्रिमिनल केस इतक्या डिटेल्स मधे घरातल्यांशी डिस्कस करतो?? तेही आधीच्या सगळ्या केसेसचा अनुभव असताना.
आता काय त्यांच्या मातोश्री त्यांना क्ल्यु देणार का खुन्याचा??

घरच्यांशी तर तो discuss करतोच.. पण त्या राणीला पण नको इतक्या details देत असतो फोनवर..

पटवर्धन पण मेले का?
आता धनंजयच्या ड्रायव्हरचा नंबर आधी लागेल की संगिताचा?
असंच एकेकाल मारत मालिकेच्या शेवटी राणीच मेलेली दाखवतील... कारण काय तर अजय ठाकूर जाळ्यात येत नाही म्हणून नैराश्य आल्याने आत्महत्त्या!

अगदीच बाळ्बोध सिरेल आहे. काय कामाचा नाही तो विन्सपेक्टर. तपासात काय दिवे लावतोय.
धडाधडा माणसं मरतात. राखेच्याच्या वरताण आहे हे.

मंजू Biggrin

छोटारे थंडक्काला कॉम्पीट करत आहात. एकुणच त्याचा तपासाचा वेग बघता मला तोच खून करतोय राणीशी संगनमत करुन असे वाटायला लागले आहे. Proud

मला तर काल अजय ठाकूर च्या आईचाच संशेव येऊ लागला होता Proud
म्हटलं ही बाई एकिकडे रांगोळी काढत दुसरीकडे एखाद्याला उडवून येत असेल.
भाजी टाकली की दुसरा... Proud

दक्षे Rofl

खरंतर एक मस्त तपास मालिका झाली असती ही. पण हे लुटुपुटुचा शोध करताहेत जसे काय. आणि तो फॅमिलीचा / गफ्रेचा, लग्नाचा ट्रॅक हवाच होता का? वैताग बाया आहेत त्या. आई, नेहा आणि तिची आई.

पण मी काय म्हणतो... Happy
असेही राणी ला शिक्षा देऊन कुणाला काय मिळणारे?
पहिल्या बायकोचा घटस्फोट झालाय..
पटवर्धन गेलेच...
राणी च्या नावाने विल आहे..
त्यापेक्षा अजय ने तिच्याशी डील करून टाकायची.. म्हणजे त्याला पण मस्त मोठा फ्लॅट घेता येईल, लग्न होईल, नेहा खूष, आई खूष, सासू खूष... सगळेच खूष.
फक्त त्या आधी अजय ला हे सर्व राणी ने केले आहे हे हे सिध्ध करावेच लागेल.. Happy
तीच्या जाळ्यात अडकण्याचे नाटक केल्याशिवाय पर्याय नाही..

तावडे नी आता केस काढून घ्यावी... म्हणजे अजय ला जरा मोटीवेशन मिळेल..

आता ४० दिवस झाल्यावर अजय आणि त्याच्या सहकार्‍यांना सुचतय घरातल्या नोकर चाकर अगदी राणीचेही फिंगर प्रिंटस घ्यायचेत. हे सुचायला तीन खून व्हावे लागले खरा खुनी सापडेपर्यंत फक्त राणीच राहिल बहुदा Lol

पटवर्धनांची प्रॉपर्टी राणीला कस्काय मिळणार बुवा?? Uhoh अस कुणी नातेवाईक नसतील तर कुणालाही मिळते का प्रॉपर्टी?? मग त्या मीरा आणि तिच्या वहिनीने काय घोडं मारलय?? ती वहिनी तर गरीब (स्वभाव-सम्पत्ती) आहे बिचारी Wink

धनंजय आणि पटवर्धन ह्यांच्या मधल्या कॉलचे ट्रान्स्क्रिप्ट? Uhoh
ठाकूर साहेबांनी धनंजय मरण्या अगोदर च ट्रान्स्क्रिप्ट ची रीक्वेस्ट दिली होती की प्लँचेट वरच्या कॉलचे ट्रान्स्क्रिप्ट होते ते?
अत्यंत कंडम रायटर आहे सिरीयल चा... Angry
आणि काय पण नाटकाचे प्रवेश वाचन चालले होते.... व्वा Biggrin

धनंजय आणि पटवर्धन ह्यांच्या मधल्या कॉलचे ट्रान्स्क्रिप्ट ?

अगदी बरोबर , हे तर बिगेष्ट ब्लंडर आहे , अब्जावधी सेल फोन वापरात आहेत , सगळ्या कॉल्स चे रेकॉर्डू6ग करायचे तर हिमालय पर्वता एव्हढी हार्ड ड्राईव्ह लागेल !

मला वाटते सेल फोन कंपनीला स्पेसिफीक रिव्केस्ट केली तर आणी तरच कॉल रेकॉर्ड केले जातत. धनंजय गायब होण्या आधीचे कॉल कसे काय रेकॉर्ड केले गेले !!

काहीही फेकतात हे लोक! शाळकरी पोरं आहेत !

>>धनंजय आणि पटवर्धन ह्यांच्या मधल्या कॉलचे ट्रान्स्क्रिप्ट?

अगदी अगदी. हेच लिहायला आले होते. आता कीव नाही येत त्यांची तर राग येतोय. ह्यात कुठलाही अभ्यास करायचा आळस आणि मूर्ख प्रेक्षक आम्ही काय दाखवतो ते पहातील ही घमेंड आहे. Angry

पटवर्धनांचा नैसर्गिक मृत्यू, खून आणि आत्महत्या असे सगळे पर्याय छोटारे आणि बाकी दोघांनी बोलून दाखवले. अ‍ॅक्सिडेन्ट हा पर्याय विसरले. घरातल्या घरात धडपडून डोक्यावर आपटून पटवर्धन मरु शकतात, नाही का? Happy अरे हे पोलिस आहेत का कोण? आधी काहीच केसेस नाही हॅन्डल केल्या का? वर नाटकाच्या मध्यंतरात असल्यासारखे चहा पीत गप्पा मारत होते. आता पुढचा बळी ह्यांच्या साहेबांचा जाणार - 'प्रेशर'मुळे. हे निवांत आहेत.

छोटारेंची आई तर एक अतरंगी आहे. त्याला झोपू पण नाही देत नीट. 'झोप नाही येत का' असं विचारून विचारून त्याची आलेली झोप घालवतेय. किती ती राणीची काळजी.

एव्हढ्या मोठया शहरात त्या राणीला छोटारे आणि नेहा बरे सापडतात नेहमी नेहमी.

मला तर वाटतंय आता छोटारेंनी आपल्या वडिलांच्या आत्म्याला प्लॅंचेट करून बोलवावं. तेच काहीतरी मदत करतील.

'पटवर्धनांचे लास्ट राईट्स मी केले म्हणून शेअर्स मला मिळू शकत नाहीत का?' हे तर्कट तर अजब आहे. Uhoh फक्त ह्या बाईच्या साड्याच बघणेबल आहेत.

Pages